चांगले व्हा आणि इतरांसाठी चांगलं करा... दररोज पृथ्वीच्या एका विशिष्ट भागाला सूर्याचं दर्शन होत असतं. तसं पाहता प्रत्येक दिवसाची स्वतंत्र अशी ओळख असते आणि हे सगळं काही त्यादिवशी काय घडलं यावर अवलंबून असतं. जगाच्या इतिहासामध्ये ४ एप्रिल १९७५ हा दिवस देखील असाच महत्त्वपूर्ण ठरला. अवघ्या विशीतील पॉल ॲलन आणि बिल गेट्स या दोन तरुणांनी संगणकाच्या अनुषंगाने मूलभूत प्रोग्रॅमिंग लँग्वेज इंटरप्रेटरच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. यामुळे जगातील महिला मायक्रोकॉम्प्युटर ऑपरेट करणे सोपे झाले. विशेष म्हणजे हा कॉम्प्युटर दुसऱ्याच कंपनीने तयार केला होता. हा संगणक तयार करणाऱ्या कंपनीचं नाव होतं मायक्रो इन्स्ट्रूमेंटेशन अँड टेलिमेटरी सिस्टिम्स (एमआयटीएस). या सगळ्या संशोधनाच्या मुळाशी एकमेव कल्पना होती ती म्हणजे दुसऱ्याने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अन्य तिसरी व्यक्ती स्वतःचं हार्डवेअर ऑपरेट करू शकेल. त्या दोन तरुणांनी त्यांच्या कंपनीला देखील तसंच साजेसं नावही दिलं. ते नाव होतं मायक्रो-सॉफ्ट. हा सगळा खेळ मायक्रोकॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरचा होता. आता मायक्रोसॉफ्टच्या येण्यामुळे जागतिक कार्यपद्धतीमध्ये नेमके काय बदल झाले, हा सगळा इतिहास आहे.  भारतामध्ये आयआयटी कानपूर या संस्थेमध्ये सर्वप्रथम मशिन आणि सॉफ्टवेअर डिझाईनला सुरुवात झाली. तेव्हा नारायण मूर्ती आणि नरेंद्र काळे ही मंडळी तिथं मास्टर्सचे शिक्षण घेत होती. मायक्रोसॉफ्ट स्थापन झाली तेव्हा नारायण मूर्ती पुण्यातील पटणी कॉम्प्युटर सिस्टिम्स आणि नरेंद्र काळे यांनी पुणे विद्यापीठामध्ये काम करायला सुरुवात केली होती. याआधी त्यांनी तीन वर्षे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घाम गाळला होता. यानंतर १९८२ मध्ये नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस स्थापन केली तर नरेंद्र काळे यांनी १९८३ मध्ये काळे कन्सल्टंट्स लिमिटेडची स्थापना केली.  या संस्थांमुळे हवाई वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये संगणक क्रांती शिरकाव होऊ शकला. पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये १९८८ साली ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) ची स्थापना झाली. या संस्थेची धुरा त्यावेळी डॉ. विजय भटकर यांच्याकडे होती. या संस्थेनंच ‘परम’ या महासंगणकाला जन्म दिला. तो १९९० साली झुरीच येथील सुपर कॉम्प्युटिंग शोमध्ये झळकल्यानंतर सगळं जग अवाक झालं होतं. अमेरिकेनंतर भारतानं या संगणकाच्या निर्मितीची किमया केली होती.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘वायटूके’च्या संकटानं जगभरातील संगणकीय क्षेत्रामध्ये एक वेगळी अस्थिरता निर्माण केली होती. कारण तेव्हा जगभरातील संगणकांना १९०० आणि २००० यातील भेद करता येणार नाही असं सांगितलं जात होतं. याचं रीडिंग ०० असं झाल्यानं जगभरातील संगणकीय प्रणाली कोसळून पडण्याची भीती व्यक्त केली जात होती.यानंतर जगभरच सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मागणी वाढली. तेव्हा हीच संधी भारतातील कंपन्यांनी साधली. अर्थात या सगळ्या बदलांमुळे भारतामध्ये बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) या क्षेत्राचा उदय झाला असं म्हणता येईल. त्यावेळी पश्‍चिमेकडील कंपन्यांनी उच्चशिक्षित अभियंते हे कमी वेतनावर राबताहेत असं चित्र कधीच पाहिलं नव्हतं.  