‘टेस्ला’मुळे बदलणार बिटकॉईनचं विश्व जगप्रसिद्ध ‘टेस्ला’नं फेब्रुवारीच्या सुरुवातीस १.५ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचं बिटकॉईन खरेदी केलं. हे मूल्य कंपनीच्या राखीव गंगाजळीपैकी १५ टक्के इतकं होतं, यामुळे ‘टेस्ला’चे गुंतवणूकदार बिटकॉईन खरेदी करण्यासाठी आकर्षित झाले. परिणामी, चार तासांच्या आत बिटकॉईनची किंमत ४० टक्क्यांहून अधिक वाढली. ‘टेस्ला’च्या बिटकॉईनप्रवेशामुळे संचयी/साखळीप्रभाव पडला.  ‘टेस्ला’नं बिटकॉईनची मोठ्या संख्येनं खरेदी केल्याच्या एका महिन्यानंतर ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांनी जाहीर केलं, की बिटकॉईननं आपण टेस्ला कार विकत घेऊ शकता. असं करणारी ‘टेस्ला’ ही पहिली प्रमुख वाहनकंपनी ठरली आहे. ‘टेस्ला’ हे बिटकॉईन फियाट करन्सीमध्ये (देशातील चलन) रूपांतर करणार नाही आणि कंपनीतच ठेवणार आहे, हे त्यांनी नेहमीच सूचित केलं आहे. याचाच अर्थ बिटकॉईनकडे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ‘टेस्ला’ पाहत आहे.  काही बिटकॉईनचाहत्यांना अशी भीती वाटत आहे, की भविष्यात ‘टेस्ला’ बहुसंख्य बिटकॉईन स्वत:कडे बाळगेल. ही चिंता (एफओएमओ - फीअर ऑफ मिसिंग आऊट) ही बाजारात नेहमीच होती; परंतु मस्क यांच्या घोषणेनंतर ती शिगेला पोचली आहे. ‘टेस्ला’च्या या वेगळ्या चालीनंतर एफएएएमजी (फेसबुक-अ‍ॅमेझॉन-अ‍ॅपल-मायक्रोसॉफ्ट-गुगल) हे पण याचं अनुसरण करण्याच्या विचारात आहेत. अर्थात् ही काही मोजकीच नावं आहेत. फक्त वित्तीय आणि वाहनक्षेत्राशी संबंधित तज्ज्ञच नव्हे, तर जगभरातील इतर बऱ्याच तज्ज्ञांचा असा अंदाज आहे, की बिटकॉईन वर्षाअखेरपर्यंत एक लाख डॉलरपर्यंत पोचेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप क्रिप्टोकरन्सीचं भवितव्य इलॉन मस्क यांनी वैविध्य आणि जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या लवचिकतेमुळे ‘बिटकॉईन’ लोकप्रिय बनवलं आहे. आपल्या कृतीद्वारे व ट्विट्सद्वारे बिटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीची किंमत वाढवल्याचं त्यांना नेहमीच श्रेय मिळालं आहे. ‘टेस्ला’सारख्या वाहनांमध्ये आपण या क्षेत्राचं भविष्य पाहत असू तर बिटकॉईनदेखील इथंच राहणार असून सर्वोत्तम मूल्य बनेल, यावरदेखील आपण सहमत होऊ शकतो. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टवर आधारित असलेल्या इथेरियनसारख्या इतर क्रिप्टोकरन्सीचा वापर बिटकॉईनपेक्षा भिन्न आहे. इथेरियन परिसंस्थेसह इतर अनेक क्रिप्टो प्रकल्प हे इथेरियन ब्लॉकचेनवर प्रस्थापित केले गेले आहेत. डोगेकॉईन, एक्सआरपी, बिटकॉईन कॅश, कार्डानो यांसारख्या इतर क्रिप्टोकरन्सी हे दैनंदिन वापरविनिमय बनू शकतात. कारण, जगभरातील अधिकाधिक व्यापारी हे स्वीकारत आहेत. या सर्व क्रिप्टोकरन्सी भविष्यात ‘मल्टी ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था तयार करतील अशी अपेक्षा आहे. भविष्यातील फायदे व तोटे फक्त एका ट्विटद्वारे ‘टेस्ला’चे शेअर अल्पावधीत दोन टक्क्यांनी वाढले. ही क्रिप्टोचाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जरी सामान्य चलनामध्ये पैसे भरले तरी क्रिप्टोधारकमालकांमध्ये ‘टेस्ला’ अधिक विक्री करेल. क्रिप्टो बाळगल्यामुळे ‘टेस्ला’ वधारत्या बाजारात अधिक नफा कमावेल किंवा पडत्या बाजारात तोटा कमी करू शकेल. प्रत्येक मिनिटाला जरी किमतीत फरक पडत असला तरी अधिक व्यापक दृष्टीनं पाहता बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या बिटकॉईनचं कौतुक होत आहे. अर्थात्, बाजारावर परिणाम करणाऱ्या आपल्या ट्विट्समुळे मस्क याआधीही अडचणीत आले आहेत.   सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘टेस्ला’ विकत घेताना बिटकॉईनचा वापर करण्याबाबतच्या ट्विट्सबद्दल बोलायचं झालं तर ‘टेस्ला’ केवळ अचूक रक्कम स्वीकारेल आणि चुकीच्या पत्त्यावर पाठवलेल्या देय मोबदल्याची भरपाई करणार नाही. ‘एसईसी’कडे केल्या गेलेल्या अर्जात (फायलिंग) ‘टेस्ला’नं गुंतवणूकदारांना बिटकॉईनच्या किमतीतील अस्थिरतेबद्दल इशारा दिला आहे.  ‘कॉईनडेस्क’च्या डॅनियल कून्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टेस्ला’साठी बिटकॉईनद्वारे व्यवहार करताना वाहन खरेदीदाराला आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी साधारणतः तीस मिनिटं असतात, अन्यथा बीटीसी किंमत ही कालबाह्य होते आणि नवी विनंती करणं आवश्यक असतं. बिटकॉईननं वस्तू किंवा सेवा विकत घेताना करआकारणीबाबत अजूनही स्पष्टता नाही. असं म्हटलं जातं की, तुमच्याकडे बिटकॉईननं भरलेल्या मोठ्या पिशव्या असल्या तरी खरेदी करताना पुन्हा विचार करण्याची गरज आहे; मग ती ‘टेस्ला’ असो की पिझ्झा! गुंतवणूकदारांसाठी सल्ला ज्या मुद्द्यांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, ते म्हणजे जे ग्राहक बिटकॉईननं व्यवहार करत आहेत  त्यांना अपेक्षित अशी कोणतीही सवलत मिळेल, असे कोणतेही संकेत ‘टेस्ला’नं दिलेले नाहीत. ते आता अगदी सुरक्षित खेळी खेळत असून, बिटकॉईनच्या व्यवहाराला प्रोत्साहित करत आहेत. बिटकॉईनच्या मूल्यामध्ये वाढ दिसून आली असली तरी सोमवारी त्यात मोठी घसरणही झाली. बाजाराला हलवून टाकणाऱ्या या ट्विट्समुळे मस्क यांनी १५ अब्ज डॉलर गमावले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मस्क यांच्या ट्विटमुळे ही मोठी घसरणही झाली असावी. जर जगातील अर्थव्यवस्था एका ‘ट्विट’नं हादरली असेल तर गुंतवणुकीबाबत आपण सावध असलं पाहिजे. जर तुम्ही एखादी गोष्ट गमावण्याची जोखीम घेऊ शकत नसाल, तर कधीच कोणत्याच गोष्टीत गुंतवणूक न करण्याचाच सल्ला दिला जातो. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आपण स्वत:ला शिक्षित केलं पाहिजे व त्यासाठी पुरेसं संशोधन केलं पाहिजे. पारंपरिक निर्देशांकांप्रमाणे याचं भविष्य उज्ज्वल आहे. मात्र, जोखीम आहे. क्रिप्टो एक उद्योगक्षेत्र म्हणून अद्याप प्रारंभीच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये तोटा व नफा पचवण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. (लेखक ‘उनोकॉइन’ या भारतातील सर्वांत जुन्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्मचे सीईओ आणि सहसंस्थापक आहेत.) (अनुवाद : मुकुंद लेले) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

