Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 28, 2020

मराठी शाळांचं आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य कसं असेल?
लीप वर्ष म्हणजे काय? 29 फेब्रुवारी तारीख चार वर्षांनी का येते?
'अरे बळीराजा नको करू आत्महत्या' शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या
'या' विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका

वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेची गुप्तचर संस्था कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून आहे. तसेच चीनसह जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना या विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका असण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी वर्तवली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे कोरोनाचा प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता या संस्थेने वर्तवली असून, जर हा रोग भारतात पसरला, तर येथील आरोग्य अधिकारी या रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सक्षम आहेत का, हा सवालदेखील या गुप्तचर संस्थेने विचारला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेकडून जरी चिंता व्यक्त केली जात असली, तरी चीनसारखीच प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये आजवर कोरोनाची लागण झालेली तीनच प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ही सर्व प्रकरणे केरळ राज्यात आहेत. सरकारच्या निवेदनानुसार, आणखी २३ हजार ५३१ जण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.असे असले तरी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्याचे थांबवले नाही.

जगभरात फैलाव
चीनमध्ये दोन हजार ७८८ जणांचा मृत्यू
इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू; १४० जणांना लागण
इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांच्यावर उपचार सुरू
दक्षिण कोरियात दोन हजार जणांना लागण

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'या' विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेची गुप्तचर संस्था कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून आहे. तसेच चीनसह जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना या विषाणूमुळे भारताला सर्वांत जास्त धोका असण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी वर्तवली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतातील प्रचंड लोकसंख्येमुळे कोरोनाचा प्रसार भारतात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता या संस्थेने वर्तवली असून, जर हा रोग भारतात पसरला, तर येथील आरोग्य अधिकारी या रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सक्षम आहेत का, हा सवालदेखील या गुप्तचर संस्थेने विचारला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेकडून जरी चिंता व्यक्त केली जात असली, तरी चीनसारखीच प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये आजवर कोरोनाची लागण झालेली तीनच प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ही सर्व प्रकरणे केरळ राज्यात आहेत. सरकारच्या निवेदनानुसार, आणखी २३ हजार ५३१ जण सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.असे असले तरी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्याचे थांबवले नाही. जगभरात फैलाव चीनमध्ये दोन हजार ७८८ जणांचा मृत्यू इराणमध्ये १९ जणांचा मृत्यू; १४० जणांना लागण इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांच्यावर उपचार सुरू दक्षिण कोरियात दोन हजार जणांना लागण News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3acoPRQ
Read More
या जिल्ह्याला घातलाय क्षयरोगाने विळखा  

बेळगाव : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दर सहा महिन्यातून एकदा क्षयरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. 2018 मध्ये जिल्हाभरात 2,990 क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढले असून तब्बल 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचा विळखा घट्ट होत चालला आहे. 

हे पण वाचा -  या अधिकाऱ्याकडून होतो आमदार निधी मंजूर

क्षयरोगाला टीबी (ट्युबरक्‍युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार "मायकोबॅक्‍टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. प्रामुख्याने यात रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होत असते. तर काही रुग्णांमध्ये फुफ्फुसासह इतर अवयवांनाही बाधा होते. क्षयरोगमुक्‍त भारत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळे 2017 पासून दरवर्षी सहा महिन्यांतून एकदा जिल्ह्यात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णाचा कफ संग्रहित करुन तो चाचणीसाठी पाठविण्यात येतो. दरवर्षी जुलै आणि डिसेंबर महिन्यात याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिने मोफत उपचार करण्यात येत आहेत. पौष्टिक आहार सेवन करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत प्रतिमहा पाचशे रुपये आर्थिक साहाय्यधन दिले जाते. तर सहा महिने औषधोपचार व योग्य काळजी घेतल्यानंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे आरोग्य खात्याचा दावा आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात पोलिस निरीक्षकावर हल्ला

क्षयरोगाची लक्षणे 
क्षयरोग असलेली व्यक्‍ती बोलली, थुंकली किंवा शिंकली, तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे, अशी लक्षणे असल्यास 
क्षयरोगाची शक्‍यता असते. 

क्षयरोगाचे प्रकार 
फुफ्फुसासह इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. त्यामध्ये हाडे-सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग आदींचा समावेश आहे. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने किंवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असते. जर उपचार मध्येच बंद केले, तर क्षयरोग परत उलटण्याची शक्‍यता असते. 

क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षापासून घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यात येतात. 
-डॉ. अनिल कोरबू, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या जिल्ह्याला घातलाय क्षयरोगाने विळखा   बेळगाव : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दर सहा महिन्यातून एकदा क्षयरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. 2018 मध्ये जिल्हाभरात 2,990 क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढले असून तब्बल 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचा विळखा घट्ट होत चालला आहे.  हे पण वाचा -  या अधिकाऱ्याकडून होतो आमदार निधी मंजूर क्षयरोगाला टीबी (ट्युबरक्‍युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार "मायकोबॅक्‍टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. प्रामुख्याने यात रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होत असते. तर काही रुग्णांमध्ये फुफ्फुसासह इतर अवयवांनाही बाधा होते. क्षयरोगमुक्‍त भारत करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळे 2017 पासून दरवर्षी सहा महिन्यांतून एकदा जिल्ह्यात संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णाचा कफ संग्रहित करुन तो चाचणीसाठी पाठविण्यात येतो. दरवर्षी जुलै आणि डिसेंबर महिन्यात याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात 5,017 जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिने मोफत उपचार करण्यात येत आहेत. पौष्टिक आहार सेवन करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत प्रतिमहा पाचशे रुपये आर्थिक साहाय्यधन दिले जाते. तर सहा महिने औषधोपचार व योग्य काळजी घेतल्यानंतर हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे आरोग्य खात्याचा दावा आहे.  हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात पोलिस निरीक्षकावर हल्ला क्षयरोगाची लक्षणे  क्षयरोग असलेली व्यक्‍ती बोलली, थुंकली किंवा शिंकली, तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे, अशी लक्षणे असल्यास  क्षयरोगाची शक्‍यता असते.  क्षयरोगाचे प्रकार  फुफ्फुसासह इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. त्यामध्ये हाडे-सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग आदींचा समावेश आहे. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने किंवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असते. जर उपचार मध्येच बंद केले, तर क्षयरोग परत उलटण्याची शक्‍यता असते.  क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षापासून घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यात येतात.  -डॉ. अनिल कोरबू, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ad6d4c
Read More
डोळ्यांवर झोप असतानाही हाकतात ट्रक

नवी दिल्ली -  वाहनांच्या अपघातांमागील कारणे पाहिली असता वाहनचालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटल्याचे कारण अनेकदा सांगितले जाते. हे खरे असल्याचे ट्रकचालकांनीही मान्य केले आहे. डोळ्यांवर झोप असताना किंवा थकवा जाणवत असला तरी गाडी चालवणे भाग असते, असे ५० टक्के चालकांनी सांगितले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने ‘भारतातील ट्रकचालकांचा स्थिती’ या विषयावर सर्व्हे करून अहवाल तयार केला आहे. या प्रकारचा हा पहिलाच तपशीलवार अहवाल आहे. यासाठी देशातील दहा शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यातून ट्रकचालकांचे हे वास्तव समोर आले आहे. शिवाय पाहणीत प्रवासात काही प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असे पाचपैकी एका ट्रकचालकाने मान्य केले. 