त्या काळामध्ये आयटी कंपन्या जेवढी कमाई करायचा तो सगळा पैसा मालकांच्या खिशामध्ये जायचा. याच कंपन्यांचे मालक पुढे देशातील नवे अब्जाधीश बनले. विशेष म्हणजे ज्या काळामध्ये वायटूकेच्या संकटानं सगळं जग धास्तावलं होतं बरोबर तेव्हाच रशियाने मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं पण   त्यामुळे त्यांचं कसलंही नुकसान झाले नाही हे विशेष. नोव्हेंबर २००२ मध्ये बिल गेट्स हे राष्ट्रपती कलाम यांना राष्ट्रपती भवनामध्ये भेटले होते. त्या भेटीचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी दोघांमध्ये झालेलं संभाषण मला ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी कलाम स्वतःबाबत म्हणाले होते की, ‘‘मी ओपनसोर्स माणूस आहे.’’  २८ मे २००३ मध्ये कलाम यांनी पुण्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्कचे उद्‌घाटन केले तेव्हा बहुउद्देशीय कामांसाठी सिटिझन कार्डचा वापर शक्य असल्याचे सांगणारे ते पहिले नेते होते. मतदान, बँकेतील व्यवहार आणि रेशन हे सगळं एकाच कार्डद्वारे होऊ शकते हे कलामांनी सांगितलं होतं. भारताने केवळ सॉफ्टवेअर पॉवर नव्हे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देखील शक्ती बनावं असं सांगणारे ते पहिले व्यक्ती होते.  आज २०२१ मध्ये आपण मागे वळून पाहतो तेव्हा एवढ्या वर्षांमध्ये आपण खूप काही कमावलेले दिसतं. आता भारताची वित्तीय प्रणाली ‘आयसीटी’वर (माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान) चालते. आमच्या निवडणुका देखील आता इलेक्ट्रॉनिक मोडवर आल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ‘आयसीटी’ सुशासनाचा एक महत्त्वपूर्ण टूल बनले आहे. आता लसीकरणामध्ये देखील त्याचा वापर होतोय. अनेक मंडळी आज घरी बसून आणि ऑनलाइन पद्धतीने काम करू शकत आहेत तसंच त्यांना ऑनलाइन खरेदी करणं देखील शक्य झालं आहे. ते देखील या ‘आयसीटीमुळं’च. विनाव्यत्यय विद्युत पुरवठा ही कालपरवापर्यंतची आपली समस्या होती पण ती देखील आता इतिहासजमा झाली आहे.  आपण जे ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहिले आहे त्यातील ‘आयसीटी’चा वाटा हा पाचशे अब्ज डॉलर्सचा असेल यात मला मुळीच शंका नाही. माझा हा आत्मविश्‍वास काही अनाठायी नाही. मी फक्त बिंदू जोडण्याचं काम करतोय. देशामध्ये ५-जी तंत्रज्ञान लवकर येईल की विलंबाने हा प्रश्‍नच नाही पण इंटरनेट तुमचे सगळे काही डिव्हाईस कवेमध्ये घेईल एवढे मात्र नक्की. चालकविरहीत गाड्या आधीच आल्या आहेत. इलेक्ट्रिक कारही लवकरच धावू लागतील. पुन्हा वायटूकेसारखी स्थिती निर्माण झाली तर सगळं जग हे उत्तर शोधण्यासाठी भारताच्या दिशेनं धावू लागेल यात शंका नाही.  मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या भारतामध्ये कोठे आहेत? किंवा गुगल आणि आयबीएमसारखे तरी पर्याय आहेत का? आपल्या मनुष्यबळाच्या गुणवत्तेचा विचार केला तर जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तिन्ही आघाडीच्या कंपन्यांची सूत्रे ही भारतीय वंशाच्या माणसांकडेच आहेत.  खरा प्रश्‍न आहे तो आमच्या व्यवस्थेचा. ती मग सार्वजनिक-खासगी असो किंवा पूर्णपणे सार्वजनिक व्यवस्था. ही व्यवस्था समस्यांच्या ओझ्याखाली दबली आहे. यामुळे एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला अनेक मर्यादा येतात. आपल्याकडे सार्वजनिक व्यवस्थेला केवळ नोकरशाहीच्या सुस्तपणाचा फटका बसलेला नाही तर राजकीय एकाधिकारशाहीमुळे देखील तिचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील खासगी क्षेत्राला हावरटपणाचे ग्रहण लागले आहे. इथे अनेकांना फक्त स्वतःलाच अब्जाधीश बनायचं नसतं तर त्यांना आपली लेकरंबाळं देखील अब्जाधीश व्हावी असं वाटत असतं. कधीकाळी अमेरिकेतील भांडवलशाही प्रिय समाज पाहून आपणच नाकं मुरडली होती तेव्हा आपल्यासाठी द्राक्ष आंबट अशी अवस्था होती. त्यावेळी लोकांना अमेरिकी समाजावर टीका करायला आवडायचे.  