कोरोना काळातही तातडीच्या शस्रक्रियांना डॉक्टरांकडून प्राधान्य पिंपरी - ‘कोरोना आहे म्हणून अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबविलेले नाहीत. तातडीच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये ह्रदयरुग्ण, अपघातातील व्यक्ती, अपघातात जखमी, जिवाला धोका असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,’’ हे शब्द आहेत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे. असाच अनुभव निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही सांगितला. शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलेले असते. मास्क, फेसशिल्ड, ग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने दिलेली असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेच आहे. मात्र, इतर रुग्णांचे काय? याबाबत महापालिकेच्या वायसीएम व शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी कोरोना बरोबरच तातडीच्या वैद्यकीय सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले.  कोरोना नसलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था बघायला मिळाली. शस्रक्रियेसाठीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व बेडची व्यवस्था आहे. दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व कोरोना संसर्ग झालेले रुग्ण यांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्याचे चित्र दिसले. मात्र, तातडीने शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात असताना नेत्र, आर्थो, कॉस्मेटिक व हेअरिंग अशा स्वरुपातील शस्रक्रिया पुढे ढकलता येतात. देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार शस्त्रक्रियेपूर्वी काय करावे कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे रुग्णांनी इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तसे केल्यास तो आजार अधिक वाढण्याची शक्यता असते  शस्त्रक्रिया करण्याचा अथवा इतर आजारांसाठी उपचार करण्याविषयीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यास रुग्णांनी त्यानुसार निर्णय घ्यावा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन ते पाच दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, सेल्फरिलेशन करावे. म्हणजेच, अन्य व्यक्तींपासून दूर राहावे स्वतः बरोबरच घरातील नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी करून घ्यावी काही वेळा कोणतेही लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे शस्रक्रियेसाठी तपासणी सुरक्षित ठरते  पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर शस्रक्रियेनंतर काय करावे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरही मास्क कायम वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे  फिजिओथेरपिस्ट घरी हवा असल्यास कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे  रुग्णाच्या हितासाठी घरातील नियमित भेटणाऱ्‍या व्यक्ती वा बाहेरील नातेवाइकांनी रुग्णास भेटणे टाळावे डॉक्टरांनी दिलेली औषधे व सांगितलेल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून सल्ला घ्यावा. ह्रदयाशी संबंधित विकार, गंभीर मार लागलेले, शस्रामुळे जखमी,  जिवाला धोका असलेले, अपघातात गंभीर दुखापत झालेले अशा रुग्णांवर तातडीने शस्रक्रिया केल्या जात आहेत. कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाऊ शकणार नाहीत, अशा शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे. जिवाचा धोका टाळणे महत्त्वाचे आहे.  - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर डिस्चार्ज प्रक्रिया करण्यात येते. गेल्या वर्षभरात आम्ही पाचशेपेक्षा अधिक रुग्णांवर शस्रक्रिया केलेल्या आहेत.  - डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 30, 2021

कोरोना काळातही तातडीच्या शस्रक्रियांना डॉक्टरांकडून प्राधान्य पिंपरी - ‘कोरोना आहे म्हणून अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार थांबविलेले नाहीत. तातडीच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये ह्रदयरुग्ण, अपघातातील व्यक्ती, अपघातात जखमी, जिवाला धोका असलेल्या रुग्णांचा समावेश आहे,’’ हे शब्द आहेत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे. असाच अनुभव निगडीतील लोकमान्य रुग्णालयाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनीही सांगितला. शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केलेले असते. मास्क, फेसशिल्ड, ग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने दिलेली असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेच आहे. मात्र, इतर रुग्णांचे काय? याबाबत महापालिकेच्या वायसीएम व शहरातील काही खासगी रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी कोरोना बरोबरच तातडीच्या वैद्यकीय सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे आढळले.  कोरोना नसलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था बघायला मिळाली. शस्रक्रियेसाठीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व बेडची व्यवस्था आहे. दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्ण व कोरोना संसर्ग झालेले रुग्ण यांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्याचे चित्र दिसले. मात्र, तातडीने शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात असताना नेत्र, आर्थो, कॉस्मेटिक व हेअरिंग अशा स्वरुपातील शस्रक्रिया पुढे ढकलता येतात. देहू - इंद्रायणी काठी तुकाराम महाराज बीज सोहळा पडला पार शस्त्रक्रियेपूर्वी काय करावे कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे रुग्णांनी इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तसे केल्यास तो आजार अधिक वाढण्याची शक्यता असते  शस्त्रक्रिया करण्याचा अथवा इतर आजारांसाठी उपचार करण्याविषयीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यास रुग्णांनी त्यानुसार निर्णय घ्यावा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन ते पाच दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये, सेल्फरिलेशन करावे. म्हणजेच, अन्य व्यक्तींपासून दूर राहावे स्वतः बरोबरच घरातील नियमित संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचीही कोरोना तपासणी करून घ्यावी काही वेळा कोणतेही लक्षणे नसतानाही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. त्यामुळे शस्रक्रियेसाठी तपासणी सुरक्षित ठरते  पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात १७५ बालगुन्हेगारांची भर शस्रक्रियेनंतर काय करावे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरही मास्क कायम वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे  फिजिओथेरपिस्ट घरी हवा असल्यास कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे  रुग्णाच्या हितासाठी घरातील नियमित भेटणाऱ्‍या व्यक्ती वा बाहेरील नातेवाइकांनी रुग्णास भेटणे टाळावे डॉक्टरांनी दिलेली औषधे व सांगितलेल्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून सल्ला घ्यावा. ह्रदयाशी संबंधित विकार, गंभीर मार लागलेले, शस्रामुळे जखमी,  जिवाला धोका असलेले, अपघातात गंभीर दुखापत झालेले अशा रुग्णांवर तातडीने शस्रक्रिया केल्या जात आहेत. कोणत्याही स्थितीत पुढे ढकलल्या जाऊ शकणार नाहीत, अशा शस्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे. जिवाचा धोका टाळणे महत्त्वाचे आहे.  - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम शस्रक्रियेसाठी रुग्ण दाखल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील सुधारणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर डिस्चार्ज प्रक्रिया करण्यात येते. गेल्या वर्षभरात आम्ही पाचशेपेक्षा अधिक रुग्णांवर शस्रक्रिया केलेल्या आहेत.  - डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Pp7RLb

No comments:

Post a Comment