गुगल 'डूडल' सुरू होण्यामागची रंजक कथा माहितीये का? 'असे' बघा जुने डूडल्स नागपूर : गूगल हे जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे मुखपृष्ठ आहे. त्यावर डूडल हे असे साधन आहे ज्याद्वारे जागतिक समस्या, ऐतिहासिक घटना आणि जगभरातील उत्सव हायलाइट करण्यासाठी वापरले जाते. सर्च बॉक्सच्या वर आपल्याला गुगलचा लोगो दिसत असतो. मात्र, काहीतरी विशेष असेल त्यादिवशी त्यामध्ये कोणाचा फोटो, काही डिझाईन असलेला लोगो आपल्याला दिसतो.  त्यालाच डूडल म्हणतो. आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत असते. आपल्याला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती मिळावी, हाच गुगलचा डूडल तयार करण्याचा उद्देश आहे. मात्र, या गुगल डूडलची सुरुवात कशी झाली माहिती आहे का? हेही वाचा - मार्च महिन्यातच पारा वरचढ, कूलरही निघाले बाहेर; जलवाहिनी नसलेल्या भागात वाढतेय समस्या 'डूडल'मागची रंजक कथा - डूडल्स सुरू झाले त्यामागची कथा फारच रंजक आहे. गुगलचे संस्थापक लॅरी आणि सर्जी हे दोघेही १९९८ मध्ये नेवाडा येथील 'बर्निंग मेन' या उत्सवामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी GOOGLE मधले दुसऱ्या 'O' च्या मागे एक स्टीकसारखे चित्र काढले. त्याद्वारे संस्थापक 'आऊट ऑफ द ऑफिस' असं दर्शविण्यात आलं. हा लोगो 'बर्निंग मॅन'च्या चित्रासारखाच दिसत होता. हे डूडल फारसे चांगले नव्हते. मात्र, यानिमित्ताने ही संकल्पना मांडली गेली होती. तिथूनच गुगल डूडलची प्रगती होत गेली.  त्यानंतर डेनिस व्हँग याला 'बेस्टील डे'साठी डूडल बनविण्यास सांगितले.  ते डूडल चांगलेच गाजले होते. त्यानंतर कंपनीने डेनिसला डूडलसाठी प्रभारी म्हणून नेमले. त्यानंतर गुगलच्या मुखपृष्ठावर विशिष्ट दिवशी अनेक डूडल झळकू लागले असून ते तयार करणाऱ्यांना प्रतिभासंपन्न लोकांना डूडलर म्हणतात.  सुरुवातीच्या काळात गुगल डूडल हे क्वचितच बदलायचे. मात्र, आता क्रिकेट असेल किंवा कोणत्या महान व्यक्तीचा वाढदिवस, त्यावेळी गुगलचे डूडल बदलत असते. डूडलचा विषय बऱ्याचदा जागतिक घटनांवर अवलंबून असतो. जसे की, एप्रिल २०२० मध्ये कोरोनाची महामारी आली. त्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांचा सन्मान म्हणून गुगलने तब्बल दोन आठवडे डूडलद्वारे त्या कामगारांचा सन्मान केला. यामध्ये आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि अन्नपुरवठा करणाऱ्या कामगारांचा समावेश होता. एखादी जागतिक सुट्टी असेल किंवा स्थानिक त्यानुसारही गुगल डूडल प्रकाशित करत असते. त्याद्वारे त्या दिवसाचे महत्व सांगितले जाते.  हेही वाचा - ब्लूटूथ-मायक्रोफोन वापरून दिली परीक्षा अन् मुन्नाभाई आला टॉपर, एका पेपरसाठी घ्यायचा ४ लाख आजचे डूडल उद्या पाहता येतात का?- गुगलच्या मुखपृष्ठावर डूडल बघण्यात वेगळीच मजा असते. मात्र, तुमच्याजवळ संगणक किंवा लॅपटाप नसेल तर तुम्ही डूडल पाहू शकत नाही. मग अशावेळी हे न पाहता आलेले डूडल कसे शोधायचे? असा प्रश्न तुम्हाला पडतच असेल. त्यासाठी गुगलकडे ऐतिहासिक संग्रह असतो.  google.com/doodles या संकेतस्थळावर गुगलच्या मुखपृष्ठावर झळकलेले प्रत्येक डूडल तुम्हाला सापडले. एखाद्या स्थानिक जागेपुरते डूडल तयार केले असेल, ते देखील डूडल तुम्हाला या यादीमध्ये दिसेल.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

