Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 8, 2020

लखनऊ: IPS अजयपाल शर्मा के खिलाफ हजरतगंज थाने में केस दर्ज https://ift.tt/3aFnt2k
कश्मीर: डेरा गली में 'रोमियो फोर्स' ने बर्फबारी में फंसे 9 यात्रियों को बचाया https://ift.tt/3aGiJJw
तिच्या हाती आर्थिक दोरी

आपला एक समज आहे, की महिला पैशाचे व्यवस्थापन करू शकत नाहीत. मात्र, प्रत्यक्षातील स्थिती वेगळी आहे. अनेक वेळा महिलांची प्रतिमा अवाजवी खर्च करणाऱ्या अशी दाखविली जाते; मात्र महिला या घरगुती खर्च आणि बजेटिंग पूर्वापार करीत आल्या आहेत. यातून अनेक धडे घेण्यासारखे असून, आधुनिक जगात पुरुष आणि महिलांना त्याचा फायदा होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महिला या वित्तीय बाबतीत हुशार म्हणून असतात; मात्र बहुतांश महिला त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत नाहीत, ही समस्या आहे. याच वेळी दीर्घकालीन निर्णय आणि आर्थिक नियोजन यापासून महिला दूर राहतात. महिलांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आत्मविश्‍वास आणि अनुभव नसणे अथवा पतीकडून स्वातंत्र्य न मिळणे अथवा पालकांकडून त्यांच्यातील या नैसर्गिक क्षमतेला डावलले जाणे, ही यामागील कारणे असतात. खूप आधीपासून भारतीय महिला या बचत करणाऱ्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करणाऱ्या आहेत, हे माहिती असूनही हे याकडे दुर्लक्ष झाले आहे. आपण यावर चर्चा करीत असताना या परिस्थितीत बदल होत असून, देशातील स्वयंउद्योजकांमध्ये बहुतांश महिला आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री’ने (सीआयआय) केलेल्या पाहणीनुसार, ५६.६७ टक्के महिला स्वयंउद्योजक त्यांचे आर्थिक निर्णय स्वतः घेतात, तर ३८.७१ टक्के महिला संयुक्तपणे पती, पिता अथवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींसोबत हे निर्णय घेतात. 

(लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट असून, त्यांचे ‘फायनान्शिअल स्पिरिच्युॲलिटी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तिच्या हाती आर्थिक दोरी आपला एक समज आहे, की महिला पैशाचे व्यवस्थापन करू शकत नाहीत. मात्र, प्रत्यक्षातील स्थिती वेगळी आहे. अनेक वेळा महिलांची प्रतिमा अवाजवी खर्च करणाऱ्या अशी दाखविली जाते; मात्र महिला या घरगुती खर्च आणि बजेटिंग पूर्वापार करीत आल्या आहेत. यातून अनेक धडे घेण्यासारखे असून, आधुनिक जगात पुरुष आणि महिलांना त्याचा फायदा होऊ शकतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  महिला या वित्तीय बाबतीत हुशार म्हणून असतात; मात्र बहुतांश महिला त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत नाहीत, ही समस्या आहे. याच वेळी दीर्घकालीन निर्णय आणि आर्थिक नियोजन यापासून महिला दूर राहतात. महिलांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आत्मविश्‍वास आणि अनुभव नसणे अथवा पतीकडून स्वातंत्र्य न मिळणे अथवा पालकांकडून त्यांच्यातील या नैसर्गिक क्षमतेला डावलले जाणे, ही यामागील कारणे असतात. खूप आधीपासून भारतीय महिला या बचत करणाऱ्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करणाऱ्या आहेत, हे माहिती असूनही हे याकडे दुर्लक्ष झाले आहे. आपण यावर चर्चा करीत असताना या परिस्थितीत बदल होत असून, देशातील स्वयंउद्योजकांमध्ये बहुतांश महिला आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री’ने (सीआयआय) केलेल्या पाहणीनुसार, ५६.६७ टक्के महिला स्वयंउद्योजक त्यांचे आर्थिक निर्णय स्वतः घेतात, तर ३८.७१ टक्के महिला संयुक्तपणे पती, पिता अथवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींसोबत हे निर्णय घेतात.  (लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट असून, त्यांचे ‘फायनान्शिअल स्पिरिच्युॲलिटी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 08, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cGUkp4
Read More

Saturday, March 7, 2020

मेरी कोम: BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन
पी. व्ही. सिंधू: BBC Indian Sportswoman of the Year पुरस्कारासाठी नामांकन
मित्राची दुचाकी घेऊन जाताना अभियंत्यावर काळाची झडप

कणकवली (सिंधुदुर्ग) - हुंबरट-फोंडाघाट मार्गावरील डामरे-कानडेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून राधानगरी येथील अभियंता ठार झाला. ही घटना आज सकाळी 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. सचिन मारुती टिपुगडे (वय 24) असे मृताचे नाव आहे. सचिन हे राधानगरीहून दुचाकीने ओरोसला निघाले असता अज्ञात वाहनाने मागाहून धडक दिल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. 

