मालवणात 2384 जणांचे कोरोना लसीकरण  मालवण (सिंधुदुर्ग) - शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडची लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत 2384 जणांनी लस घेतली आहे. शहरात सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त करत व्यापारी, नागरिक, पर्यटकांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असून यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कांदळगावकर यांनी केले.  ग्रामीण रुग्णालयात सध्या नागरिकांना कोविडची लस दिली जात आहे. आतापर्यंत 2384 जणांना लस देण्यात आली असून अन्य नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा. सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविडसदृश लक्षणे दिसल्यास संबंधितांनी तपासणी करून घ्यावी. जे रुग्ण बाधित आढळले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जे निर्बंध घातले आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे. शहरात अनेक व्यापारी, विक्रेते मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून व्यापारी संघाने याबाबत पुढाकार घेत सर्व व्यापाऱ्यांचे विक्रेत्यांचे प्रबोधन करावे. कोरोनाचा प्रसार वाढल्यास प्रशासनास कठोर निर्णय घ्यावा लागल्यास त्याचा परिणाम व्यवसायांवर होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करावा. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुन्हा घरपोच सामान पोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन कांदळगावकर यांनी केले आहे. पालिकेत अत्यावश्‍यक काम असल्यासच नागरिकांनी यावे. पालिकेत येणाऱ्या नागरिकांची थर्मल गन, ऑक्‍सीमीटरद्वारे तपासणी केली जाणार आहे. नागरिकांना विविध प्रकारचे दाखले घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागरिकांनी 02365-252030 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही नगराध्यक्षांनी केले.  नियम पाळण्याचे आवाहन  गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. नागरिक, व्यापाऱ्यांचे याला चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले होते; मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, पर्यटकांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. कोरोनाचे जे नियम आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी शहरात सुरू आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, पर्यटकांनी याचे पालन करत पालिकेस सहकार्य करावे, असेही नगराध्यक्षांनी म्हटले आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

मालवणात 2384 जणांचे कोरोना लसीकरण  मालवण (सिंधुदुर्ग) - शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडची लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत 2384 जणांनी लस घेतली आहे. शहरात सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षांनी चिंता व्यक्त करत व्यापारी, नागरिक, पर्यटकांनी कोविडच्या सर्व नियमांचे कडक पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असून यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कांदळगावकर यांनी केले.  ग्रामीण रुग्णालयात सध्या नागरिकांना कोविडची लस दिली जात आहे. आतापर्यंत 2384 जणांना लस देण्यात आली असून अन्य नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा. सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविडसदृश लक्षणे दिसल्यास संबंधितांनी तपासणी करून घ्यावी. जे रुग्ण बाधित आढळले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जे निर्बंध घातले आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे. शहरात अनेक व्यापारी, विक्रेते मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून व्यापारी संघाने याबाबत पुढाकार घेत सर्व व्यापाऱ्यांचे विक्रेत्यांचे प्रबोधन करावे. कोरोनाचा प्रसार वाढल्यास प्रशासनास कठोर निर्णय घ्यावा लागल्यास त्याचा परिणाम व्यवसायांवर होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करावा. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुन्हा घरपोच सामान पोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन कांदळगावकर यांनी केले आहे. पालिकेत अत्यावश्‍यक काम असल्यासच नागरिकांनी यावे. पालिकेत येणाऱ्या नागरिकांची थर्मल गन, ऑक्‍सीमीटरद्वारे तपासणी केली जाणार आहे. नागरिकांना विविध प्रकारचे दाखले घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागरिकांनी 02365-252030 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही नगराध्यक्षांनी केले.  नियम पाळण्याचे आवाहन  गेल्या वर्षभरात पालिका प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. नागरिक, व्यापाऱ्यांचे याला चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले होते; मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, पर्यटकांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. कोरोनाचे जे नियम आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी शहरात सुरू आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, पर्यटकांनी याचे पालन करत पालिकेस सहकार्य करावे, असेही नगराध्यक्षांनी म्हटले आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3t34zw1

No comments:

Post a Comment