Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 17, 2020

BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

March 17, 2020 0 Comments
साल 2020 फिल्मों के लिहाज शानदार नहीं रहा है। अजय देवगन की तानाजी द अनसंग वॅारियर को छोड़कर कोई भी कमाई के लिहाज से काबिल प्रदर्शन नहीं कर प...
Read More
BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

March 17, 2020 0 Comments
इन दिनों कोरोना का कहर हर शहर, हर देश पर बरपा हुआ है। विश्व स्वास्थ्य संगठन ने अब कोरोना को महामारी घोषित कर दिया है। लाखों जानें जा चुकी है...
Read More
बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

March 17, 2020 0 Comments
टाईगर श्रॉफ स्टारर बागी 3 बॉक्स ऑफिस पर दूसरे शुक्रवार भी 2.5 करोड़ की कमाई कर चुकी है। जबकि देश में कोरोना वायरस महामारी को लेकर काफी डर है...
Read More
BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

March 17, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में एक हफ्ता गुजार लिया है। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म की कमाई अच्छी रही है और...
Read More
BOX OFFICE: बागी 3 की धुआंधार रफ्तार, टाइगर की बिग सुपरहिट, 100 करोड़ सीधा पार !

BOX OFFICE: बागी 3 की धुआंधार रफ्तार, टाइगर की बिग सुपरहिट, 100 करोड़ सीधा पार !

March 17, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 दर्शकों के बीच अपनी पकड़ जमाए रखने में सफल हो रही है। अपनी दो पिछली सीरीज के कारण बागी 3 ने इस बार भी ...
Read More
BOX OFFICE: बॉलीवुड की टॉप 10 फिल्मों में शामिल अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

BOX OFFICE: बॉलीवुड की टॉप 10 फिल्मों में शामिल अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

March 17, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी ने सिनेमाघरों में सात हफ्तों से भी ऊपर राज किया है। बॉक्स ऑफिस पर 280 करोड़ का आंकड़ा पार कर चुकी है और इसी के स...
Read More
BOX OFFICE: होली पर बागी 3 की धुआंधार कमाई, टाइगर का तगड़ा रिकॅार्ड, डिटेल रिपोर्ट !

BOX OFFICE: होली पर बागी 3 की धुआंधार कमाई, टाइगर का तगड़ा रिकॅार्ड, डिटेल रिपोर्ट !

March 17, 2020 0 Comments
बागी फ्रैंचाइजी की तीसरी फिल्म बागी 3 अपने रिलीज के साथ पूरी तरह से कमा रही है। हालांकि कोरोनावायरल का असर बागी 3 पर नहीं होता हुआ दिखाई दे ...
Read More
आमदार वैभव नाईक का म्हणाले सतर्क राहा?

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशी सुचना आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना सदृश्‍य रूग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालय येथे आज आमदार नाईक यांनी आढावा बैठक घेत तालुक्‍यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतला.

यावेळी तहसीलदार रविंद्र नाचणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, सभापती सौ. नुतन आईर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी उपसभापती बबन बोभाटे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रमाकांत ताम्हाणेकर, शहरप्रमुख नितीन सावंत आदींसह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

आमदार नाईक यांनी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून आपल्या जिल्ह्यात त्याचा शिरकाव होऊ नये, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. परराज्य, परजिल्हा व अन्य भागातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांची प्रशासनाने माहीती घेऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवावा. खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी करावी.

नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयातच राहावे. आरोग्य विभागाने तालुक्‍यात पुरेशा प्रमाणात मास्क व सॅनिटायझरचा साठा उपलब्ध करावा. मास्क कमी पडल्यास त्याची तातडीने मागणी करावी तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन यांसह गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेऊन बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, आदी सुचना आमदार नाईक यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. डॉ. कांबळे यांनी तालुक्‍यातील बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे आरोग्य विभागामाफत पथके तैनात करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. शहरातही जनजागृती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

आजचा आठवडा बाजार बंद 
आजचा येथील बाजार बंद राहणार आहे, याची नोंद ग्रामीण भागातील जनतेनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार श्री. नाचोणकर यांनी केले. दरम्यान, मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी शहरात नगरपंचायतमार्फत आवश्‍यक ती खबरदारी व जनजागृतीच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्याचे स्पष्ट केले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आमदार वैभव नाईक का म्हणाले सतर्क राहा? कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशी सुचना आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना सदृश्‍य रूग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालय येथे आज आमदार नाईक यांनी आढावा बैठक घेत तालुक्‍यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतला. यावेळी तहसीलदार रविंद्र नाचणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, सभापती सौ. नुतन आईर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी उपसभापती बबन बोभाटे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रमाकांत ताम्हाणेकर, शहरप्रमुख नितीन सावंत आदींसह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.  आमदार नाईक यांनी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून आपल्या जिल्ह्यात त्याचा शिरकाव होऊ नये, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. परराज्य, परजिल्हा व अन्य भागातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांची प्रशासनाने माहीती घेऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवावा. खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी करावी. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयातच राहावे. आरोग्य विभागाने तालुक्‍यात पुरेशा प्रमाणात मास्क व सॅनिटायझरचा साठा उपलब्ध करावा. मास्क कमी पडल्यास त्याची तातडीने मागणी करावी तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन यांसह गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेऊन बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, आदी सुचना आमदार नाईक यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. डॉ. कांबळे यांनी तालुक्‍यातील बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे आरोग्य विभागामाफत पथके तैनात करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. शहरातही जनजागृती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.  आजचा आठवडा बाजार बंद  आजचा येथील बाजार बंद राहणार आहे, याची नोंद ग्रामीण भागातील जनतेनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार श्री. नाचोणकर यांनी केले. दरम्यान, मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी शहरात नगरपंचायतमार्फत आवश्‍यक ती खबरदारी व जनजागृतीच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्याचे स्पष्ट केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UlxmvE
Read More
दुर्दैवी! वेळीच वनखाते पोचले असते तर....

बांदा (सिंधुदुर्ग) -  गाळेल-वरचीवाडी येथील काजू बागायतीत असलेल्या ओहोळात आज सकाळी जखमी अवस्थेत आढळलेल्या सांबराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांबराच्या शरीरावर जखमा असल्याने जंगलातील झटापटीत सांबर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे; मात्र पाठीवरील जखमा खोल असल्याने शिकारीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी वेळेत घटनास्थळी दाखल न झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी विलास नाडकर्णी हे आपल्या घरालगत असलेल्या काजू बागायतीमध्ये गेले असता त्यांना एक भलेमोठे सांबर ओहोळातील अडचणीत जखमी दिसले. त्यांनी याची कल्पना पोलिसपाटील चंद्रकांत बांदेकर यांना दिली. श्री. बांदेकर यांनी तत्काळ येथील पोलिस व वनखात्याला खबर दिली.

तब्बल दोन तास वनखात्याचा कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहचला नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. पाठीवर जखमा असल्याने व पाठीमागील दोन्ही पाय जायबंदी असल्याने सांबर वेदनेने विव्हळत होते. सकाळी 9 वाजता वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यु टिमचे अनिल गावडे, तुषार विचारे, वैभव आमडोसकर, वनविभागाचे दत्तात्रय शिंदे, वनरक्षक संतोष गोजारे, रमेश पाटील, शशिकांत देसाई, मनोहर गावडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप संसारे घटनास्थळी दाखल झाले. सांबरावर प्राथोमपचार करण्यात आले. सावंतवाडी येथे उपचारासाठी आणले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. सावंतवाडी या सांबरावर अंत्यविधी करण्यात आले. 

