पुण्यात कोरोनाच्या साथीत कर्करोग रुग्णांची उपचाराअभावी होतेय गैरसोय पुणे - आधी अभिप्राय, निधी, त्यानंतर जागा शोधण्यावरून रेंगाळलेल्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल दोन वर्षानंतरही कागदोपत्रीच राहिले आहे. कोरोनाच्या साथीत या आजाराच्या रुग्णांची उपचाराअभावी गैरसोय झाली. या आजाराच्या रुग्णांसाठी महापालिकेने सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासगीकरण न करता महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत स्वतंत्र हॉस्पिटल चालविण्याचे नियोजन सप्टेंबर २०१८ मध्ये झाले आणि तसा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने तेव्हा मंजूर केला. परिणामी, या आजाराच्या रुग्णांना खऱ्याअर्थाने दिलासा मिळण्याची आशा होती. त्यानंतर मात्र, गेल्या दोन वर्षांत या हॉस्पिटलच्या उभारणीची घोषणा करीत, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, त्यावरील कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कर्करोगाच्या रुग्णांना उपचाराकरिता शहरी गरीब योजनेंतर्गंत दोन लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, उपचार आणि त्यावरील खर्च लक्षात घेता, स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचा अभिप्राय महापालिका प्रशासनाने दिला. त्यानंतर शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या मिळकतीमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या तत्कालीन अध्यक्ष राजश्री नवले यांनी जाहीर केले होते. मात्र, आता अन्य दोन ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू करता येईल का, याची महापालिका चाचपणी करीत आहे. पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय खासगीकरणातून राबविण्याचा आग्रह शहरात फुटकळ कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असताना कर्करोगाच्या रुग्णांसाठीचे हॉस्पिटल मात्र, सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) किंवा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. योजना जाहीर होताच, ती खासगीकरणातून राबविण्याचा आग्रह पदाधिकारी आणि प्रशासनातील काही अधिकारी करीत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी कर्करोगाच्या रुग्णांची संख्या पाहता, त्यावरील उपचारासाठी हे हॉस्पिटल आवश्‍यक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. ती पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल.  - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका या हॉस्पिटलच्या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना अल्पदरात उपचार देण्याची व्यवस्था होणार आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेल्या तरतुदीतून हे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. पुढील काही महिन्यांत कायदेशीर बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल.  - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

पुण्यात कोरोनाच्या साथीत कर्करोग रुग्णांची उपचाराअभावी होतेय गैरसोय पुणे - आधी अभिप्राय, निधी, त्यानंतर जागा शोधण्यावरून रेंगाळलेल्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल दोन वर्षानंतरही कागदोपत्रीच राहिले आहे. कोरोनाच्या साथीत या आजाराच्या रुग्णांची उपचाराअभावी गैरसोय झाली. या आजाराच्या रुग्णांसाठी महापालिकेने सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासगीकरण न करता महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत स्वतंत्र हॉस्पिटल चालविण्याचे नियोजन सप्टेंबर २०१८ मध्ये झाले आणि तसा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने तेव्हा मंजूर केला. परिणामी, या आजाराच्या रुग्णांना खऱ्याअर्थाने दिलासा मिळण्याची आशा होती. त्यानंतर मात्र, गेल्या दोन वर्षांत या हॉस्पिटलच्या उभारणीची घोषणा करीत, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, त्यावरील कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कर्करोगाच्या रुग्णांना उपचाराकरिता शहरी गरीब योजनेंतर्गंत दोन लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, उपचार आणि त्यावरील खर्च लक्षात घेता, स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचा अभिप्राय महापालिका प्रशासनाने दिला. त्यानंतर शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या मिळकतीमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या तत्कालीन अध्यक्ष राजश्री नवले यांनी जाहीर केले होते. मात्र, आता अन्य दोन ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू करता येईल का, याची महापालिका चाचपणी करीत आहे. पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय खासगीकरणातून राबविण्याचा आग्रह शहरात फुटकळ कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असताना कर्करोगाच्या रुग्णांसाठीचे हॉस्पिटल मात्र, सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) किंवा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. योजना जाहीर होताच, ती खासगीकरणातून राबविण्याचा आग्रह पदाधिकारी आणि प्रशासनातील काही अधिकारी करीत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी कर्करोगाच्या रुग्णांची संख्या पाहता, त्यावरील उपचारासाठी हे हॉस्पिटल आवश्‍यक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. ती पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल.  - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका या हॉस्पिटलच्या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना अल्पदरात उपचार देण्याची व्यवस्था होणार आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेल्या तरतुदीतून हे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. पुढील काही महिन्यांत कायदेशीर बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल.  - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s104RZ

No comments:

Post a Comment