‘टेस्ला’मुळे बदलणार बिटकॉईनचं विश्व जगप्रसिद्ध ‘टेस्ला’नं फेब्रुवारीच्या सुरुवातीस १.५ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचं बिटकॉईन खरेदी केलं. हे मूल्य कंपनीच्या राखीव गंगाजळीपैकी १५ टक्के इतकं होतं, यामुळे ‘टेस्ला’चे गुंतवणूकदार बिटकॉईन खरेदी करण्यासाठी आकर्षित झाले. परिणामी, चार तासांच्या आत बिटकॉईनची किंमत ४० टक्क्यांहून अधिक वाढली. ‘टेस्ला’च्या बिटकॉईनप्रवेशामुळे संचयी/साखळीप्रभाव पडला.  ‘टेस्ला’नं बिटकॉईनची मोठ्या संख्येनं खरेदी केल्याच्या एका महिन्यानंतर ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांनी जाहीर केलं, की बिटकॉईननं आपण टेस्ला कार विकत घेऊ शकता. असं करणारी ‘टेस्ला’ ही पहिली प्रमुख वाहनकंपनी ठरली आहे. ‘टेस्ला’ हे बिटकॉईन फियाट करन्सीमध्ये (देशातील चलन) रूपांतर करणार नाही आणि कंपनीतच ठेवणार आहे, हे त्यांनी नेहमीच सूचित केलं आहे. याचाच अर्थ बिटकॉईनकडे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ‘टेस्ला’ पाहत आहे.  काही बिटकॉईनचाहत्यांना अशी भीती वाटत आहे, की भविष्यात ‘टेस्ला’ बहुसंख्य बिटकॉईन स्वत:कडे बाळगेल. ही चिंता (एफओएमओ - फीअर ऑफ मिसिंग आऊट) ही बाजारात नेहमीच होती; परंतु मस्क यांच्या घोषणेनंतर ती शिगेला पोचली आहे. ‘टेस्ला’च्या या वेगळ्या चालीनंतर एफएएएमजी (फेसबुक-अ‍ॅमेझॉन-अ‍ॅपल-मायक्रोसॉफ्ट-गुगल) हे पण याचं अनुसरण करण्याच्या विचारात आहेत. अर्थात् ही काही मोजकीच नावं आहेत. फक्त वित्तीय आणि वाहनक्षेत्राशी संबंधित तज्ज्ञच नव्हे, तर जगभरातील इतर बऱ्याच तज्ज्ञांचा असा अंदाज आहे, की बिटकॉईन वर्षाअखेरपर्यंत एक लाख डॉलरपर्यंत पोचेल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप क्रिप्टोकरन्सीचं भवितव्य इलॉन मस्क यांनी वैविध्य आणि जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या लवचिकतेमुळे ‘बिटकॉईन’ लोकप्रिय बनवलं आहे. आपल्या कृतीद्वारे व ट्विट्सद्वारे बिटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीची किंमत वाढवल्याचं त्यांना नेहमीच श्रेय मिळालं आहे. ‘टेस्ला’सारख्या वाहनांमध्ये आपण या क्षेत्राचं भविष्य पाहत असू तर बिटकॉईनदेखील इथंच राहणार असून सर्वोत्तम मूल्य बनेल, यावरदेखील आपण सहमत होऊ शकतो. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टवर आधारित असलेल्या इथेरियनसारख्या इतर क्रिप्टोकरन्सीचा वापर बिटकॉईनपेक्षा भिन्न आहे. इथेरियन परिसंस्थेसह इतर अनेक क्रिप्टो प्रकल्प हे इथेरियन ब्लॉकचेनवर प्रस्थापित केले गेले आहेत. डोगेकॉईन, एक्सआरपी, बिटकॉईन कॅश, कार्डानो यांसारख्या इतर क्रिप्टोकरन्सी हे दैनंदिन वापरविनिमय बनू शकतात. कारण, जगभरातील अधिकाधिक व्यापारी हे स्वीकारत आहेत. या सर्व क्रिप्टोकरन्सी भविष्यात ‘मल्टी ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था तयार करतील अशी अपेक्षा आहे. भविष्यातील फायदे व तोटे फक्त एका ट्विटद्वारे ‘टेस्ला’चे शेअर अल्पावधीत दोन टक्क्यांनी वाढले. ही क्रिप्टोचाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जरी सामान्य चलनामध्ये पैसे भरले तरी क्रिप्टोधारकमालकांमध्ये ‘टेस्ला’ अधिक विक्री करेल. क्रिप्टो बाळगल्यामुळे ‘टेस्ला’ वधारत्या बाजारात अधिक नफा कमावेल किंवा पडत्या बाजारात तोटा कमी करू शकेल. प्रत्येक मिनिटाला जरी किमतीत फरक पडत असला तरी अधिक व्यापक दृष्टीनं पाहता बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या बिटकॉईनचं कौतुक होत आहे. अर्थात्, बाजारावर परिणाम करणाऱ्या आपल्या ट्विट्समुळे मस्क याआधीही अडचणीत आले आहेत.   सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘टेस्ला’ विकत घेताना बिटकॉईनचा वापर करण्याबाबतच्या ट्विट्सबद्दल बोलायचं झालं तर ‘टेस्ला’ केवळ अचूक रक्कम स्वीकारेल आणि चुकीच्या पत्त्यावर पाठवलेल्या देय मोबदल्याची भरपाई करणार नाही. ‘एसईसी’कडे केल्या गेलेल्या अर्जात (फायलिंग) ‘टेस्ला’नं गुंतवणूकदारांना बिटकॉईनच्या किमतीतील अस्थिरतेबद्दल इशारा दिला आहे.  ‘कॉईनडेस्क’च्या डॅनियल कून्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टेस्ला’साठी बिटकॉईनद्वारे व्यवहार करताना वाहन खरेदीदाराला आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी साधारणतः तीस मिनिटं असतात, अन्यथा बीटीसी किंमत ही कालबाह्य होते आणि नवी विनंती करणं आवश्यक असतं. बिटकॉईननं वस्तू किंवा सेवा विकत घेताना करआकारणीबाबत अजूनही स्पष्टता नाही. असं म्हटलं जातं की, तुमच्याकडे बिटकॉईननं भरलेल्या मोठ्या पिशव्या असल्या तरी खरेदी करताना पुन्हा विचार करण्याची गरज आहे; मग ती ‘टेस्ला’ असो की पिझ्झा! गुंतवणूकदारांसाठी सल्ला ज्या मुद्द्यांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, ते म्हणजे जे ग्राहक बिटकॉईननं व्यवहार करत आहेत  त्यांना अपेक्षित अशी कोणतीही सवलत मिळेल, असे कोणतेही संकेत ‘टेस्ला’नं दिलेले नाहीत. ते आता अगदी सुरक्षित खेळी खेळत असून, बिटकॉईनच्या व्यवहाराला प्रोत्साहित करत आहेत. बिटकॉईनच्या मूल्यामध्ये वाढ दिसून आली असली तरी सोमवारी त्यात मोठी घसरणही झाली. बाजाराला हलवून टाकणाऱ्या या ट्विट्समुळे मस्क यांनी १५ अब्ज डॉलर गमावले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मस्क यांच्या ट्विटमुळे ही मोठी घसरणही झाली असावी. जर जगातील अर्थव्यवस्था एका ‘ट्विट’नं हादरली असेल तर गुंतवणुकीबाबत आपण सावध असलं पाहिजे. जर तुम्ही एखादी गोष्ट गमावण्याची जोखीम घेऊ शकत नसाल, तर कधीच कोणत्याच गोष्टीत गुंतवणूक न करण्याचाच सल्ला दिला जातो. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आपण स्वत:ला शिक्षित केलं पाहिजे व त्यासाठी पुरेसं संशोधन केलं पाहिजे. पारंपरिक निर्देशांकांप्रमाणे याचं भविष्य उज्ज्वल आहे. मात्र, जोखीम आहे. क्रिप्टो एक उद्योगक्षेत्र म्हणून अद्याप प्रारंभीच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये तोटा व नफा पचवण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. (लेखक ‘उनोकॉइन’ या भारतातील सर्वांत जुन्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्मचे सीईओ आणि सहसंस्थापक आहेत.) (अनुवाद : मुकुंद लेले) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ueX7Oc

No comments:

Post a Comment