रोपळे परिसरात फळबागा जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यासह गारांची बरसात; जनजीवनही झाले विस्कळित रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात मंगळवारी जोराच्या वादळासह गारांची बरसात झाली. या पावसात फळबागा जमीनदोस्त झाल्या असून जनजीवन विस्कळित झाले आहे.  रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व बार्डी या भागात मंगळवारी (ता. 12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येताच जोराचे वादळही सुरू झाले. या वादळातच मुसळधार पावसाला सुरवात होताच गारांची बरसातही झाली. वादळ आणि गारांच्या माऱ्यात द्राक्ष, आंबा, केळी, निंबोणी व पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात फेरफटका मारला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या फळांवरील व हार्वेस्टिंग झालेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. शेडमधील बेदाणा या पावसात भिजून गेला आहे. आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्यांची गळ झाली होती. लिंबूच्या बागांमधील झाडे उन्मळून पडली तर अपरिपक्व लिंबाची मोठी गळही झाली. केळीच्या बागा तर उभ्या दिसतच नव्हत्या. मका व इतर चारा पिके जमीनदोस्त व्हायला जराही वेळ लागला नाही. पपईच्या बागेतील झाडे या गारपिटीत भुंडीच झाली आहेत. या वेळी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी, आमच्या शेतात आता बघण्यासारखं काही राहिलंच नसल्याचे सांगितले.  गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतमाल कवडीमोल किमतीने विकावा लागला तर यंदा हार्वेस्टिंगला आलेल्या बागाच जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बांधावरील व रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. रोपळे ते भोसे मार्गावरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे हा रस्ता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंदच होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागली. पिठाच्या गिरण्याही बंदच असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  जोराच्या वादळात गारांचा पाऊस पडल्यामुळे आमच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.  - महेश गणगे,  शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर  आमच्या निंबोणीच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी.  - नागनाथ माळी,  शेतकरी, रोपळे बुद्रूक  आमच्या डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर केशर आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांची गळ झाली आहे. कैऱ्या खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  - भारत रानरुई,  आढीव, ता. पंढरपूर  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

रोपळे परिसरात फळबागा जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यासह गारांची बरसात; जनजीवनही झाले विस्कळित रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) व परिसरात मंगळवारी जोराच्या वादळासह गारांची बरसात झाली. या पावसात फळबागा जमीनदोस्त झाल्या असून जनजीवन विस्कळित झाले आहे.  रोपळे व परिसरातील मेंढापूर, खरातवाडी, पांढरेवाडी, चिलाईवाडी व बार्डी या भागात मंगळवारी (ता. 12) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येताच जोराचे वादळही सुरू झाले. या वादळातच मुसळधार पावसाला सुरवात होताच गारांची बरसातही झाली. वादळ आणि गारांच्या माऱ्यात द्राक्ष, आंबा, केळी, निंबोणी व पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात फेरफटका मारला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या फळांवरील व हार्वेस्टिंग झालेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. शेडमधील बेदाणा या पावसात भिजून गेला आहे. आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्यांची गळ झाली होती. लिंबूच्या बागांमधील झाडे उन्मळून पडली तर अपरिपक्व लिंबाची मोठी गळही झाली. केळीच्या बागा तर उभ्या दिसतच नव्हत्या. मका व इतर चारा पिके जमीनदोस्त व्हायला जराही वेळ लागला नाही. पपईच्या बागेतील झाडे या गारपिटीत भुंडीच झाली आहेत. या वेळी शेतकरी बाळासाहेब पवार यांनी, आमच्या शेतात आता बघण्यासारखं काही राहिलंच नसल्याचे सांगितले.  गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतमाल कवडीमोल किमतीने विकावा लागला तर यंदा हार्वेस्टिंगला आलेल्या बागाच जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बांधावरील व रस्त्यांच्या कडेची मोठी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. रोपळे ते भोसे मार्गावरील मोठी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे हा रस्ता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बंदच होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागली. पिठाच्या गिरण्याही बंदच असल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  जोराच्या वादळात गारांचा पाऊस पडल्यामुळे आमच्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.  - महेश गणगे,  शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर  आमच्या निंबोणीच्या बागेतील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत द्यावी.  - नागनाथ माळी,  शेतकरी, रोपळे बुद्रूक  आमच्या डाळिंबाच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर केशर आंब्याच्या झाडांवरील कैऱ्यांची गळ झाली आहे. कैऱ्या खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.  - भारत रानरुई,  आढीव, ता. पंढरपूर  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tiE4CD

No comments:

Post a Comment