ट्रक चालविताना प्रवासात विविध विभागांना लाच दिली जात असल्याचे सत्यही यातून उघड झाले आहे. सध्या ट्रकचालक आणि ट्रकमालकांना वर्षाला ४७ हजार ८५२ कोटी रुपयांचा मलिदा सरकारी विभागांना मिळतो. विशेष म्हणजे यातील मोठा वाटा पोलिसांकडे जातो. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या अंदाजानुसार २००६-०७ मध्ये ट्रक वाहतुकीतून २२ हजार ०४८ कोटी रुपयांची लाच दिली गेली. 

दहा शहरांमध्ये पाहणी 
दिल्ली-राष्ट्रीय राजधानी विभाग, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोलकता, बंगळूर, चेन्नई, कानपूर, विजयवाडा आणि गुवाहाटी या दहा शहरांमध्ये करण्यात आली. तेथील सुमारे एक हजार २१७ ट्रकचालक आणि ट्रकमालक यांची मुलाखत घेऊन यातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. वाहन परवाना मिळविण्यापूर्वी वाहन चालविण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते, असे दहापैकी नऊ ट्रकचालकांनी (९० टक्के) कबूल केले.

कामाच्या ताणामुळे वेगात वाढ
कामाचा ताण असल्याने माल वेळेत पोचण्यासाठी भरधाव गाडी चालवावी लागते, असा दावा दोन तृतीयांशापेक्षा अधिक (६७.१ टक्का) चालकांनी केला आहे. 
दिल्लीतील ५८ टक्के चालकांनी गेल्या दहा वर्षांत आयुष्याची गुणवत्तेत बिघाड झाला असल्याचे सांगितले. 

ट्रकचालकांच्या दैनावस्थेवर प्रकाश
ट्रक चालकांच्या दैनावस्थेवरही या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यात ५३ टक्के चालक त्यांच्या व्यवसायाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले. कुटुंबातील अन्य सदस्यांनी किंवा नातेवाइकांनी या व्यवसायात उतरावे, असे अजिबात वाटत नसल्याचे ८४ टक्के चालकांनी सांगितले. रस्त्यावर सुरक्षेचा अभाव असल्याने या ट्रक व्यवसायाबद्दल आकर्षण वाटत नसल्याचे दोन तृतीयांश चालकांनी सांगितले.

वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार
१५,००० - ट्रक अपघातांतील बळी
५७,००० - ट्रकमुळे होणारे अपघात

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

डोळ्यांवर झोप असतानाही हाकतात ट्रक नवी दिल्ली -  वाहनांच्या अपघातांमागील कारणे पाहिली असता वाहनचालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटल्याचे कारण अनेकदा सांगितले जाते. हे खरे असल्याचे ट्रकचालकांनीही मान्य केले आहे. डोळ्यांवर झोप असताना किंवा थकवा जाणवत असला तरी गाडी चालवणे भाग असते, असे ५० टक्के चालकांनी सांगितले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने ‘भारतातील ट्रकचालकांचा स्थिती’ या विषयावर सर्व्हे करून अहवाल तयार केला आहे. या प्रकारचा हा पहिलाच तपशीलवार अहवाल आहे. यासाठी देशातील दहा शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यातून ट्रकचालकांचे हे वास्तव समोर आले आहे. शिवाय पाहणीत प्रवासात काही प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असे पाचपैकी एका ट्रकचालकाने मान्य केले.  ट्रक चालविताना प्रवासात विविध विभागांना लाच दिली जात असल्याचे सत्यही यातून उघड झाले आहे. सध्या ट्रकचालक आणि ट्रकमालकांना वर्षाला ४७ हजार ८५२ कोटी रुपयांचा मलिदा सरकारी विभागांना मिळतो. विशेष म्हणजे यातील मोठा वाटा पोलिसांकडे जातो. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या अंदाजानुसार २००६-०७ मध्ये ट्रक वाहतुकीतून २२ हजार ०४८ कोटी रुपयांची लाच दिली गेली.  दहा शहरांमध्ये पाहणी  दिल्ली-राष्ट्रीय राजधानी विभाग, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोलकता, बंगळूर, चेन्नई, कानपूर, विजयवाडा आणि गुवाहाटी या दहा शहरांमध्ये करण्यात आली. तेथील सुमारे एक हजार २१७ ट्रकचालक आणि ट्रकमालक यांची मुलाखत घेऊन यातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. वाहन परवाना मिळविण्यापूर्वी वाहन चालविण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते, असे दहापैकी नऊ ट्रकचालकांनी (९० टक्के) कबूल केले. कामाच्या ताणामुळे वेगात वाढ कामाचा ताण असल्याने माल वेळेत पोचण्यासाठी भरधाव गाडी चालवावी लागते, असा दावा दोन तृतीयांशापेक्षा अधिक (६७.१ टक्का) चालकांनी केला आहे.  दिल्लीतील ५८ टक्के चालकांनी गेल्या दहा वर्षांत आयुष्याची गुणवत्तेत बिघाड झाला असल्याचे सांगितले.  ट्रकचालकांच्या दैनावस्थेवर प्रकाश ट्रक चालकांच्या दैनावस्थेवरही या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. यात ५३ टक्के चालक त्यांच्या व्यवसायाबद्दल असमाधानी असल्याचे दिसून आले. कुटुंबातील अन्य सदस्यांनी किंवा नातेवाइकांनी या व्यवसायात उतरावे, असे अजिबात वाटत नसल्याचे ८४ टक्के चालकांनी सांगितले. रस्त्यावर सुरक्षेचा अभाव असल्याने या ट्रक व्यवसायाबद्दल आकर्षण वाटत नसल्याचे दोन तृतीयांश चालकांनी सांगितले. वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार १५,००० - ट्रक अपघातांतील बळी ५७,००० - ट्रकमुळे होणारे अपघात News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39b7Sar
Read More
ब्रेकफास्ट @ बॅरोमीटर

