थरारक पाठलागानंतर कणकवलीत दारू पकडली  कणकवली (सिंधुदुर्ग) - गोवा ते चिपळूण दारू वाहतूक करणाऱ्या मोटारीला पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. या मोटारीतून दारू वाहतूक करणाऱ्या सचिन प्रभाकर वेळिप (वय 30, रा. दक्षिण-गोवा) या संशयिताला जेरबंद केले. पहाटे दोनच्या सुमारास कारवाई करण्यात आली. मोटारीतून 1 लाख 42 हजार 80 रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि मोटार हस्तगत करण्यात आली आहे.  कणकवली पोलिसांना एका मोटारीतून दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तळेरे येथे पोलिसांनी सापळा रचून वाहनांवर लक्ष ठेवले होते. यात दीडच्या सुमारास गोवा ते चिपळूण या दिशेने जाणारी मोटार थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र चालक न थांबता वैभववाडीच्या दिशेने सुसाट वेगाने गेला. त्यानंतर पोलिसांनी त्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. तळेरेहून वैभववाडीच्या दिशेने गेलेली ही तेथील पेट्रोलपंपाच्या बाजूला लावण्यात आली होती. मोटारीपाशी पोलिस आल्यानंतर चालकाने पुन्हा वैभववाडीहून तळेरेच्या दिशेने पलायन केले. पहाटेच्या 2 सुमारास हे थरारनाट्य सुरू असतानाच संशयिताने महामार्गावर आल्यावर पुन्हा तळेरे बसस्थानक परिसरात मोटार घुसवली. याचदरम्यान पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून चालकाला ताब्यात घेतले. मोटारीची तपासणी केली असता मागील डिकीत 1 लाख 42 हजार 80 रुपयांच्या 1776 दारूच्या बाटल्या बॉक्‍समध्ये भरलेल्या आढळून आल्या. या दारू साठ्यासह पोलिसांनी 3 लाखाची मोटार पोलिसांनी हस्तगत केली.  कारवाईमुळे शिलेदारांचे कौतुक  या धडक कारवाईबद्दल कणकवली पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, संदेश आबिटकर, रूपेश गुरव यांनी सहभाग घेतला. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

थरारक पाठलागानंतर कणकवलीत दारू पकडली  कणकवली (सिंधुदुर्ग) - गोवा ते चिपळूण दारू वाहतूक करणाऱ्या मोटारीला पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. या मोटारीतून दारू वाहतूक करणाऱ्या सचिन प्रभाकर वेळिप (वय 30, रा. दक्षिण-गोवा) या संशयिताला जेरबंद केले. पहाटे दोनच्या सुमारास कारवाई करण्यात आली. मोटारीतून 1 लाख 42 हजार 80 रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि मोटार हस्तगत करण्यात आली आहे.  कणकवली पोलिसांना एका मोटारीतून दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तळेरे येथे पोलिसांनी सापळा रचून वाहनांवर लक्ष ठेवले होते. यात दीडच्या सुमारास गोवा ते चिपळूण या दिशेने जाणारी मोटार थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र चालक न थांबता वैभववाडीच्या दिशेने सुसाट वेगाने गेला. त्यानंतर पोलिसांनी त्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. तळेरेहून वैभववाडीच्या दिशेने गेलेली ही तेथील पेट्रोलपंपाच्या बाजूला लावण्यात आली होती. मोटारीपाशी पोलिस आल्यानंतर चालकाने पुन्हा वैभववाडीहून तळेरेच्या दिशेने पलायन केले. पहाटेच्या 2 सुमारास हे थरारनाट्य सुरू असतानाच संशयिताने महामार्गावर आल्यावर पुन्हा तळेरे बसस्थानक परिसरात मोटार घुसवली. याचदरम्यान पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून चालकाला ताब्यात घेतले. मोटारीची तपासणी केली असता मागील डिकीत 1 लाख 42 हजार 80 रुपयांच्या 1776 दारूच्या बाटल्या बॉक्‍समध्ये भरलेल्या आढळून आल्या. या दारू साठ्यासह पोलिसांनी 3 लाखाची मोटार पोलिसांनी हस्तगत केली.  कारवाईमुळे शिलेदारांचे कौतुक  या धडक कारवाईबद्दल कणकवली पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, संदेश आबिटकर, रूपेश गुरव यांनी सहभाग घेतला. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ueAUQz

No comments:

Post a Comment