सावंतवाडीच्या कारभाराची घडी बसवली  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दुसरे फोंड सावंत (आनासाहेब) यांच्या कारकीर्दीत राज्याच्या विस्तार आणि संरक्षणाबरोबरच इतरही अनेक गोष्टींकडे लक्ष दिले गेले. यात राज्याची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी करव्यवस्थेत सुधारणा, नव्या गडकिल्ल्यांची बांधणी, जुन्यांची डागडुजी, अशी कामे केली गेली. चारही बाजूंनी प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष करत असतानाही त्यांनी केलेली ही कामे विशेष म्हणावी लागतील.  दुसरे फोंड सावंत यांच्या करकीर्दीत पोर्तुगिज आणि इंग्रजांशी बराचकाळ संघर्ष झाला. कोल्हापूर संस्थानकडूनही त्या काळात हल्ले झाले. 1730च्या सुमारास कोल्हापुरकरांनी सावंतवाडीवर दुसरा हल्ला केला. यात कोल्हापुरच्यावतीने सरदार उदाजीराव मोहिते हे नेतृत्व करत होते; मात्र सावंतवाडीकरांच्या चोख प्रतित्युत्तरामुळे त्यांना परतावे लागले. पुढे जून 1732 मध्ये फोंड सावंत दुसरे यांनी बोलवण-घोणसरी येथील डोंगरावर तटबंदी उभारण्यासाठी सैन्य पाठवले. ही माहिती कोल्हापुरच्या राज्यकर्त्यांना कळली. त्यांनी आपल्या समर्थक सरदारांना तेथे पाठवून त्याला विरोध केला. त्यामुळे सावंतवाडीच्या सैन्याला परत यावे लागले. पुढे सावंतवाडीकरांनी त्याच वर्षाच्या ऑगस्टमध्ये सदानंद गडावर हल्ला केला; पण त्यांना यात यश आले नाही.  हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांना पोर्तुगिजांशीही दोन हात करावे लागले. बराच काळ शांत असलेल्या पोर्तुगिजांनी 1732 मध्ये पुन्हा उचलखाली गोव्याचा गर्व्हनर जनरल म्हणून त्यावर्षी कोंद दि सांदोमिल याची नियुक्‍ती झाली. त्याने सावंतवाडीकरांवर हल्ल्याची तयारी सुरू केली. यासाठी सावंतवाडी संस्थानच्या क्षेत्रात सैनिकांचे तीन गट पाठवले. त्यांनी लुटालुट सुरू केली.  सावंतवाडीकरांच्या सैन्याने नियोजनबद्ध प्रतिहल्ला करत अवघ्या 80 जणांच्या पथकाने या तिन्ही गटांना पळवून लावले. हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांनी राज्याची घडी बसवण्याच्या दृष्टीने भरीव काम केले. त्यांनी कुंबळे स्वरूपात कर आकारणीच्या पायंडा घातला. कुंबळे म्हणजे जमिनीवर घेतला जाणारा सारा. तसा कुंबळे हा शब्द 1673 मध्ये सावंतवाडी संस्थानमधून दिलेल्या एका सनदेमध्ये आढळतो.  फोंड सावंत दुसरे यांनी यात बरीच सुधारणा केली. त्यातही दुबळ्या आणि गरिबांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली. विशिष्ट परिस्थितीत हा कर माफ करण्याची व्यवस्था यात केली. त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी संस्थानात काही नवे किल्ले बांधण्यात आले. यात फुकेरी येथील हनुमंतगड, गेळे येथील नारायणगड, आंबोली येथील महादेवगड, सोनवडे येथील नरसिंहगड किंवा सोनगड, मसुरे येथील भरतगड, ओवळीये तर्फे मालंड येथील सिदगड, आवाडे येथील आवर किल्ला आणि हळर्ण (गोवा) येथील कोट याची उभारणी केली. शिवाय कुडाळ, बांदा, डिचोली, साखळी, वेंगुर्ले येथील जुन्या कोटांची डागडूजी केली.  