फूडहंट 

पुण्यातील प्रमुख निवासी परिसर अशी ख्याती असलेल्या ‘कोथरूड’चे फूड पॅराडाइसमध्ये रूपांतर झालेले अनेकांनी अनुभवले असेलच. छोट्या फूड चेन्सपासून ते मोठमोठे रेस्टॉरंट्स इथे आहेत. पण, सिटीप्राइडजवळ कोथरूडमधील पहिल्यावहिल्या फाइन-डाइन रेस्टॉरंटचा मान ‘बॅरोमीटर’ला द्यायला हवा. ‘ऑल डे डायनिंग’ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये दर्जेदार ग्लोबल फूड अनुभवायला मिळते. खवय्ये कोथरूडकरांना फाइन डाइन एक्सपीरियन्ससाठी आता कोरेगाव पार्क आणि बाणेरच्या हॉटेल्सकडे धाव घ्यावी लागत नाही. यामुळेच अल्पावधीत बॅरोमीटरला नियमित व नवीन ग्राहकवर्ग मिळाला आहे. ब्रेकफास्ट आणि लंच-डिनर असे दोन वेगवेगळे मेन्यू येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण ब्रेकफास्ट अनुभवता यावा यासाठी येथे खास मेन्यू डिझाइन केला आहे. इंडियन, कॉंटिनेंटल, मेक्सिकन, इंग्लिश आणि इतर ब्रेकफास्टचे अनेक पर्याय इथे चाखायला मिळतात. इथली सर्वांत लक्षवेधी ऑफेरिग म्हणजे ‘फ्री कॉफी’! ब्रेकफास्टला, म्हणजेच सकाळी ७.३० ते ११ या वेळेत सर्वांना फिल्टर कॉफी विनामूल्य आहे आणि तीही अमर्यादित. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रेकफास्ट म्हटले की, डोळ्यांसमोर प्रथम येते अंडे. अंड्याच्या इंडियन आणि विदेशी प्रकारात विविध डिशेस मेन्यूमध्ये बघायला मिळतात. यापैकी उल्लेखनीय डिश म्हणजे गोट चीज आणि ट्रफल ऑइल युक्त ‘वाइल्ड मशरूम अँड रोस्टेड गार्लिक स्क्रॅम्बल’ आणि गोअन रॉस ऑम्लेट. ट्रफल ऑइल, गोट चीज आणि गार्लिकमुळे या एग स्क्रॅम्बलची एक वेगळीच लाजवाब चव येते. गोव्यामध्ये सर्रास मिळणाऱ्या रॉस किंवा रस्सा ऑम्लेटचे मॉडिफाइड रूप येथे मिळते. ऑम्लेट, त्यावर रिच टेस्टी चिकन कोकोनट ग्रेव्ही आणि सोबत ब्रेड अगदी पोटभरीचे ठरते. क्रोक सेन्यॉर ही एक मेक्सिकन एग डिश असून, त्यात फ्राईड एग्स, फहिताच्या मसाल्यामधले सौसेज, बेक्ड बीन्स, सार क्रीम, बेशामेल याचा समावेश आहे. गालायेत बंडोरा ही एक जॉर्डेनिअन एग आणि चिकन डिश आहे. ती नुकतीच ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये ॲड झाली आहे. ‘द बॅरोमीटर ब्रेकफास्ट’ ही डिश घेतल्यास आपण रात्रीपर्यंत काहीच खाऊ शकणार नाही, हे नक्की...

फूडहंट : येती अँड द माँक आगळेवेगळे एशियन फूड

आंतरराष्ट्रीय डिशेसबरोबर येथील भारतीय पदार्थही तितकेच स्वादिष्ट आहेत. कमी तेलातले हेल्दी पोहे आणि चक्क प्रॉन्स पोहे देखील येथे मिळतात. सोबत थालीपीठ, पराठे, खिमा पावही! येथील छोले कुलछेची चव अफलातून आहे. नुकतीच ‘राधावल्लभी’ ही बंगाली डिश सर्व्ह करायला सुरुवात झाली आहे. राधावल्लभी म्हणजे मटारचे सारण असलेल्या ३ पुऱ्या व त्यासोबत चना दाल आणि दम आलू.            

फिटनेस प्रेमींमध्ये बॅरोमीटर लोकप्रिय आहे. ग्लुटन फ्री, किटो-डाएट फ्रेंडली डिशेसचे पर्याय बघायला मिळतात. आपापल्या डाएटनुसार त्या-त्या मापात डिश बनवून मिळते. किनुआ उपमा, बॉडी बिल्डर्स ब्रेकफास्ट, बुलेट-प्रूफ कॉफी (हाय कॅलरी कॉफी) असे पर्याय फिटनेस प्रेमींच्या पसंतीस उतरतात. बॅरोमीटरमध्ये डिशेस आणि प्रेझेंटेशनबरोबर उत्तम सर्व्हिस, इंटिरिअर आणि अँबियन्सवर देखील कष्ट घेतले आहेत. टेबलचे नंबरिंग, स्क्रीनवर चालणारे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे, म्युझिक या सगळ्यांवर बारकाईने काम केल्याचे लक्षात येते. सकाळच्या वेळेस, खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. त्यामुळे गप्पा मारत ब्रेकफास्ट करताना मंद हवेचा गारवा एक वेगळाच आनंद देऊन जातो.