आपल्या मित्राची दुचाकी घेऊन सचिन हे राधानगरी येथून सकाळी नऊ वाजता निघाले. फोंडाघाट बाजारपेठेतून निघाल्यानंतर डामरे-कानडेवाडी येथील काजू कारखान्यालगत सकाळी 10.45 च्या सुमारास ते दुचाकीसह रस्त्यावर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या अपघाताची माहिती मिळताच फोंडाघाट येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सचिन टिपुगडे याना तत्काळ फोंडाघाट आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून भाजपच्या रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. 

दुचाकी अपघातानंतर फोंडाघाट येथील अण्णा पारकर, नितीन पालकर, विनोद भोगले, सुमित मेजारी, नईम शेख, राजू डॅनी, सुयोग कुबडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. मात्र ते व्यर्थ ठरले. 

अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सचिन यांच्या मित्रपरिवाराने कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. सचिन यांनी सिव्हिल इंजिनिअर पदवी घेतली होती. त्याचे वडील नाभिक समाजाचे अध्यक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. सचिन यांच्या मागे वडील, आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मित्राची दुचाकी घेऊन जाताना अभियंत्यावर काळाची झडप कणकवली (सिंधुदुर्ग) - हुंबरट-फोंडाघाट मार्गावरील डामरे-कानडेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून राधानगरी येथील अभियंता ठार झाला. ही घटना आज सकाळी 10.45 च्या सुमारास ही घटना घडली. सचिन मारुती टिपुगडे (वय 24) असे मृताचे नाव आहे. सचिन हे राधानगरीहून दुचाकीने ओरोसला निघाले असता अज्ञात वाहनाने मागाहून धडक दिल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे.  आपल्या मित्राची दुचाकी घेऊन सचिन हे राधानगरी येथून सकाळी नऊ वाजता निघाले. फोंडाघाट बाजारपेठेतून निघाल्यानंतर डामरे-कानडेवाडी येथील काजू कारखान्यालगत सकाळी 10.45 च्या सुमारास ते दुचाकीसह रस्त्यावर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या अपघाताची माहिती मिळताच फोंडाघाट येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सचिन टिपुगडे याना तत्काळ फोंडाघाट आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून भाजपच्या रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले.  दुचाकी अपघातानंतर फोंडाघाट येथील अण्णा पारकर, नितीन पालकर, विनोद भोगले, सुमित मेजारी, नईम शेख, राजू डॅनी, सुयोग कुबडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. मात्र ते व्यर्थ ठरले.  अपघाताचे वृत्त समजल्यानंतर सचिन यांच्या मित्रपरिवाराने कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. सचिन यांनी सिव्हिल इंजिनिअर पदवी घेतली होती. त्याचे वडील नाभिक समाजाचे अध्यक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. सचिन यांच्या मागे वडील, आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39xkwRj
Read More
‘भूलथापा देत शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या कक्षेत’

मुंबई - एखाद्या तरुणीबरोबर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी खोटी आश्‍वासने देऊन तिची फसवणूक केली तर त्या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, आरोपीचे अन्य मुलीवरही प्रेम आहे, असे तक्रारदार तरुणीला समजल्यानंतर तिने अकोला येथे आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीची फिर्याद नोंदविली. ही तक्रार रद्द करण्यासाठी आरोपीने स्थानिक सत्र न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, हा दावा अमान्य झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली.

तक्रारदार तरुणीबरोबर माझे प्रेमसंबंध होते आणि तिने स्वतःहूनच शारीरिक संबंधांना तयारी दर्शविली. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला. मात्र, आपली दिशाभूल करण्यात आली. वास्तव समोर आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चुकीच्या पद्धतीने आपली सहमती घेतली, असा दावा तरुणीच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘भूलथापा देत शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या कक्षेत’ मुंबई - एखाद्या तरुणीबरोबर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी खोटी आश्‍वासने देऊन तिची फसवणूक केली तर त्या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एका प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, आरोपीचे अन्य मुलीवरही प्रेम आहे, असे तक्रारदार तरुणीला समजल्यानंतर तिने अकोला येथे आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीची फिर्याद नोंदविली. ही तक्रार रद्द करण्यासाठी आरोपीने स्थानिक सत्र न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, हा दावा अमान्य झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली. तक्रारदार तरुणीबरोबर माझे प्रेमसंबंध होते आणि तिने स्वतःहूनच शारीरिक संबंधांना तयारी दर्शविली. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला. मात्र, आपली दिशाभूल करण्यात आली. वास्तव समोर आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चुकीच्या पद्धतीने आपली सहमती घेतली, असा दावा तरुणीच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xkfSb3
Read More
`झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे...`

नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाव सर्व्हिस रस्ता प्रश्नी आज अचानक नांदगांव पंचक्रोशीचे ठिय्या आंदोलन झाले. नांदगाव पंचक्रोशी ग्रामस्थांचा विजय असो, झालाच पाहीजे झालाच पाहीजे सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे, आधी सर्व्हिस रस्ता करा,मगच पुलाचे काम करा आदी घोषणांनी नांदगाव तिठा दणाणला. या प्रश्‍नावर एकत्रीत बैठक घेवून तोडगा काढण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनाची माहीती मिळताच आमदार नितेश राणे व कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना या आंदोलना ठिकाणी पाचारण केले व झालेल्या चर्चेत यासंदर्भात 12 मार्चला सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयात संबधीत अधिकारी व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ यांची एकत्र बैठक घेण्याचे मान्य केले.

सार्वजनिक बांधकामचे खारेपाटण येथील शाखा अभियंता डी.जी.कुमावत यांना लेखी पत्र आंदोलकांना द्यायला लावले. हे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित केले; मात्र त्यावेळीही सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा केव्हाही आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी दिला. 

नांदगाव तिठा येथे सध्या सर्व्हिस रस्त्याअभावी अधुन मधून छोटे मोठे अपघात घडत आहेत. मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. सुरूवातीला आंदोलकांना पुन्हा शाखा अभियंता श्री. कुमावत पुन्हा सामोरे गेले. यावेळीही क्षेत्र हे अपूरे पडत असल्याने या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने सर्व्हिस रस्त्याचे बांधकाम काम करता येत नाही.

यासाठी कार्यालयाने आवश्‍यक असलेल्या जादा क्षेत्राकरीता भूसंपादन प्रस्ताव सादर केलेला असून या अनुषंगाने पुढील कार्यवाही ही भूसंपादन प्राधिकारी यांचे स्तरावर प्रगतीपथावर आहे. याची सर्व पूर्तता झाल्यानंतर सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले; मात्र त्यांच्याकडून ठोस माहीती मिळत नसल्याने कार्यकारी अभियंता व प्रांताधिकारी यांनी येथे यावे असा पावित्रा आंदोलकांनी घेतला. यानंतर आमदार राणे व श्री. पारकर दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी एकमेकाला हस्तांदोलन करीत आंदोलन ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर प्रांताधिकारी काही वेळातच दाखल होवून चर्चा करण्यात आली. 

यावेळी आमदार राणे, श्री. पारकर, नांदगांव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, नांदगांव सरपंच आफोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, शिवसेना शाखा राजा म्हसकर, ओटव सरपंच हेमंत परूळेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगांव माजी सरपंच संजय पाटील, भाजपा तालूकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, शिवसेना तालूका प्रमुख शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे, अरूण बापार्डेकर, गवस साठविलकर, मंगेश पाटील, सदस्या वृषाली मोरजकर, रेणूका पाटील , रमिजानबी बटवाले, बाळा मोरये, रवि तेली आदी पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

`झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे...` नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाव सर्व्हिस रस्ता प्रश्नी आज अचानक नांदगांव पंचक्रोशीचे ठिय्या आंदोलन झाले. नांदगाव पंचक्रोशी ग्रामस्थांचा विजय असो, झालाच पाहीजे झालाच पाहीजे सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे, आधी सर्व्हिस रस्ता करा,मगच पुलाचे काम करा आदी घोषणांनी नांदगाव तिठा दणाणला. या प्रश्‍नावर एकत्रीत बैठक घेवून तोडगा काढण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  आंदोलनाची माहीती मिळताच आमदार नितेश राणे व कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना या आंदोलना ठिकाणी पाचारण केले व झालेल्या चर्चेत यासंदर्भात 12 मार्चला सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयात संबधीत अधिकारी व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ यांची एकत्र बैठक घेण्याचे मान्य केले. सार्वजनिक बांधकामचे खारेपाटण येथील शाखा अभियंता डी.जी.कुमावत यांना लेखी पत्र आंदोलकांना द्यायला लावले. हे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित केले; मात्र त्यावेळीही सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा केव्हाही आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी दिला.  नांदगाव तिठा येथे सध्या सर्व्हिस रस्त्याअभावी अधुन मधून छोटे मोठे अपघात घडत आहेत. मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. सुरूवातीला आंदोलकांना पुन्हा शाखा अभियंता श्री. कुमावत पुन्हा सामोरे गेले. यावेळीही क्षेत्र हे अपूरे पडत असल्याने या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने सर्व्हिस रस्त्याचे बांधकाम काम करता येत नाही. यासाठी कार्यालयाने आवश्‍यक असलेल्या जादा क्षेत्राकरीता भूसंपादन प्रस्ताव सादर केलेला असून या अनुषंगाने पुढील कार्यवाही ही भूसंपादन प्राधिकारी यांचे स्तरावर प्रगतीपथावर आहे. याची सर्व पूर्तता झाल्यानंतर सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले; मात्र त्यांच्याकडून ठोस माहीती मिळत नसल्याने कार्यकारी अभियंता व प्रांताधिकारी यांनी येथे यावे असा पावित्रा आंदोलकांनी घेतला. यानंतर आमदार राणे व श्री. पारकर दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी एकमेकाला हस्तांदोलन करीत आंदोलन ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर प्रांताधिकारी काही वेळातच दाखल होवून चर्चा करण्यात आली.  यावेळी आमदार राणे, श्री. पारकर, नांदगांव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, नांदगांव सरपंच आफोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, शिवसेना शाखा राजा म्हसकर, ओटव सरपंच हेमंत परूळेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगांव माजी सरपंच संजय पाटील, भाजपा तालूकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, शिवसेना तालूका प्रमुख शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे, अरूण बापार्डेकर, गवस साठविलकर, मंगेश पाटील, सदस्या वृषाली मोरजकर, रेणूका पाटील , रमिजानबी बटवाले, बाळा मोरये, रवि तेली आदी पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2THnmfK
Read More
पीएच.डी. करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच मिळणार हा दर्जा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी.साठी लावण्यात आलेल्या दिशानिर्देशात बदल करण्यासाठी गेल्या वर्षी झालेल्या सिनेटमध्ये डॉ. आर. जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या समितीने तयार केलेला अहवाल शनिवारी (ता. 7) सिनेटच्या बैठकीत सादर करण्यात आला. अहवालात शिफारशीनुसार, आता मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द करण्यात आली असून, पीएच.डी. पदवी मिळताच त्यास मार्गदर्शक होता येणार आहे. याशिवाय निवृत्त झाल्यावर शेवटचा उमेदवाराचा शोधप्रबंध होईस्तोवर तो मार्गदर्शक राहणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने 2009ला काढलेल्या दिशानिर्देशावरून विद्यापीठात 2015ला पीएच.डी.मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार पीएच.डी. प्रवेशासाठी "पेट' परीक्षेस सुरुवात करण्यात आली. यानंतर दोन वर्षांपूर्वी विषयनिहाय "पेट-2'ला सुरुवात करण्यात आली. मात्र, पेट-1मुळे मानव्यशास्त्रातील विद्यार्थ्यांची पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या बरीच रोडावली आहे. त्यामुके गेल्या वर्षी सिनेटमध्ये डॉ. आर. जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे, डॉ. ऊर्मिला डबीर, डॉ. मृत्युंजय सिंग, डॉ. देशकर, डॉ. चिमणकर, डॉ. अजित जाचक यांचा समावेश होता. समितीने या अटीत बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला. शनिवारी हा अहवाल सिनेटच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला.

- फडणवीस सरकारपेक्षा ठाकरे सरकारला अधिक काळजी.. वन खात्याच्या निधीत 130 कोटींची वाढ

भोयर समितीचा अहवाल सिनेटमध्ये सादर 
या वेळी डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अहवालात 32 शिफारशींचा समावेश आहे. दरम्यान, सिनेटमध्ये अहवालाला एकमताने मान्य करीत, डॉ. पेशवे समितीचा अहवाल आल्यावर दोन्ही अहवालांच्या शिफारशींचा विचार करीत, एका महिन्याच्या आत दिशानिर्देश काढण्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्य केले. 

मार्गदर्शक, उमेदवारांना दिलासा 
डॉ. भोयर समितीच्या शिफारशीनुसार पीएच.डी. करणारे उमेदवार आणि मार्गदर्शकांना बराच दिलासा मिळाला आहे. आता शिफारशीमध्ये मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द करण्यात आली असून पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शकाचा दर्जा देणे, निवृत्त झाल्यावर शेवटचा उमेदवाराचा शोधप्रबंध होईस्तोवर तो मार्गदर्शकाचा दर्जा कायम ठेवणे, शोधप्रबंध सादर केल्यावर एका महिन्यात "व्हायवा' घेणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, रिसर्च सेंटरला मार्गदर्शक नेमण्याचा अधिकार देणे, रिसर्च ऍडव्हाजरी कमिटी नेमणे, मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून नेमता येणे आदी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

- अनेक वर्ष प्रेमप्रकरण चालल्यानंतर प्रेयसीचे बदलले मन; न राहवल्याने प्रियकराने केले असे...

