सिंधुदुर्गात सक्रिय कोरोनाग्रस्त हजाराच्या पार  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 197 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या एक हजार 173 झाली आहे. यात तब्बल 37 रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 27 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधित संख्या आठ हजारच्या पुढे गेली आहे.  गेल्या पाच महिन्यांनंतर जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात 197 एवढे उच्चांकी रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे एकूण बाधित संख्येने आठ हजारी संख्या पार केली आहे. 8 हजार 184 अशी एकूण बाधित संख्या आहे. तर आणखी 27 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त संख्या 6 हजार 782 झाली आहे. 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी 1 हजार 173 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत असलेले रुग्ण वगळता सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.  1173 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 37 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 30 रुग्ण ऑक्‍सिजनवर तर सात रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर. टेस्टमध्ये 49 हजार 579 नमुने तपासण्यात आले. यातील 5 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 1233 नमुने घेण्यात आले. ऍन्टिजेन टेस्टमध्ये एकूण 31 हजार 926 नमुने तपासले. पैकी 2 हजार 717 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 321 नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 81 हजार 505 नमुने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 750 (15), दोडामार्ग 419 (5), कणकवली 2330 (50), कुडाळ 1767 (36), मालवण 816 (21), सावंतवाडी 1072 (44), वैभववाडी 317 (14), वेंगुर्ले 665 (10). जिल्ह्याबाहेरील रुग्ण 48 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड - 218, दोडामार्ग - 45, कणकवली - 208, कुडाळ - 230, मालवण - 149, सावंतवाडी - 126, वैभववाडी - 96, वेंगुर्ले- 85 व जिल्ह्याबाहेरील 16.  तीन तालुक्‍यांत 200 च्यावर रुग्ण सक्रिय  देवगड, कणकवली, कुडाळ या तीन तालुक्‍यांत 200 च्या वर रुग्ण सक्रिय आहेत. मालवण, सावंतवाडी या दोन तालुक्‍यांत 100 च्या वर रुग्ण उपचाराखाली आहेत.  ई-संजीवनीचा लाभ घ्यावा  जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारावर सल्लामसलत करता यावी यासाठी ई-संजीवनी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सध्या 95 लोकांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 11, 2021

सिंधुदुर्गात सक्रिय कोरोनाग्रस्त हजाराच्या पार  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 197 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या एक हजार 173 झाली आहे. यात तब्बल 37 रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 27 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधित संख्या आठ हजारच्या पुढे गेली आहे.  गेल्या पाच महिन्यांनंतर जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात 197 एवढे उच्चांकी रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे एकूण बाधित संख्येने आठ हजारी संख्या पार केली आहे. 8 हजार 184 अशी एकूण बाधित संख्या आहे. तर आणखी 27 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त संख्या 6 हजार 782 झाली आहे. 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी 1 हजार 173 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत असलेले रुग्ण वगळता सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.  1173 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 37 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 30 रुग्ण ऑक्‍सिजनवर तर सात रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर. टेस्टमध्ये 49 हजार 579 नमुने तपासण्यात आले. यातील 5 हजार 626 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 1233 नमुने घेण्यात आले. ऍन्टिजेन टेस्टमध्ये एकूण 31 हजार 926 नमुने तपासले. पैकी 2 हजार 717 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 321 नमुने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 81 हजार 505 नमुने तपासण्यात आले.  तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 750 (15), दोडामार्ग 419 (5), कणकवली 2330 (50), कुडाळ 1767 (36), मालवण 816 (21), सावंतवाडी 1072 (44), वैभववाडी 317 (14), वेंगुर्ले 665 (10). जिल्ह्याबाहेरील रुग्ण 48 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड - 218, दोडामार्ग - 45, कणकवली - 208, कुडाळ - 230, मालवण - 149, सावंतवाडी - 126, वैभववाडी - 96, वेंगुर्ले- 85 व जिल्ह्याबाहेरील 16.  तीन तालुक्‍यांत 200 च्यावर रुग्ण सक्रिय  देवगड, कणकवली, कुडाळ या तीन तालुक्‍यांत 200 च्या वर रुग्ण सक्रिय आहेत. मालवण, सावंतवाडी या दोन तालुक्‍यांत 100 च्या वर रुग्ण उपचाराखाली आहेत.  ई-संजीवनीचा लाभ घ्यावा  जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारावर सल्लामसलत करता यावी यासाठी ई-संजीवनी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सध्या 95 लोकांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PV48W3

No comments:

Post a Comment