हे हॉटेल अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाले असले, तरी बॅरोमीटरच्या टीमने माणुसकी जपल्याचे दिसून येते. पार्सल घ्यायला आलेल्या प्रत्येक झोमॅटो व स्वीगी बॉयला कोल्डड्रिंक किंवा कॉफी दिली जाते. येथे  वेटिंग अधिक असते, बाहेर थांबलेल्या ग्राहकांना मिनरल वॉटर आणि पिझ्झा स्लाइसेस दिले जातात. माणुसकी सोबतच सामाजिक बांधीलकीही जोपासलेली दिसते. बॅरोमीटरच्या पहिल्या वर्धापनदिन टीमने वंचित मुलांबरोबर साजरा केला, तर दुसरा वर्धापनदिन तृतीयपंथीयांसोबत  साजरा केला. अन्य ग्राहकही यात आनंदाने सामील झाले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ब्रेकफास्ट @ बॅरोमीटर फूडहंट  पुण्यातील प्रमुख निवासी परिसर अशी ख्याती असलेल्या ‘कोथरूड’चे फूड पॅराडाइसमध्ये रूपांतर झालेले अनेकांनी अनुभवले असेलच. छोट्या फूड चेन्सपासून ते मोठमोठे रेस्टॉरंट्स इथे आहेत. पण, सिटीप्राइडजवळ कोथरूडमधील पहिल्यावहिल्या फाइन-डाइन रेस्टॉरंटचा मान ‘बॅरोमीटर’ला द्यायला हवा. ‘ऑल डे डायनिंग’ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये दर्जेदार ग्लोबल फूड अनुभवायला मिळते. खवय्ये कोथरूडकरांना फाइन डाइन एक्सपीरियन्ससाठी आता कोरेगाव पार्क आणि बाणेरच्या हॉटेल्सकडे धाव घ्यावी लागत नाही. यामुळेच अल्पावधीत बॅरोमीटरला नियमित व नवीन ग्राहकवर्ग मिळाला आहे. ब्रेकफास्ट आणि लंच-डिनर असे दोन वेगवेगळे मेन्यू येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण ब्रेकफास्ट अनुभवता यावा यासाठी येथे खास मेन्यू डिझाइन केला आहे. इंडियन, कॉंटिनेंटल, मेक्सिकन, इंग्लिश आणि इतर ब्रेकफास्टचे अनेक पर्याय इथे चाखायला मिळतात. इथली सर्वांत लक्षवेधी ऑफेरिग म्हणजे ‘फ्री कॉफी’! ब्रेकफास्टला, म्हणजेच सकाळी ७.३० ते ११ या वेळेत सर्वांना फिल्टर कॉफी विनामूल्य आहे आणि तीही अमर्यादित.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ब्रेकफास्ट म्हटले की, डोळ्यांसमोर प्रथम येते अंडे. अंड्याच्या इंडियन आणि विदेशी प्रकारात विविध डिशेस मेन्यूमध्ये बघायला मिळतात. यापैकी उल्लेखनीय डिश म्हणजे गोट चीज आणि ट्रफल ऑइल युक्त ‘वाइल्ड मशरूम अँड रोस्टेड गार्लिक स्क्रॅम्बल’ आणि गोअन रॉस ऑम्लेट. ट्रफल ऑइल, गोट चीज आणि गार्लिकमुळे या एग स्क्रॅम्बलची एक वेगळीच लाजवाब चव येते. गोव्यामध्ये सर्रास मिळणाऱ्या रॉस किंवा रस्सा ऑम्लेटचे मॉडिफाइड रूप येथे मिळते. ऑम्लेट, त्यावर रिच टेस्टी चिकन कोकोनट ग्रेव्ही आणि सोबत ब्रेड अगदी पोटभरीचे ठरते. क्रोक सेन्यॉर ही एक मेक्सिकन एग डिश असून, त्यात फ्राईड एग्स, फहिताच्या मसाल्यामधले सौसेज, बेक्ड बीन्स, सार क्रीम, बेशामेल याचा समावेश आहे. गालायेत बंडोरा ही एक जॉर्डेनिअन एग आणि चिकन डिश आहे. ती नुकतीच ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये ॲड झाली आहे. ‘द बॅरोमीटर ब्रेकफास्ट’ ही डिश घेतल्यास आपण रात्रीपर्यंत काहीच खाऊ शकणार नाही, हे नक्की... फूडहंट : येती अँड द माँक आगळेवेगळे एशियन फूड आंतरराष्ट्रीय डिशेसबरोबर येथील भारतीय पदार्थही तितकेच स्वादिष्ट आहेत. कमी तेलातले हेल्दी पोहे आणि चक्क प्रॉन्स पोहे देखील येथे मिळतात. सोबत थालीपीठ, पराठे, खिमा पावही! येथील छोले कुलछेची चव अफलातून आहे. नुकतीच ‘राधावल्लभी’ ही बंगाली डिश सर्व्ह करायला सुरुवात झाली आहे. राधावल्लभी म्हणजे मटारचे सारण असलेल्या ३ पुऱ्या व त्यासोबत चना दाल आणि दम आलू.             फिटनेस प्रेमींमध्ये बॅरोमीटर लोकप्रिय आहे. ग्लुटन फ्री, किटो-डाएट फ्रेंडली डिशेसचे पर्याय बघायला मिळतात. आपापल्या डाएटनुसार त्या-त्या मापात डिश बनवून मिळते. किनुआ उपमा, बॉडी बिल्डर्स ब्रेकफास्ट, बुलेट-प्रूफ कॉफी (हाय कॅलरी कॉफी) असे पर्याय फिटनेस प्रेमींच्या पसंतीस उतरतात. बॅरोमीटरमध्ये डिशेस आणि प्रेझेंटेशनबरोबर उत्तम सर्व्हिस, इंटिरिअर आणि अँबियन्सवर देखील कष्ट घेतले आहेत. टेबलचे नंबरिंग, स्क्रीनवर चालणारे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे, म्युझिक या सगळ्यांवर बारकाईने काम केल्याचे लक्षात येते. सकाळच्या वेळेस, खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. त्यामुळे गप्पा मारत ब्रेकफास्ट करताना मंद हवेचा गारवा एक वेगळाच आनंद देऊन जातो. हे हॉटेल अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाले असले, तरी बॅरोमीटरच्या टीमने माणुसकी जपल्याचे दिसून येते. पार्सल घ्यायला आलेल्या प्रत्येक झोमॅटो व स्वीगी बॉयला कोल्डड्रिंक किंवा कॉफी दिली जाते. येथे  वेटिंग अधिक असते, बाहेर थांबलेल्या ग्राहकांना मिनरल वॉटर आणि पिझ्झा स्लाइसेस दिले जातात. माणुसकी सोबतच सामाजिक बांधीलकीही जोपासलेली दिसते. बॅरोमीटरच्या पहिल्या वर्धापनदिन टीमने वंचित मुलांबरोबर साजरा केला, तर दुसरा वर्धापनदिन तृतीयपंथीयांसोबत  साजरा केला. अन्य ग्राहकही यात आनंदाने सामील झाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ts3DjR
Read More
नगरसेवकांना "जोर'का झटका ; कर्मचाऱ्यांना मात्र सुखद धक्का... 

 

सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली पण अद्याप वर्कऑर्डर न झालेली सुमारे 15 कोटींची कामे स्थगित करत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नगरसेवकांना वर्षपूर्तीची भेट दिली. त्यांच्या निर्णयामुळे सन 2017-18 या कालावधीत सुचविण्यात आलेली व अभिप्राय दिलेली कामे आता थांबविण्यात येणार आहेत. कामे थांबविण्यात आल्याच्या वृत्तास त्यांनी "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला. त्याचवेळी 19 शिपायांसह तब्बल 55 जणांना पदोन्नती देत त्यांना सुखद धक्काही दिला. 

हे आधी वाचा - लेट लतिफांची उडणार झोप.... 

शासनाने मुदतवाढ दिली, पण.... 
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे घेऊन श्री. तावरे यांना शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी कामे थांबविण्याचा आदेश काढून श्री. तावरे यांनी नगरसेवकांना जोरदार धक्का दिला आहे. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. 

हेही वाचा - महापालिका अंदाजपत्रकावर "या' तारखेला चर्चा 

या तारखेपर्यंत मिळाली मुदतवाढ 
शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षातील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुुरु झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सर्व खातेप्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. 