याशिवाय एकच परीक्षा घेणे, पेट- 1 व पेट- 2 असे दोन पेपर घेणे, निगेटिव्ह मार्किंग बंद करणे, 50 गुणांचे "ऑब्जेक्‍टिव्ह' तर 50 गुणांच्या "सब्जेटिव्ह' प्रश्‍नांचा समावेश करणे, एम.फिल.धारकांना कोर्स वर्क अट रद्द करणे, "पेट'च्या कालावधीची अट रद्द करणे, शोधप्रबंध सादर केल्यावर दोन महिन्यांत "आरआरसी' नेमणे, 15 दिवसांत "प्लॅगेरिझम'चा अहवाल द्यावा लागणार आहे. सर्व संवाद ई-मेलवरून करण्यात येणार आहे. "व्हायवा'नंतर 8 दिवसांत परीक्षा व मूल्यमापन मंडळाला नोटीफिकेशन काढण्यात येईल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पीएच.डी. करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लगेच मिळणार हा दर्जा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी.साठी लावण्यात आलेल्या दिशानिर्देशात बदल करण्यासाठी गेल्या वर्षी झालेल्या सिनेटमध्ये डॉ. आर. जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या समितीने तयार केलेला अहवाल शनिवारी (ता. 7) सिनेटच्या बैठकीत सादर करण्यात आला. अहवालात शिफारशीनुसार, आता मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द करण्यात आली असून, पीएच.डी. पदवी मिळताच त्यास मार्गदर्शक होता येणार आहे. याशिवाय निवृत्त झाल्यावर शेवटचा उमेदवाराचा शोधप्रबंध होईस्तोवर तो मार्गदर्शक राहणार आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाने 2009ला काढलेल्या दिशानिर्देशावरून विद्यापीठात 2015ला पीएच.डी.मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार पीएच.डी. प्रवेशासाठी "पेट' परीक्षेस सुरुवात करण्यात आली. यानंतर दोन वर्षांपूर्वी विषयनिहाय "पेट-2'ला सुरुवात करण्यात आली. मात्र, पेट-1मुळे मानव्यशास्त्रातील विद्यार्थ्यांची पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या बरीच रोडावली आहे. त्यामुके गेल्या वर्षी सिनेटमध्ये डॉ. आर. जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे, डॉ. ऊर्मिला डबीर, डॉ. मृत्युंजय सिंग, डॉ. देशकर, डॉ. चिमणकर, डॉ. अजित जाचक यांचा समावेश होता. समितीने या अटीत बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला. शनिवारी हा अहवाल सिनेटच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला. - फडणवीस सरकारपेक्षा ठाकरे सरकारला अधिक काळजी.. वन खात्याच्या निधीत 130 कोटींची वाढ भोयर समितीचा अहवाल सिनेटमध्ये सादर  या वेळी डॉ. भोयर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशाचा अभ्यास करून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अहवालात 32 शिफारशींचा समावेश आहे. दरम्यान, सिनेटमध्ये अहवालाला एकमताने मान्य करीत, डॉ. पेशवे समितीचा अहवाल आल्यावर दोन्ही अहवालांच्या शिफारशींचा विचार करीत, एका महिन्याच्या आत दिशानिर्देश काढण्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्य केले.  मार्गदर्शक, उमेदवारांना दिलासा  डॉ. भोयर समितीच्या शिफारशीनुसार पीएच.डी. करणारे उमेदवार आणि मार्गदर्शकांना बराच दिलासा मिळाला आहे. आता शिफारशीमध्ये मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द करण्यात आली असून पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शकाचा दर्जा देणे, निवृत्त झाल्यावर शेवटचा उमेदवाराचा शोधप्रबंध होईस्तोवर तो मार्गदर्शकाचा दर्जा कायम ठेवणे, शोधप्रबंध सादर केल्यावर एका महिन्यात "व्हायवा' घेणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, रिसर्च सेंटरला मार्गदर्शक नेमण्याचा अधिकार देणे, रिसर्च ऍडव्हाजरी कमिटी नेमणे, मान्यताप्राप्त पदव्युत्तर प्राध्यापकांना मार्गदर्शक म्हणून नेमता येणे आदी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. - अनेक वर्ष प्रेमप्रकरण चालल्यानंतर प्रेयसीचे बदलले मन; न राहवल्याने प्रियकराने केले असे... याशिवाय एकच परीक्षा घेणे, पेट- 1 व पेट- 2 असे दोन पेपर घेणे, निगेटिव्ह मार्किंग बंद करणे, 50 गुणांचे "ऑब्जेक्‍टिव्ह' तर 50 गुणांच्या "सब्जेटिव्ह' प्रश्‍नांचा समावेश करणे, एम.फिल.धारकांना कोर्स वर्क अट रद्द करणे, "पेट'च्या कालावधीची अट रद्द करणे, शोधप्रबंध सादर केल्यावर दोन महिन्यांत "आरआरसी' नेमणे, 15 दिवसांत "प्लॅगेरिझम'चा अहवाल द्यावा लागणार आहे. सर्व संवाद ई-मेलवरून करण्यात येणार आहे. "व्हायवा'नंतर 8 दिवसांत परीक्षा व मूल्यमापन मंडळाला नोटीफिकेशन काढण्यात येईल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32Yy4Ti
Read More
कोरोनामुळे सिंधुदुर्गात ही खबरदारी....

