Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 29, 2020

दहशतवादाच्या सावटाखाली ‘चौथा स्तंभ’

पत्रकारितेचे काम जोखमीचे असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विशेषतः पाकिस्तान तर पत्रकारांसाठी सर्वांत धोकादायक देश म्हणून ओळखला जातो. दहशतवादाच्या सावटाखाली राहणाऱ्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याविरुद्ध बातमी छापणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असे करण्यासारखेच आहे. जो बातमी देईल, तो जिवानिशी जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आत्तापर्यंत असेच घडत आले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तुनवा प्रांतातील पत्रकार जावेदुल्लाह खान (वय ३६) यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. विशेष म्हणजे त्यांना पोलिस संरक्षण असतानाही हल्लेखोरांनी खान यांना टिपले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नसली, तरी तेहरिक ए तालिबान संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. 

जावेदुल्लाह हे ‘औसाफ’ या दैनिकासाठी काम करत होते. त्यांच्या कुटुंबातील आत्तापर्यंत १५ जणांची हत्या तालिबानपुरस्कृत संघटनेने केली आहे. हे हत्याकांड २००८ पासून चालत आले असून तालिबानविरोधी गटाचे सदस्य असल्या कारणाने दहशतवादी गटांनी खान कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. यात जावेदुल्लाहचे काका, पुतणे यांचा समावेश आहे. ते पीएमएलएन पक्षाचे स्थानिक नेते म्हणून काम करत असताना दहशतवाद विरोधी गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते. 

मागील महिन्यात सिंध प्रांतात पत्रकार अजिज मेमन यांचा मृतदेह आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याची नवीन घटना नाही. २०१३ ते २०१९ या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे ३३ पत्रकारांची हत्या झाली आहे. परंतु पोलिसांनी केवळ २० प्रकरणांचीच नोंद केली आहे. यानुसार न्यायालयाने २० खटले चालू शकतात, असा निर्णय दिला होता. यापैकी सहा खटल्याचे कामकाज पूर्ण होऊ शकले आणि त्याचे प्रमाण १८ टक्केच आहे. सहापैकी एकाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गावाच्या सुरक्षेसाठी शांतता समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी दक्षता दलांना प्रोत्साहन देण्यात आले होते. दहशतवाद्यांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्षण करणे हे प्रमुख काम होते. परंतु पाकिस्तानात कायद्याच्या सुधारणेनंतर या समित्या भंग करण्यात आल्या. समित्यांमुळे दहशतवाद्यांचे जाळे बऱ्यापैकी नष्ट झाले, तरीही सरकारी धोरणाचे समर्थक असणाऱ्या गावातील आदिवासी समाजातील ज्येष्ठांना लक्ष्य करण्यात आले. काही भागात समितीच्या सदस्यांनाही लक्ष्य केले गेले. जावेदुल्लाह यांची हत्या या प्रकारातूनच घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