फोंड सावंत दुसरे यांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी आवाडे गावातील आवर किल्ला उर्फ आवडकोट हा भुईकोट होता. सावंतवाडीपासून पंधरा मैलावर इशान्येला हा गाव आहे. तो केवळ दगडमातीचा बनवला असला तरी प्रशस्त होता. तटाभोवती खंदक होते. या खंदकाच्या बाहेरच्या बाजुला एक पडकोट होता. 1844 मध्ये इंग्रजांविरूद्ध सावंतवाडीत उद्रेक झाला. त्यावेळी अशाच गडकिल्ल्यातून मदत पुरवली जात होती. त्यामुळे हे कोट उद्‌ध्वस्त करण्याचे धोरण इंग्रजांनी ठरवले. त्यानुसार 1845 मध्ये तो पूर्व भुईसपाट करण्यात आला. फोंड सावंत यांच्या कारकिर्दीत या कोटावर एक किल्लेदार, एक कारखाननीस, 1 तासजी, 35 लोक, एक कुणबीण आणि खर्चासाठी 973 रूपये अशी तरतुद होती.  हनुमंतगड हा फुकेरी येथे असलेला गिरीदुर्गही त्यांच्याच कारकिर्दीत बांधला गेला. कातळात खोदलेल्या दोन पाण्याच्या टाक्‍या, उद्‌ध्वस्त वाडे-इमारती, प्रवेशद्वाराची कमान येथील गतवैभवाची आजही साक्ष देते. या किल्ल्यावर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. या किल्ल्याच्या खर्चासाठी सावंतवाडी संस्थानकडून तीन हजारांची तरतुद होती. शिवाय एक किल्लेदार, तीन कारकून, 2 किर्तनी, एक कोठावळा, 80 गडकरी, 47 लोक, 2 कुणबीणी, अशी येथील व्यवस्था होती. हा किल्लाही इंग्रजांविरूद्धच्या उद्रेकावेळी महत्त्वाची भूमिका पार पाडणारा ठरला.  फोंड सावंत दुसरे यांनी आंबोलीत नारायणगड आणि महादेवगड असे दोन वनदुर्ग बांधले. महादेवगड पारपोली घाटीच्या शिखरावर होता. गेळेच्या हद्दीत नारायणगड होता. महादेवगडावर पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटीशांनी तो उद्‌ध्वस्त केला. नारायणगड हा मोठा किल्ला नव्हता. कोकणातून घाट चढून वर आल्यावर जकातीचे मेट याच किल्ल्याच्या ठिकाणी होते. हे देवाचे स्थळ म्हणून जास्त परिचित होते.  कुडाळ तालुक्‍यातील सोनवडे गावाच्या डोंगरात विसावलेला नरसिंहगड हाही फोंड सावंत त्यांनीच बांधला. हा किल्ला पुढे सावंतवाडीकर आणि कोल्हापूरकर यांच्या संघर्षाचे केंद्रही बनला. त्यांनी बांधलेल्या इतर किल्ल्यात कसाल-ओवळीये येथील सिदगड या गिरी दुर्गाचा समावेश आहे. सैन्यासाठी विश्रांती आणि सुरक्षित स्थळ म्हणून याची उभारणी झाली. हा किल्लाही पुढे ब्रिटीशांनी उद्‌ध्वस्त केला. मसुरे येथे कालावल खाडीच्या किनाऱ्यावर त्या फोंड सावंत दुसरे यांनीच भरतगड उभारला. 150 मीटर लांब, 30 मीटर रूंदीचा बुलंद बालेकिल्ला, त्याला 2 मीटर रूंद आणि चार मीटर उंचीचा चिरेबंदी तट, प्रशस्त बुरूज अशी त्याची रचना होती. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी येथे किल्ला उभारायचा प्रयत्न केला होता; पण पाण्याची उपलब्धता नसल्याने त्यांनी तो विचार सोडला होता. फोंड सावंत दुसरे यांनी आधी विहीर खोदून मग याची उभारणी केली. 