जखमांबाबत संशय 
जखमी सांबराच्या पाठीवर व पायावर खोल जखमा होत्या. या परिसरात सांबराची मोठ्या प्रमाणात शिकार होते. या सांबरावर शिकारीच्या उद्देशाने हल्ला केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती; मात्र जंगलात झालेल्या झटापटीत जखमा होण्याची शक्‍यता डॉ. संसारे यांनी व्यक्त केली. सावंतवाडीत अधिक उपचार करताना जखमांबाबत स्पष्टता होईल, असे त्यांनी सांगितले. 

स्थानिकांचे मदतकार्य 
वनखात्याचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने वनरक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. स्थानिकांनी मदतकार्य केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संसारे यांनी पत्रकारांना वृत्तसंकलन व छायाचित्रण करताना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त स्थानिकांनी वनरक्षकांना धारेवर धरत वरिष्ठ उपस्थित नसल्याबाबत जाब विचारला. सांबराला नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्याने सांबर तब्बल एक तास विव्हळत होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दुर्दैवी! वेळीच वनखाते पोचले असते तर.... बांदा (सिंधुदुर्ग) -  गाळेल-वरचीवाडी येथील काजू बागायतीत असलेल्या ओहोळात आज सकाळी जखमी अवस्थेत आढळलेल्या सांबराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांबराच्या शरीरावर जखमा असल्याने जंगलातील झटापटीत सांबर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे; मात्र पाठीवरील जखमा खोल असल्याने शिकारीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही. वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी वेळेत घटनास्थळी दाखल न झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी विलास नाडकर्णी हे आपल्या घरालगत असलेल्या काजू बागायतीमध्ये गेले असता त्यांना एक भलेमोठे सांबर ओहोळातील अडचणीत जखमी दिसले. त्यांनी याची कल्पना पोलिसपाटील चंद्रकांत बांदेकर यांना दिली. श्री. बांदेकर यांनी तत्काळ येथील पोलिस व वनखात्याला खबर दिली. तब्बल दोन तास वनखात्याचा कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहचला नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. पाठीवर जखमा असल्याने व पाठीमागील दोन्ही पाय जायबंदी असल्याने सांबर वेदनेने विव्हळत होते. सकाळी 9 वाजता वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यु टिमचे अनिल गावडे, तुषार विचारे, वैभव आमडोसकर, वनविभागाचे दत्तात्रय शिंदे, वनरक्षक संतोष गोजारे, रमेश पाटील, शशिकांत देसाई, मनोहर गावडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप संसारे घटनास्थळी दाखल झाले. सांबरावर प्राथोमपचार करण्यात आले. सावंतवाडी येथे उपचारासाठी आणले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. सावंतवाडी या सांबरावर अंत्यविधी करण्यात आले.  जखमांबाबत संशय  जखमी सांबराच्या पाठीवर व पायावर खोल जखमा होत्या. या परिसरात सांबराची मोठ्या प्रमाणात शिकार होते. या सांबरावर शिकारीच्या उद्देशाने हल्ला केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती; मात्र जंगलात झालेल्या झटापटीत जखमा होण्याची शक्‍यता डॉ. संसारे यांनी व्यक्त केली. सावंतवाडीत अधिक उपचार करताना जखमांबाबत स्पष्टता होईल, असे त्यांनी सांगितले.  स्थानिकांचे मदतकार्य  वनखात्याचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने वनरक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. स्थानिकांनी मदतकार्य केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संसारे यांनी पत्रकारांना वृत्तसंकलन व छायाचित्रण करताना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त स्थानिकांनी वनरक्षकांना धारेवर धरत वरिष्ठ उपस्थित नसल्याबाबत जाब विचारला. सांबराला नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्याने सांबर तब्बल एक तास विव्हळत होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39Yi1aF
Read More
...तरीही सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा

ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, महसुल, पोलिस व आरटीओ अशी सर्वच यंत्रणा यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोना बाधित देशातून आलेल्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील कोरोना व्हायरस विलीनीकरण कक्षाला आज सायंकाळी भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दालनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्या समवेत कोल्हापुर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे आदी उपस्थित होते. 