या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती 
कार्यालय अधीक्षक - सुहास उंडाळे. 
वरिष्ठ मुख्य लेखनिक - खलीक काझी, सतीश पाटील, लव बुगडे, सिद्राम मलशेट्टी. 
वरिष्ठ श्रेणी लिपिक - राजेंद्रसा कोल्हापुरे, करीम बागवान, विजय तिऱ्हेकर, विजयकुमार अंजिखाने, श्‍यामल खराडे, भुजंग घोंगडे, फारुख शेख, दिलीप देशमुख, वंदना लोंढे, श्रीकांत गिडवीर, मल्लेशम नराल, गुरुनाथ येनगंदूल, रामचंद्र बडगू, व्यंकटेश गुर्रम, अभिमन्यू झांबरे, श्रीनिवास लिंगराज, मनोज धेंडे, मल्लिनाथ उटगी, कय्यूम बागवान, गोपाळ पिडगूलकर, उमेशकुमार मोरे, निर्मलकुमार शितोळे, अनुराधा कव्हेकर, युवराज क्षीरसागर, विशाल माने, जवाहर जाजू, रमेश उळागड्डे, मुर्तुज शहापूरे, राजेंद्र साळुंके, माधवराव पाटील. 
कनिष्ठ श्रेणी लिपीक - रऊफ पटेल, कृष्णमूर्ती धारा, विजयकुमार करली, रमेश मोहिते, अनिल खरटमल, वसंत ढाले, मीरा पोरे, महादेव ढेकणे, प्रशांत केरूरकर, पोपट खरात, अश्‍विनी खडतरे, अल्लाबक्ष शेख, सविता मकवाना, संतोष कलकामकर, राजशेखर कोळी, सुचित्रा सुलतानपुरे, नागेश कुर्ले, सिद्राम यमनूर, महादेव येळे. 

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नगरसेवकांना "जोर'का झटका ; कर्मचाऱ्यांना मात्र सुखद धक्का...    सोलापूर : भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली पण अद्याप वर्कऑर्डर न झालेली सुमारे 15 कोटींची कामे स्थगित करत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नगरसेवकांना वर्षपूर्तीची भेट दिली. त्यांच्या निर्णयामुळे सन 2017-18 या कालावधीत सुचविण्यात आलेली व अभिप्राय दिलेली कामे आता थांबविण्यात येणार आहेत. कामे थांबविण्यात आल्याच्या वृत्तास त्यांनी "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला. त्याचवेळी 19 शिपायांसह तब्बल 55 जणांना पदोन्नती देत त्यांना सुखद धक्काही दिला.  हे आधी वाचा - लेट लतिफांची उडणार झोप....  शासनाने मुदतवाढ दिली, पण....  महापालिका आयुक्तपदाची सूत्रे घेऊन श्री. तावरे यांना शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी कामे थांबविण्याचा आदेश काढून श्री. तावरे यांनी नगरसेवकांना जोरदार धक्का दिला आहे. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. पण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी वेळेत खर्च केला नाही. परिणामी तब्बल तीन आर्थिक वर्षांतील निधी खर्च करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.  हेही वाचा - महापालिका अंदाजपत्रकावर "या' तारखेला चर्चा  या तारखेपर्यंत मिळाली मुदतवाढ  शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षातील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुुरु झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सर्व खातेप्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.  या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती  कार्यालय अधीक्षक - सुहास उंडाळे.  वरिष्ठ मुख्य लेखनिक - खलीक काझी, सतीश पाटील, लव बुगडे, सिद्राम मलशेट्टी.  वरिष्ठ श्रेणी लिपिक - राजेंद्रसा कोल्हापुरे, करीम बागवान, विजय तिऱ्हेकर, विजयकुमार अंजिखाने, श्‍यामल खराडे, भुजंग घोंगडे, फारुख शेख, दिलीप देशमुख, वंदना लोंढे, श्रीकांत गिडवीर, मल्लेशम नराल, गुरुनाथ येनगंदूल, रामचंद्र बडगू, व्यंकटेश गुर्रम, अभिमन्यू झांबरे, श्रीनिवास लिंगराज, मनोज धेंडे, मल्लिनाथ उटगी, कय्यूम बागवान, गोपाळ पिडगूलकर, उमेशकुमार मोरे, निर्मलकुमार शितोळे, अनुराधा कव्हेकर, युवराज क्षीरसागर, विशाल माने, जवाहर जाजू, रमेश उळागड्डे, मुर्तुज शहापूरे, राजेंद्र साळुंके, माधवराव पाटील.  कनिष्ठ श्रेणी लिपीक - रऊफ पटेल, कृष्णमूर्ती धारा, विजयकुमार करली, रमेश मोहिते, अनिल खरटमल, वसंत ढाले, मीरा पोरे, महादेव ढेकणे, प्रशांत केरूरकर, पोपट खरात, अश्‍विनी खडतरे, अल्लाबक्ष शेख, सविता मकवाना, संतोष कलकामकर, राजशेखर कोळी, सुचित्रा सुलतानपुरे, नागेश कुर्ले, सिद्राम यमनूर, महादेव येळे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2I47Xkn
Read More
दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका

मुंबई - राज्यातील दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका असल्याचा दावा भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (जीएसआय)  प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ग्रेटर मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर भूगर्भ विभागाने २२५  खेड्यांचा अभ्यास केला होता. संशोधकांनी यासाठी या सर्व खेड्यांचे धोक्याच्या चार श्रेणींमध्ये विभाजन केले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील चार जिल्ह्यांतील ४७ गावांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळले. हा अहवाल त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शोध प्रकल्पांची व्याप्ती
भूस्खलनाच्या या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी ‘जीएसआय’कडून दोन शोध प्रकल्प हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पांचा कालखंड हा २०१५ ते १८ असा होता. या प्रकल्पाच्या माध्यमातूनच रायगड, रत्नागिरी, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकवस्तीला लागून असलेल्या धोकादायक उतारांची माहिती संकलित करण्यात आली तसेच मुंबईच्या नागरी भागांतील लोकवस्तीला लागून असलेल्या टेकड्यांचे धोकादायक उतारही निश्‍चित करण्यात आले होते.

पश्‍चिम घाट रडारवर
पश्‍चिम घाटातील १९८० पासूनच्या भूस्खलनाचा जीएसआयकडून सविस्तर अभ्यास केला जात असून याचे आपत्तीपूर्वी आणि आपत्तीनंतर असे दोन भागांत त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय भूस्खलन शक्यता मापन कार्यक्रमान्वये तब्बल २८ हजार किलोमीटरच्या परिसराचा वेध घेणारा भूस्खलन संभाव्यतः नकाशा तयार केला जात असून, यामध्ये महाराष्ट्रातील डोंगराळ भागांचा समावेश आहे. हा नकाशा २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका मुंबई - राज्यातील दोनशे खेड्यांना भूस्खलनाचा धोका असल्याचा दावा भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (जीएसआय)  प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ग्रेटर मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर भूगर्भ विभागाने २२५  खेड्यांचा अभ्यास केला होता. संशोधकांनी यासाठी या सर्व खेड्यांचे धोक्याच्या चार श्रेणींमध्ये विभाजन केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील चार जिल्ह्यांतील ४७ गावांना भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळले. हा अहवाल त्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शोध प्रकल्पांची व्याप्ती भूस्खलनाच्या या धोक्याचा अभ्यास करण्यासाठी ‘जीएसआय’कडून दोन शोध प्रकल्प हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पांचा कालखंड हा २०१५ ते १८ असा होता. या प्रकल्पाच्या माध्यमातूनच रायगड, रत्नागिरी, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकवस्तीला लागून असलेल्या धोकादायक उतारांची माहिती संकलित करण्यात आली तसेच मुंबईच्या नागरी भागांतील लोकवस्तीला लागून असलेल्या टेकड्यांचे धोकादायक उतारही निश्‍चित करण्यात आले होते. पश्‍चिम घाट रडारवर पश्‍चिम घाटातील १९८० पासूनच्या भूस्खलनाचा जीएसआयकडून सविस्तर अभ्यास केला जात असून याचे आपत्तीपूर्वी आणि आपत्तीनंतर असे दोन भागांत त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय भूस्खलन शक्यता मापन कार्यक्रमान्वये तब्बल २८ हजार किलोमीटरच्या परिसराचा वेध घेणारा भूस्खलन संभाव्यतः नकाशा तयार केला जात असून, यामध्ये महाराष्ट्रातील डोंगराळ भागांचा समावेश आहे. हा नकाशा २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2T9jjd2
Read More
भारत करणार जगाचे नेतृत्व; शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांची माहिती 

