नगराध्यक्षांकडून लोकशाहीचा खून; अफजल सुतारांचा घणाघात महाबळेश्वर (जि. सातारा) : पालिकेच्या 31 मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेतील मंजूर करण्यात आलेल्या सर्व ठरावांच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे पालिकेतील बहुमत गमावलेल्या सत्ताधारी गटाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.   नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या मनमानी कारभारास कंटाळून सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे पालिकेत बहुमतात असलेला सत्ताधारी गट अल्पमतात आला आहे. असे असताना नगराध्यक्षांनी 31 मार्च रोजी 84 विषयांवर निर्णय घेण्यासाठी ऑनलाइन सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेपुढील काही विषय हे नगराध्यक्षांच्या व्यक्तिगत आर्थिक फायद्याचे असून, जनतेच्या हिताचे नाहीत, तसेच पालिकेचेही भविष्यात त्यातून आर्थिक नुकसान करणारे असल्याबाबत पालिकेतील विरोधी गटातील 13 नगरसेवकांचे एकमत झाल्याने त्यांनी या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोरमअभावी ही सभा रद्द होईल, असे विरोधी गटातील नगरसेवकांना वाटले; परंतु नगराध्यक्षांनी ही सभा तहकूब केली. कोरमअभावी तहकूब करण्यात आलेली सभा नगराध्यक्षांनी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बोलविली; परंतु या दिवशीही 13 नगरसेवक गैरहजर राहिले. कोरम झाला नाही तर ती सभा रद्द करणे आवश्‍यक आहे; परंतु नगराध्यक्षांनी ती सभा तहकूब केल्याने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील एक एप्रिलच्या त्या सभेला हजेरी लावली नाही. मुख्याधिकारी नसल्याने त्या सभेला पालिकेतील सर्व विभागांचे अधिकारीदेखील उपस्थित राहिले नाहीत, तरीही नगराध्यक्षांनी ती सभा घेतली. या सभेला नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, नगरसेविका आफरीन वारुणकर व सुनीता आखाडे हे चौघेच उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील 84 विषय मंजूर करण्यात आले. वेण्णा नदीपात्रात बांधकाम; महाबळेश्‍वरातील दोघांवर गुन्हा    सभा बोलविण्यापूर्वी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्‍यक होते. इतर नगरसेवकांच्या प्रभागातील काही विषय आहेत का, याबाबत नगरसेवकांबरोबर चर्चा करणे आवश्‍यक होते. ज्या सभेला कोरम नाही अशी सभा रद्द करणे आवश्‍यक होते. मुख्याधिकाऱ्यांनी एक एप्रिलची सभा बेकायदेशीर आहे, असे कळविले होते. त्यानंतर सभा रद्द करणे आवश्‍यक होते; परंतु काहीही झाले नाही, तरी सभा झाली व त्या सभेत 84 विषय मंजूर करण्यात आले म्हणून विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी एकत्र येऊन या सभेतील मंजूर ठरावांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला.   विरोधी गटातील उपनगराध्यक्ष अफजल सुतार, किसन शिंदे, जुबेदा मुलाणी, स्नेहल जंगम, श्रद्धा रोकडे, प्रकाश पाटील, उज्ज्वला तोष्णीवाल, संदीप साळुंखे, शारदा ढाणक, विमलताई पारठे, विमलताई ओंबळे, संजय पिसाळ व रवींद्र कुंभारदरे या नगरसेवकांनी एकत्र येऊन नगराध्यक्षांनी बहुमत नसताना सर्वसाधारण सभा घेऊन मंजूर केलेल्या विषयांना हरकत घेऊन तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे, की उपस्थित नगरसेवकांनी आपल्या आर्थिक हिताचा फायदा करून विषय मंजूर केले आहेत. हे विषय स्थानिकांच्या हिताचे नाहीत, तसेच या विषयांमुळे पालिकेचे भविष्यात आर्थिक नुकसान करणारे आहे.   विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी   दरम्यान, सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाच एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व माहिती कळवून 308 कलमांच्या आधारे तक्रार दाखल केली होती. पालिकेतील 13 नगरसेवकांबरोबरच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत आठ एप्रिल रोजी पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.  नगराध्यक्षांनी केला लोकशाहीचा खून  दरम्यान, सर्वसाधारण सभेत 17 पैकी तीन नगरसेवक असताना सर्व विषय मंजूर करून घेऊन नगराध्यक्षांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करून जर तीन नगरसेवक पालिकेचा कारभार करणार असतील, तर पालिकेत 17 नगरसेवकांची गरजच काय? असा सवाल पालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी उपस्थित केला आहे.  उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलनातून जमा केलेले 450 रुपये काेणत्या अधिका-याने का नाकारले, पुढे काय झाले वाचा सविस्तर Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 11, 2021