डॉ. चाकूरकर म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या प्रवासाविषयीची माहितीही घेण्यात येत आहे. अशा तपासणीमध्ये जर कोणी बाधित क्षेत्रातून आला असल्यास त्यास ताबडतोब निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तपासणी अंतर्गत जिल्ह्यात तैनात आरोग्य पथकामार्फत आतापर्यंत 816 प्रवाशांची तपासणी केली असून आरोग्य संस्थेमार्फत 517 जणांची तपासणी केली आहे. यामध्ये एकही व्यक्ती कोरोनासदृष्य असल्याचे दिसून आलेले नाही. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवले त्यांच्या हातावर शिक्का मारलेला असून अशा व्यक्तींची ओळख पटवणे सोपे जाणार आहे. याविषयी राज्य शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.'' 

ते म्हणाले, ""कोरोना साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाची 10 पथके जिल्ह्याच्या विविध तपासणी नाक्‍यांवर तैनात केली आहेत. कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली रेल्वेस्थानक व बस स्थानकांवर आरोग्य पथके तैनात केली आहेत. महसूल विभागाकडूनही जिल्ह्याबाहेरील प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. मंडळ अधिकारी स्तरावर ही माहिती घेतली जात आहे. पोलीस प्रशासनातर्फे पोलीस स्टेशन स्तरावरही माहिती घेतली जात असून प्रादेशिक परिवहन विभागाकडून आरोंदा आणि इन्सुली तपासणी नाक्‍यावर राज्या बाहेरून विशेषतः गोवा राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांची माहिती घेतली जात आहे.

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत पातळीवरही परदेशातून तसेच बाधीत क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. जे प्रवासी बाधीत राज्यातून तसेच परदेशातून आले आहेत त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास व आरोग्य यंत्रणेस दिली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याबाबत सर्वत्या उपायययोजना केल्या आहेत.'' 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. बोरसे यांनी जिल्ह्यात भेट देऊन केलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केले. 

20 जण निरीक्षणाखाली 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 20 व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. यातील 5 जर्मनीचे नागरिक आहेत. उर्वरित 15 जिल्ह्यातील आहेत. या जर्मनीच्या पाच नागरिकांना रिसॉर्टमध्ये सेवा देणाऱ्या 8 कामगारांची तपासणी केल्याचे सांगितले. 
 

31 मार्चपर्यंतची लग्ने रजिस्टर 
जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आठवडा बाजार बंद केले आहेत. पर्यटक हॉटेल व्यावसायिकांना नवीन बुकिंग न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 31 मार्चपर्यंत होणारी लग्ने रजिस्टर करावी. 10 ते 15 नागरिकांनी उपस्थित राहून लग्नाचे विधि करावेत, असेही आवाहन केले आहे. 

