‘रासेयो’ घेणार पुतळ्यांची काळजी; मनपासोबत होणार करार; ८६ पुतळे, स्मारकांचा समावेश नागपूर : महापालिकेच्या अखत्यारित असलेले पुतळे आणि स्मारके यांची निगा राखण्याची जबाबदारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घेतली आहे. रासेयोच्या माध्यमातून पुतळे आणि स्मारकांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याबाबत विद्यापीठाद्वारे महापालिकेसोबत करार करण्यात येणार आहे. शहरात काही विशिष्ट चौकांमध्ये थोर पुरुषांचे ६२ पुतळे आणि २४ स्मारक उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचे व स्मारकांचे जतन करणे ही पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही बाब विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला निदर्शनास आली. याबाबत पालिकेशी संपर्क साधून त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांच्या माध्यमातून या पुतळ्यांची व स्मारकांची निगा राखण्याची योजना देण्यात आली. जाणून घ्या - आता याला काय म्हणावे! मृत शिक्षिकेमागेही कोरोना सर्वेक्षणाचे काम, एसडीओ कार्यालयाचा अजब कारभार प्रशासनाने ती बाब मान्य करीत होकार दिला. त्यानुसार ज्या महाविद्यालय परिसरात महापालिकेच्या अधिन असलेला पुतळा आहे. त्या पुतळ्याची वा स्मारकाची निगा राखणे आणि त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी त्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहा स्वयंसेवकांची राहणार आहे. त्यासाठी त्याच्यासोबत महापालिकेच्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. हा उपक्रम आठवड्यातून एकदा करावयाचा आहे. याशिवाय जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानेही काही उपक्रम घेता येतील काय? याबाबत विचार करण्यात येणार आहे. करारानुसार याबदल्यात विद्यार्थ्यांना निःशुल्क फायर फायटींगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सन्मानपत्रही देण्यात येईल. अधिक वाचा - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण पुतळे स्वच्छ ठेवण्यास होणार मदत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम राबविणारे विद्यापीठ प्रथमच आहे. यामुळे विद्यार्थ्याद्वारे शहरातील विविध पुतळे स्वच्छ ठेवण्यास मदत होणार असून त्यांचे जतन करण्यास मदर होईल. त्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे.  - डॉ. सोपानदेव पिसे, संचालक, रासेयो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 10, 2021

‘रासेयो’ घेणार पुतळ्यांची काळजी; मनपासोबत होणार करार; ८६ पुतळे, स्मारकांचा समावेश नागपूर : महापालिकेच्या अखत्यारित असलेले पुतळे आणि स्मारके यांची निगा राखण्याची जबाबदारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घेतली आहे. रासेयोच्या माध्यमातून पुतळे आणि स्मारकांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याबाबत विद्यापीठाद्वारे महापालिकेसोबत करार करण्यात येणार आहे. शहरात काही विशिष्ट चौकांमध्ये थोर पुरुषांचे ६२ पुतळे आणि २४ स्मारक उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचे व स्मारकांचे जतन करणे ही पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही बाब विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला निदर्शनास आली. याबाबत पालिकेशी संपर्क साधून त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांच्या माध्यमातून या पुतळ्यांची व स्मारकांची निगा राखण्याची योजना देण्यात आली. जाणून घ्या - आता याला काय म्हणावे! मृत शिक्षिकेमागेही कोरोना सर्वेक्षणाचे काम, एसडीओ कार्यालयाचा अजब कारभार प्रशासनाने ती बाब मान्य करीत होकार दिला. त्यानुसार ज्या महाविद्यालय परिसरात महापालिकेच्या अधिन असलेला पुतळा आहे. त्या पुतळ्याची वा स्मारकाची निगा राखणे आणि त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी त्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहा स्वयंसेवकांची राहणार आहे. त्यासाठी त्याच्यासोबत महापालिकेच्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. हा उपक्रम आठवड्यातून एकदा करावयाचा आहे. याशिवाय जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानेही काही उपक्रम घेता येतील काय? याबाबत विचार करण्यात येणार आहे. करारानुसार याबदल्यात विद्यार्थ्यांना निःशुल्क फायर फायटींगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना सन्मानपत्रही देण्यात येईल. अधिक वाचा - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण पुतळे स्वच्छ ठेवण्यास होणार मदत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम राबविणारे विद्यापीठ प्रथमच आहे. यामुळे विद्यार्थ्याद्वारे शहरातील विविध पुतळे स्वच्छ ठेवण्यास मदत होणार असून त्यांचे जतन करण्यास मदर होईल. त्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे.  - डॉ. सोपानदेव पिसे, संचालक, रासेयो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39ZdRRS

No comments:

Post a Comment