पाकिस्तानमध्ये पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा ‘प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट ॲड मीडिया प्रोफेशनल्स ॲक्ट २०१९ विधेयक आणले आहे. यानुसार दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत नियमांचा वापर पत्रकारांविरुद्ध करता येणार नाही. याशिवाय विधेयकातील मसुद्यानुसार पत्रकारांसाठी आयोग नेमण्यात येणार असून त्याचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील. हा आयोग पत्रकारांचे अपहरण आणि आर्थिक अडचण सोडवण्याबाबत मदत करणार आहे. याशिवाय पत्रकारांना बातमीचा  स्रोत सांगण्यासाठी दबाव आणता येणार नाही आणि कर्तव्य बजावत असताना कोणीही अडथळा आणू शकणार नाही. दुसरीकडे खोट्या बातम्या पसरवण्यास पत्रकारांना मनाई केली आहे.  अर्थात पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे अनेक कायदे अगोदरपासून पाकिस्तानात अस्तित्वात आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अशा स्थितीत नवीन विधेयक कितपत उपयुक्त ठरेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानात लोकशाही नसली तरी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. हा स्तंभ उभा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दहशतवादाच्या सावटाखाली ‘चौथा स्तंभ’ पत्रकारितेचे काम जोखमीचे असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विशेषतः पाकिस्तान तर पत्रकारांसाठी सर्वांत धोकादायक देश म्हणून ओळखला जातो. दहशतवादाच्या सावटाखाली राहणाऱ्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याविरुद्ध बातमी छापणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ असे करण्यासारखेच आहे. जो बातमी देईल, तो जिवानिशी जातो. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आत्तापर्यंत असेच घडत आले आहे. काही दिवसांपूर्वीच खैबर पख्तुनवा प्रांतातील पत्रकार जावेदुल्लाह खान (वय ३६) यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. विशेष म्हणजे त्यांना पोलिस संरक्षण असतानाही हल्लेखोरांनी खान यांना टिपले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नसली, तरी तेहरिक ए तालिबान संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे.  जावेदुल्लाह हे ‘औसाफ’ या दैनिकासाठी काम करत होते. त्यांच्या कुटुंबातील आत्तापर्यंत १५ जणांची हत्या तालिबानपुरस्कृत संघटनेने केली आहे. हे हत्याकांड २००८ पासून चालत आले असून तालिबानविरोधी गटाचे सदस्य असल्या कारणाने दहशतवादी गटांनी खान कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. यात जावेदुल्लाहचे काका, पुतणे यांचा समावेश आहे. ते पीएमएलएन पक्षाचे स्थानिक नेते म्हणून काम करत असताना दहशतवाद विरोधी गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते.  मागील महिन्यात सिंध प्रांतात पत्रकार अजिज मेमन यांचा मृतदेह आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याची नवीन घटना नाही. २०१३ ते २०१९ या काळात पाकिस्तानमध्ये सुमारे ३३ पत्रकारांची हत्या झाली आहे. परंतु पोलिसांनी केवळ २० प्रकरणांचीच नोंद केली आहे. यानुसार न्यायालयाने २० खटले चालू शकतात, असा निर्णय दिला होता. यापैकी सहा खटल्याचे कामकाज पूर्ण होऊ शकले आणि त्याचे प्रमाण १८ टक्केच आहे. सहापैकी एकाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गावाच्या सुरक्षेसाठी शांतता समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी दक्षता दलांना प्रोत्साहन देण्यात आले होते. दहशतवाद्यांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्षण करणे हे प्रमुख काम होते. परंतु पाकिस्तानात कायद्याच्या सुधारणेनंतर या समित्या भंग करण्यात आल्या. समित्यांमुळे दहशतवाद्यांचे जाळे बऱ्यापैकी नष्ट झाले, तरीही सरकारी धोरणाचे समर्थक असणाऱ्या गावातील आदिवासी समाजातील ज्येष्ठांना लक्ष्य करण्यात आले. काही भागात समितीच्या सदस्यांनाही लक्ष्य केले गेले. जावेदुल्लाह यांची हत्या या प्रकारातूनच घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  पाकिस्तानमध्ये पत्रकारांना सुरक्षा प्रदान करणारा ‘प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट ॲड मीडिया प्रोफेशनल्स ॲक्ट २०१९ विधेयक आणले आहे. यानुसार दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत नियमांचा वापर पत्रकारांविरुद्ध करता येणार नाही. याशिवाय विधेयकातील मसुद्यानुसार पत्रकारांसाठी आयोग नेमण्यात येणार असून त्याचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील. हा आयोग पत्रकारांचे अपहरण आणि आर्थिक अडचण सोडवण्याबाबत मदत करणार आहे. याशिवाय पत्रकारांना बातमीचा  स्रोत सांगण्यासाठी दबाव आणता येणार नाही आणि कर्तव्य बजावत असताना कोणीही अडथळा आणू शकणार नाही. दुसरीकडे खोट्या बातम्या पसरवण्यास पत्रकारांना मनाई केली आहे.  अर्थात पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे अनेक कायदे अगोदरपासून पाकिस्तानात अस्तित्वात आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अशा स्थितीत नवीन विधेयक कितपत उपयुक्त ठरेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानात लोकशाही नसली तरी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. हा स्तंभ उभा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकारांचे जीव गेले आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3akOOX9
Read More
बिहारीबाबूंचा जातींच्या मतांवर डोळा

