साडेपाच हजार मतदार छायाचित्राविना  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 6 लाख 75 हजार 709 एवढे मतदार असून पैकी 5 हजार 693 मतदारांचे मतदार यादीत नाव आहे; परंतु त्यांची छायाचित्रे नाहीत. त्यामुळे 5 हजार 693 मतदारांनी आपली छायाचित्रे त्वरित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावीत. अन्यथा या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असा इशारा जिल्हा निवडणूक विभागाने दिला आहे.  जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात 6 लाख 75 हजार 709 एवढे मतदार आहेत. यात 3 लाख 36 हजार 532 पुरुष तर 3 लाख 39 हजार 178 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीचा निरंतर कार्यक्रम सुरू असून 15 जानेवारी 2021च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 5 हजार 807 एवढे मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार आहेत. ज्या मतदारांचे छायाचित्र नाही, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाच्या असून त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यात 15 जानेवारी 2021 च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 5 हजार 807 एवढे मतदारांचे छायाचित्र नव्हते.  निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत यातील 53 मतदारांनी त्यांचे छायाचित्र मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत तर 61 जणांच्या नातेवाईकांनी 7 नंबर अर्ज दाखल करून संबधित मतदारांचे नाव मतदान यादीतून कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्यास्थितीला 5 हजार 693 मतदार असे आहेत की त्यांचे मतदार यादीत नाव आहे; परंतु छायाचित्र नाही. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या मतदारांना त्यांनी छायाचित्र मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावे, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. संबधित मतदारांनी त्यांचे छायाचित्र वेळीच निवडणूक विभाग किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असा इशारा दिला आहे.  विधानसभानिहाय आकडेवारी  *मतदारसंघ* मतदार*छायाचित्र नसलेले  *कणकवली*232129*1871  *कुडाळ*217635*2784  *सावंतवाडी*225945*1038  मतदार यादीत छायाचित्र नाही, अशा मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत; मात्र त्यासाठी सबंधित मतदारांच्या नातेवाईकांनी 7 नंबर अर्ज भरून देणे आवश्‍यक आहे; मात्र जिल्ह्यातील नागरिक असे अर्ज भरून देत नाहीत. त्यामुळे नावे वगळता येत नाहीत. छायाचित्रे जमा केल्यास अथवा 7 नंबर अर्ज भरून दिल्यास जिल्ह्याची 100 टक्के छायाचित्र असलेली मतदार यादी बनविण्यास मदत होईल.  - क्षितिज ठाकूर, मतदार नोंदणी अधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

साडेपाच हजार मतदार छायाचित्राविना  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात 6 लाख 75 हजार 709 एवढे मतदार असून पैकी 5 हजार 693 मतदारांचे मतदार यादीत नाव आहे; परंतु त्यांची छायाचित्रे नाहीत. त्यामुळे 5 हजार 693 मतदारांनी आपली छायाचित्रे त्वरित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावीत. अन्यथा या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असा इशारा जिल्हा निवडणूक विभागाने दिला आहे.  जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात 6 लाख 75 हजार 709 एवढे मतदार आहेत. यात 3 लाख 36 हजार 532 पुरुष तर 3 लाख 39 हजार 178 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीचा निरंतर कार्यक्रम सुरू असून 15 जानेवारी 2021च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 5 हजार 807 एवढे मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार आहेत. ज्या मतदारांचे छायाचित्र नाही, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाच्या असून त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यात 15 जानेवारी 2021 च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 5 हजार 807 एवढे मतदारांचे छायाचित्र नव्हते.  निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत यातील 53 मतदारांनी त्यांचे छायाचित्र मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत तर 61 जणांच्या नातेवाईकांनी 7 नंबर अर्ज दाखल करून संबधित मतदारांचे नाव मतदान यादीतून कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्यास्थितीला 5 हजार 693 मतदार असे आहेत की त्यांचे मतदार यादीत नाव आहे; परंतु छायाचित्र नाही. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या मतदारांना त्यांनी छायाचित्र मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावे, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. संबधित मतदारांनी त्यांचे छायाचित्र वेळीच निवडणूक विभाग किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असा इशारा दिला आहे.  विधानसभानिहाय आकडेवारी  *मतदारसंघ* मतदार*छायाचित्र नसलेले  *कणकवली*232129*1871  *कुडाळ*217635*2784  *सावंतवाडी*225945*1038  मतदार यादीत छायाचित्र नाही, अशा मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत; मात्र त्यासाठी सबंधित मतदारांच्या नातेवाईकांनी 7 नंबर अर्ज भरून देणे आवश्‍यक आहे; मात्र जिल्ह्यातील नागरिक असे अर्ज भरून देत नाहीत. त्यामुळे नावे वगळता येत नाहीत. छायाचित्रे जमा केल्यास अथवा 7 नंबर अर्ज भरून दिल्यास जिल्ह्याची 100 टक्के छायाचित्र असलेली मतदार यादी बनविण्यास मदत होईल.  - क्षितिज ठाकूर, मतदार नोंदणी अधिकारी  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fGyjuK

No comments:

Post a Comment