सिंधुदुर्गनगरी - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जेथे गर्दी होणार असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार (ता.8) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेतर्फे होणारे कृषी पशु प्रदर्शन मेळावा या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द किंवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हा व्हायरस अन्यत्र पसरत असल्याने देशाची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यावर उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा आवश्‍यक उपाययोजना राबवित आहे. असे असतानाच हा व्हायरस एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असल्याने खबरदारी म्हणून शासनाने गर्दी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा, बैठका आदी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सुचना सर्व विभागांना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जागतिक महिला दिनांनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, असे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. 

कृषी प्रदर्शन पुढे जाण्याची शक्‍यता 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर ज्या ठिकाणी गर्दी होणार, असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे हे कोरोनाचे सावट जिल्हा परिषदेच्या कृषी पशु प्रदर्शनावर दिसत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन रद्द होण्याची किवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनामुळे सिंधुदुर्गात ही खबरदारी.... सिंधुदुर्गनगरी - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जेथे गर्दी होणार असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार (ता.8) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेतर्फे होणारे कृषी पशु प्रदर्शन मेळावा या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द किंवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हा व्हायरस अन्यत्र पसरत असल्याने देशाची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यावर उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा आवश्‍यक उपाययोजना राबवित आहे. असे असतानाच हा व्हायरस एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असल्याने खबरदारी म्हणून शासनाने गर्दी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा, बैठका आदी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सुचना सर्व विभागांना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जागतिक महिला दिनांनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, असे आदेश सर्व विभागांना दिले आहेत.  कृषी प्रदर्शन पुढे जाण्याची शक्‍यता  कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर ज्या ठिकाणी गर्दी होणार, असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे हे कोरोनाचे सावट जिल्हा परिषदेच्या कृषी पशु प्रदर्शनावर दिसत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन रद्द होण्याची किवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aG3GQ3
Read More
मुलांच्या शिक्षणासाठी अंधारातही तिची होडी पाण्यात

