वणवा रोखण्यात गब्बरसिंग, सिंघम फेल, मेळघाटच्या व्याघ्रप्रकल्पात आग लागण्याचे प्रकार सुरूच अचलपूर (जि. अमरावती ) : उन्हाळ्यात जंगलात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि सिंघम यांचे मेळघाटातील पोस्टर चांगलेच चर्चेत आले होते. मात्र मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षणासाठी मैदानात उतरलेले गब्बरसिंग आणि सिंघम दोघेही अपयशी ठरल्याचे खोंगडा वनक्षेत्रात लागलेल्या आगीवरून दिसून येत आहे. या परिसरात जवळपास तीस हेक्‍टरांवर वन जळून खाक झाले आहे. त्यामुळे गब्बरसिंग, सिंघम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  हेही वाचा - "वाझेला सेवेत घेणे सरकारची मोठी चूक; म्हणूनच वाढल्या अडचणी"  जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी तसा संदेश देणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग व ठाणेदार सिंघमचे फलक व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने मेळघाटातील आदिवासी पाड्यांच्या दर्शनी भागावर लावण्यात आले होते. तसेच ते पोस्टर सोशल मीडियावरही अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे त्या पोस्टरची चांगलीच चर्चा झाली होती. गब्बर आणि सिंघममुळे आग लागण्याचे प्रकार कमी होतील, या उद्देशानेच हे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र सिंघम आणि गब्बर दोघेही आगीच्या घटनेवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत.  मेळघाटच्या जंगलात दरवर्षीच आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. त्यामध्ये हजारो हेक्‍टर जंगलाची राखरांगोळी होते. शिवाय साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरीण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांचा होरपळून मृत्यूसुद्धा होतो. यात कोट्यवधी रुपयांची वनसंपदा यात जळून खाक होत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी बांबूंच्या घर्षणाने उन्हाळ्यात आग लागत असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र आग मानवनिर्मित असल्याचे सत्य आहे.  हेही वाचा - क्या बात है! नागपूरचा भावेश 'इंडिया बुक'मध्ये; दुचाकीने केला सहा हजार किमीचा चतुष्कोन... वन आणि व्याघ्रप्रकल्प त्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. त्याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून सोशल मीडियावर शोले चित्रपटातील गब्बरसिंग यांचा प्रसिद्ध डायलॉग ‘अरे ओ सांभा, जंगल मे आग लगाने पे सरकार कितना जुमार्ना रखे है, सरदार पुरे पाच हजार और दो साल की जेल’, तर सिंघममधील अजय देवगनचा डॉयलाग ‘आली रे आली, आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’, अशा आशयाचे पोस्टर लावले होते. मात्र हे दोघेही आग लावण्याच्या घटनेला अंकुश बसवू शकले नाहीत. आजही मेळघाटच्या जंगलात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

वणवा रोखण्यात गब्बरसिंग, सिंघम फेल, मेळघाटच्या व्याघ्रप्रकल्पात आग लागण्याचे प्रकार सुरूच अचलपूर (जि. अमरावती ) : उन्हाळ्यात जंगलात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि सिंघम यांचे मेळघाटातील पोस्टर चांगलेच चर्चेत आले होते. मात्र मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षणासाठी मैदानात उतरलेले गब्बरसिंग आणि सिंघम दोघेही अपयशी ठरल्याचे खोंगडा वनक्षेत्रात लागलेल्या आगीवरून दिसून येत आहे. या परिसरात जवळपास तीस हेक्‍टरांवर वन जळून खाक झाले आहे. त्यामुळे गब्बरसिंग, सिंघम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  हेही वाचा - "वाझेला सेवेत घेणे सरकारची मोठी चूक; म्हणूनच वाढल्या अडचणी"  जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी तसा संदेश देणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग व ठाणेदार सिंघमचे फलक व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने मेळघाटातील आदिवासी पाड्यांच्या दर्शनी भागावर लावण्यात आले होते. तसेच ते पोस्टर सोशल मीडियावरही अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे त्या पोस्टरची चांगलीच चर्चा झाली होती. गब्बर आणि सिंघममुळे आग लागण्याचे प्रकार कमी होतील, या उद्देशानेच हे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र सिंघम आणि गब्बर दोघेही आगीच्या घटनेवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत.  मेळघाटच्या जंगलात दरवर्षीच आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. त्यामध्ये हजारो हेक्‍टर जंगलाची राखरांगोळी होते. शिवाय साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरीण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांचा होरपळून मृत्यूसुद्धा होतो. यात कोट्यवधी रुपयांची वनसंपदा यात जळून खाक होत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी बांबूंच्या घर्षणाने उन्हाळ्यात आग लागत असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र आग मानवनिर्मित असल्याचे सत्य आहे.  हेही वाचा - क्या बात है! नागपूरचा भावेश 'इंडिया बुक'मध्ये; दुचाकीने केला सहा हजार किमीचा चतुष्कोन... वन आणि व्याघ्रप्रकल्प त्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. त्याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून सोशल मीडियावर शोले चित्रपटातील गब्बरसिंग यांचा प्रसिद्ध डायलॉग ‘अरे ओ सांभा, जंगल मे आग लगाने पे सरकार कितना जुमार्ना रखे है, सरदार पुरे पाच हजार और दो साल की जेल’, तर सिंघममधील अजय देवगनचा डॉयलाग ‘आली रे आली, आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’, अशा आशयाचे पोस्टर लावले होते. मात्र हे दोघेही आग लावण्याच्या घटनेला अंकुश बसवू शकले नाहीत. आजही मेळघाटच्या जंगलात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rGsxLS

No comments:

Post a Comment