आमदार वैभव नाईक का म्हणाले सतर्क राहा? कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशी सुचना आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना सदृश्‍य रूग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालय येथे आज आमदार नाईक यांनी आढावा बैठक घेत तालुक्‍यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतला. यावेळी तहसीलदार रविंद्र नाचणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, सभापती सौ. नुतन आईर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी उपसभापती बबन बोभाटे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रमाकांत ताम्हाणेकर, शहरप्रमुख नितीन सावंत आदींसह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.  आमदार नाईक यांनी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून आपल्या जिल्ह्यात त्याचा शिरकाव होऊ नये, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. परराज्य, परजिल्हा व अन्य भागातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांची प्रशासनाने माहीती घेऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवावा. खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी करावी. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयातच राहावे. आरोग्य विभागाने तालुक्‍यात पुरेशा प्रमाणात मास्क व सॅनिटायझरचा साठा उपलब्ध करावा. मास्क कमी पडल्यास त्याची तातडीने मागणी करावी तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन यांसह गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेऊन बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, आदी सुचना आमदार नाईक यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. डॉ. कांबळे यांनी तालुक्‍यातील बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे आरोग्य विभागामाफत पथके तैनात करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. शहरातही जनजागृती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.  आजचा आठवडा बाजार बंद  आजचा येथील बाजार बंद राहणार आहे, याची नोंद ग्रामीण भागातील जनतेनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार श्री. नाचोणकर यांनी केले. दरम्यान, मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी शहरात नगरपंचायतमार्फत आवश्‍यक ती खबरदारी व जनजागृतीच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्याचे स्पष्ट केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 17, 2020

आमदार वैभव नाईक का म्हणाले सतर्क राहा? कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशी सुचना आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना सदृश्‍य रूग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालय येथे आज आमदार नाईक यांनी आढावा बैठक घेत तालुक्‍यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतला. यावेळी तहसीलदार रविंद्र नाचणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, सभापती सौ. नुतन आईर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी उपसभापती बबन बोभाटे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रमाकांत ताम्हाणेकर, शहरप्रमुख नितीन सावंत आदींसह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.  आमदार नाईक यांनी तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून आपल्या जिल्ह्यात त्याचा शिरकाव होऊ नये, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. परराज्य, परजिल्हा व अन्य भागातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांची प्रशासनाने माहीती घेऊन त्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवावा. खबरदारीच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य तपासणी करावी. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयातच राहावे. आरोग्य विभागाने तालुक्‍यात पुरेशा प्रमाणात मास्क व सॅनिटायझरचा साठा उपलब्ध करावा. मास्क कमी पडल्यास त्याची तातडीने मागणी करावी तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन यांसह गर्दीच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेऊन बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, आदी सुचना आमदार नाईक यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. डॉ. कांबळे यांनी तालुक्‍यातील बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे आरोग्य विभागामाफत पथके तैनात करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. शहरातही जनजागृती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.  आजचा आठवडा बाजार बंद  आजचा येथील बाजार बंद राहणार आहे, याची नोंद ग्रामीण भागातील जनतेनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार श्री. नाचोणकर यांनी केले. दरम्यान, मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी शहरात नगरपंचायतमार्फत आवश्‍यक ती खबरदारी व जनजागृतीच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्याचे स्पष्ट केले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UlxmvE

No comments:

Post a Comment