मुलांच्या शिक्षणासाठी अंधारातही तिची होडी पाण्यात चिखलठाण (सोलापूर) : दररोज पहाटे तीन वाजता "ती' उजनी धरणात पतीसोबत मासे धरण्यास जाते. पतीसोबत मासे पकडणे, जाळे टाकणे, होडी वल्हवणे आदी कामे ती दररोज 10 तास करते. कारण, तिला मुलांना शिकवून मोठे करायचे आहे. शिक्षणाअभावी आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत याकरिता अश्‍विनी सल्लेंची होत धडपड आगळे उदाहरण बनले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेला त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा. चिखलठाण लांडाहिरा परिसरात उजनी धरण काठावर अश्‍विनी अण्णा सल्ले छोट्या झोपडीत राहून पतीसोबत परंपरागत मासेमारी व्यवसाय करतात. सुरवातीला अण्णा व गोकूळ दोघे भाऊ एका होडीच्या मदतीने मासेमारी करत होते. त्यांना कधी हजार तर कधी 100 रुपयांतच समाधान मानावे लागत. जेमतेम जगण्यापुरतीच रक्कम हातात मिळत. मुलांना शिकवायचे असल्यास दोन होड्या घेतल्यास चांगली कमाई होईल असे अश्‍विनी सल्ले यांनी दोन्ही कुटुंबांना सुचविले.  परंतु, मासेमारीकरिता होडी चालवण्यास दोन व्यक्तींची गरज असते. उजनी धरणात मगरीसारख्या जलचर प्राण्यांची भीती कायम असते. पण, अश्‍विनी सल्ले स्वतः कसलाही विचार न करता पतीसोबत धरणात होडी चालवण्यास तयार झाल्या. उजनी धरणाच्या पाण्यात मासे धरण्यास पहाटे तीन वाजता पतीसोबत अश्‍विनी सल्ले पाच तास होडी चालवतात. घरी येऊन स्वयंपाक व अन्य कामे करून पुन्हा दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत जाळे टाकण्याकरिता होडी चालवतात. हे पाहून गोकूळची पत्नी रेखा सुद्धा मासेमारीस जाऊ लागली. पतीच्या खांद्याला खांदा लावून एवढे कष्ट कशासाठी करतात असे अश्‍विनी यांना विचारले असता, आपण शिक्षण घेतले नसल्याने गुरासारखे कष्ट करावे लागत आहेत. निदान मुलांवर ही वेळ येऊ नये, त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आनंदाने कष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 7, 2020

मुलांच्या शिक्षणासाठी अंधारातही तिची होडी पाण्यात चिखलठाण (सोलापूर) : दररोज पहाटे तीन वाजता "ती' उजनी धरणात पतीसोबत मासे धरण्यास जाते. पतीसोबत मासे पकडणे, जाळे टाकणे, होडी वल्हवणे आदी कामे ती दररोज 10 तास करते. कारण, तिला मुलांना शिकवून मोठे करायचे आहे. शिक्षणाअभावी आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत याकरिता अश्‍विनी सल्लेंची होत धडपड आगळे उदाहरण बनले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेला त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा. चिखलठाण लांडाहिरा परिसरात उजनी धरण काठावर अश्‍विनी अण्णा सल्ले छोट्या झोपडीत राहून पतीसोबत परंपरागत मासेमारी व्यवसाय करतात. सुरवातीला अण्णा व गोकूळ दोघे भाऊ एका होडीच्या मदतीने मासेमारी करत होते. त्यांना कधी हजार तर कधी 100 रुपयांतच समाधान मानावे लागत. जेमतेम जगण्यापुरतीच रक्कम हातात मिळत. मुलांना शिकवायचे असल्यास दोन होड्या घेतल्यास चांगली कमाई होईल असे अश्‍विनी सल्ले यांनी दोन्ही कुटुंबांना सुचविले.  परंतु, मासेमारीकरिता होडी चालवण्यास दोन व्यक्तींची गरज असते. उजनी धरणात मगरीसारख्या जलचर प्राण्यांची भीती कायम असते. पण, अश्‍विनी सल्ले स्वतः कसलाही विचार न करता पतीसोबत धरणात होडी चालवण्यास तयार झाल्या. उजनी धरणाच्या पाण्यात मासे धरण्यास पहाटे तीन वाजता पतीसोबत अश्‍विनी सल्ले पाच तास होडी चालवतात. घरी येऊन स्वयंपाक व अन्य कामे करून पुन्हा दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत जाळे टाकण्याकरिता होडी चालवतात. हे पाहून गोकूळची पत्नी रेखा सुद्धा मासेमारीस जाऊ लागली. पतीच्या खांद्याला खांदा लावून एवढे कष्ट कशासाठी करतात असे अश्‍विनी यांना विचारले असता, आपण शिक्षण घेतले नसल्याने गुरासारखे कष्ट करावे लागत आहेत. निदान मुलांवर ही वेळ येऊ नये, त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आनंदाने कष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aCYSv4

No comments:

Post a Comment