चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी कणकवली (सिंधुदुर्ग) - चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली रतांबीचा व्हाळ येथे आज आयशर टेम्पो पलटी झाला. सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली. यात चालक जखमी झाला आहे. भरधाव वेगाने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. रतांबी व्हाळ येथे गेली काही वर्षे वारंवार अपघात होत आहेत. यात महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे सत्र सुरूच राहिले आहे. दरम्यान अपघातातील टेम्पोचालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस प्रकाश गवस व सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी कणकवली (सिंधुदुर्ग) - चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली रतांबीचा व्हाळ येथे आज आयशर टेम्पो पलटी झाला. सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली. यात चालक जखमी झाला आहे. भरधाव वेगाने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. रतांबी व्हाळ येथे गेली काही वर्षे वारंवार अपघात होत आहेत. यात महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे सत्र सुरूच राहिले आहे. दरम्यान अपघातातील टेम्पोचालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस प्रकाश गवस व सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cNnK79

No comments:

Post a Comment