बिहार विधानसभेत २०२१ मध्ये होणारी जनगणना जातिनिहाय करण्याच्या मागणीचा प्रस्ताव नुकताच बहुमताने मंजूर करण्यात आला. यावरून राज्यात कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, हे समजणार आहे. इतर मागासवर्गीयांची संख्या सर्वांत जास्त असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जातींच्या मतांवर डोळा ठेवूनच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हा जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लालूप्रसाद यादव आग्रही
नवी जनगणना २०२१ मध्ये सुरू होणार आहे. नितीशकुमार यांनी जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव विधानसभेत बहुमताने मंजूर केला. हा प्रस्ताव आता संबंधित केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी सभागृहातील सदस्यांना सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे जातिनिहाय जनगणनेसाठी आग्रही आहेत. या मागणीसाठी त्यांच्या पक्षाने ‘बिहार बंद’ आंदोलनही केले आहे. याच मुद्यावर नितीशकुमार आणि ‘राजद’चे नेते व लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची बंदखोलीत चर्चा झाली होती. यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरू झाली होती. ही चर्चा म्हणजे नितीशकुमार राजकारणात नवे समीकरण तयार करीत असल्याचे भाकीत वर्तविले जाऊ लागले होते. मात्र नितीशकुमार यांच्याशी युतीच्या सर्व शक्यता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी फेटाळून लावल्या. 

केंद्राकडे लवकरच मागणी
बिहारच्या विधानसभेत १८ फेब्रुवारी २०१९ रोजी जातिनिहाय जनगणनेचे विधेयक मंजूर केले होते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर्वांनी मंजुरी देऊन केंद्र सरकारपुढे बाजू मांडणे आवश्‍यक असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. ज्याप्रमाणे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या प्रस्तावाची कल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती, त्याचप्रमाणे हे विधेयक पुन्हा एकदा मंजूर करायला हवे, असेही ते म्हणाले. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या जनगणनेला फार कालावधी उरला नसल्याचे सांगत नितीशकुमार यांनी केंद्रात व्ही. पी. सिंह सरकारच्या वेळी राज्यमंत्री या नात्याने जातिनिहाय जनगणनेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती सभागृहात दिली. मात्र त्या वेळी उशीर झाल्याचे कारण पंतप्रधानांनी दिले होते. देशात १९३१ रोजी जातिनिहाय जनगणना झाली होती, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आणि आता पुन्हाती करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बिहारीबाबूंचा जातींच्या मतांवर डोळा बिहार विधानसभेत २०२१ मध्ये होणारी जनगणना जातिनिहाय करण्याच्या मागणीचा प्रस्ताव नुकताच बहुमताने मंजूर करण्यात आला. यावरून राज्यात कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, हे समजणार आहे. इतर मागासवर्गीयांची संख्या सर्वांत जास्त असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जातींच्या मतांवर डोळा ठेवूनच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हा जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लालूप्रसाद यादव आग्रही नवी जनगणना २०२१ मध्ये सुरू होणार आहे. नितीशकुमार यांनी जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव विधानसभेत बहुमताने मंजूर केला. हा प्रस्ताव आता संबंधित केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी सभागृहातील सदस्यांना सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे जातिनिहाय जनगणनेसाठी आग्रही आहेत. या मागणीसाठी त्यांच्या पक्षाने ‘बिहार बंद’ आंदोलनही केले आहे. याच मुद्यावर नितीशकुमार आणि ‘राजद’चे नेते व लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची बंदखोलीत चर्चा झाली होती. यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरू झाली होती. ही चर्चा म्हणजे नितीशकुमार राजकारणात नवे समीकरण तयार करीत असल्याचे भाकीत वर्तविले जाऊ लागले होते. मात्र नितीशकुमार यांच्याशी युतीच्या सर्व शक्यता बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी फेटाळून लावल्या.  केंद्राकडे लवकरच मागणी बिहारच्या विधानसभेत १८ फेब्रुवारी २०१९ रोजी जातिनिहाय जनगणनेचे विधेयक मंजूर केले होते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर्वांनी मंजुरी देऊन केंद्र सरकारपुढे बाजू मांडणे आवश्‍यक असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. ज्याप्रमाणे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या प्रस्तावाची कल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती, त्याचप्रमाणे हे विधेयक पुन्हा एकदा मंजूर करायला हवे, असेही ते म्हणाले. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या जनगणनेला फार कालावधी उरला नसल्याचे सांगत नितीशकुमार यांनी केंद्रात व्ही. पी. सिंह सरकारच्या वेळी राज्यमंत्री या नात्याने जातिनिहाय जनगणनेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती सभागृहात दिली. मात्र त्या वेळी उशीर झाल्याचे कारण पंतप्रधानांनी दिले होते. देशात १९३१ रोजी जातिनिहाय जनगणना झाली होती, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आणि आता पुन्हाती करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PBUvZ1
Read More

