Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 30, 2020

ऋषी कपूरच्या गाडीला कोल्हापुरात म्हशी आल्या आडव्या अन्‌...

कोल्हापूर - चाळीस वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतून ऋषी कपूर यांची गाडी कांडगावकडे निघाली होती. वाटेत म्हशी आडव्या आल्या आणि त्यांनी गाडी थेट संध्यामठ गल्लीत वळवली. इतक्‍यात भोईटेंच्या घरातील पमा आणि इतर मुलींनी ऋषी कपूरऽऽऽ ऋषी कपूरऽऽऽ असा गलका केला आणि तितक्‍याच तिथे गल्लीतली सारी मंडळी जमा झाली...बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ऋषी कपूर कोल्हापुरात होते. शहरासह कांडगाव (ता. करवीर), मरळी (ता. पन्हाळा) आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांच्याही भूमिका होत्या. नगरसेविका सुरेखा शहा यांनी यांचीही या चित्रपटात भूमिका होती. शिवाजी पेठेतील आठवण शाहीर राजू राऊत आणि राजू ढेंगे यांनी शेअर केली.

पाहा - ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह...

नाते तीन पिढ्यांचे...

भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो जयप्रभा स्टुडिओत. 'वाल्मिकी' या चित्रपटात नारद मुनींची भूमिका त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर येथे उभारलेला हा स्टुडिओ ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत मोलाचे योगदान देणारा ठरला.

मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्याविषयीच्या आठवणी आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतात. महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनी पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते.  

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ऋषी कपूरच्या गाडीला कोल्हापुरात म्हशी आल्या आडव्या अन्‌... कोल्हापूर - चाळीस वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतून ऋषी कपूर यांची गाडी कांडगावकडे निघाली होती. वाटेत म्हशी आडव्या आल्या आणि त्यांनी गाडी थेट संध्यामठ गल्लीत वळवली. इतक्‍यात भोईटेंच्या घरातील पमा आणि इतर मुलींनी ऋषी कपूरऽऽऽ ऋषी कपूरऽऽऽ असा गलका केला आणि तितक्‍याच तिथे गल्लीतली सारी मंडळी जमा झाली...बॉलीवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रदीर्घ काळ चित्रपट रसिकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आणि त्यांच्या व एकूणच कपूर घराण्याविषयीच्या कोल्हापुरातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. दरम्यान, 1978 ला प्रदर्शित झालेल्या 'फुल खिले है गुलशन गुलशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ऋषी कपूर कोल्हापुरात होते. शहरासह कांडगाव (ता. करवीर), मरळी (ता. पन्हाळा) आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांच्याही भूमिका होत्या. नगरसेविका सुरेखा शहा यांनी यांचीही या चित्रपटात भूमिका होती. शिवाजी पेठेतील आठवण शाहीर राजू राऊत आणि राजू ढेंगे यांनी शेअर केली. पाहा - ऋषी कपूर अन् कोल्हापुरचं अनोख नातं... पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणासाठी असायचा आग्रह... नाते तीन पिढ्यांचे... भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर घराण्यावर कोल्हापूरकरांनी आणि कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. म्हणूनच 1996 साली 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो जयप्रभा स्टुडिओत. 'वाल्मिकी' या चित्रपटात नारद मुनींची भूमिका त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली आणि त्यानंतर येथे उभारलेला हा स्टुडिओ ऋषी कपूर यांच्या एकूणच कारकिर्दीत मोलाचे योगदान देणारा ठरला. मुळात चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. 'वाल्मीकी', 'महारथी कर्ण' आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणाऱ्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्याविषयीच्या आठवणी आजही येथील काही ज्येष्ठांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा तरळतात. महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते. त्यांनी पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरमासाठी शशी कपूर स्वतः आले होते.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SlsFRZ
Read More
महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा!

