कानमंत्र कष्टाच्या वारशाचा! त्या   दिवशी पुण्यात मीटिंगला थोडासा वेळ होता. मनात विचार आला, थोडे पाय मोकळे करून यावेत. आमच्या ‘एसआयएलसी’च्या कार्यालयापासून थोडा पुढं गेलो. ‘सकाळनगर’च्या गेटवर सफारी घातलेले एक काका बूटपॉलिशसाठीची सगळी सामग्री मांडून ग्राहकाची वाट पाहत बसले होते.  आपणच या काकांचं पहिलं ग्राहक व्हावं असा विचार करून मी त्यांच्या दिशेनं गेलो. पॉलिशला बूट दिले. शेजारीच काही रिक्षाचालक गप्पा मारत होते. वाढत्या महागाईवर चर्चा सुरू होती. पॉलिश करणाऱ्या काकांच्या दुकानपरवान्याकडे माझं लक्ष गेलं.  मी त्या काकांना विचारलं : ‘‘काका, बराच जुना दिसतोय तुमचा परवाना.’’ काका म्हणाले : ‘‘बाबा, वयाच्या दहाव्या वर्षापासून काम करतोय. मी आणि माझा भाऊ पुण्यात आलो, रस्त्यावर दुकान थाटलं ते आजपर्यंत सुरूच आहे.’’  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मी ज्या काकांशी बोलत होतो त्यांचं नाव नवनाथ धस (९३०९९३९२५८). बार्शी तालुक्‍यातील सुर्डी हे त्यांचं मूळ गाव.  सन १९७५ मध्ये धाकटा भाऊ रघुनाथ याला घेऊन ते पुण्यात आले. दोघांनी रस्त्यावर बूटपॉलिशचं दुकान थाटलं. एक काळी पेटी, अर्धी जमिनीत, अर्धी वर, तीत बूटपॉलिश करण्यासाठीची सगळी सामग्री आणि पेटीला मोठं कुलूप.  काका घासघासून बुटांना चकाकी आणत होते. एकीकडे माझ्या बुटांचा रंग खुलत होता व माझ्या बोलण्यामुळे काकांच्या चेहऱ्याचाही रंग खुलत होता. आपलं गाव, कुटुंब आणि पुण्यातल्या जुन्या आठवणी यांविषयी काका भरभरून बोलत होते. साहजिकच कोरोनाचाही विषय निघाला. सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे आपल्या संसारात किती अडचणी आल्या आहेत ते त्यांंनी सांगितलं. सौदागर, अतुल आणि उमेश हे तीन मुलगे आणि मुलगी रंजना...काकांना अशी चार अपत्यं. चौघंही पोटापाण्याच्या व्यवसायाला लागले आहेत. काकांच्या भावाची मुलंही कामाला लागली आहेत.  काका म्हणाले : ‘‘बूटपॉलिशचे एका जोडीचे तेव्हा पन्नास पैसे मिळायचे. तेव्हाही तेवढंच समाधान होतं आणि आजही तेच समाधान कायम आहे.’’ काका चांगलेच बोलके होते. त्यांच्याकडे विषयही भरपूर होते. मात्र, माझीच मीटिंगची वेळ होत आल्यामुळे मला निघावं लागणार होतं. बोलणं आटोपतं घेत मी त्यांना म्हणालो : ‘मी दुपारनंतर येतो, काका.’  मीटिंग संपल्यावर मी काकांकडे पुन्हा आलो. काकांच्या बोलण्यात त्यांच्या आईचा विषय वारंवार येत होता.  मला त्यांच्या आईला भेटावंसं वाटलं. आम्ही निघालो. त्यांचं घर त्याच परिसरात, जवळच होतं. आम्ही काकांच्या घरी पोहोचलो. काकांची पत्नी सजाबाई यांच्याशीही गप्पा झाल्या. काकांशी त्यांचं लग्न अगदी कमी वयात झालं होतं. ते कसं झालं ते त्यांना आज आठवतही नव्हतं. काकांच्या आईचं नाव मंदाबाई. काका आज एरवीपेक्षा लवकर घरी आल्याचं आश्चर्य आणि आनंद दोघींच्याही चेहऱ्यावर दिसत होता. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  आम्ही घरात स्थिरस्थावर झाल्यावर गप्पा पुन्हा सुरू झाल्या. काका सांगू लागले : ‘‘आर्थिक स्थितीमुळे आईची फार परवड होते. रोज काय खायचं हा प्रश्र्न कोरोनानंतरच्या परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे.’’ आता आमच्या गप्पांमध्ये मंदाबाईही सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या : ‘‘आम्ही खूप हाल सोसले. एक वेळचं खाणंही नीटसं मिळायचं नाही. माझी दोन्ही मुलं कर्तबगार निघाली ही आनंदाची बाब.’’ आयुष्य जगताना सोसाव्या लागलेल्या अनेक हाल-अपेष्टांविषयी मंदाबाईंनी सांगितलं.  काका  म्हणाले : ‘‘पूर्वी माणसं मोठ्या मनाची असायची. एकमेकांना सहजपणे मदत व्हायची. पूर्वी व्यवसायातून चारशे रुपये मिळायचे, आता पन्नास रुपयेही मिळत नाहीत. एवढा मोठा व्याप चालवायचा असतो, तो या गरिबीमुळे कसा चालवायचा, हा प्रश्न माझा मला अनेक वेळा पडतो. माझे वडील काशिनाथ हे गावाकडे असतात. त्यांना शहरात अजिबात करमत नाही. गावाकडचं घर बांधायचा विचार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे; पण ते बांधता आलेलं नाही. अलीकडच्या काळात महागाईनं आणि रोगराईनं माझं कुटुंब अगदी होरपळून निघालं आहे.’’  काकांचा काळजीचा सूर थांबवत मंदाबाई आपल्या मुलाला धीर देऊ लागल्या. म्हणाल्या : ‘‘बाबा, आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हा आनंदानं दिवस काढले. आता तर सगळं आहे... आनंदानं, माणसांनी सगळं घर भरलेलं आहे. आता कशाची काळजी करायची?’’  काका म्हणाले : ‘‘एका गोष्टीची नेहमीच खंत वाटते. आईच्या आजारपणावर मी पाहिजे तसे उपचार करू शकत नाही. तिला पाहिजे ते वेळेवर देऊ शकत नाही.’’  मुलगी रंजना वडिलांची समजूत काढत म्हणाली : ‘‘बाबा, तुम्ही आम्हा सगळ्यांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लग्न करून दिलं, हाताला काम मिळवून दिलं, तुमची जबाबदारी आता संपली आहे.’’  तिला मध्येच थांबवत काका म्हणाले : ‘‘नाही बाळा, आपल्या आई-वडिलांविषयीची आपली जबाबदारी कधीच संपत नसते. आपण जेव्हा शेवटचे डोळे मिटतो तेव्हाच ती जबाबदारी संपते.’’  काका, काकांची आई आणि काकांची मुलगी या तिघांचा संवाद मला त्या तीन पिढ्यांचा संवाद वाटत होता, ज्यातून काहीतरी बोध मलाही घेता येईल असं मला वाटलं. काकांनी आपली जबाबदारी पार पाडत जे कष्टातून उभं केलं होतं त्याला तोड नव्हती. आईनं आपल्या मुलाला उभं राहण्यासाठी सातत्यानं प्रोत्साहन दिलं होतं आणि तिसरी पिढी म्हणजे रंजना.  ती आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल पाय ठेवत कष्टाचा वारसा पुढं नेत आहे. उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा सोडायचा नाही...काम, मग ते कसलंही असो, कुठलंही असो, त्यात लाज बाळगायची नाही. पुढं पुढं पावलं टाकत निघायचं, असा कानमंत्र काकांनी आपल्या मुलांनाच नव्हे, तर आयुष्यात उभं राहू पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला आहे असं मला वाटून गेलं. मी काकांच्या आईचे आशीर्वाद घेऊन काकांचा निरोप घेतला. मनात विचार आला...काकांनी जे उभं केलं ते चिरंतन टिकणारं आहे. ते उभं करण्यामागं आत्मीयता होती, स्वाभिमानही होता आणि आनंद तर होताच होता.   आपण जे निर्माण करतो त्यात आनंदही असला पाहिजे. काकांची शिकवण हीच आहे. नाही का? Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