बचतगटांना मास्कचा ठेका 
मंजुलक्ष्मी यांनी, जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी बचत गटांना ठेका देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी उमेद व महिला विकास मंडळ यांच्याशी बोलणे सुरु आहे, असे सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...तरीही सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील आरोग्य, जिल्हा परिषद, महसुल, पोलिस व आरटीओ अशी सर्वच यंत्रणा यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोना बाधित देशातून आलेल्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील कोरोना व्हायरस विलीनीकरण कक्षाला आज सायंकाळी भेट दिली. यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दालनात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्या समवेत कोल्हापुर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे आदी उपस्थित होते.  डॉ. चाकूरकर म्हणाले, ""जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या प्रवासाविषयीची माहितीही घेण्यात येत आहे. अशा तपासणीमध्ये जर कोणी बाधित क्षेत्रातून आला असल्यास त्यास ताबडतोब निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तपासणी अंतर्गत जिल्ह्यात तैनात आरोग्य पथकामार्फत आतापर्यंत 816 प्रवाशांची तपासणी केली असून आरोग्य संस्थेमार्फत 517 जणांची तपासणी केली आहे. यामध्ये एकही व्यक्ती कोरोनासदृष्य असल्याचे दिसून आलेले नाही. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवले त्यांच्या हातावर शिक्का मारलेला असून अशा व्यक्तींची ओळख पटवणे सोपे जाणार आहे. याविषयी राज्य शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.''  ते म्हणाले, ""कोरोना साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाची 10 पथके जिल्ह्याच्या विविध तपासणी नाक्‍यांवर तैनात केली आहेत. कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली रेल्वेस्थानक व बस स्थानकांवर आरोग्य पथके तैनात केली आहेत. महसूल विभागाकडूनही जिल्ह्याबाहेरील प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. मंडळ अधिकारी स्तरावर ही माहिती घेतली जात आहे. पोलीस प्रशासनातर्फे पोलीस स्टेशन स्तरावरही माहिती घेतली जात असून प्रादेशिक परिवहन विभागाकडून आरोंदा आणि इन्सुली तपासणी नाक्‍यावर राज्या बाहेरून विशेषतः गोवा राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत पातळीवरही परदेशातून तसेच बाधीत क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. जे प्रवासी बाधीत राज्यातून तसेच परदेशातून आले आहेत त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास व आरोग्य यंत्रणेस दिली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याबाबत सर्वत्या उपायययोजना केल्या आहेत.''  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. बोरसे यांनी जिल्ह्यात भेट देऊन केलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केले.  20 जण निरीक्षणाखाली  कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सध्या 20 व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. यातील 5 जर्मनीचे नागरिक आहेत. उर्वरित 15 जिल्ह्यातील आहेत. या जर्मनीच्या पाच नागरिकांना रिसॉर्टमध्ये सेवा देणाऱ्या 8 कामगारांची तपासणी केल्याचे सांगितले.    31 मार्चपर्यंतची लग्ने रजिस्टर  जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आठवडा बाजार बंद केले आहेत. पर्यटक हॉटेल व्यावसायिकांना नवीन बुकिंग न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 31 मार्चपर्यंत होणारी लग्ने रजिस्टर करावी. 10 ते 15 नागरिकांनी उपस्थित राहून लग्नाचे विधि करावेत, असेही आवाहन केले आहे.  बचतगटांना मास्कचा ठेका  मंजुलक्ष्मी यांनी, जिल्ह्यात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी बचत गटांना ठेका देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी उमेद व महिला विकास मंडळ यांच्याशी बोलणे सुरु आहे, असे सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38YxNBd
Read More
पिंपरी महापालिकेत 'नो एंट्री'

पिंपरी - वार मंगळवार... स्थळ महापालिका मुख्यालय... वेळ सकाळी नऊ ते दहा... प्रसंग कर्मचारी व अधिकारी कार्यालयात येऊ लागले. आवाराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी नेहमीप्रमाणे तैनात, तोंडाला मास्क लावलेले. पण, सर्वसामान्य नागरिकांना आत येण्यास मनाई करीत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता. हीच स्थिती मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळही होती. येणाऱ्या नागरिकांची नोंद करणारे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे नोंदवही घेऊन बसलेले होते. काही जण एक मीटरपेक्षा अधिक अंतर ठेवून उभे होते. ‘चारपेक्षा जास्त जण जवळजवळ थांबू नका,’ अशा सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या जात होत्या. ‘मास्क लावा, ओळखपत्र दाखवा,’ असे सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. त्यांच्यासाठी प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सोय केलेली होती. ‘नागरिकांना प्रवेश बंद’ अशी सूचना लावलेली होती. ‘आज कोण भेटायला येणार आहे?’ अशा व्यक्तींची यादी विभागप्रमुखांनी सुरक्षारक्षकांकडे दिलेली होती. त्याची खातरजमा करून व संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे नेहमी गजबजाट असलेल्या महापालिका भवनात फक्त आणि फक्त अधिकारी, कर्मचारी आणि मोजकेच नगरसेवक दिसत होते.