भारतासारख्या विशाल देशाचा महाराष्ट्र मुकुटमणी आहे. राज्याच्या विकासात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले आहे. भाजपचे ते महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री.आज महाराष्ट्राकडे अन्य राज्ये आदराने बघतात. जगातल्या पुढारलेल्या देशांनाही मागे टाकणारा जीडीपी दर अन् विकास महाराष्ट्राला साधायचा आहे. महाराष्ट्राविषयी आपल्या भावना त्यांनी सकाळच्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - हीरक महोत्सवी वाटचालीत महाराष्ट्राने काय कमावले आहे?
उत्तर - देशातल्या सर्व राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने महान ठरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र हा आपला लौकीक. बाहेर वावरताना तर तो अधिक प्रकर्षाने जाणवतो. योग्य आणि अचूक व प्रवाही निर्णय, कालसुसंगत धोरणे अन् या समीकरणांना वेग देणारे गतीमान प्रशासन ही महाराष्ट्राची 60 वर्षातील कमाई आहे. सकल उत्पन्न वाढते ठेवणे, सामाजिक क्षेत्रात पथदर्शी निर्णय घेणे हे सामूहिक यश, तर सर्वाधिक भारतरत्ने जन्माला घालणारे राज्य ही त्या-त्या व्यक्तींच्या प्रयत्नांनी मिळालेले ललामभूत कोंदण. आज साठ वर्षांचा टप्पा गाठताना महाराष्ट्राचे हे अभिमानगीत आनंद देतेय. 

पुढच्या दहा-वीस वर्षात महाराष्ट्र कुठे असायला हवा?
    भारतातल्या या राज्याशी बरोबरी करायची ईर्षा अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर बाहेरच्या देशांमध्येही निर्माण व्हायला हवी.

जरा नीट सांगा ना काय म्हणायचे आहे ते?
    आजच्या परिस्थितीतच सांगतो. सध्या कोरोनाचा कहर माजलाय. चीनमधील गुंतवणूक तेथेच मर्यादित न ठेवता ती बाहेरही विस्तारीत ठेवावी, असा बड्या कंपन्यांचा प्रयास आहे. जपानने तसे जाहीरही केलंय. संकट नेहमीच संधी घेवून येत असते. ही नवे पडाव शोधणारी गुंतवणूक महाराष्ट्राचे सर्वात मोठे शक्‍तीस्थळ ठरू शकते. ही गुंतवणूक आज युरोपात जावू शकत नाही. तेथील समस्या जगजाहीर आहेत. आफ्रिका अजून या संधी घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच ही गुंतवणूक आशियात येणार हे सरळ आहे. व्हिएतनामसारखे देश त्याचा लाभ घेण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्राने या संदर्भात पुढाकार घेतला, ईज ऑफ डुईंग बिझिनेसचे वातावरण निर्माण केले तर स्वप्नभूमीच्या शोधातल्या कंपन्यांना महाराष्ट्र तीर्थक्षेत्र वाटू शकेल. 

प्रगतीच्या वाटेवरची आव्हाने कोणती?
    आव्हानेही बरीच आहेत. जगाच्या रचना वारंवार बदलत असतात, त्यामुळे संपन्न प्रदेशांसमोरही आव्हाने असतातच. महाराष्ट्रात विकास सर्वदूर पसरलेला नाही. तो काही टापूतच मर्यादित आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विकास पोहोचवण्याचे आव्हान आहे. त्यावर सर्व पक्षांनी एकत्रित तोडगा काढावा. दुसरे मोठे अन् सर्वाधिक चिंतेचे आव्हान म्हणजे शाश्‍वत शेतीचे. सिंचन मर्यादित. त्यातच वातावरणात सध्या होत असलेले अनाकलनीय बदल.

पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेणारी क्‍लायमेट रिझीलियन्ट शेतीव्यवस्था निर्माण करणे आव्हान आहे. शेतीत कालसुसंगत बदल युद्धपातळीवर करावेत. पाण्याचे नियोजन हेही मोठे आव्हान. तुटीच्या खोऱ्यांचे जलनियोजन करण्यासाठी जास्त पाणी असलेल्या प्रदेशातून पाणी अभाव्याच्या प्रदेशात वळवावे लागेल. आपण राज्य म्हणून हे करू शकलो तर प्रगतीची फळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरतील. संघराज्यीय ढाच्यात राज्याराज्यांत स्पर्धा असतेच, ती निकोप असली की झाले. आयटीचा विचार केला तर ही स्पर्धा तेलंगणा, कर्नाटक, आंध्रशी आहे. उद्योगांबाबत बोलायचे तर गुजरात, तमिळनाडूशी, आरोग्य व्यवस्थापन अन् डिझास्टर मॅनेजमेंटबाबत बोलायचे तर केरळ, ओडिशाशी  स्पर्धा आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात आघाडी मिळवावी. 

महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीतले सर्वात महत्वाचे क्षण कोणते?
    अनेक आहेत. पण, सिंहावलोकन करताना आठवायच्या त्या चांगल्या बाबी. पायाभूत सुविधांसाठी आज सुरू असलेले श्रम आपली संपत्ती आहे. राज्यनिर्मितीचा क्षण महत्वाचा. माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. पण रोजगार हमी योजनेसारखा महत्वाचा कायदा महाराष्ट्रातून निर्माण झाला, तो दिवस सुवर्णाक्षरांचा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला तोही असाच संस्मरणीय. सेवा हमी कायद्याची मुहुर्तमेढ करणारा दिवसही सुवर्णक्षरांनी कोरावा असाच. कोयनेतील लेकटॅपिंगचा क्षणही मोलाचाच. आज राज्याच्या साठीचा हिरेजडित पाढा वाचताना मला स्मृतीकोशात साठवलेला एक क्षण तर आवर्जून आठवतोच आठवतो : दुष्काळी भागात लोकसहभागातून खणलेल्या कित्येक किलोमीटरच्या खड्ड्यात पावसाने हजेरी लावताच गंगा अवतीर्ण झाली तो. पाणी हेच जीवन आहे अन् महाराष्ट्रात पाणी आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा! भारतासारख्या विशाल देशाचा महाराष्ट्र मुकुटमणी आहे. राज्याच्या विकासात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले आहे. भाजपचे ते महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री.आज महाराष्ट्राकडे अन्य राज्ये आदराने बघतात. जगातल्या पुढारलेल्या देशांनाही मागे टाकणारा जीडीपी दर अन् विकास महाराष्ट्राला साधायचा आहे. महाराष्ट्राविषयी आपल्या भावना त्यांनी सकाळच्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रश्‍न - हीरक महोत्सवी वाटचालीत महाराष्ट्राने काय कमावले आहे? उत्तर - देशातल्या सर्व राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने महान ठरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र हा आपला लौकीक. बाहेर वावरताना तर तो अधिक प्रकर्षाने जाणवतो. योग्य आणि अचूक व प्रवाही निर्णय, कालसुसंगत धोरणे अन् या समीकरणांना वेग देणारे गतीमान प्रशासन ही महाराष्ट्राची 60 वर्षातील कमाई आहे. सकल उत्पन्न वाढते ठेवणे, सामाजिक क्षेत्रात पथदर्शी निर्णय घेणे हे सामूहिक यश, तर सर्वाधिक भारतरत्ने जन्माला घालणारे राज्य ही त्या-त्या व्यक्तींच्या प्रयत्नांनी मिळालेले ललामभूत कोंदण. आज साठ वर्षांचा टप्पा गाठताना महाराष्ट्राचे हे अभिमानगीत आनंद देतेय.  पुढच्या दहा-वीस वर्षात महाराष्ट्र कुठे असायला हवा?     भारतातल्या या राज्याशी बरोबरी करायची ईर्षा अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर बाहेरच्या देशांमध्येही निर्माण व्हायला हवी. जरा नीट सांगा ना काय म्हणायचे आहे ते?     