फ्राईंग तेलाचा पुनर्वापर ठरु शकतो घातक! 'हे' आहेत परिणाम नाशिक : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्व असल्याने अनेक घरात तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते. पण एकदा वापरुन झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आपल्या आरोग्याला घातक ठरु शकते. ​तेलाच्या पुनर्वापराने होऊ शकतो कॅन्सर तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर, अशा तेलात फ्रि रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तसेच एकदा वापरुन झालेले तेल पुनःपुन्हा वापरल्याने अॅथेरोस्कॉलरोसिस होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात. हे आहेत परिणाम एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर अॅसिडीटी तसेच ह्रदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ या सारख्या समस्या उद्भवू शकतात. तेल किती वेळा वापरणे योग्य डीप फ्रायसाठी एकदा वापरलेले तेल खरेतर पुन्हा वापरु नये. पण काही पदार्थात आपण ते वापरु शकतो. परंतू हा वापर ते तेल कोणत्या प्रकारचे आहे, ते डीप फ्राय साठी वापरले आहे कि हलक्या तळणासाठी वापरले आहे आणि ते तेल आता कोणत्या पदार्थात वापरले जाणार आहे यावर अवलंबून आहे. दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी काय कराल जेवण बनवल्यानंतर तेल थंड होऊ द्या त्यानंतर ते एका हवाबंद डब्यात गाळून भरा. यामुळे त्यातील अन्न कण निघून जातील. जेव्हा तुम्ही हे तेल पुन्हा वापरणार असाल त्यावेळी त्याचा रंग आणि दाटपणा तपासा, जर ते गडद आणि अति दाट झाले असेल तर असे तेल वापरु नका. तसेच जर हे तेल गरम केल्यावर त्यातून धूर निघत असेल तर असे तेल न वापरणेच योग्य ठरेल. जेवणासाठी वापरा हे तेल प्रत्येक तेल हे एकमेकांपेक्षा वेगळे असते. काहींमध्ये स्मोकिंग पॉइंट जास्त असतो तर काहींमध्ये कमी. काही प्रकरचे तेल गरम केल्यावर खूप धूर निघतो पण काही तेलांतून अजिबात धूर निघत नाही. जसे की, सनफ्लॉअर ऑईल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल. ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे अशा तेलाचा वापर तळणासाठी करु नये. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

फ्राईंग तेलाचा पुनर्वापर ठरु शकतो घातक! 'हे' आहेत परिणाम नाशिक : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्व असल्याने अनेक घरात तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते. पण एकदा वापरुन झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आपल्या आरोग्याला घातक ठरु शकते. ​तेलाच्या पुनर्वापराने होऊ शकतो कॅन्सर तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर, अशा तेलात फ्रि रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तसेच एकदा वापरुन झालेले तेल पुनःपुन्हा वापरल्याने अॅथेरोस्कॉलरोसिस होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात. हे आहेत परिणाम एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर अॅसिडीटी तसेच ह्रदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ या सारख्या समस्या उद्भवू शकतात. तेल किती वेळा वापरणे योग्य डीप फ्रायसाठी एकदा वापरलेले तेल खरेतर पुन्हा वापरु नये. पण काही पदार्थात आपण ते वापरु शकतो. परंतू हा वापर ते तेल कोणत्या प्रकारचे आहे, ते डीप फ्राय साठी वापरले आहे कि हलक्या तळणासाठी वापरले आहे आणि ते तेल आता कोणत्या पदार्थात वापरले जाणार आहे यावर अवलंबून आहे. दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी काय कराल जेवण बनवल्यानंतर तेल थंड होऊ द्या त्यानंतर ते एका हवाबंद डब्यात गाळून भरा. यामुळे त्यातील अन्न कण निघून जातील. जेव्हा तुम्ही हे तेल पुन्हा वापरणार असाल त्यावेळी त्याचा रंग आणि दाटपणा तपासा, जर ते गडद आणि अति दाट झाले असेल तर असे तेल वापरु नका. तसेच जर हे तेल गरम केल्यावर त्यातून धूर निघत असेल तर असे तेल न वापरणेच योग्य ठरेल. जेवणासाठी वापरा हे तेल प्रत्येक तेल हे एकमेकांपेक्षा वेगळे असते. काहींमध्ये स्मोकिंग पॉइंट जास्त असतो तर काहींमध्ये कमी. काही प्रकरचे तेल गरम केल्यावर खूप धूर निघतो पण काही तेलांतून अजिबात धूर निघत नाही. जसे की, सनफ्लॉअर ऑईल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल. ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे अशा तेलाचा वापर तळणासाठी करु नये. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2MPpvGI

No comments:

Post a Comment