पुणे - आज अस्तित्वात असलेल्या ब्रह्मांडाबद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती आहे. पण, महाविस्फोटानंतर (बिग बॅंग) निर्माण झालेले प्रारंभीचे ब्रह्मांड कसे होते, त्यातून आकाशगंगा, डार्क मॅटर आदींची निर्मिती कशी झाली, याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. प्रारंभीच्या ब्रह्मांडाचा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंडने अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी "सीएमबी-भारत' ही मोहीम आखली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत जगाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांनी केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेत (आयुका) विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या "ब्रह्मांडाच्या स्वरूपाचा उलगडा' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ब्रह्मांडाचे आजचे स्वरूप, वैश्‍विक स्थिरांक, कोल्ड डार्क मॅटर आदी विषयांचा आढावा त्यांनी घेतला. 

प्रा. सौरदीप म्हणाले, ""विश्वातील 95 टक्के पदार्थ, सतत विस्तारत जाणारे ब्रह्मांड, प्राचीन गुरुत्वीय लहरी याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. यासंबंधीची माहिती सुरुवातीच्या ब्रह्मांडीय घटनांतून, त्यांच्या स्वरूपातून मिळेल. त्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी ही मोहीम आखली आहे.'' आयुकाचे संचालक प्रा. शोमक राय चौधरी, प्रा. सुहृद मोरे आदी उपस्थित होते. 

अशी आहे मोहीम 
- ब्रह्मांडीय "मायक्रोव्हेव'चा अभ्यास करण्यासाठी जगातील पहिली मोहीम 
- पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर असलेल्या "एल-2' बिंदूवर उपग्रह स्थिरावणार 
- "सीएमबी-भारत'मधील पेलोडचे वजन दोन टन 
- "जीएसएलव्ही मार्क : 3' अग्निबाणाचे प्रक्षेपण शक्‍य 

मोहिमेचे फायदे 
- क्वांटम ग्राव्हिटीद्वारे सुरुवातीच्या ब्रह्मांडाची निरीक्षणे होणार 
- डार्क मॅटर, दृश्‍य ब्रह्मांडातील बेरिऑन्स, न्यूट्रिनो फिजिक्‍सच्या निरीक्षणासाठी मदत 
- प्राचीन आणि सुरुवातीच्या ब्रह्मांडातील माहिती मिळणार 

देशाला मूलभूत विज्ञानात योगदान देण्याची सुवर्णसंधी "सीएमबी-भारत' मोहिमेद्वारे निर्माण झाली आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्याही मोहिमेकडून अपेक्षा उंचाविल्या आहेत. 
- प्रा. तरुण सौरदीप 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भारत करणार जगाचे नेतृत्व; शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांची माहिती  पुणे - आज अस्तित्वात असलेल्या ब्रह्मांडाबद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती आहे. पण, महाविस्फोटानंतर (बिग बॅंग) निर्माण झालेले प्रारंभीचे ब्रह्मांड कसे होते, त्यातून आकाशगंगा, डार्क मॅटर आदींची निर्मिती कशी झाली, याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. प्रारंभीच्या ब्रह्मांडाचा कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंडने अभ्यास करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी "सीएमबी-भारत' ही मोहीम आखली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत जगाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. तरुण सौरदीप यांनी केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेत (आयुका) विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या "ब्रह्मांडाच्या स्वरूपाचा उलगडा' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ब्रह्मांडाचे आजचे स्वरूप, वैश्‍विक स्थिरांक, कोल्ड डार्क मॅटर आदी विषयांचा आढावा त्यांनी घेतला.  प्रा. सौरदीप म्हणाले, ""विश्वातील 95 टक्के पदार्थ, सतत विस्तारत जाणारे ब्रह्मांड, प्राचीन गुरुत्वीय लहरी याबद्दल आपण आजही अनभिज्ञ आहोत. यासंबंधीची माहिती सुरुवातीच्या ब्रह्मांडीय घटनांतून, त्यांच्या स्वरूपातून मिळेल. त्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी ही मोहीम आखली आहे.'' आयुकाचे संचालक प्रा. शोमक राय चौधरी, प्रा. सुहृद मोरे आदी उपस्थित होते.  अशी आहे मोहीम  - ब्रह्मांडीय "मायक्रोव्हेव'चा अभ्यास करण्यासाठी जगातील पहिली मोहीम  - पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर असलेल्या "एल-2' बिंदूवर उपग्रह स्थिरावणार  - "सीएमबी-भारत'मधील पेलोडचे वजन दोन टन  - "जीएसएलव्ही मार्क : 3' अग्निबाणाचे प्रक्षेपण शक्‍य  मोहिमेचे फायदे  - क्वांटम ग्राव्हिटीद्वारे सुरुवातीच्या ब्रह्मांडाची निरीक्षणे होणार  - डार्क मॅटर, दृश्‍य ब्रह्मांडातील बेरिऑन्स, न्यूट्रिनो फिजिक्‍सच्या निरीक्षणासाठी मदत  - प्राचीन आणि सुरुवातीच्या ब्रह्मांडातील माहिती मिळणार  देशाला मूलभूत विज्ञानात योगदान देण्याची सुवर्णसंधी "सीएमबी-भारत' मोहिमेद्वारे निर्माण झाली आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्याही मोहिमेकडून अपेक्षा उंचाविल्या आहेत.  - प्रा. तरुण सौरदीप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Pvpupy
Read More
‘भारतरत्न’चे राजकारण