आजच्या परिस्थितीतच सांगतो. सध्या कोरोनाचा कहर माजलाय. चीनमधील गुंतवणूक तेथेच मर्यादित न ठेवता ती बाहेरही विस्तारीत ठेवावी, असा बड्या कंपन्यांचा प्रयास आहे. जपानने तसे जाहीरही केलंय. संकट नेहमीच संधी घेवून येत असते. ही नवे पडाव शोधणारी गुंतवणूक महाराष्ट्राचे सर्वात मोठे शक्‍तीस्थळ ठरू शकते. ही गुंतवणूक आज युरोपात जावू शकत नाही. तेथील समस्या जगजाहीर आहेत. आफ्रिका अजून या संधी घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच ही गुंतवणूक आशियात येणार हे सरळ आहे. व्हिएतनामसारखे देश त्याचा लाभ घेण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्राने या संदर्भात पुढाकार घेतला, ईज ऑफ डुईंग बिझिनेसचे वातावरण निर्माण केले तर स्वप्नभूमीच्या शोधातल्या कंपन्यांना महाराष्ट्र तीर्थक्षेत्र वाटू शकेल.  प्रगतीच्या वाटेवरची आव्हाने कोणती?     आव्हानेही बरीच आहेत. जगाच्या रचना वारंवार बदलत असतात, त्यामुळे संपन्न प्रदेशांसमोरही आव्हाने असतातच. महाराष्ट्रात विकास सर्वदूर पसरलेला नाही. तो काही टापूतच मर्यादित आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विकास पोहोचवण्याचे आव्हान आहे. त्यावर सर्व पक्षांनी एकत्रित तोडगा काढावा. दुसरे मोठे अन् सर्वाधिक चिंतेचे आव्हान म्हणजे शाश्‍वत शेतीचे. सिंचन मर्यादित. त्यातच वातावरणात सध्या होत असलेले अनाकलनीय बदल. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेणारी क्‍लायमेट रिझीलियन्ट शेतीव्यवस्था निर्माण करणे आव्हान आहे. शेतीत कालसुसंगत बदल युद्धपातळीवर करावेत. पाण्याचे नियोजन हेही मोठे आव्हान. तुटीच्या खोऱ्यांचे जलनियोजन करण्यासाठी जास्त पाणी असलेल्या प्रदेशातून पाणी अभाव्याच्या प्रदेशात वळवावे लागेल. आपण राज्य म्हणून हे करू शकलो तर प्रगतीची फळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरतील. संघराज्यीय ढाच्यात राज्याराज्यांत स्पर्धा असतेच, ती निकोप असली की झाले. आयटीचा विचार केला तर ही स्पर्धा तेलंगणा, कर्नाटक, आंध्रशी आहे. उद्योगांबाबत बोलायचे तर गुजरात, तमिळनाडूशी, आरोग्य व्यवस्थापन अन् डिझास्टर मॅनेजमेंटबाबत बोलायचे तर केरळ, ओडिशाशी  स्पर्धा आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात आघाडी मिळवावी.  महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीतले सर्वात महत्वाचे क्षण कोणते?     अनेक आहेत. पण, सिंहावलोकन करताना आठवायच्या त्या चांगल्या बाबी. पायाभूत सुविधांसाठी आज सुरू असलेले श्रम आपली संपत्ती आहे. राज्यनिर्मितीचा क्षण महत्वाचा. माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. पण रोजगार हमी योजनेसारखा महत्वाचा कायदा महाराष्ट्रातून निर्माण झाला, तो दिवस सुवर्णाक्षरांचा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला तोही असाच संस्मरणीय. सेवा हमी कायद्याची मुहुर्तमेढ करणारा दिवसही सुवर्णक्षरांनी कोरावा असाच. कोयनेतील लेकटॅपिंगचा क्षणही मोलाचाच. आज राज्याच्या साठीचा हिरेजडित पाढा वाचताना मला स्मृतीकोशात साठवलेला एक क्षण तर आवर्जून आठवतोच आठवतो : दुष्काळी भागात लोकसहभागातून खणलेल्या कित्येक किलोमीटरच्या खड्ड्यात पावसाने हजेरी लावताच गंगा अवतीर्ण झाली तो. पाणी हेच जीवन आहे अन् महाराष्ट्रात पाणी आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f5JZUZ
Read More
महाराष्ट्र दिन : शाहिरांचा बुलंद आवाज, कोल्हापूरने दिला अभ्यासाचा साज...!