चिखलठाण (सोलापूर) : दररोज पहाटे तीन वाजता "ती' उजनी धरणात पतीसोबत मासे धरण्यास जाते. पतीसोबत मासे पकडणे, जाळे टाकणे, होडी वल्हवणे आदी कामे ती दररोज 10 तास करते. कारण, तिला मुलांना शिकवून मोठे करायचे आहे. शिक्षणाअभावी आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत याकरिता अश्‍विनी सल्लेंची होत धडपड आगळे उदाहरण बनले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेला त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा.
चिखलठाण लांडाहिरा परिसरात उजनी धरण काठावर अश्‍विनी अण्णा सल्ले छोट्या झोपडीत राहून पतीसोबत परंपरागत मासेमारी व्यवसाय करतात. सुरवातीला अण्णा व गोकूळ दोघे भाऊ एका होडीच्या मदतीने मासेमारी करत होते. त्यांना कधी हजार तर कधी 100 रुपयांतच समाधान मानावे लागत. जेमतेम जगण्यापुरतीच रक्कम हातात मिळत. मुलांना शिकवायचे असल्यास दोन होड्या घेतल्यास चांगली कमाई होईल असे अश्‍विनी सल्ले यांनी दोन्ही कुटुंबांना सुचविले. 
परंतु, मासेमारीकरिता होडी चालवण्यास दोन व्यक्तींची गरज असते. उजनी धरणात मगरीसारख्या जलचर प्राण्यांची भीती कायम असते. पण, अश्‍विनी सल्ले स्वतः कसलाही विचार न करता पतीसोबत धरणात होडी चालवण्यास तयार झाल्या. उजनी धरणाच्या पाण्यात मासे धरण्यास पहाटे तीन वाजता पतीसोबत अश्‍विनी सल्ले पाच तास होडी चालवतात. घरी येऊन स्वयंपाक व अन्य कामे करून पुन्हा दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत जाळे टाकण्याकरिता होडी चालवतात. हे पाहून गोकूळची पत्नी रेखा सुद्धा मासेमारीस जाऊ लागली. पतीच्या खांद्याला खांदा लावून एवढे कष्ट कशासाठी करतात असे अश्‍विनी यांना विचारले असता, आपण शिक्षण घेतले नसल्याने गुरासारखे कष्ट करावे लागत आहेत. निदान मुलांवर ही वेळ येऊ नये, त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आनंदाने कष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुलांच्या शिक्षणासाठी अंधारातही तिची होडी पाण्यात चिखलठाण (सोलापूर) : दररोज पहाटे तीन वाजता "ती' उजनी धरणात पतीसोबत मासे धरण्यास जाते. पतीसोबत मासे पकडणे, जाळे टाकणे, होडी वल्हवणे आदी कामे ती दररोज 10 तास करते. कारण, तिला मुलांना शिकवून मोठे करायचे आहे. शिक्षणाअभावी आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत याकरिता अश्‍विनी सल्लेंची होत धडपड आगळे उदाहरण बनले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेला त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा. चिखलठाण लांडाहिरा परिसरात उजनी धरण काठावर अश्‍विनी अण्णा सल्ले छोट्या झोपडीत राहून पतीसोबत परंपरागत मासेमारी व्यवसाय करतात. सुरवातीला अण्णा व गोकूळ दोघे भाऊ एका होडीच्या मदतीने मासेमारी करत होते. त्यांना कधी हजार तर कधी 100 रुपयांतच समाधान मानावे लागत. जेमतेम जगण्यापुरतीच रक्कम हातात मिळत. मुलांना शिकवायचे असल्यास दोन होड्या घेतल्यास चांगली कमाई होईल असे अश्‍विनी सल्ले यांनी दोन्ही कुटुंबांना सुचविले.  परंतु, मासेमारीकरिता होडी चालवण्यास दोन व्यक्तींची गरज असते. उजनी धरणात मगरीसारख्या जलचर प्राण्यांची भीती कायम असते. पण, अश्‍विनी सल्ले स्वतः कसलाही विचार न करता पतीसोबत धरणात होडी चालवण्यास तयार झाल्या. उजनी धरणाच्या पाण्यात मासे धरण्यास पहाटे तीन वाजता पतीसोबत अश्‍विनी सल्ले पाच तास होडी चालवतात. घरी येऊन स्वयंपाक व अन्य कामे करून पुन्हा दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत जाळे टाकण्याकरिता होडी चालवतात. हे पाहून गोकूळची पत्नी रेखा सुद्धा मासेमारीस जाऊ लागली. पतीच्या खांद्याला खांदा लावून एवढे कष्ट कशासाठी करतात असे अश्‍विनी यांना विचारले असता, आपण शिक्षण घेतले नसल्याने गुरासारखे कष्ट करावे लागत आहेत. निदान मुलांवर ही वेळ येऊ नये, त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आनंदाने कष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aCYSv4
Read More
आणला मी उद्याचा सूर्य येथे

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्रिपदच मिळावे यासाठी सर्वाधिक आग्रही का होते, याचे उत्तर कदाचित आघाडीचा पहिला अर्थसंकल्प पाहिल्यानंतर मिळाले असेल. गेल्या पाच वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढून राज्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्याची कसरत अजितदादांना करावी लागणार आहे. हे करताना अर्थसंकल्पात त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करून ‘बूस्टर’ दिला आहे. आता या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तत्परता दाखवावी लागेल, नाहीतर निष्क्रियतेचे करंटेपण येईल, हे नक्की!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किती दिवस टिकणार? या ‘नर्व्हस ९९’मधून बाहेर पडून महाविकास आघाडीने आपले शंभर दिवस पूर्ण केले. या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शिवभोजन थाळी हे दोन निर्णय अमलात आणले. त्यापाठोपाठ आघाडीने आपला पहिला अर्थसंकल्पही सादर केला. अर्थमंत्रिपदाचा अनुभव पाठीशी असणाऱ्या आणि गेल्या पाच वर्षात सत्ता नसली की काय हाल होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अजितदादांनी सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. 

दादा अर्थमंत्री झाल्याचा फायदा साहजिकच पुण्याला झाला. विविध तरतुदी करताना त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी आवश्‍यक तो निधी दिला आहे. 