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील चौकात एका चौथऱ्यावर भेटलेल्या पाच पुतळ्यांची कविता त्या महामानवांची वेदना तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचविते. संवेदनशील, देशप्रेमी नागरिकाच्या अंगावर काटा आणणारी ही कविता आहे. सध्या महापुरुषांच्या नावांचा वापर ज्या पद्धतीने राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे, ती बाब धक्कादायक आहे. जातीपातीचे राजकारण असते मुळात विभाजक. त्यात धर्माचे, पंथाचे पाठभेद शिरले की ते ठरते विदारक अन्‌ एकाच विचाराच्या दोन पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले की ते ठरते विद्वेषक. गेल्या वेळी वेगळे लढून दोन पक्ष नंतर एकत्र आले. या वेळी उलटे झाले. लढले एकत्र अन्‌ नंतर झाले वेगळे. सत्तालालसा परस्परसंबंध ठरवतेय सध्या. पण एकेकाळी सत्ता अप्राप्य असल्याने हिंदुत्ववादी राजकारण हा दोघांनाही जोडणारा धागा होता. आज वेगळे झाल्यावरही या मतपेढीवर भाजप आणि शिवसेना हे दोघेही हक्‍क सांगत आहेत. त्यासाठी वैचारिक प्रतीके आपापल्या दिशेने ओढली जात आहेत. किमान समान कार्यक्रमानंतरही शिवसेनेचे ‘चलो अयोध्या’ आहेच अन्‌ भाजप त्यांना अडचणीत आणायला कधीही न मांडलेल्या ‘सावरकर गौरव ठरावा’चा आग्रह धरते आहे. या हिंदुत्वाच्या साठमारीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, तो निंद्यच आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापुरुषांचे जीवन तसेही सरळ, एकरेषीय नसतेच. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व तर वादळी होते. त्यांच्याविषयीच्या काही प्रवादांवर चर्चा होऊही शकते; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते ते त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे काय, याबद्दल सुरू असलेले राजकारण. समाजजीवनात, राष्ट्राच्या वाटचालीत योगदान देणारा कुणीही सच्चा माणूस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी मोर्चेबांधणी करत नसतो. त्यासाठी पुढे येतात ते अनुयायी. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा नेहरू-गांधींना केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला ही उजव्या विचारसरणीची ठसठस. नेहरू-गांधी परिवाराच्या वरचष्म्याला विरोध करण्यासाठी सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची चरित्रे मग प्रतीक पर्याय म्हणून प्रखरपणे समोर आणली गेली. वाजपेयी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले ते विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्याने. खरे तर मतभेदांना तिलांजली देत देशाने भविष्याकडे वाटचाल करायची असते; पण ज्या संस्कृतीत मंदिरप्रवेशाचे मुद्दे आजही वादविषय ठरतात, तेथे महापुरुषही ‘तुमचे ते’ अन्‌ ‘आमचे हे’ अशा विभाजनात वाटले जातात. 

काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व बेरजेच्या राजकारणाचे भान नसलेले. ‘मी राहुल- सावरकर नाही’ असे गांधी घराण्याचे वारस अकारण म्हणतात अन्‌ वादाच्या आगीत विधानांच्या मोळ्या पडतात. खरे तर सावरकरांचे योगदान आणि मराठी माणसातले त्यांचे स्थान लक्षात घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. दादरमध्ये सावरकर स्मारकासाठी ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी स्थानिकांना मदत करत पाठविलेला प्रस्ताव वसंतदादा पाटील, शरद पवार अशा तत्कालिन राज्यप्रमुखांनी प्रत्यक्षात आणला. सर्वसमावेशकतेची, सामोपचाराची ही काँग्रेस संस्कृती आज पक्षनेतृत्वाच्या भीतीने दूर ठेवली जाते. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी मात्र कुणी चुगली केली, तर राहुलजींची मर्जी फिरायची या भीतीने कणाहीन वागणे पत्करले.

आश्‍वासनाचे विस्मरण?
 हिंदुत्ववादी पक्षांचे वर्तनही तपासण्यासारखे. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा विषय भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केला. देशाचा कारभार आपल्या मर्जीनुसार चालवायची या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची वृत्ती. अमित शहा तर सावरकरभक्‍त, पहिला ब्लॉग सावरकरांना समर्पित करणारे. ‘भारतरत्न’साठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला शिफारस करणे एवढाच काय तो नियम अन्‌ निकष. तरीही पक्षाला या आश्‍वासनाचा विसर पडतो आहे, की राजकारण करीत हा विषय तापवत ठेवायचा आहे? सावरकरांबरोबर फडवणीस सरकाने महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांचीही शिफारस ‘भारतरत्न’साठी पाठविलेली आहे. त्याचे पुढे काय झाले?