कोल्हापूर - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थाने खमका आवाज दिला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील शाहिरांनी. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख असोत शाहीर आत्माराम पाटील असोत किंवा कोल्हापूरचे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर अशा कैक शाहिरांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, या शाहिरांच्या पोवाड्यांचा विविधांगी अभ्यास केला तो येथील सध्याच्या शाहिरांनी. विविध पोवाड्यांचा केवळ संगीतात्मकच नव्हे तर रूपकात्मक अर्थही समजून सांगण्यात इथल्या शाहिरांनी पुढाकार घेतला आणि या नसांनसांत रोमांच उभे करणाऱ्या या पोवाड्यांतील विविध पैलू सर्वांसमोर आणले. हिरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आता नव्या पिढीसाठी हा अभ्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

- मैनेची पर्वा
नाही कुणा राहिली...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आजही साऱ्यांनाच तितकीच अंतर्मुख करणारी 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड. वरवर पहाता ही एक प्रेमकथा वाटत असली तरी ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि तत्कालीन एकूणच परिस्थितीवर भाष्य करताना ती मराठी माणसांची तळमळ अधोरेखित करते. अर्थात त्यासाठी मैनेचे रूपक अण्णाभाऊंनी वापरले होते. मात्र, नंतरच्या काळात ती केवळ मनोरंजनासाठीची एक प्रेमकथा असल्याचा समज वाढू लागला आणि अशा काळात या रचनेचा खरा अर्थ समजून सांगण्याची वेळ आल्यानंतर ही रचना समजून सांगण्यासाठी शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी त्यावर आधारित दुसरी रचना लिहिली आणि ती सर्वांसमोर आणली. आजही त्यांची ही "माझी मैना गावावर राहिली. तिची पर्वा कुणा नाही राहिली' ही रचना सर्वत्र नव्या पिढीसाठी हमखास सादर होते.

- गोंधळ संयुक्त
महाराष्ट्र चळवळीचा...

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर आत्माराम पाटील यांचा "संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा...' हा गोंधळ प्रचंड गाजला. अनेक दीर्घ पोवाडेही त्यांनी लिहिले. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या या शाहिरीचा तौलनिक अभ्यास संशोधनातून पहिल्यांदा पुढे आणला तो शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी. शाहीरी पोवाडा या पारंपरिक बाजाला कुठेही धक्का न लावता आत्माराम पाटील यांनी नवीन पोवाड्याचा बाज निर्माण केला. स्वतःची स्वतंत्र शैली, भूमिका घेवून त्यांनी शाहिरी केली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही आणि फारसे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांच्या रचना आणि सादरीकरणात शास्त्रीय संगीताचा कसा प्रभावी वापर झाला आहे, अशा विविध अंगांनी डॉ. नायकवडी यांनी हा अभ्यास मांडला आहे.

आजरेकर एकवटले

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचे मुळगाव आजरा तालुक्‍यातील महागोंड. राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषयात 1935 साली ते पदवीधर झालेले. नोकरीनिमित्त हे मुंबईला गेले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या एकूणच कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने समस्त आजरेकर एकवटले असून प्रत्येक वर्षी गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  