Friday, February 28, 2020

मुस्लीम आरक्षण शिवसेनेची सत्ता स्थापनेपूर्वीची सेटिंग आहे काय? - देवेंद्र फडणवीस, #5मोठ्याबातम्या
गृहनिर्माण संस्थांसाठी नियमावली की मुदतवाढ? 

पुणे  - अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी नियमावली जाहीर करण्याबाबत दिलेली 29 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ शनिवारी संपत आहे. मात्र, सहकार खात्यातील व्यस्त अधिकाऱ्यांकडून तारखांवर तारखा देऊनही नियमावली तयार झालेली नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहकार खात्याने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका संबंधित संस्थांनीच घ्याव्यात, असा निर्णय घेतला. परंतु, या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणुका कोणत्या नियमानुसार घ्यायच्या, असा प्रश्‍न गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांसमोर आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळास यापूर्वी 31 डिसेंबर आणि त्यानंतर 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. 

शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बॅंकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देणे, कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण आणि जिल्हास्तरीय समितीकडून तक्रारनिवारण, अशी कार्यवाही करावी लागणार आहे. या कामकाजात सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील बहुतांश अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या 22 हजार 680 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. परंतु, सध्या मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे एप्रिल 2020 अखेरपर्यंत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा आदेश 31 जानेवारी रोजी काढण्यात आला होता. दरम्यान, अडीचशेपर्यंत सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, नियमावली जाहीर न झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प राहणार आहे. तसेच, पुढील निर्णय होईपर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांना गृहनिर्माण संस्थांचा गाडा हाकावा लागण्याची शक्‍यता आहे. 

राज्यातील गृहनिर्माण संस्था : सुमारे एक लाख 
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 80 हजार 

पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था : 18 हजार 
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 15 हजार 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गृहनिर्माण संस्थांसाठी नियमावली की मुदतवाढ?  पुणे  - अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी नियमावली जाहीर करण्याबाबत दिलेली 29 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ शनिवारी संपत आहे. मात्र, सहकार खात्यातील व्यस्त अधिकाऱ्यांकडून तारखांवर तारखा देऊनही नियमावली तयार झालेली नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सहकार खात्याने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका संबंधित संस्थांनीच घ्याव्यात, असा निर्णय घेतला. परंतु, या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणुका कोणत्या नियमानुसार घ्यायच्या, असा प्रश्‍न गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांसमोर आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळास यापूर्वी 31 डिसेंबर आणि त्यानंतर 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.  शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बॅंकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देणे, कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण आणि जिल्हास्तरीय समितीकडून तक्रारनिवारण, अशी कार्यवाही करावी लागणार आहे. या कामकाजात सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील बहुतांश अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या 22 हजार 680 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. परंतु, सध्या मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे एप्रिल 2020 अखेरपर्यंत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा आदेश 31 जानेवारी रोजी काढण्यात आला होता. दरम्यान, अडीचशेपर्यंत सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, नियमावली जाहीर न झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प राहणार आहे. तसेच, पुढील निर्णय होईपर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांना गृहनिर्माण संस्थांचा गाडा हाकावा लागण्याची शक्‍यता आहे.  राज्यातील गृहनिर्माण संस्था : सुमारे एक लाख  अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 80 हजार  पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था : 18 हजार  अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था : 15 हजार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aiboA2
Read More
ब्रेकींग : 'या'मुळे आज कऱ्हाड शहर राहणार बंद ?