आता वास्तव मात्र वेगळं आहे. जून २०२० मध्ये बिल गेट्स आणि वॉरन बफे यांच्यासारख्या कुबेरांनी धनाढ्य मंडळींना जनहिताच्या कामांसाठी पैसे खर्च करायला प्रोत्साहित केलं. किमान अर्धी संपत्ती त्यांनी यावर खर्च करावी असा त्यांचा आग्रह होता. हे त्यांनी हयात असताना करावं किंवा हयात नसताना हे त्यात अपेक्षित होतं. अझीम प्रेमजी यांनी २०१३ मध्ये सर्वप्रथम या दिशेनं पाऊल टाकलं. त्यानंतर किरण मुजुमदार-शॉ, पीएनसी मेनन आणि नंदन निलेकणी ही मंडळी सरसावली. आतापर्यंत २५ देशांतील २१९ मंडळी यासाठी पुढे आली आहेत. भारतामध्ये १०२ अब्जाधीश आहेत. श्रीमंत मंडळींच्या वास्तव्यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आपला चौथा क्रमांक लागतो. यात अन्य मंडळींचाही शोध घ्यावा लागेल. आज ती सगळी कोठे आहेत?  आज देशातील प्रत्येक जुन्या खेड्यात आणि शहरामध्ये अशी जनसेवेसाठी उभारलेली महाविद्यालये, रुग्णालये आणि पाणपोया दिसतील पण यामध्ये नव्याने भर पडताना दिसत नाही. आज सगळ्यांचा प्राधान्यक्रम हा स्वतःचं चांगलं व्हायला आहे पण लोकांसाठी काही चांगलं करण्याची संकल्पना मागे पडत चालली आहे. एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यश कुणा एकट्यादुकट्या व्यक्तीचं नसतं. त्यामध्ये सभोवतालचे लोक आणि समाजाचा वाटा देखील असतो. प्रत्येकजण समाजाचं देणं लागतो. ती परतफेड करणं हे आपलं कर्तव्यच असतं. ते ऋण तुम्ही कधीही फेडू शकता हयात असेल तेव्हा किंवा हयातीनंतर देखील.  (सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.) (अनुवाद : गोपाळ कुलकर्णी Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

चांगले व्हा आणि इतरांसाठी चांगलं करा... दररोज पृथ्वीच्या एका विशिष्ट भागाला सूर्याचं दर्शन होत असतं. तसं पाहता प्रत्येक दिवसाची स्वतंत्र अशी ओळख असते आणि हे सगळं काही त्यादिवशी काय घडलं यावर अवलंबून असतं. जगाच्या इतिहासामध्ये ४ एप्रिल १९७५ हा दिवस देखील असाच महत्त्वपूर्ण ठरला. अवघ्या विशीतील पॉल ॲलन आणि बिल गेट्स या दोन तरुणांनी संगणकाच्या अनुषंगाने मूलभूत प्रोग्रॅमिंग लँग्वेज इंटरप्रेटरच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. यामुळे जगातील महिला मायक्रोकॉम्प्युटर ऑपरेट करणे सोपे झाले. विशेष म्हणजे हा कॉम्प्युटर दुसऱ्याच कंपनीने तयार केला होता. हा संगणक तयार करणाऱ्या कंपनीचं नाव होतं मायक्रो इन्स्ट्रूमेंटेशन अँड टेलिमेटरी सिस्टिम्स (एमआयटीएस). या सगळ्या संशोधनाच्या मुळाशी एकमेव कल्पना होती ती म्हणजे दुसऱ्याने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अन्य तिसरी व्यक्ती स्वतःचं हार्डवेअर ऑपरेट करू शकेल. त्या दोन तरुणांनी त्यांच्या कंपनीला देखील तसंच साजेसं नावही दिलं. ते नाव होतं मायक्रो-सॉफ्ट. हा सगळा खेळ मायक्रोकॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरचा होता. आता मायक्रोसॉफ्टच्या येण्यामुळे जागतिक कार्यपद्धतीमध्ये नेमके काय बदल झाले, हा सगळा इतिहास आहे.  भारतामध्ये आयआयटी कानपूर या संस्थेमध्ये सर्वप्रथम मशिन आणि सॉफ्टवेअर डिझाईनला सुरुवात झाली. तेव्हा नारायण मूर्ती आणि नरेंद्र काळे ही मंडळी तिथं मास्टर्सचे शिक्षण घेत होती. मायक्रोसॉफ्ट स्थापन झाली तेव्हा नारायण मूर्ती पुण्यातील पटणी कॉम्प्युटर सिस्टिम्स आणि नरेंद्र काळे यांनी पुणे विद्यापीठामध्ये काम करायला सुरुवात केली होती. याआधी त्यांनी तीन वर्षे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घाम गाळला होता. यानंतर १९८२ मध्ये नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस स्थापन केली तर नरेंद्र काळे यांनी १९८३ मध्ये काळे कन्सल्टंट्स लिमिटेडची स्थापना केली.  