नगराध्यक्षांकडून लोकशाहीचा खून; अफजल सुतारांचा घणाघात महाबळेश्वर (जि. सातारा) : पालिकेच्या 31 मार्च रोजी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेतील मंजूर करण्यात आलेल्या सर्व ठरावांच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे पालिकेतील बहुमत गमावलेल्या सत्ताधारी गटाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.   नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या मनमानी कारभारास कंटाळून सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे पालिकेत बहुमतात असलेला सत्ताधारी गट अल्पमतात आला आहे. असे असताना नगराध्यक्षांनी 31 मार्च रोजी 84 विषयांवर निर्णय घेण्यासाठी ऑनलाइन सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेपुढील काही विषय हे नगराध्यक्षांच्या व्यक्तिगत आर्थिक फायद्याचे असून, जनतेच्या हिताचे नाहीत, तसेच पालिकेचेही भविष्यात त्यातून आर्थिक नुकसान करणारे असल्याबाबत पालिकेतील विरोधी गटातील 13 नगरसेवकांचे एकमत झाल्याने त्यांनी या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोरमअभावी ही सभा रद्द होईल, असे विरोधी गटातील नगरसेवकांना वाटले; परंतु नगराध्यक्षांनी ही सभा तहकूब केली. कोरमअभावी तहकूब करण्यात आलेली सभा नगराध्यक्षांनी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बोलविली; परंतु या दिवशीही 13 नगरसेवक गैरहजर राहिले. कोरम झाला नाही तर ती सभा रद्द करणे आवश्‍यक आहे; परंतु नगराध्यक्षांनी ती सभा तहकूब केल्याने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील एक एप्रिलच्या त्या सभेला हजेरी लावली नाही. मुख्याधिकारी नसल्याने त्या सभेला पालिकेतील सर्व विभागांचे अधिकारीदेखील उपस्थित राहिले नाहीत, तरीही नगराध्यक्षांनी ती सभा घेतली. या सभेला नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, नगरसेविका आफरीन वारुणकर व सुनीता आखाडे हे चौघेच उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील 84 विषय मंजूर करण्यात आले. वेण्णा नदीपात्रात बांधकाम; महाबळेश्‍वरातील दोघांवर गुन्हा    सभा बोलविण्यापूर्वी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्‍यक होते. इतर नगरसेवकांच्या प्रभागातील काही विषय आहेत का, याबाबत नगरसेवकांबरोबर चर्चा करणे आवश्‍यक होते. ज्या सभेला कोरम नाही अशी सभा रद्द करणे आवश्‍यक होते. मुख्याधिकाऱ्यांनी एक एप्रिलची सभा बेकायदेशीर आहे, असे कळविले होते. त्यानंतर सभा रद्द करणे आवश्‍यक होते; परंतु काहीही झाले नाही, तरी सभा झाली व त्या सभेत 84 विषय मंजूर करण्यात आले म्हणून विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी एकत्र येऊन या सभेतील मंजूर ठरावांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला.   विरोधी गटातील उपनगराध्यक्ष अफजल सुतार, किसन शिंदे, जुबेदा मुलाणी, स्नेहल जंगम, श्रद्धा रोकडे, प्रकाश पाटील, उज्ज्वला तोष्णीवाल, संदीप साळुंखे, शारदा ढाणक, विमलताई पारठे, विमलताई ओंबळे, संजय पिसाळ व रवींद्र कुंभारदरे या नगरसेवकांनी एकत्र येऊन नगराध्यक्षांनी बहुमत नसताना सर्वसाधारण सभा घेऊन मंजूर केलेल्या विषयांना हरकत घेऊन तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे, की उपस्थित नगरसेवकांनी आपल्या आर्थिक हिताचा फायदा करून विषय मंजूर केले आहेत. हे विषय स्थानिकांच्या हिताचे नाहीत, तसेच या विषयांमुळे पालिकेचे भविष्यात आर्थिक नुकसान करणारे आहे.   विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी   दरम्यान, सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाच एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व माहिती कळवून 308 कलमांच्या आधारे तक्रार दाखल केली होती. पालिकेतील 13 नगरसेवकांबरोबरच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत आठ एप्रिल रोजी पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.  नगराध्यक्षांनी केला लोकशाहीचा खून  दरम्यान, सर्वसाधारण सभेत 17 पैकी तीन नगरसेवक असताना सर्व विषय मंजूर करून घेऊन नगराध्यक्षांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करून जर तीन नगरसेवक पालिकेचा कारभार करणार असतील, तर पालिकेत 17 नगरसेवकांची गरजच काय? असा सवाल पालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी उपस्थित केला आहे.  उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलनातून जमा केलेले 450 रुपये काेणत्या अधिका-याने का नाकारले, पुढे काय झाले वाचा सविस्तर Edited By : Siddharth Latkar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d5zRfX

No comments:

Post a Comment