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. १६) सायंकाळी ‘कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे व त्याचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका मुख्य कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद’ करण्याबाबतचा आदेश प्रशासन विभागाला दिला. त्याची अंमलबजावणी मंगळवारी (ता. १७) सकाळपासून सुरू झाली. त्याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे आवश्‍यक आहे. महापालिकेत दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, समाजसेवक, ठेकेदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यांना ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंद करणे आवश्‍यक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाच्या आवश्‍यकतेनुसार नागरिकांना मुख्य कार्यालयात येणे आवश्‍यक असल्यास प्रवेश देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा विभागाने संबंधितांना प्रवेश द्यावा.

अटी व शर्ती
    विभागप्रमुखांची लेखी परवानगी किंवा पास असावा
    तोंडाला मास्क लावलेले असावे
    मुख्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन सॅनिटायझरचा वापर करावा किंवा साबन अथवा हॅंडवॉशने हात धुऊन अधिकाऱ्यांना भेटावे
    काम झाल्यानंतर तत्काळ कार्यालय सोडावे
    महापालिका, क्षेत्रीय व अन्य विभागांना पाठवावयाचे अत्यंत तातडीचे टपाल केवळ संबंधित विभागाच्या ई-मेलद्वारे पाठवावे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी महापालिकेत 'नो एंट्री' पिंपरी - वार मंगळवार... स्थळ महापालिका मुख्यालय... वेळ सकाळी नऊ ते दहा... प्रसंग कर्मचारी व अधिकारी कार्यालयात येऊ लागले. आवाराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी नेहमीप्रमाणे तैनात, तोंडाला मास्क लावलेले. पण, सर्वसामान्य नागरिकांना आत येण्यास मनाई करीत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता. हीच स्थिती मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळही होती. येणाऱ्या नागरिकांची नोंद करणारे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे नोंदवही घेऊन बसलेले होते. काही जण एक मीटरपेक्षा अधिक अंतर ठेवून उभे होते. ‘चारपेक्षा जास्त जण जवळजवळ थांबू नका,’ अशा सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या जात होत्या. ‘मास्क लावा, ओळखपत्र दाखवा,’ असे सांगत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. त्यांच्यासाठी प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सोय केलेली होती. ‘नागरिकांना प्रवेश बंद’ अशी सूचना लावलेली होती. ‘आज कोण भेटायला येणार आहे?’ अशा व्यक्तींची यादी विभागप्रमुखांनी सुरक्षारक्षकांकडे दिलेली होती. त्याची खातरजमा करून व संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे नेहमी गजबजाट असलेल्या महापालिका भवनात फक्त आणि फक्त अधिकारी, कर्मचारी आणि मोजकेच नगरसेवक दिसत होते. - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. १६) सायंकाळी ‘कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे व त्याचा प्रसार टाळण्यासाठी महापालिका मुख्य कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद’ करण्याबाबतचा आदेश प्रशासन विभागाला दिला. त्याची अंमलबजावणी मंगळवारी (ता. १७) सकाळपासून सुरू झाली. त्याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे आवश्‍यक आहे. महापालिकेत दैनंदिन व वैयक्तिक कामासाठी नागरिक, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, समाजसेवक, ठेकेदार, त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यांना ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंद करणे आवश्‍यक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत अथवा कामकाजाच्या आवश्‍यकतेनुसार नागरिकांना मुख्य कार्यालयात येणे आवश्‍यक असल्यास प्रवेश देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा विभागाने संबंधितांना प्रवेश द्यावा. अटी व शर्ती     विभागप्रमुखांची लेखी परवानगी किंवा पास असावा     तोंडाला मास्क लावलेले असावे     मुख्यालयातील स्वच्छतागृहात जाऊन सॅनिटायझरचा वापर करावा किंवा साबन अथवा हॅंडवॉशने हात धुऊन अधिकाऱ्यांना भेटावे     काम झाल्यानंतर तत्काळ कार्यालय सोडावे     महापालिका, क्षेत्रीय व अन्य विभागांना पाठवावयाचे अत्यंत तातडीचे टपाल केवळ संबंधित विभागाच्या ई-मेलद्वारे पाठवावे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UsKz5V
Read More
सरकारी कार्यालये सुरूच राहणार  - उद्धव ठाकरे