6 एकर क्षेत्रातील हा किल्ला पुढे बऱ्याच राजकीय हालचालींचे केंद्र बनला. हळर्ण येथेही फोंड सावंत दुसरे यांनी किल्ला उभारला. पुढे तो पोर्तुगिज व सावंतवाडीकरांच्या एका मोठ्या लढाईचा साक्षीदार बनला.  असा होता राजपरिवार  फोंड सावंत दुसरे यांचे 2 जानेवारी 1738 ला निधन झाले. त्यांचा परिवार मोठा होता. त्यांना सहा पत्नी होत्या. त्यांना 11 मुलगे आणि 6 मुली मिळून 17 अपत्य होती. त्यांच्या ज्येष्ठ पत्नी लक्ष्मीबाई या तांबुळकर सावंत घराण्यातील. त्यांना नारोबा सावंत हा मुलगा आणि अंबुबाई व गोदुबाई या मुली होत्या. दुसऱ्या पत्नी सावित्री या बुधकर घाटगे यांच्या कन्या. त्यांना नाग सावंत, लखम सावंत व खेम सावंत असे तीन मुलगे होते. तिसऱ्या पत्नी रूक्‍मीणी या निंबाळकर घराण्यातील. त्यांना जयराम सावंत हे पुत्र आणि कृष्णाबाई व राजसबाई या दोन मुली होत्या. चौथ्या पत्नी पार्वती या खोडुलकर घराण्यातील. त्यांना गंगा व आनंदी अशा दोन मुली होत्या. पाचव्या पत्नी तारा यांना रघुनाथ सावंत, सोम सावंत, शिवराम सावंत व आत्माराम सावंत असे चार मुलगे होते. सहाव्या पत्नी अहिल्या या पिसाळ घराण्यातील. त्यांना श्रीराम सावंत व कृष्ण सावंत असे दोन मुलगे होते. या सगळ्या अपत्यामध्ये नार सावंत, नाग सावंत, जयराम सावंत आणि सोमसावंत हे आपल्या कर्तृत्वामुळे विशेष प्रसिद्ध होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

सावंतवाडीच्या कारभाराची घडी बसवली  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दुसरे फोंड सावंत (आनासाहेब) यांच्या कारकीर्दीत राज्याच्या विस्तार आणि संरक्षणाबरोबरच इतरही अनेक गोष्टींकडे लक्ष दिले गेले. यात राज्याची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी करव्यवस्थेत सुधारणा, नव्या गडकिल्ल्यांची बांधणी, जुन्यांची डागडुजी, अशी कामे केली गेली. चारही बाजूंनी प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष करत असतानाही त्यांनी केलेली ही कामे विशेष म्हणावी लागतील.  दुसरे फोंड सावंत यांच्या करकीर्दीत पोर्तुगिज आणि इंग्रजांशी बराचकाळ संघर्ष झाला. कोल्हापूर संस्थानकडूनही त्या काळात हल्ले झाले. 1730च्या सुमारास कोल्हापुरकरांनी सावंतवाडीवर दुसरा हल्ला केला. यात कोल्हापुरच्यावतीने सरदार उदाजीराव मोहिते हे नेतृत्व करत होते; मात्र सावंतवाडीकरांच्या चोख प्रतित्युत्तरामुळे त्यांना परतावे लागले. पुढे जून 1732 मध्ये फोंड सावंत दुसरे यांनी बोलवण-घोणसरी येथील डोंगरावर तटबंदी उभारण्यासाठी सैन्य पाठवले. ही माहिती कोल्हापुरच्या राज्यकर्त्यांना कळली. त्यांनी आपल्या समर्थक सरदारांना तेथे पाठवून त्याला विरोध केला. त्यामुळे सावंतवाडीच्या सैन्याला परत यावे लागले. पुढे सावंतवाडीकरांनी त्याच वर्षाच्या ऑगस्टमध्ये सदानंद गडावर हल्ला केला; पण त्यांना यात यश आले नाही.  हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांना पोर्तुगिजांशीही दोन हात करावे लागले. बराच काळ शांत असलेल्या पोर्तुगिजांनी 1732 मध्ये पुन्हा उचलखाली गोव्याचा गर्व्हनर जनरल म्हणून त्यावर्षी कोंद दि सांदोमिल याची नियुक्‍ती झाली. त्याने सावंतवाडीकरांवर हल्ल्याची तयारी सुरू केली. यासाठी सावंतवाडी संस्थानच्या क्षेत्रात सैनिकांचे तीन गट पाठवले. त्यांनी लुटालुट सुरू केली.  सावंतवाडीकरांच्या सैन्याने नियोजनबद्ध प्रतिहल्ला करत अवघ्या 80 जणांच्या पथकाने या तिन्ही गटांना पळवून लावले. हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांनी राज्याची घडी बसवण्याच्या दृष्टीने भरीव काम केले. त्यांनी कुंबळे स्वरूपात कर आकारणीच्या पायंडा घातला. कुंबळे म्हणजे जमिनीवर घेतला जाणारा सारा. तसा कुंबळे हा शब्द 1673 मध्ये सावंतवाडी संस्थानमधून दिलेल्या एका सनदेमध्ये आढळतो.  फोंड सावंत दुसरे यांनी यात बरीच सुधारणा केली. त्यातही दुबळ्या आणि गरिबांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली. विशिष्ट परिस्थितीत हा कर माफ करण्याची व्यवस्था यात केली. त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी संस्थानात काही नवे किल्ले बांधण्यात आले. यात फुकेरी येथील हनुमंतगड, गेळे येथील नारायणगड, आंबोली येथील महादेवगड, सोनवडे येथील नरसिंहगड किंवा सोनगड, मसुरे येथील भरतगड, ओवळीये तर्फे मालंड येथील सिदगड, आवाडे येथील आवर किल्ला आणि हळर्ण (गोवा) येथील कोट याची उभारणी केली. शिवाय कुडाळ, बांदा, डिचोली, साखळी, वेंगुर्ले येथील जुन्या कोटांची डागडूजी केली.  फोंड सावंत दुसरे यांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी आवाडे गावातील आवर किल्ला उर्फ आवडकोट हा भुईकोट होता. सावंतवाडीपासून पंधरा मैलावर इशान्येला हा गाव आहे. तो केवळ दगडमातीचा बनवला असला तरी प्रशस्त होता. तटाभोवती खंदक होते. या खंदकाच्या बाहेरच्या बाजुला एक पडकोट होता. 1844 मध्ये इंग्रजांविरूद्ध सावंतवाडीत उद्रेक झाला. त्यावेळी अशाच गडकिल्ल्यातून मदत पुरवली जात होती. त्यामुळे हे कोट उद्‌ध्वस्त करण्याचे धोरण इंग्रजांनी ठरवले. त्यानुसार 1845 मध्ये तो पूर्व भुईसपाट करण्यात आला. फोंड सावंत यांच्या कारकिर्दीत या कोटावर एक किल्लेदार, एक कारखाननीस, 1 तासजी, 35 लोक, एक कुणबीण आणि खर्चासाठी 973 रूपये अशी तरतुद होती.  हनुमंतगड हा फुकेरी येथे असलेला गिरीदुर्गही त्यांच्याच कारकिर्दीत बांधला गेला. कातळात खोदलेल्या दोन पाण्याच्या टाक्‍या, उद्‌ध्वस्त वाडे-इमारती, प्रवेशद्वाराची कमान येथील गतवैभवाची आजही साक्ष देते. या किल्ल्यावर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. या किल्ल्याच्या खर्चासाठी सावंतवाडी संस्थानकडून तीन हजारांची तरतुद होती. शिवाय एक किल्लेदार, तीन कारकून, 2 किर्तनी, एक कोठावळा, 80 गडकरी, 47 लोक, 2 कुणबीणी, अशी येथील व्यवस्था होती. हा किल्लाही इंग्रजांविरूद्धच्या उद्रेकावेळी महत्त्वाची भूमिका पार पाडणारा ठरला.  