या संस्थांमुळे हवाई वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये संगणक क्रांती शिरकाव होऊ शकला. पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये १९८८ साली ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) ची स्थापना झाली. या संस्थेची धुरा त्यावेळी डॉ. विजय भटकर यांच्याकडे होती. या संस्थेनंच ‘परम’ या महासंगणकाला जन्म दिला. तो १९९० साली झुरीच येथील सुपर कॉम्प्युटिंग शोमध्ये झळकल्यानंतर सगळं जग अवाक झालं होतं. अमेरिकेनंतर भारतानं या संगणकाच्या निर्मितीची किमया केली होती.  सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘वायटूके’च्या संकटानं जगभरातील संगणकीय क्षेत्रामध्ये एक वेगळी अस्थिरता निर्माण केली होती. कारण तेव्हा जगभरातील संगणकांना १९०० आणि २००० यातील भेद करता येणार नाही असं सांगितलं जात होतं. याचं रीडिंग ०० असं झाल्यानं जगभरातील संगणकीय प्रणाली कोसळून पडण्याची भीती व्यक्त केली जात होती.यानंतर जगभरच सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मागणी वाढली. तेव्हा हीच संधी भारतातील कंपन्यांनी साधली. अर्थात या सगळ्या बदलांमुळे भारतामध्ये बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) या क्षेत्राचा उदय झाला असं म्हणता येईल. त्यावेळी पश्‍चिमेकडील कंपन्यांनी उच्चशिक्षित अभियंते हे कमी वेतनावर राबताहेत असं चित्र कधीच पाहिलं नव्हतं.  त्या काळामध्ये आयटी कंपन्या जेवढी कमाई करायचा तो सगळा पैसा मालकांच्या खिशामध्ये जायचा. याच कंपन्यांचे मालक पुढे देशातील नवे अब्जाधीश बनले. विशेष म्हणजे ज्या काळामध्ये वायटूकेच्या संकटानं सगळं जग धास्तावलं होतं बरोबर तेव्हाच रशियाने मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं पण   त्यामुळे त्यांचं कसलंही नुकसान झाले नाही हे विशेष. नोव्हेंबर २००२ मध्ये बिल गेट्स हे राष्ट्रपती कलाम यांना राष्ट्रपती भवनामध्ये भेटले होते. त्या भेटीचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी दोघांमध्ये झालेलं संभाषण मला ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी कलाम स्वतःबाबत म्हणाले होते की, ‘‘मी ओपनसोर्स माणूस आहे.’’  २८ मे २००३ मध्ये कलाम यांनी पुण्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्कचे उद्‌घाटन केले तेव्हा बहुउद्देशीय कामांसाठी सिटिझन कार्डचा वापर शक्य असल्याचे सांगणारे ते पहिले नेते होते. मतदान, बँकेतील व्यवहार आणि रेशन हे सगळं एकाच कार्डद्वारे होऊ शकते हे कलामांनी सांगितलं होतं. भारताने केवळ सॉफ्टवेअर पॉवर नव्हे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देखील शक्ती बनावं असं सांगणारे ते पहिले व्यक्ती होते.  आज २०२१ मध्ये आपण मागे वळून पाहतो तेव्हा एवढ्या वर्षांमध्ये आपण खूप काही कमावलेले दिसतं. आता भारताची वित्तीय प्रणाली ‘आयसीटी’वर (माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान) चालते. आमच्या निवडणुका देखील आता इलेक्ट्रॉनिक मोडवर आल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ‘आयसीटी’ सुशासनाचा एक महत्त्वपूर्ण टूल बनले आहे. आता लसीकरणामध्ये देखील त्याचा वापर होतोय. अनेक मंडळी आज घरी बसून आणि ऑनलाइन पद्धतीने काम करू शकत आहेत तसंच त्यांना ऑनलाइन खरेदी करणं देखील शक्य झालं आहे. ते देखील या ‘आयसीटीमुळं’च. विनाव्यत्यय विद्युत पुरवठा ही कालपरवापर्यंतची आपली समस्या होती पण ती देखील आता इतिहासजमा झाली आहे.  