मुंबई - ‘‘जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सरकारी कार्यालये सुरूच आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे रेल्वे आणि बेस्ट सेवा सुरू आहे. मात्र, आवश्‍यकता वाटली तर पुढील काळात सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक सेवा नाइलाजाने बंद कराव्या लागतील. राज्यातील जनतेने सहकार्य करावे,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारी कार्यालये बंद करावीत का? याबाबत विचार सुरू आहे. मात्र, सध्या सरकारी कार्यालये बंद करण्याचा विचार नाही. तसेच बस अथवा रेल्वेसेवा बंद केल्या जाणार नाहीत. मात्र, जनतेने सहकार्य करावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. जनतेने सहकार्य केले नाही, तर आम्हाला नाइलाजाने निर्णय घ्यावा लागेल.’’ 

‘‘जनतेने स्वतःची काळजी घ्यावी. धार्मिक स्थळांची गर्दी कमी करावी. धार्मिक स्थळांच्या प्रमुखांनी याची खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहनही ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे खासगी तसेच सरकारी आस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती कमी करता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. तसेच, अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर ठिकाणची कार्यालये, खासगी दुकाने यांनी सहकार्य करावे. शक्‍यतो बंद ठेवावा.’’ 

किट केंद्राकडून येते ः मुख्यमंत्री 
कोरोनाचे टेस्ट किट केंद्र सरकार देते. केंद्राची याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार आपणास खासगी रुग्णालयात या चाचण्यांची सुविधा करता येत नाही. असे असले तरीही चाचण्यांसाठी किट कमी पडणार नाहीत, याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

कुणाच्याही तोंडावर मास्क नाही 
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर मोठ्या संख्येने प्रिंट तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना गराडा टाकून प्रश्‍न विचारत होते. यापैकी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सरकारी कार्यालये सुरूच राहणार  - उद्धव ठाकरे मुंबई - ‘‘जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सरकारी कार्यालये सुरूच आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे रेल्वे आणि बेस्ट सेवा सुरू आहे. मात्र, आवश्‍यकता वाटली तर पुढील काळात सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक सेवा नाइलाजाने बंद कराव्या लागतील. राज्यातील जनतेने सहकार्य करावे,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारी कार्यालये बंद करावीत का? याबाबत विचार सुरू आहे. मात्र, सध्या सरकारी कार्यालये बंद करण्याचा विचार नाही. तसेच बस अथवा रेल्वेसेवा बंद केल्या जाणार नाहीत. मात्र, जनतेने सहकार्य करावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. जनतेने सहकार्य केले नाही, तर आम्हाला नाइलाजाने निर्णय घ्यावा लागेल.’’  ‘‘जनतेने स्वतःची काळजी घ्यावी. धार्मिक स्थळांची गर्दी कमी करावी. धार्मिक स्थळांच्या प्रमुखांनी याची खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहनही ठाकरे यांनी केले.  मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे खासगी तसेच सरकारी आस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती कमी करता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. तसेच, अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर ठिकाणची कार्यालये, खासगी दुकाने यांनी सहकार्य करावे. शक्‍यतो बंद ठेवावा.’’  किट केंद्राकडून येते ः मुख्यमंत्री  कोरोनाचे टेस्ट किट केंद्र सरकार देते. केंद्राची याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार आपणास खासगी रुग्णालयात या चाचण्यांची सुविधा करता येत नाही. असे असले तरीही चाचण्यांसाठी किट कमी पडणार नाहीत, याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  कुणाच्याही तोंडावर मास्क नाही  सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर मोठ्या संख्येने प्रिंट तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना गराडा टाकून प्रश्‍न विचारत होते. यापैकी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TZdwqS
Read More
कोरोना से निपटने के लिए पीएम मोदी ने सऊदी अरब के प्रिंस से की बात https://ift.tt/3b5nYmy