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या माध्यमातून गेले तीन दिवस अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या माेहिमेस विराेध करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे तीनशे व्यापाऱ्यांचा जथ्था पोलिस ठाण्यात दाखल झाला. या अतिक्रमण माेहिमेत कर्मचारी वर्गाने कायदेशीर बोर्ड काढून त्याचे नुकसान केल्याची तक्रार व्यापारी करीत हाेते. यावेळी बहुतांश व्यापारी संतप्त झाले हाेते. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची पोलिसांशी चर्चा झाली. ही माेहिम आम्हांला न सांगताच केल्याचा व्यापाऱ्यांचा आक्षेप हाेता. दरम्यान न्याय मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा दिला इशारा आहे.प्रसंगी बाजारपेठ बंद ठेवू असेही व्यापारी वर्गाने नमूद केले आहे.

माजी नगरसेवक आनंदराव लादे भिमशक्ती जिल्हाध्यक्ष, सातारा भिमशक्ती संघटनेचा वतीने कराङ शहरात पलिका प्रशासन व पोलिस प्रशासनच्या वतीने चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण मोहिम राबवली जाता आहे. त्याबदल आज शनिवार ता.29 फेब्रुवारीस सकाळी अकरा तहसीलदार यांना व महिती प्रत मुख्याधिकारी. पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण मोहीम बाबतीत अंदोलन ऊभा करून सोमवार (ता.२) पासून तसिलदार कार्यालय येथे अमर उपोषण बसणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान हातगाडा धारकांचेही हाॅकर्स झोनच्या मागणीसाठी पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण करेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

कऱ्हाडमध्ये तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा

कऱ्हाडमधील तब्बल १९ वर्षानंतर पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली. शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा नाका ते कन्याशाळा मार्गे चावडी चौक, भाजी मंडई परिसरात ही धडक मोहिम राबवण्यात आली. अनेक अनाधिकृत बांधकामावर जेसीबी चालवुन पालिकेने आज अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

कऱ्हाडमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तीन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत बसस्थानक परिसर, दत्त चौक, विजय दिवस चौक, स्टेशन रोड, कृष्णा नाका, कृष्णा पुल, मंगळवार पेठ, कन्याशाळेसमोरील परिसर, मंडई परिसर, बाजारपेठील मेन रोड परिसरातील सुमारे 600 हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार यांनी आखलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमागे पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः उभे राहुन ही मोहिम राबवल्याने बऱ्यापैकी अतिक्रमणे हटण्यास मदत झाली. शहरात तब्बल 19 वर्षानंतर ही मोहिम राबवण्यात आल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे. किरकोळ अपवाद वगळता मोहिम सध्यातरी शांततेत सुरु राहिली. 
 

कऱ्हाड पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. अतिक्रमण कारवाईत कायदेशीर फलक काढल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा होता. #SakalNews #MarathiNews #ViralVideos #Karad pic.twitter.com/V4jENDzM70