त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो, रिंगरोड, विमानतळ आदी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ‘सकाळ’ने जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यात शहर आणि जिल्ह्यात ‘वाहतूक’ या प्रश्‍नावरच सर्वांनी भर दिला होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी ज्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज होती, त्यात रिंगरोडचा समावेश आहे. शहराबाहेरून येणारी वाहने शहराच्या वाहतुकीला अडथळा न आणता परस्पर इच्छित स्थळी जावीत यासाठी १७० किलोमीटर अंतराचा रिंगरोड होणे आवश्‍यक आहे. 

या रस्त्याचा उपयोग वाहतुकीसाठी तर होणार आहेच, पण ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे, त्या भागाचा नव्याने विकास होऊन पुण्यावरील वाढत्या नागरीकरणाचा भारही हलका होणार आहे.

बांधकाम क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून मंदीचे वातावरण आहे, ते दूर करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सलग दोन वर्षे एक टक्का सवलत देण्याची घोषणा पुणे आणि परिसरातील घरखरेदीला नक्की चालना देईल. रेडीरेकनचे दर वाढू देणार नाही, असे महसूलमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जर रेडीरेकनरचे दर वाढले नाहीत आणि एक टक्का सवलत मिळाली तर त्याचा फायदा ग्राहक आणि बिल्डर या दोघांना नक्की होईल. शहराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात झाल्या आहेत.

दादांच्या कामाचा झपाटा चांगला आहे. आता गरज आहे ती ‘असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्‍या कमी रह गई देखो और सुधार करो’, या अजितदादांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान हिंदी कवी सोहनलाल द्विवेदी यांच्या कवितेतील ओळींनुसार वागण्याची.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आणला मी उद्याचा सूर्य येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्रिपदच मिळावे यासाठी सर्वाधिक आग्रही का होते, याचे उत्तर कदाचित आघाडीचा पहिला अर्थसंकल्प पाहिल्यानंतर मिळाले असेल. गेल्या पाच वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढून राज्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्याची कसरत अजितदादांना करावी लागणार आहे. हे करताना अर्थसंकल्पात त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करून ‘बूस्टर’ दिला आहे. आता या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तत्परता दाखवावी लागेल, नाहीतर निष्क्रियतेचे करंटेपण येईल, हे नक्की! ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप किती दिवस टिकणार? या ‘नर्व्हस ९९’मधून बाहेर पडून महाविकास आघाडीने आपले शंभर दिवस पूर्ण केले. या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शिवभोजन थाळी हे दोन निर्णय अमलात आणले. त्यापाठोपाठ आघाडीने आपला पहिला अर्थसंकल्पही सादर केला. अर्थमंत्रिपदाचा अनुभव पाठीशी असणाऱ्या आणि गेल्या पाच वर्षात सत्ता नसली की काय हाल होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अजितदादांनी सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला.  दादा अर्थमंत्री झाल्याचा फायदा साहजिकच पुण्याला झाला. विविध तरतुदी करताना त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी आवश्‍यक तो निधी दिला आहे.  त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो, रिंगरोड, विमानतळ आदी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ‘सकाळ’ने जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यात शहर आणि जिल्ह्यात ‘वाहतूक’ या प्रश्‍नावरच सर्वांनी भर दिला होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी ज्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज होती, त्यात रिंगरोडचा समावेश आहे. शहराबाहेरून येणारी वाहने शहराच्या वाहतुकीला अडथळा न आणता परस्पर इच्छित स्थळी जावीत यासाठी १७० किलोमीटर अंतराचा रिंगरोड होणे आवश्‍यक आहे.  या रस्त्याचा उपयोग वाहतुकीसाठी तर होणार आहेच, पण ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे, त्या भागाचा नव्याने विकास होऊन पुण्यावरील वाढत्या नागरीकरणाचा भारही हलका होणार आहे. बांधकाम क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून मंदीचे वातावरण आहे, ते दूर करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सलग दोन वर्षे एक टक्का सवलत देण्याची घोषणा पुणे आणि परिसरातील घरखरेदीला नक्की चालना देईल. रेडीरेकनचे दर वाढू देणार नाही, असे महसूलमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जर रेडीरेकनरचे दर वाढले नाहीत आणि एक टक्का सवलत मिळाली तर त्याचा फायदा ग्राहक आणि बिल्डर या दोघांना नक्की होईल. शहराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात झाल्या आहेत. दादांच्या कामाचा झपाटा चांगला आहे. आता गरज आहे ती ‘असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्‍या कमी रह गई देखो और सुधार करो’, या अजितदादांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान हिंदी कवी सोहनलाल द्विवेदी यांच्या कवितेतील ओळींनुसार वागण्याची. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VVVirI
Read More
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर: आज होणार विजेत्या महिला खेळाडूची घोषणा - #BBCISWOTY