फोंड सावंत दुसरे यांनी आंबोलीत नारायणगड आणि महादेवगड असे दोन वनदुर्ग बांधले. महादेवगड पारपोली घाटीच्या शिखरावर होता. गेळेच्या हद्दीत नारायणगड होता. महादेवगडावर पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटीशांनी तो उद्‌ध्वस्त केला. नारायणगड हा मोठा किल्ला नव्हता. कोकणातून घाट चढून वर आल्यावर जकातीचे मेट याच किल्ल्याच्या ठिकाणी होते. हे देवाचे स्थळ म्हणून जास्त परिचित होते.  कुडाळ तालुक्‍यातील सोनवडे गावाच्या डोंगरात विसावलेला नरसिंहगड हाही फोंड सावंत त्यांनीच बांधला. हा किल्ला पुढे सावंतवाडीकर आणि कोल्हापूरकर यांच्या संघर्षाचे केंद्रही बनला. त्यांनी बांधलेल्या इतर किल्ल्यात कसाल-ओवळीये येथील सिदगड या गिरी दुर्गाचा समावेश आहे. सैन्यासाठी विश्रांती आणि सुरक्षित स्थळ म्हणून याची उभारणी झाली. हा किल्लाही पुढे ब्रिटीशांनी उद्‌ध्वस्त केला. मसुरे येथे कालावल खाडीच्या किनाऱ्यावर त्या फोंड सावंत दुसरे यांनीच भरतगड उभारला. 150 मीटर लांब, 30 मीटर रूंदीचा बुलंद बालेकिल्ला, त्याला 2 मीटर रूंद आणि चार मीटर उंचीचा चिरेबंदी तट, प्रशस्त बुरूज अशी त्याची रचना होती. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी येथे किल्ला उभारायचा प्रयत्न केला होता; पण पाण्याची उपलब्धता नसल्याने त्यांनी तो विचार सोडला होता. फोंड सावंत दुसरे यांनी आधी विहीर खोदून मग याची उभारणी केली. 6 एकर क्षेत्रातील हा किल्ला पुढे बऱ्याच राजकीय हालचालींचे केंद्र बनला. हळर्ण येथेही फोंड सावंत दुसरे यांनी किल्ला उभारला. पुढे तो पोर्तुगिज व सावंतवाडीकरांच्या एका मोठ्या लढाईचा साक्षीदार बनला.  असा होता राजपरिवार  फोंड सावंत दुसरे यांचे 2 जानेवारी 1738 ला निधन झाले. त्यांचा परिवार मोठा होता. त्यांना सहा पत्नी होत्या. त्यांना 11 मुलगे आणि 6 मुली मिळून 17 अपत्य होती. त्यांच्या ज्येष्ठ पत्नी लक्ष्मीबाई या तांबुळकर सावंत घराण्यातील. त्यांना नारोबा सावंत हा मुलगा आणि अंबुबाई व गोदुबाई या मुली होत्या. दुसऱ्या पत्नी सावित्री या बुधकर घाटगे यांच्या कन्या. त्यांना नाग सावंत, लखम सावंत व खेम सावंत असे तीन मुलगे होते. तिसऱ्या पत्नी रूक्‍मीणी या निंबाळकर घराण्यातील. त्यांना जयराम सावंत हे पुत्र आणि कृष्णाबाई व राजसबाई या दोन मुली होत्या. चौथ्या पत्नी पार्वती या खोडुलकर घराण्यातील. त्यांना गंगा व आनंदी अशा दोन मुली होत्या. पाचव्या पत्नी तारा यांना रघुनाथ सावंत, सोम सावंत, शिवराम सावंत व आत्माराम सावंत असे चार मुलगे होते. सहाव्या पत्नी अहिल्या या पिसाळ घराण्यातील. त्यांना श्रीराम सावंत व कृष्ण सावंत असे दोन मुलगे होते. या सगळ्या अपत्यामध्ये नार सावंत, नाग सावंत, जयराम सावंत आणि सोमसावंत हे आपल्या कर्तृत्वामुळे विशेष प्रसिद्ध होते.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fDEtM4

No comments:

Post a Comment