गुगल 'डूडल' सुरू होण्यामागची रंजक कथा माहितीये का? 'असे' बघा जुने डूडल्स नागपूर : गूगल हे जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे मुखपृष्ठ आहे. त्यावर डूडल हे असे साधन आहे ज्याद्वारे जागतिक समस्या, ऐतिहासिक घटना आणि जगभरातील उत्सव हायलाइट करण्यासाठी वापरले जाते. सर्च बॉक्सच्या वर आपल्याला गुगलचा लोगो दिसत असतो. मात्र, काहीतरी विशेष असेल त्यादिवशी त्यामध्ये कोणाचा फोटो, काही डिझाईन असलेला लोगो आपल्याला दिसतो.  त्यालाच डूडल म्हणतो. आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत असते. आपल्याला नवनवीन गोष्टींबद्दल माहिती मिळावी, हाच गुगलचा डूडल तयार करण्याचा उद्देश आहे. मात्र, या गुगल डूडलची सुरुवात कशी झाली माहिती आहे का? हेही वाचा - मार्च महिन्यातच पारा वरचढ, कूलरही निघाले बाहेर; जलवाहिनी नसलेल्या भागात वाढतेय समस्या 'डूडल'मागची रंजक कथा - डूडल्स सुरू झाले त्यामागची कथा फारच रंजक आहे. गुगलचे संस्थापक लॅरी आणि सर्जी हे दोघेही १९९८ मध्ये नेवाडा येथील 'बर्निंग मेन' या उत्सवामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी GOOGLE मधले दुसऱ्या 'O' च्या मागे एक स्टीकसारखे चित्र काढले. त्याद्वारे संस्थापक 'आऊट ऑफ द ऑफिस' असं दर्शविण्यात आलं. हा लोगो 'बर्निंग मॅन'च्या चित्रासारखाच दिसत होता. हे डूडल फारसे चांगले नव्हते. मात्र, यानिमित्ताने ही संकल्पना मांडली गेली होती. तिथूनच गुगल डूडलची प्रगती होत गेली.  त्यानंतर डेनिस व्हँग याला 'बेस्टील डे'साठी डूडल बनविण्यास सांगितले.  ते डूडल चांगलेच गाजले होते. त्यानंतर कंपनीने डेनिसला डूडलसाठी प्रभारी म्हणून नेमले. त्यानंतर गुगलच्या मुखपृष्ठावर विशिष्ट दिवशी अनेक डूडल झळकू लागले असून ते तयार करणाऱ्यांना प्रतिभासंपन्न लोकांना डूडलर म्हणतात.  सुरुवातीच्या काळात गुगल डूडल हे क्वचितच बदलायचे. मात्र, आता क्रिकेट असेल किंवा कोणत्या महान व्यक्तीचा वाढदिवस, त्यावेळी गुगलचे डूडल बदलत असते. डूडलचा विषय बऱ्याचदा जागतिक घटनांवर अवलंबून असतो. जसे की, एप्रिल २०२० मध्ये कोरोनाची महामारी आली. त्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांचा सन्मान म्हणून गुगलने तब्बल दोन आठवडे डूडलद्वारे त्या कामगारांचा सन्मान केला. यामध्ये आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि अन्नपुरवठा करणाऱ्या कामगारांचा समावेश होता. एखादी जागतिक सुट्टी असेल किंवा स्थानिक त्यानुसारही गुगल डूडल प्रकाशित करत असते. त्याद्वारे त्या दिवसाचे महत्व सांगितले जाते.  हेही वाचा - ब्लूटूथ-मायक्रोफोन वापरून दिली परीक्षा अन् मुन्नाभाई आला टॉपर, एका पेपरसाठी घ्यायचा ४ लाख आजचे डूडल उद्या पाहता येतात का?- गुगलच्या मुखपृष्ठावर डूडल बघण्यात वेगळीच मजा असते. मात्र, तुमच्याजवळ संगणक किंवा लॅपटाप नसेल तर तुम्ही डूडल पाहू शकत नाही. मग अशावेळी हे न पाहता आलेले डूडल कसे शोधायचे? असा प्रश्न तुम्हाला पडतच असेल. त्यासाठी गुगलकडे ऐतिहासिक संग्रह असतो.  google.com/doodles या संकेतस्थळावर गुगलच्या मुखपृष्ठावर झळकलेले प्रत्येक डूडल तुम्हाला सापडले. एखाद्या स्थानिक जागेपुरते डूडल तयार केले असेल, ते देखील डूडल तुम्हाला या यादीमध्ये दिसेल.    Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sUPZWQ

No comments:

Post a Comment