 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्र दिन : शाहिरांचा बुलंद आवाज, कोल्हापूरने दिला अभ्यासाचा साज...! कोल्हापूर - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थाने खमका आवाज दिला तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील शाहिरांनी. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख असोत शाहीर आत्माराम पाटील असोत किंवा कोल्हापूरचे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर अशा कैक शाहिरांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, या शाहिरांच्या पोवाड्यांचा विविधांगी अभ्यास केला तो येथील सध्याच्या शाहिरांनी. विविध पोवाड्यांचा केवळ संगीतात्मकच नव्हे तर रूपकात्मक अर्थही समजून सांगण्यात इथल्या शाहिरांनी पुढाकार घेतला आणि या नसांनसांत रोमांच उभे करणाऱ्या या पोवाड्यांतील विविध पैलू सर्वांसमोर आणले. हिरकमहोत्सवी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आता नव्या पिढीसाठी हा अभ्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. - मैनेची पर्वा नाही कुणा राहिली... लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आजही साऱ्यांनाच तितकीच अंतर्मुख करणारी 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड. वरवर पहाता ही एक प्रेमकथा वाटत असली तरी ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि तत्कालीन एकूणच परिस्थितीवर भाष्य करताना ती मराठी माणसांची तळमळ अधोरेखित करते. अर्थात त्यासाठी मैनेचे रूपक अण्णाभाऊंनी वापरले होते. मात्र, नंतरच्या काळात ती केवळ मनोरंजनासाठीची एक प्रेमकथा असल्याचा समज वाढू लागला आणि अशा काळात या रचनेचा खरा अर्थ समजून सांगण्याची वेळ आल्यानंतर ही रचना समजून सांगण्यासाठी शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांनी त्यावर आधारित दुसरी रचना लिहिली आणि ती सर्वांसमोर आणली. आजही त्यांची ही "माझी मैना गावावर राहिली. तिची पर्वा कुणा नाही राहिली' ही रचना सर्वत्र नव्या पिढीसाठी हमखास सादर होते. - गोंधळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा... संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर आत्माराम पाटील यांचा "संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा...' हा गोंधळ प्रचंड गाजला. अनेक दीर्घ पोवाडेही त्यांनी लिहिले. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या या शाहिरीचा तौलनिक अभ्यास संशोधनातून पहिल्यांदा पुढे आणला तो शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांनी. शाहीरी पोवाडा या पारंपरिक बाजाला कुठेही धक्का न लावता आत्माराम पाटील यांनी नवीन पोवाड्याचा बाज निर्माण केला. स्वतःची स्वतंत्र शैली, भूमिका घेवून त्यांनी शाहिरी केली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही आणि फारसे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांच्या रचना आणि सादरीकरणात शास्त्रीय संगीताचा कसा प्रभावी वापर झाला आहे, अशा विविध अंगांनी डॉ. नायकवडी यांनी हा अभ्यास मांडला आहे. आजरेकर एकवटले लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांचे मुळगाव आजरा तालुक्‍यातील महागोंड. राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषयात 1935 साली ते पदवीधर झालेले. नोकरीनिमित्त हे मुंबईला गेले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या एकूणच कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने समस्त आजरेकर एकवटले असून प्रत्येक वर्षी गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VSHgH2
Read More
समाजकारण राजकारण - शोषितांना न्याय; देशात आघाडी

महाराष्ट्राने साठ वर्षांच्या वाटचालीत समाजातील शोषितांना न्याय देण्यापासून ते प्रगल्भ राजकारण करून देशात प्रगतीचा नवा लौकीक आणि आदर्श निर्माण केला. प्रशासनात आघाडी घेत कल्याणकारी राज्य निर्माण केले.

असा बदलत गेला महाराष्ट्र
वर्ष                                         सन 1962         सन 2019           
सर्वसाधारण मतदारसंघ             217         234
अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ      33                  29
अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ        14                 25
एकूण विधानसभा मतदारसंघ                    264                 288
मतदान                                       60.36 टक्के            61.1 टक्के
पुरुष मतदारांची टक्केवारी                      65.17                62.77
महिला मतदारांची टक्केवारी                    54.17                59.26
एकूण मतदार                                1,93,95,795    8,98,38,267
हक्क बजावलेले मतदार                     1,17,०6,674    5,48,87,०49
एकूण उमेदवारांची संख्या                     1,161    3,237
पुरुष उमेदवारांची संख्या                      1,125       2,997
महिला उमेदवारांची संख्या                        36                   239
विजयी पुरुष उमेदवारांची संख्या                   251                264
विजयी महिला उमेदवारांची संख्या                 13                 24        

पूर्ण शहरी 92 आणि निमशहरी 31 अशी शहरी तोंडवळ्याच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या 123, तर ग्रामीण मतदारसंघ 165. 

गेल्या तीन दशकांमध्ये शहरी, निमशहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ. 

शहरी आणि निमशहरी विधानसभा मतदारसंघांची वाढती संख्या, सेवा क्षेत्राचा विकास, 18 वर्षांच्या तरुणाला मतदानाचा हक्क मिळाल्याने तरुण मतदारसंख्येत झालेली वाढ अशा साऱ्या कारणांमुळे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव राजकारणावर राहिलेला नाही. काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली स्थापना हेही त्यामागचे कारण.

महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येने निम्मा भाग (45.22 टक्के) व्यापला आहे. स्वाभाविकच शहरे राजकारणाची केंद्रे झालीत.

शहरी लोकसंख्या अधिक असलेल्या 20 शहरांपैकी मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर ही महाराष्ट्रातील शहरे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

समाजकारण राजकारण - शोषितांना न्याय; देशात आघाडी महाराष्ट्राने साठ वर्षांच्या वाटचालीत समाजातील शोषितांना न्याय देण्यापासून ते प्रगल्भ राजकारण करून देशात प्रगतीचा नवा लौकीक आणि आदर्श निर्माण केला. प्रशासनात आघाडी घेत कल्याणकारी राज्य निर्माण केले. असा बदलत गेला महाराष्ट्र वर्ष                                         सन 1962         सन 2019            सर्वसाधारण मतदारसंघ             217         234 अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ      33                  29 अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ        14                 25 एकूण विधानसभा मतदारसंघ                    264                 288 मतदान                                       60.36 टक्के            61.1 टक्के पुरुष मतदारांची टक्केवारी                      65.17                62.77 महिला मतदारांची टक्केवारी                    54.17                59.26 एकूण मतदार                                1,93,95,795    8,98,38,267 हक्क बजावलेले मतदार                     1,17,०6,674    5,48,87,०49 एकूण उमेदवारांची संख्या                     1,161    3,237 पुरुष उमेदवारांची संख्या                      1,125       2,997 महिला उमेदवारांची संख्या                        36                   239 विजयी पुरुष उमेदवारांची संख्या                   251                264 विजयी महिला उमेदवारांची संख्या                 13                 24         पूर्ण शहरी 92 आणि निमशहरी 31 अशी शहरी तोंडवळ्याच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या 123, तर ग्रामीण मतदारसंघ 165.  गेल्या तीन दशकांमध्ये शहरी, निमशहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ.  शहरी आणि निमशहरी विधानसभा मतदारसंघांची वाढती संख्या, सेवा क्षेत्राचा विकास, 18 वर्षांच्या तरुणाला मतदानाचा हक्क मिळाल्याने तरुण मतदारसंख्येत झालेली वाढ अशा साऱ्या कारणांमुळे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव राजकारणावर राहिलेला नाही. काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली स्थापना हेही त्यामागचे कारण. महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येने निम्मा भाग (45.22 टक्के) व्यापला आहे. स्वाभाविकच शहरे राजकारणाची केंद्रे झालीत. शहरी लोकसंख्या अधिक असलेल्या 20 शहरांपैकी मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर ही महाराष्ट्रातील शहरे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3d6FRCa
Read More
कॅमेरामॅनचा धसका; उपमुख्यमंत्र्यासह चार मंत्री झाले क्‍वारंटाईन 

बंगळूर : कन्नड वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनला झालेल्या कोरोना संसर्गामुळे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चिंतेत आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर आणि पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी कोरोना विषाणूची चाचणी घेतली आहे. या चौघांचा नकारात्मक अहवाल आला असला, तरी त्यांनी स्वत:हून विलगीकरणाचा (क्वारंटाईन) मार्ग स्वीकारला आहे. 

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ट्‌विट करून कॅमेरामॅनच्या संपर्कात आलेल्या सर्व मंत्र्यांना क्वारंटाईनमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सी. टी. रवी यांनी बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन पर्यटनच्या विकासासाठी खास पॅकेजची विनंती केली. त्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 23 एप्रिल रोजी या कॅमेरामनची तपासणी केल्यानंतर त्याला संसर्गाची पुष्टी झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांचे कॅमेरामनने जवळून चित्रीकरण केले आहे. कोरोना इन्फेक्‍शन मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार त्यांना अलग ठेवणे आवश्‍यक असल्याचे डी. के. शिवकुमार यांनी ट्‌विट केले आहे. सामान्य लोकांसाठी एक धोरण आणि सत्तेत असलेल्यांसाठी वेगळे धोरण दर्शविणारे उदाहरण असल्याचा आरोपीही त्यांनी केला. 