— Siddharth Latkar (@siddharthSakal) February 29, 2020

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ब्रेकींग : 'या'मुळे आज कऱ्हाड शहर राहणार बंद ? कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या माध्यमातून गेले तीन दिवस अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या माेहिमेस विराेध करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे तीनशे व्यापाऱ्यांचा जथ्था पोलिस ठाण्यात दाखल झाला. या अतिक्रमण माेहिमेत कर्मचारी वर्गाने कायदेशीर बोर्ड काढून त्याचे नुकसान केल्याची तक्रार व्यापारी करीत हाेते. यावेळी बहुतांश व्यापारी संतप्त झाले हाेते. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची पोलिसांशी चर्चा झाली. ही माेहिम आम्हांला न सांगताच केल्याचा व्यापाऱ्यांचा आक्षेप हाेता. दरम्यान न्याय मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा दिला इशारा आहे.प्रसंगी बाजारपेठ बंद ठेवू असेही व्यापारी वर्गाने नमूद केले आहे. माजी नगरसेवक आनंदराव लादे भिमशक्ती जिल्हाध्यक्ष, सातारा भिमशक्ती संघटनेचा वतीने कराङ शहरात पलिका प्रशासन व पोलिस प्रशासनच्या वतीने चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण मोहिम राबवली जाता आहे. त्याबदल आज शनिवार ता.29 फेब्रुवारीस सकाळी अकरा तहसीलदार यांना व महिती प्रत मुख्याधिकारी. पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण मोहीम बाबतीत अंदोलन ऊभा करून सोमवार (ता.२) पासून तसिलदार कार्यालय येथे अमर उपोषण बसणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान हातगाडा धारकांचेही हाॅकर्स झोनच्या मागणीसाठी पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण करेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.  कऱ्हाडमध्ये तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा कऱ्हाडमधील तब्बल १९ वर्षानंतर पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली. शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा नाका ते कन्याशाळा मार्गे चावडी चौक, भाजी मंडई परिसरात ही धडक मोहिम राबवण्यात आली. अनेक अनाधिकृत बांधकामावर जेसीबी चालवुन पालिकेने आज अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कऱ्हाडमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तीन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत बसस्थानक परिसर, दत्त चौक, विजय दिवस चौक, स्टेशन रोड, कृष्णा नाका, कृष्णा पुल, मंगळवार पेठ, कन्याशाळेसमोरील परिसर, मंडई परिसर, बाजारपेठील मेन रोड परिसरातील सुमारे 600 हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता ए. आर. पवार यांनी आखलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमागे पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः उभे राहुन ही मोहिम राबवल्याने बऱ्यापैकी अतिक्रमणे हटण्यास मदत झाली. शहरात तब्बल 19 वर्षानंतर ही मोहिम राबवण्यात आल्याने नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे. किरकोळ अपवाद वगळता मोहिम सध्यातरी शांततेत सुरु राहिली.    कऱ्हाड पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. अतिक्रमण कारवाईत कायदेशीर फलक काढल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा होता. #SakalNews #MarathiNews #ViralVideos #Karad pic.twitter.com/V4jENDzM70 — Siddharth Latkar (@siddharthSakal) February 29, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Vtg9Cx
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 फेब्रुवारी

दिनमान 29 फेब्रुवारी 2020 
मेष : आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचार राहतील. आनंदी व आशावाद राहाल. 

वृषभ : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामे नकोशी होतील. मनाविरुद्ध घटना संभवते. 

मिथुन : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

कर्क : नवी दिशा सापडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान लाभेल. अधिकार प्राप्त होईल. 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उत्तम राहणार आहे. 

कन्या : प्रकृतीच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अतिउत्साहीपणा टाळावा. 

तूळ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. प्रवासास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. 

वृश्‍चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. 

धनू : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. 

मकर : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. 

कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. 

मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. 

पंचांग 29 फेब्रुवारी 2020 
शनिवार : फाल्गुन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.23, भारतीय सौर फाल्गुन 10, शके 1941. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 29 फेब्रुवारी दिनमान 29 फेब्रुवारी 2020  मेष : आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचार राहतील. आनंदी व आशावाद राहाल.  वृषभ : अनावश्‍यक खर्च संभवतात. कामे नकोशी होतील. मनाविरुद्ध घटना संभवते.  मिथुन : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.  कर्क : नवी दिशा सापडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान लाभेल. अधिकार प्राप्त होईल.  सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उत्तम राहणार आहे.  कन्या : प्रकृतीच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अतिउत्साहीपणा टाळावा.  तूळ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. प्रवासास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे.  वृश्‍चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी राहतील.  धनू : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.  मकर : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे.  कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल.  मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.  पंचांग 29 फेब्रुवारी 2020  शनिवार : फाल्गुन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.57, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय सकाळी 10.21, चंद्रास्त रात्री 11.23, भारतीय सौर फाल्गुन 10, शके 1941.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39aL4HM
Read More
'ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप खेळायचा असेल तर...'; कपिल देव यांचा धोनीला गुरुमंत्र

