मातोंडमध्ये जपली जातेय मांड परंपरा  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तळकोकणात शिमगोत्सव हा ठिकठिकाणी विविध रूढी परंपरांनी साजरा केला जातो. यातीलच एक परंपरा म्हणजेच मांड. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड गावात अजूनही तेवढ्याच उत्साहात ही मांड परंपरा जपली जातेय. यात वैशिष्ट्य म्हणजे गावात घरोघरी जाऊन माती पासून बनवलेले घुमट हे वाद्य गावातील नागरिकांना वर्षातून एकदा ऐकायला मिळते.  तालुक्‍यातील मातोंड गाव हा विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात शिमगोत्सव सुद्धा होळी पासून सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शिमगोत्सवातील एक वैशिष्ट्य म्हणजे मांड. हा मांड होळीपासून चौथ्या दिवशी गावात प्रत्येक घरोघरी फिरतो. यातील मुख्य आकर्षण म्हणजे घुमट हे वाद्य. मातीपासून बनवलेले हे घुमट वाद्य गावातील प्रत्येक घरी विविध गाण्यांच्या तालावर वाजवले जाते. यामुळे एक वेगळेच वातावरण गावात पहावयास मिळते. गावातील प्रमुख परब गावकारांचे एक प्रतिनिधी यांच्यासहीत घाडी, मेस्त्री, मातोंडकर, नर्से, वराडकर, नाथ, जाधव आदी कुटुंबीय गावचे निशाण घेऊन या मांडमध्ये सहभागी होतात. मातोंड, पेंडुर गावाबरोबरच तुळस-कुंभारटेंब याठिकाणी हा मातोंड गावच्या मनाचा मांड जातो. होळीपासून सातव्या दिवशी धुळवडीने याची सांगता होते.  नियम पाळून रूढी परंपरा  कोरोनाचे सावट या शिमगोत्सवावर असल्याने हे मांडकरी शासनाचे सर्व नियम पाळून हा मांड घरोघरी फिरवत आहेत. सध्या लोप पावत असलेल्या या रूढी परंपरा अजूनही मातोंड गावात तेवढ्याच उत्साहात जपल्या जात आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

मातोंडमध्ये जपली जातेय मांड परंपरा  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तळकोकणात शिमगोत्सव हा ठिकठिकाणी विविध रूढी परंपरांनी साजरा केला जातो. यातीलच एक परंपरा म्हणजेच मांड. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड गावात अजूनही तेवढ्याच उत्साहात ही मांड परंपरा जपली जातेय. यात वैशिष्ट्य म्हणजे गावात घरोघरी जाऊन माती पासून बनवलेले घुमट हे वाद्य गावातील नागरिकांना वर्षातून एकदा ऐकायला मिळते.  तालुक्‍यातील मातोंड गाव हा विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात शिमगोत्सव सुद्धा होळी पासून सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शिमगोत्सवातील एक वैशिष्ट्य म्हणजे मांड. हा मांड होळीपासून चौथ्या दिवशी गावात प्रत्येक घरोघरी फिरतो. यातील मुख्य आकर्षण म्हणजे घुमट हे वाद्य. मातीपासून बनवलेले हे घुमट वाद्य गावातील प्रत्येक घरी विविध गाण्यांच्या तालावर वाजवले जाते. यामुळे एक वेगळेच वातावरण गावात पहावयास मिळते. गावातील प्रमुख परब गावकारांचे एक प्रतिनिधी यांच्यासहीत घाडी, मेस्त्री, मातोंडकर, नर्से, वराडकर, नाथ, जाधव आदी कुटुंबीय गावचे निशाण घेऊन या मांडमध्ये सहभागी होतात. मातोंड, पेंडुर गावाबरोबरच तुळस-कुंभारटेंब याठिकाणी हा मातोंड गावच्या मनाचा मांड जातो. होळीपासून सातव्या दिवशी धुळवडीने याची सांगता होते.  नियम पाळून रूढी परंपरा  कोरोनाचे सावट या शिमगोत्सवावर असल्याने हे मांडकरी शासनाचे सर्व नियम पाळून हा मांड घरोघरी फिरवत आहेत. सध्या लोप पावत असलेल्या या रूढी परंपरा अजूनही मातोंड गावात तेवढ्याच उत्साहात जपल्या जात आहेत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3meyX3C

No comments:

Post a Comment