हे पण वाचा - जवानाला थर्ड डिग्री देणे पोलिस उपनिरीक्षकांना पडले चांगलेच महागात 

संक्रमित कॅमेरामनने 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालयाला भेट देऊन तेथील बैठकीचे चित्रीकरण कले. तर 21 एप्रिल रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालयात येऊन त्यांनी बैठकीस आलेल्या कन्नड आणि संस्कृती मंत्र्यांची प्रतिक्रिया (बाईट्‌स) घेतली. तर 22 एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या घरी जाऊन मुलाखतीचे चित्रीकरण केले असून त्याच दिवशी गृहनिर्माण मंत्र्यांचेही त्यांने बाईट्‌स घेतल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. 

हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                    

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कॅमेरामॅनचा धसका; उपमुख्यमंत्र्यासह चार मंत्री झाले क्‍वारंटाईन  बंगळूर : कन्नड वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनला झालेल्या कोरोना संसर्गामुळे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चिंतेत आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर आणि पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी कोरोना विषाणूची चाचणी घेतली आहे. या चौघांचा नकारात्मक अहवाल आला असला, तरी त्यांनी स्वत:हून विलगीकरणाचा (क्वारंटाईन) मार्ग स्वीकारला आहे.  दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी ट्‌विट करून कॅमेरामॅनच्या संपर्कात आलेल्या सर्व मंत्र्यांना क्वारंटाईनमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सी. टी. रवी यांनी बुधवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन पर्यटनच्या विकासासाठी खास पॅकेजची विनंती केली. त्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 23 एप्रिल रोजी या कॅमेरामनची तपासणी केल्यानंतर त्याला संसर्गाची पुष्टी झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांचे कॅमेरामनने जवळून चित्रीकरण केले आहे. कोरोना इन्फेक्‍शन मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार त्यांना अलग ठेवणे आवश्‍यक असल्याचे डी. के. शिवकुमार यांनी ट्‌विट केले आहे. सामान्य लोकांसाठी एक धोरण आणि सत्तेत असलेल्यांसाठी वेगळे धोरण दर्शविणारे उदाहरण असल्याचा आरोपीही त्यांनी केला.  हे पण वाचा - जवानाला थर्ड डिग्री देणे पोलिस उपनिरीक्षकांना पडले चांगलेच महागात  संक्रमित कॅमेरामनने 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालयाला भेट देऊन तेथील बैठकीचे चित्रीकरण कले. तर 21 एप्रिल रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालयात येऊन त्यांनी बैठकीस आलेल्या कन्नड आणि संस्कृती मंत्र्यांची प्रतिक्रिया (बाईट्‌स) घेतली. तर 22 एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या घरी जाऊन मुलाखतीचे चित्रीकरण केले असून त्याच दिवशी गृहनिर्माण मंत्र्यांचेही त्यांने बाईट्‌स घेतल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.  हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!                                                     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VQkG1u
Read More
कोरोना व्हायरसः प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग झालेल्या रुग्णाचा मृत्यू #5मोठ्याबातम्या
केंद्र पर सौतेला बर्ताव का आरोप, आज पंजाब कांग्रेस का ‘हर घर तिरंगा’ अभियान https://ift.tt/2z2VT1a
कोरोना पर दिल्ली ने बदली रणनीति, हॉटस्पॉट जोन में अब 14 दिन में 3 बार स्क्रीनिंग https://ift.tt/2KMoPx5
Horoscope Today, 1 May: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2YnxCO4
कोरोना: ट्रंप का WHO पर बड़ा हमला, बताया चीन की PR एजेंसी https://ift.tt/35jvrg9
मरीज बनकर एंबुलेंस से गया गाजियाबाद, निकाह करके ले आया दुल्हन https://ift.tt/3bZhQ04
महाराष्ट्र: CM की कुर्सी बचा पाएंगे राज्यपाल? SC पहुंच सकता है केस https://ift.tt/2xnrtq6
इंसानी त्वचा के लिए खतरनाक है डिसइन्फेक्शन टनल, हो सकता है कैंसर https://ift.tt/2YjdUmJ