नोएडा : आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात उत्सुकता असली तरी, कपिलदेव मात्र फार उत्साही नाहीत. आयपीएल ही नवोदितांसाठी प्रभाव पाडण्याकरिता आहे. धोनीला जर आगामी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळायचे असेल, तर त्याने त्या अगोदरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायला हवे, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयपीएलचे वारे देशात वाहू लागले असून, धोनी 2 मार्चपासून सराव सुरू करणार आहे. भारताला दोन विश्‍वकरंडक जिंकून देणारा 38 वर्षीय धोनी इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आल्यानंतर मैदानावर दिसलेला नाही. श्रेणीनुसार मानधन करारातूनही त्याला वगळण्यात आलेले आहे. 

- खेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज..​

प्रत्येकाला समान न्याय हवा 

आयपीएल फक्त धोनीच खेळणार आहे असे नाही. पुढील 10 वर्षांत भारतीय क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू या आयपीएलमधून कसे सापडतील, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. धोनीने अगोदरच देशासाठी खूप काही केले आहे, असे सांगून कपिल म्हणाले, धोनीचा चाहता म्हणून त्याला ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना पाहायला मला आवडेल; पण क्रिकेटपटू म्हणून मी सर्वच बाबींचा विचार करेन. जवळपास वर्षभर तो खेळलेला नाही. त्यामुळे संघात पुन्हा येण्यासाठी त्याने अगोदर इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळायला हवे, वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे परिमाण लावणे योग्य नाही. 

Eh tho sahi baat hai!#TeamIndia #INDvNZ #NZvIND #MSD #MSdhoni #KapilDev pic.twitter.com/FKlRp7M9Nk

— SportsCafe (@IndiaSportscafe) February 28, 2020

बुमराबाबत चिंता नको 

न्यूझीलंड दौऱ्यात अपयशी ठरत असलेल्या जसप्रीत बुमराबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे कपिलदेव म्हणतात. एक चांगला स्पेल त्याला पुन्हा फॉर्मात आणू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त होण्यास काही काळ लागतो. जसे फलंदाजाला फॉर्मात येण्यास एखादी खेळी पुरेशी ठरते, तसे गोलंदाजाला एखादा भन्नाट स्पेल पुरेसा आहे. 

- दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद?

ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या 

सातत्याने खेळत असल्यामुळे ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या, असा थेट सल्ला कपिलदेव यांनी टीम इंडियाला दिला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी थेट स्टेडियम ते स्टेडियम असा प्रवास करावा लागला, तसेच वर्षातील सामने, प्रवास असा वर्षातील 300 दिवस व्यस्त कार्यक्रम असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले होते.

- ... तर आयपीएल खेळू नका; कपिल देव यांचा टीम इंडियाला कानमंत्र!

या संदर्भात बोलताना कपिलदेव यांनी आयपीएलमधून ब्रेक घ्या, असे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर जे खेळाडू टीम इंडियातून सर्व प्रकारांत खेळतात, त्यांनी आयपीएलमधून विश्रांती द्यावी, असा 'प्रस्ताव' दिला आहे.

