सासरी असलेल्या मुलीची भेट ठरली शेवटची, दुचाकीहून खाली पडून गंभीर जखमी झाल्याने आईचा मृत्यू भोकरदन (जि.जालना) : सासरी असलेल्या मुलीला भेटून पुन्हा आपल्या घरी मुलासह दुचाकीने परतत असताना दुचाकीहून खाली पडल्याने झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.सात) दुपारी तीन वाजेच्या सुमारास भोकरदन-हसनाबाद मुख्य रस्त्यावरील सिरसगाव मंडप पाटीजवळ घडली. शांताबाई जनार्दन दळवी (वय ५८) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या मनापूर येथील शांताबाई दळवी या त्यांचा मुलगा अमोल याच्यासह दुचाकीने तालुक्यातील लतीफपूर येथे त्यांच्या मुलीच्या घरी भेटीसाठी गेल्या होत्या. औरंगाबादसह जिल्ह्यात ११ मार्चपासून अंशतः लाॅकडाऊन; फक्त रजिस्टर मॅरेजला परवानगी, शनिवार व रविवार कडकडीत बंद रविवारी त्या घरी परतत असताना सिरसगाव मंडप पाटीजवळ रस्त्यावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यामुळे शांताबाई या दुचाकीहून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर रात्री आठ वाजता मनापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, भोकरदन पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 7, 2021

सासरी असलेल्या मुलीची भेट ठरली शेवटची, दुचाकीहून खाली पडून गंभीर जखमी झाल्याने आईचा मृत्यू भोकरदन (जि.जालना) : सासरी असलेल्या मुलीला भेटून पुन्हा आपल्या घरी मुलासह दुचाकीने परतत असताना दुचाकीहून खाली पडल्याने झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.सात) दुपारी तीन वाजेच्या सुमारास भोकरदन-हसनाबाद मुख्य रस्त्यावरील सिरसगाव मंडप पाटीजवळ घडली. शांताबाई जनार्दन दळवी (वय ५८) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या मनापूर येथील शांताबाई दळवी या त्यांचा मुलगा अमोल याच्यासह दुचाकीने तालुक्यातील लतीफपूर येथे त्यांच्या मुलीच्या घरी भेटीसाठी गेल्या होत्या. औरंगाबादसह जिल्ह्यात ११ मार्चपासून अंशतः लाॅकडाऊन; फक्त रजिस्टर मॅरेजला परवानगी, शनिवार व रविवार कडकडीत बंद रविवारी त्या घरी परतत असताना सिरसगाव मंडप पाटीजवळ रस्त्यावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यामुळे शांताबाई या दुचाकीहून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर रात्री आठ वाजता मनापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, भोकरदन पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.   संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3qthiFU

No comments:

Post a Comment