तेलींनी आधी आपल्या दिव्याखालील अंधार पाहावा : परब कुडाळ (सिंधुदुर्ग) - तीन वेळा इकडून तिकडे उड्या मारून पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पाहावे, नंतरच आरोप करावेत, असा सल्ला जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी जो दुरुस्ती निधी त्याच शाळांवर खर्च करण्यासाठी वापरून भ्रष्टाचार केला आहे, त्याची कसून चौकशी आयुक्तांमार्फत करण्याची मागणीही आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शिवसेना शाखेत आज जिल्हा परिषद शिवसेना गटनेते परब यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषदेचे सदस्य अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, राजू गवंडे आदी उपस्थित होते.  परब म्हणाले, ""माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सहा वर्षांपूर्वी कोट्यवधी निधी जिल्हा परिषद शाळांसाठी दिला आणि पुन्हा तोच निधी त्याच शाळांवर खर्च केला जात आहे. अशा या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार व अकार्यक्षम कारभारामुळे हा निधी अखर्चित, कोट्यवधी निधी दिला गेला. शाळेची दुरुस्ती करताना मर्जीतील लोकांना कामे दिली गेली. जिल्हा परिषद निधी हा पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे नाही तर अकार्यक्षम व भ्रष्टाचारी कारभारामुळे अखर्चित राहिला. करोडोंचा निधी शाळा दुरुस्तीसाठी दिला. सत्ताधारी जे काही सदस्य आहेत, त्यांचा तुमच्यावर विश्‍वास राहिला नाही. ते कंटाळले असून, आमच्याकडे यायचे आहेत. हा शिवसेनेचा दरारा जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती निवडीवेळी दिसून आला.''  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी राजीनामा का दिला? असा सवाल करीत, आज जे चार सभापती बसले हे शिवसेनेमुळेच बसले, याचे भान तेलींनी ठेवून बोलण्याअगोदर विचार करा, असा सबुरीचा सल्ला दिला. हिंमत असेल तर म्हापसेकरांचा राजीनामा मंजूर करावा, मग निवडणुकीत कळेल, असा इशाराही दिला. राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जिल्ह्याला नेहमीच विकासाच्या दिशेने झुकते माप दिले आहे. भरघोस निधी सरकारने दिला. सिंधुरत्न समूह विकास योजनेसाठी 300 कोटी निधी मंजूर केला असून, 75 कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधी अंतर्गत रोजगारातून जनतेचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. कृषी अवजारे, लघु उद्योग अशा थेट लाभाच्या योजना यात आहेत. जिल्हा परिषद स्वनिधीतही अनियमितता असून, हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  जिल्हा परिषद शिवसेनेचीच  येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या वेळी ही जिल्हा परिषद शिवसेनेकडे असेल, असे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी सांगितले. शिवाय, तुमच्या अनागोंदी कारभाराला सर्वजण कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले.  संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 3, 2021

तेलींनी आधी आपल्या दिव्याखालील अंधार पाहावा : परब कुडाळ (सिंधुदुर्ग) - तीन वेळा इकडून तिकडे उड्या मारून पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पाहावे, नंतरच आरोप करावेत, असा सल्ला जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी जो दुरुस्ती निधी त्याच शाळांवर खर्च करण्यासाठी वापरून भ्रष्टाचार केला आहे, त्याची कसून चौकशी आयुक्तांमार्फत करण्याची मागणीही आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शिवसेना शाखेत आज जिल्हा परिषद शिवसेना गटनेते परब यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषदेचे सदस्य अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, राजू गवंडे आदी उपस्थित होते.  परब म्हणाले, ""माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सहा वर्षांपूर्वी कोट्यवधी निधी जिल्हा परिषद शाळांसाठी दिला आणि पुन्हा तोच निधी त्याच शाळांवर खर्च केला जात आहे. अशा या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार व अकार्यक्षम कारभारामुळे हा निधी अखर्चित, कोट्यवधी निधी दिला गेला. शाळेची दुरुस्ती करताना मर्जीतील लोकांना कामे दिली गेली. जिल्हा परिषद निधी हा पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे नाही तर अकार्यक्षम व भ्रष्टाचारी कारभारामुळे अखर्चित राहिला. करोडोंचा निधी शाळा दुरुस्तीसाठी दिला. सत्ताधारी जे काही सदस्य आहेत, त्यांचा तुमच्यावर विश्‍वास राहिला नाही. ते कंटाळले असून, आमच्याकडे यायचे आहेत. हा शिवसेनेचा दरारा जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती निवडीवेळी दिसून आला.''  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी राजीनामा का दिला? असा सवाल करीत, आज जे चार सभापती बसले हे शिवसेनेमुळेच बसले, याचे भान तेलींनी ठेवून बोलण्याअगोदर विचार करा, असा सबुरीचा सल्ला दिला. हिंमत असेल तर म्हापसेकरांचा राजीनामा मंजूर करावा, मग निवडणुकीत कळेल, असा इशाराही दिला. राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जिल्ह्याला नेहमीच विकासाच्या दिशेने झुकते माप दिले आहे. भरघोस निधी सरकारने दिला. सिंधुरत्न समूह विकास योजनेसाठी 300 कोटी निधी मंजूर केला असून, 75 कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधी अंतर्गत रोजगारातून जनतेचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. कृषी अवजारे, लघु उद्योग अशा थेट लाभाच्या योजना यात आहेत. जिल्हा परिषद स्वनिधीतही अनियमितता असून, हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  जिल्हा परिषद शिवसेनेचीच  येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या वेळी ही जिल्हा परिषद शिवसेनेकडे असेल, असे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी सांगितले. शिवाय, तुमच्या अनागोंदी कारभाराला सर्वजण कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले.  संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PB4ZuN

No comments:

Post a Comment