If You Are Feeling Burned Out, Don’t Play IPL #Sportskeeda #IPL #KapilDev pic.twitter.com/PefEGyT4J1

— Sportskeeda India (@Sportskeeda) February 28, 2020

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप खेळायचा असेल तर...'; कपिल देव यांचा धोनीला गुरुमंत्र नोएडा : आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात उत्सुकता असली तरी, कपिलदेव मात्र फार उत्साही नाहीत. आयपीएल ही नवोदितांसाठी प्रभाव पाडण्याकरिता आहे. धोनीला जर आगामी ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळायचे असेल, तर त्याने त्या अगोदरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायला हवे, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयपीएलचे वारे देशात वाहू लागले असून, धोनी 2 मार्चपासून सराव सुरू करणार आहे. भारताला दोन विश्‍वकरंडक जिंकून देणारा 38 वर्षीय धोनी इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आल्यानंतर मैदानावर दिसलेला नाही. श्रेणीनुसार मानधन करारातूनही त्याला वगळण्यात आलेले आहे.  - खेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज..​ प्रत्येकाला समान न्याय हवा  आयपीएल फक्त धोनीच खेळणार आहे असे नाही. पुढील 10 वर्षांत भारतीय क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू या आयपीएलमधून कसे सापडतील, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. धोनीने अगोदरच देशासाठी खूप काही केले आहे, असे सांगून कपिल म्हणाले, धोनीचा चाहता म्हणून त्याला ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना पाहायला मला आवडेल; पण क्रिकेटपटू म्हणून मी सर्वच बाबींचा विचार करेन. जवळपास वर्षभर तो खेळलेला नाही. त्यामुळे संघात पुन्हा येण्यासाठी त्याने अगोदर इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळायला हवे, वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे परिमाण लावणे योग्य नाही.  Eh tho sahi baat hai!#TeamIndia #INDvNZ #NZvIND #MSD #MSdhoni #KapilDev pic.twitter.com/FKlRp7M9Nk — SportsCafe (@IndiaSportscafe) February 28, 2020 बुमराबाबत चिंता नको  न्यूझीलंड दौऱ्यात अपयशी ठरत असलेल्या जसप्रीत बुमराबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे कपिलदेव म्हणतात. एक चांगला स्पेल त्याला पुन्हा फॉर्मात आणू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त होण्यास काही काळ लागतो. जसे फलंदाजाला फॉर्मात येण्यास एखादी खेळी पुरेशी ठरते, तसे गोलंदाजाला एखादा भन्नाट स्पेल पुरेसा आहे.  - दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मतभेद? ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या  सातत्याने खेळत असल्यामुळे ताण येत असेल तर आयपीएलमधून ब्रेक घ्या, असा थेट सल्ला कपिलदेव यांनी टीम इंडियाला दिला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी थेट स्टेडियम ते स्टेडियम असा प्रवास करावा लागला, तसेच वर्षातील सामने, प्रवास असा वर्षातील 300 दिवस व्यस्त कार्यक्रम असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले होते. - ... तर आयपीएल खेळू नका; कपिल देव यांचा टीम इंडियाला कानमंत्र! या संदर्भात बोलताना कपिलदेव यांनी आयपीएलमधून ब्रेक घ्या, असे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर जे खेळाडू टीम इंडियातून सर्व प्रकारांत खेळतात, त्यांनी आयपीएलमधून विश्रांती द्यावी, असा 'प्रस्ताव' दिला आहे. If You Are Feeling Burned Out, Don’t Play IPL #Sportskeeda #IPL #KapilDev pic.twitter.com/PefEGyT4J1 — Sportskeeda India (@Sportskeeda) February 28, 2020 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2PzMIe8
Read More
LIVE: हिंसा के बाद दिल्ली पुलिस की गिरफ्त में 630 लोग, सुरक्षाबलों का गश्त https://ift.tt/385NS7D
दक्षिण कोरिया में कोरोना वायरस का कहर, 594 नए मामले आए सामने https://ift.tt/3aanf2I
राम मंदिर ट्रस्ट की बैठक आज, भूमिपूजन का मुहूर्त निकलने की उम्मीद https://ift.tt/2TkeNr2
आज बुंदेलखंड में PM मोदी करेंगे 296 KM लंबे एक्सप्रेस-वे का शिलान्यास https://ift.tt/2TaEf3a
राज्यसभा चुनाव से पहले गुजरात में विधायकों के जोड़तोड़ का खेल https://ift.tt/2Tpkynl
मराठी शाळांचं आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य कसं असेल?