कानमंत्र कष्टाच्या वारशाचा! त्या   दिवशी पुण्यात मीटिंगला थोडासा वेळ होता. मनात विचार आला, थोडे पाय मोकळे करून यावेत. आमच्या ‘एसआयएलसी’च्या कार्यालयापासून थोडा पुढं गेलो. ‘सकाळनगर’च्या गेटवर सफारी घातलेले एक काका बूटपॉलिशसाठीची सगळी सामग्री मांडून ग्राहकाची वाट पाहत बसले होते.  आपणच या काकांचं पहिलं ग्राहक व्हावं असा विचार करून मी त्यांच्या दिशेनं गेलो. पॉलिशला बूट दिले. शेजारीच काही रिक्षाचालक गप्पा मारत होते. वाढत्या महागाईवर चर्चा सुरू होती. पॉलिश करणाऱ्या काकांच्या दुकानपरवान्याकडे माझं लक्ष गेलं.  मी त्या काकांना विचारलं : ‘‘काका, बराच जुना दिसतोय तुमचा परवाना.’’ काका म्हणाले : ‘‘बाबा, वयाच्या दहाव्या वर्षापासून काम करतोय. मी आणि माझा भाऊ पुण्यात आलो, रस्त्यावर दुकान थाटलं ते आजपर्यंत सुरूच आहे.’’  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मी ज्या काकांशी बोलत होतो त्यांचं नाव नवनाथ धस (९३०९९३९२५८). बार्शी तालुक्‍यातील सुर्डी हे त्यांचं मूळ गाव.  सन १९७५ मध्ये धाकटा भाऊ रघुनाथ याला घेऊन ते पुण्यात आले. दोघांनी रस्त्यावर बूटपॉलिशचं दुकान थाटलं. एक काळी पेटी, अर्धी जमिनीत, अर्धी वर, तीत बूटपॉलिश करण्यासाठीची सगळी सामग्री आणि पेटीला मोठं कुलूप.  काका घासघासून बुटांना चकाकी आणत होते. एकीकडे माझ्या बुटांचा रंग खुलत होता व माझ्या बोलण्यामुळे काकांच्या चेहऱ्याचाही रंग खुलत होता. आपलं गाव, कुटुंब आणि पुण्यातल्या जुन्या आठवणी यांविषयी काका भरभरून बोलत होते. साहजिकच कोरोनाचाही विषय निघाला. सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे आपल्या संसारात किती अडचणी आल्या आहेत ते त्यांंनी सांगितलं. सौदागर, अतुल आणि उमेश हे तीन मुलगे आणि मुलगी रंजना...काकांना अशी चार अपत्यं. चौघंही पोटापाण्याच्या व्यवसायाला लागले आहेत. काकांच्या भावाची मुलंही कामाला लागली आहेत.  काका म्हणाले : ‘‘बूटपॉलिशचे एका जोडीचे तेव्हा पन्नास पैसे मिळायचे. तेव्हाही तेवढंच समाधान होतं आणि आजही तेच समाधान कायम आहे.’’ काका चांगलेच बोलके होते. त्यांच्याकडे विषयही भरपूर होते. मात्र, माझीच मीटिंगची वेळ होत आल्यामुळे मला निघावं लागणार होतं. बोलणं आटोपतं घेत मी त्यांना म्हणालो : ‘मी दुपारनंतर येतो, काका.’  मीटिंग संपल्यावर मी काकांकडे पुन्हा आलो. काकांच्या बोलण्यात त्यांच्या आईचा विषय वारंवार येत होता.  मला त्यांच्या आईला भेटावंसं वाटलं. आम्ही निघालो. त्यांचं घर त्याच परिसरात, जवळच होतं. आम्ही काकांच्या घरी पोहोचलो. काकांची पत्नी सजाबाई यांच्याशीही गप्पा झाल्या. काकांशी त्यांचं लग्न अगदी कमी वयात झालं होतं. ते कसं झालं ते त्यांना आज आठवतही नव्हतं. काकांच्या आईचं नाव मंदाबाई. काका आज एरवीपेक्षा लवकर घरी आल्याचं आश्चर्य आणि आनंद दोघींच्याही चेहऱ्यावर दिसत होता. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  आम्ही घरात स्थिरस्थावर झाल्यावर गप्पा पुन्हा सुरू झाल्या. काका सांगू लागले : ‘‘आर्थिक स्थितीमुळे आईची फार परवड होते. रोज काय खायचं हा प्रश्र्न कोरोनानंतरच्या परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे.’’ आता आमच्या गप्पांमध्ये मंदाबाईही सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या : ‘‘आम्ही खूप हाल सोसले. एक वेळचं खाणंही नीटसं मिळायचं नाही. माझी दोन्ही मुलं कर्तबगार निघाली ही आनंदाची बाब.’’ आयुष्य जगताना सोसाव्या लागलेल्या अनेक हाल-अपेष्टांविषयी मंदाबाईंनी सांगितलं.  काका  म्हणाले : ‘‘पूर्वी माणसं मोठ्या मनाची असायची. एकमेकांना सहजपणे मदत व्हायची. पूर्वी व्यवसायातून चारशे रुपये मिळायचे, आता पन्नास रुपयेही मिळत नाहीत. एवढा मोठा व्याप चालवायचा असतो, तो या गरिबीमुळे कसा चालवायचा, हा प्रश्न माझा मला अनेक वेळा पडतो. माझे वडील काशिनाथ हे गावाकडे असतात. त्यांना शहरात अजिबात करमत नाही. गावाकडचं घर बांधायचा विचार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे; पण ते बांधता आलेलं नाही. अलीकडच्या काळात महागाईनं आणि रोगराईनं माझं कुटुंब अगदी होरपळून निघालं आहे.’’  काकांचा काळजीचा सूर थांबवत मंदाबाई आपल्या मुलाला धीर देऊ लागल्या. म्हणाल्या : ‘‘बाबा, आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हा आनंदानं दिवस काढले. आता तर सगळं आहे... आनंदानं, माणसांनी सगळं घर भरलेलं आहे. आता कशाची काळजी करायची?’’  काका म्हणाले : ‘‘एका गोष्टीची नेहमीच खंत वाटते. आईच्या आजारपणावर मी पाहिजे तसे उपचार करू शकत नाही. तिला पाहिजे ते वेळेवर देऊ शकत नाही.’’  मुलगी रंजना वडिलांची समजूत काढत म्हणाली : ‘‘बाबा, तुम्ही आम्हा सगळ्यांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं, लग्न करून दिलं, हाताला काम मिळवून दिलं, तुमची जबाबदारी आता संपली आहे.’’  तिला मध्येच थांबवत काका म्हणाले : ‘‘नाही बाळा, आपल्या आई-वडिलांविषयीची आपली जबाबदारी कधीच संपत नसते. आपण जेव्हा शेवटचे डोळे मिटतो तेव्हाच ती जबाबदारी संपते.’’  काका, काकांची आई आणि काकांची मुलगी या तिघांचा संवाद मला त्या तीन पिढ्यांचा संवाद वाटत होता, ज्यातून काहीतरी बोध मलाही घेता येईल असं मला वाटलं. काकांनी आपली जबाबदारी पार पाडत जे कष्टातून उभं केलं होतं त्याला तोड नव्हती. आईनं आपल्या मुलाला उभं राहण्यासाठी सातत्यानं प्रोत्साहन दिलं होतं आणि तिसरी पिढी म्हणजे रंजना.  ती आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल पाय ठेवत कष्टाचा वारसा पुढं नेत आहे. उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा सोडायचा नाही...काम, मग ते कसलंही असो, कुठलंही असो, त्यात लाज बाळगायची नाही. पुढं पुढं पावलं टाकत निघायचं, असा कानमंत्र काकांनी आपल्या मुलांनाच नव्हे, तर आयुष्यात उभं राहू पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला आहे असं मला वाटून गेलं. मी काकांच्या आईचे आशीर्वाद घेऊन काकांचा निरोप घेतला. मनात विचार आला...काकांनी जे उभं केलं ते चिरंतन टिकणारं आहे. ते उभं करण्यामागं आत्मीयता होती, स्वाभिमानही होता आणि आनंद तर होताच होता.   आपण जे निर्माण करतो त्यात आनंदही असला पाहिजे. काकांची शिकवण हीच आहे. नाही का? Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31JsMv1

No comments:

Post a Comment