मतांकडे डोळे ठेवून दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन यांना या सन्मानाने गौरविले गेले, त्याच दिवशी या सर्वोच्च सन्मानाचे राजकारण सुरू झाले. ते दु:खद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचा या सन्मानासाठी विचार करावा काय, याचा विचार जरूर व्हावा, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिराव फुले किंवा क्रांतिकारक भगतसिंग या महापुरुषांची नावे वापरत ‘भारतरत्न’चे राजकारण होऊ नये. दिवंगत राष्ट्रपुरुषांना मरणयातना कितीदा द्यायच्या?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘भारतरत्न’चे राजकारण मध्यरात्र उलटल्यावर शहरातील चौकात एका चौथऱ्यावर भेटलेल्या पाच पुतळ्यांची कविता त्या महामानवांची वेदना तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचविते. संवेदनशील, देशप्रेमी नागरिकाच्या अंगावर काटा आणणारी ही कविता आहे. सध्या महापुरुषांच्या नावांचा वापर ज्या पद्धतीने राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे, ती बाब धक्कादायक आहे. जातीपातीचे राजकारण असते मुळात विभाजक. त्यात धर्माचे, पंथाचे पाठभेद शिरले की ते ठरते विदारक अन्‌ एकाच विचाराच्या दोन पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले की ते ठरते विद्वेषक. गेल्या वेळी वेगळे लढून दोन पक्ष नंतर एकत्र आले. या वेळी उलटे झाले. लढले एकत्र अन्‌ नंतर झाले वेगळे. सत्तालालसा परस्परसंबंध ठरवतेय सध्या. पण एकेकाळी सत्ता अप्राप्य असल्याने हिंदुत्ववादी राजकारण हा दोघांनाही जोडणारा धागा होता. आज वेगळे झाल्यावरही या मतपेढीवर भाजप आणि शिवसेना हे दोघेही हक्‍क सांगत आहेत. त्यासाठी वैचारिक प्रतीके आपापल्या दिशेने ओढली जात आहेत. किमान समान कार्यक्रमानंतरही शिवसेनेचे ‘चलो अयोध्या’ आहेच अन्‌ भाजप त्यांना अडचणीत आणायला कधीही न मांडलेल्या ‘सावरकर गौरव ठरावा’चा आग्रह धरते आहे. या हिंदुत्वाच्या साठमारीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, तो निंद्यच आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापुरुषांचे जीवन तसेही सरळ, एकरेषीय नसतेच. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व तर वादळी होते. त्यांच्याविषयीच्या काही प्रवादांवर चर्चा होऊही शकते; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते ते त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे काय, याबद्दल सुरू असलेले राजकारण. समाजजीवनात, राष्ट्राच्या वाटचालीत योगदान देणारा कुणीही सच्चा माणूस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी मोर्चेबांधणी करत नसतो. त्यासाठी पुढे येतात ते अनुयायी. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा नेहरू-गांधींना केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला ही उजव्या विचारसरणीची ठसठस. नेहरू-गांधी परिवाराच्या वरचष्म्याला विरोध करण्यासाठी सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची चरित्रे मग प्रतीक पर्याय म्हणून प्रखरपणे समोर आणली गेली. वाजपेयी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले ते विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्याने. खरे तर मतभेदांना तिलांजली देत देशाने भविष्याकडे वाटचाल करायची असते; पण ज्या संस्कृतीत मंदिरप्रवेशाचे मुद्दे आजही वादविषय ठरतात, तेथे महापुरुषही ‘तुमचे ते’ अन्‌ ‘आमचे हे’ अशा विभाजनात वाटले जातात.  काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व बेरजेच्या राजकारणाचे भान नसलेले. ‘मी राहुल- सावरकर नाही’ असे गांधी घराण्याचे वारस अकारण म्हणतात अन्‌ वादाच्या आगीत विधानांच्या मोळ्या पडतात. खरे तर सावरकरांचे योगदान आणि मराठी माणसातले त्यांचे स्थान लक्षात घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. दादरमध्ये सावरकर स्मारकासाठी ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी स्थानिकांना मदत करत पाठविलेला प्रस्ताव वसंतदादा पाटील, शरद पवार अशा तत्कालिन राज्यप्रमुखांनी प्रत्यक्षात आणला. सर्वसमावेशकतेची, सामोपचाराची ही काँग्रेस संस्कृती आज पक्षनेतृत्वाच्या भीतीने दूर ठेवली जाते. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी मात्र कुणी चुगली केली, तर राहुलजींची मर्जी फिरायची या भीतीने कणाहीन वागणे पत्करले. आश्‍वासनाचे विस्मरण?  हिंदुत्ववादी पक्षांचे वर्तनही तपासण्यासारखे. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा विषय भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केला. देशाचा कारभार आपल्या मर्जीनुसार चालवायची या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची वृत्ती. अमित शहा तर सावरकरभक्‍त, पहिला ब्लॉग सावरकरांना समर्पित करणारे. ‘भारतरत्न’साठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला शिफारस करणे एवढाच काय तो नियम अन्‌ निकष. तरीही पक्षाला या आश्‍वासनाचा विसर पडतो आहे, की राजकारण करीत हा विषय तापवत ठेवायचा आहे? सावरकरांबरोबर फडवणीस सरकाने महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांचीही शिफारस ‘भारतरत्न’साठी पाठविलेली आहे. त्याचे पुढे काय झाले? मतांकडे डोळे ठेवून दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन यांना या सन्मानाने गौरविले गेले, त्याच दिवशी या सर्वोच्च सन्मानाचे राजकारण सुरू झाले. ते दु:खद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचा या सन्मानासाठी विचार करावा काय, याचा विचार जरूर व्हावा, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिराव फुले किंवा क्रांतिकारक भगतसिंग या महापुरुषांची नावे वापरत ‘भारतरत्न’चे राजकारण होऊ नये. दिवंगत राष्ट्रपुरुषांना मरणयातना कितीदा द्यायच्या? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TpcAur
Read More
मुस्लिम आरक्षणावरून  आघाडीत मतभिन्नता 

मुंबई  - मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यावरून राज्य सरकारमध्येच मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षणाची घोषणा राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली; तर तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे शिवसेनेचे नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, नवीन २०२०-२१ चे शैक्षणिक प्रवेश सुरू होण्याआधीच मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येईल.

आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समाजासाठी नोकरी आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने अध्यादेश रद्द झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले गेले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु, धर्माधिष्ठित आरक्षण देण्यासाठी भाजपने नकार दिला होता.

काँग्रेसच्या आ. हुस्नबानो खलिफे यांनी येत्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी केली.  त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मलिक यांनी येत्या शैक्षणिक वर्षात हा कायदा केला जाईल, अशी हमी दिली.

दरम्यान, भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांना देण्यात येणारे आरक्षण न्यायालयात टिकेल का? आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, १९५० ला घटनादुरुस्ती करून नवबौद्ध आणि शीख धर्मातील अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरक्षण देता येते, हे सिद्ध झालेले आहे. आम्ही संविधानाच्या आधारावरच आरक्षण देऊ, याचा पुनरुच्चार केला. तसेच, सच्चर समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीदेखील आरक्षण देता येईल, असे मत नोंदविले असल्याने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देता येण्यास अडचण येत नसल्याचा विश्वास व्यक्त केला. 

शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समाज, दलित, आदिवासींच्या सामाजिक हक्कांचे संरक्षण करणार असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहेच. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. 
-नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री

राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकेच नाही, तर धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल. मंत्री ज्या वेळी उत्तर देतात तेव्हा सरकारच बोलत असते. शिवसेनेने आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवून कशाकशात सेटिंग केली आहे, हे एकदा जाहीर करावे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुस्लिम आरक्षणावरून  आघाडीत मतभिन्नता  मुंबई  - मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यावरून राज्य सरकारमध्येच मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षणाची घोषणा राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली; तर तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे शिवसेनेचे नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, नवीन २०२०-२१ चे शैक्षणिक प्रवेश सुरू होण्याआधीच मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येईल. आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समाजासाठी नोकरी आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने अध्यादेश रद्द झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले गेले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु, धर्माधिष्ठित आरक्षण देण्यासाठी भाजपने नकार दिला होता. काँग्रेसच्या आ. हुस्नबानो खलिफे यांनी येत्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी केली.  त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मलिक यांनी येत्या शैक्षणिक वर्षात हा कायदा केला जाईल, अशी हमी दिली. दरम्यान, भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांना देण्यात येणारे आरक्षण न्यायालयात टिकेल का? आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, १९५० ला घटनादुरुस्ती करून नवबौद्ध आणि शीख धर्मातील अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरक्षण देता येते, हे सिद्ध झालेले आहे. आम्ही संविधानाच्या आधारावरच आरक्षण देऊ, याचा पुनरुच्चार केला. तसेच, सच्चर समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीदेखील आरक्षण देता येईल, असे मत नोंदविले असल्याने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देता येण्यास अडचण येत नसल्याचा विश्वास व्यक्त केला.  शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समाज, दलित, आदिवासींच्या सामाजिक हक्कांचे संरक्षण करणार असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहेच. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.  -नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकेच नाही, तर धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल. मंत्री ज्या वेळी उत्तर देतात तेव्हा सरकारच बोलत असते. शिवसेनेने आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवून कशाकशात सेटिंग केली आहे, हे एकदा जाहीर करावे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/387BxQn
Read More
सोनभद्र: पत्थर की खदान धंसी, 2 घायल मजदूर निकाले गए, कई अभी भी फंसे https://ift.tt/2Pw2k2b