आपण जे ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहिले आहे त्यातील ‘आयसीटी’चा वाटा हा पाचशे अब्ज डॉलर्सचा असेल यात मला मुळीच शंका नाही. माझा हा आत्मविश्‍वास काही अनाठायी नाही. मी फक्त बिंदू जोडण्याचं काम करतोय. देशामध्ये ५-जी तंत्रज्ञान लवकर येईल की विलंबाने हा प्रश्‍नच नाही पण इंटरनेट तुमचे सगळे काही डिव्हाईस कवेमध्ये घेईल एवढे मात्र नक्की. चालकविरहीत गाड्या आधीच आल्या आहेत. इलेक्ट्रिक कारही लवकरच धावू लागतील. पुन्हा वायटूकेसारखी स्थिती निर्माण झाली तर सगळं जग हे उत्तर शोधण्यासाठी भारताच्या दिशेनं धावू लागेल यात शंका नाही.  मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या भारतामध्ये कोठे आहेत? किंवा गुगल आणि आयबीएमसारखे तरी पर्याय आहेत का? आपल्या मनुष्यबळाच्या गुणवत्तेचा विचार केला तर जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तिन्ही आघाडीच्या कंपन्यांची सूत्रे ही भारतीय वंशाच्या माणसांकडेच आहेत.  खरा प्रश्‍न आहे तो आमच्या व्यवस्थेचा. ती मग सार्वजनिक-खासगी असो किंवा पूर्णपणे सार्वजनिक व्यवस्था. ही व्यवस्था समस्यांच्या ओझ्याखाली दबली आहे. यामुळे एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला अनेक मर्यादा येतात. आपल्याकडे सार्वजनिक व्यवस्थेला केवळ नोकरशाहीच्या सुस्तपणाचा फटका बसलेला नाही तर राजकीय एकाधिकारशाहीमुळे देखील तिचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील खासगी क्षेत्राला हावरटपणाचे ग्रहण लागले आहे. इथे अनेकांना फक्त स्वतःलाच अब्जाधीश बनायचं नसतं तर त्यांना आपली लेकरंबाळं देखील अब्जाधीश व्हावी असं वाटत असतं. कधीकाळी अमेरिकेतील भांडवलशाही प्रिय समाज पाहून आपणच नाकं मुरडली होती तेव्हा आपल्यासाठी द्राक्ष आंबट अशी अवस्था होती. त्यावेळी लोकांना अमेरिकी समाजावर टीका करायला आवडायचे.  आता वास्तव मात्र वेगळं आहे. जून २०२० मध्ये बिल गेट्स आणि वॉरन बफे यांच्यासारख्या कुबेरांनी धनाढ्य मंडळींना जनहिताच्या कामांसाठी पैसे खर्च करायला प्रोत्साहित केलं. किमान अर्धी संपत्ती त्यांनी यावर खर्च करावी असा त्यांचा आग्रह होता. हे त्यांनी हयात असताना करावं किंवा हयात नसताना हे त्यात अपेक्षित होतं. अझीम प्रेमजी यांनी २०१३ मध्ये सर्वप्रथम या दिशेनं पाऊल टाकलं. त्यानंतर किरण मुजुमदार-शॉ, पीएनसी मेनन आणि नंदन निलेकणी ही मंडळी सरसावली. आतापर्यंत २५ देशांतील २१९ मंडळी यासाठी पुढे आली आहेत. भारतामध्ये १०२ अब्जाधीश आहेत. श्रीमंत मंडळींच्या वास्तव्यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आपला चौथा क्रमांक लागतो. यात अन्य मंडळींचाही शोध घ्यावा लागेल. आज ती सगळी कोठे आहेत?  आज देशातील प्रत्येक जुन्या खेड्यात आणि शहरामध्ये अशी जनसेवेसाठी उभारलेली महाविद्यालये, रुग्णालये आणि पाणपोया दिसतील पण यामध्ये नव्याने भर पडताना दिसत नाही. आज सगळ्यांचा प्राधान्यक्रम हा स्वतःचं चांगलं व्हायला आहे पण लोकांसाठी काही चांगलं करण्याची संकल्पना मागे पडत चालली आहे. एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यश कुणा एकट्यादुकट्या व्यक्तीचं नसतं. त्यामध्ये सभोवतालचे लोक आणि समाजाचा वाटा देखील असतो. प्रत्येकजण समाजाचं देणं लागतो. ती परतफेड करणं हे आपलं कर्तव्यच असतं. ते ऋण तुम्ही कधीही फेडू शकता हयात असेल तेव्हा किंवा हयातीनंतर देखील.  (सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.) (अनुवाद : गोपाळ कुलकर्णी Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3up3pv1

No comments:

Post a Comment