परीक्षकांचं हसू की ‘हसं?’ विनोदी मालिकांमध्ये ‘लाफ्टर ट्रॅक्स’ असतात. म्हणजे विनोदी दृश्यं सुरू असताना हसण्याचेही आवाज येत असतात. या ट्रॅक्सची एक गंमत आहे. खूप वर्षांपूर्वी एका स्टुडिओमध्ये चित्रीत झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षक योग्य जागी हसत नसल्यामुळे वैतागलेल्या चार्ली डग्लस नावाच्या साऊंड इंजिनिअरनं ‘लाफ्टर ट्रॅक्स’ पहिल्यांदा आणले. प्रेक्षकांना योग्य जागी हसण्यासाठी दिशादर्शन म्हणा, किंवा समूहात बसून विनोदाचा आस्वाद घेतोय असा फील देणं हे त्यांचं काम. पूर्वीच्या बहुतांश विनोदी मालिकांमध्ये हे ट्रॅक्स असायचेच. हे ट्रॅक्स आता बंद होत असले, तरी विशेषतः कॉमेडी शोंसाठी मात्र एक अफलातून ट्रॅक शोधून काढण्यात आला आहे. हा ट्रॅक आहे परीक्षकांचा. शो स्पर्धात्मक असो किंवा नसो, स्पर्धकांना गुण देणं असो किंवा नसो- परीक्षक मात्र लागतातच! कॉमेडी शोंमधली स्पर्धात्मकता लुटुपुटूची असली, तरी परीक्षकांचा हा खास ट्रॅक आता अनिवार्य होऊन बसला आहे.  भारतात कॉमेडी शोंमधल्या परीक्षकांचं स्थान जास्त अधोरेखित केलं ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ नावाच्या ‘स्टँडअप कॉमेडी शो’नं. या शोमध्ये सुरुवातीला शेखर सुमन आणि नवज्योतसिंग सिद्दू हे परीक्षक होते. खरं तर सुरवातीला हे दोघंही योग्य पद्धतीनं हसायचे, प्रतिक्रिया व्यक्त करायचे. मग सिद्दू यांनी हसण्यात जोरकसपणा दाखवायला सुरवात केली आणि एवढंच नव्हे तर त्यांचं ‘ठोको ताली’ हे वाक्य आणि ‘समंदर झुक नही सकता लहरोंसे’ वगैरे प्रकारच्या खास प्रतिक्रिया स्पर्धकांपेक्षाही लोकप्रिय व्हायला लागल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मग हळूहळू शेखर सुमन यांचं हसणं त्यांच्यापुढे फिकं पडायला लागलं आणि सुमन या शोमधून बाहेरही पडले. एकीकडे हे सगळं चालू असताना त्याच वेळी ‘इंडियन आयडॉल’सारखा म्युझिक रिअॅलिटी शोही मूळ धरत होता आणि तिथंही फराह खान, अन्नू मलिक, सोनू निगम यांच्या कॉमेंट्स महत्त्वाच्या ठरत होत्या. यातूनच भारतात छोट्या पडद्यावर ‘परीक्षक पर्व’ सुरू झालंय ते आजतागायत. ‘मी छोट्या पडद्यावर येणार नाही’ असं म्हणणारे भलेभले कलाकार मग परीक्षक येण्यासाठी धडपडायला लागले. समोर बेंचवर बसून कॉमेंट्स करणं हे फार काही अवघड नव्हतं आणि त्याच वेळी ‘परीक्षक पर्वा’मुळे काही कलाकारांना मिळणारं मानधन कोटींची उड्डाणंही गाठणारं होतं हेही खरंच. कॉमेडी शोंमध्ये तर फार काहीच करायचं नाहीये. ‘हास्य क्लब’मधल्या हसण्याच्या प्रकारांमध्येही असणार नाही इतकं वैविध्य आणत हसत बसायचंय इतकंच.  कॉमेडी शोंमध्ये ‘लाफ्टर चॅलेंज’नं परीक्षकांचं महत्त्व वाढवलं आणि त्याला जास्त बळ दिलं ते ‘कॉमेडी सर्कस’नं. तिथं विशेषतः अर्चना पुरणसिंग यांनी सिद्दू यांच्या पुढची पायरी गाठली. त्यांचं मोठ्यांदा ‘हाहा’ करून हसणं इतकं लोकप्रिय झालं, की समोर कलाकार कोणीही असोत, अर्चना पुरणसिंग यांच्याशिवाय कार्यक्रम पुढे जाऊ शकत नव्हता. नंतर तर अर्चना पुरणसिंग यांच्या हसण्यावरच स्किट सादर व्हायला लागली, इतकं ते हसणं लोकप्रिय झालं. नंतर पुढे प्रादेशिक वाहिन्यांवरसुद्धा विनोदांवर आधारित शो सुरू झाले, तेव्हा सेलिब्रिटी परीक्षक हे ‘मस्ट’ असायचे हे जितकं खरं, तितकंच त्यांनी खूप मोठमोठ्यानं हसणं आणि प्रत्येक पंचच्या वेळी एखाद्या परीक्षकावर कॅमेरा असणंही ‘मस्ट’ झालं. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. मात्र, इतर रिअॅलिटी शोंमध्ये परीक्षक रडतात, स्टेजवर जाऊन स्पर्धकांना मिठ्या मारतात, काही तरी बक्षीस देतात, चिडतात, वस्तू फेकतात हे हल्ली जितकं प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही, तितकंच कॉमेडी शोंमधलं परीक्षकांचं अवाजवी आणि अतिशयोक्तीपूर्ण हसणंही पचनी पडत नाही. कुठल्याही सुजाण माणसाला ज्या विनोदावर हसू येत नाही त्यावर इतकं लोटपोट होऊन हसण्यासारखं काय असतं? स्पर्धकाच्या नुसत्या एंट्रीवरच इतकं खदाखदा हसण्यासारखं काय असतं? खरं तर खुद्द अर्चना पुरणसिंग यांनीच या प्रश्नाचं उत्तरही दिलंय. ‘‘मला पैसे मिळतात म्हणून मी हसते,’’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यांच्या या विधानात इतकं तथ्य आहे, की अर्चना पुरणसिंग यांनी अभिनयावर जितके पैसे मिळवले नसतील, त्याच्यापेक्षा कैक पटीनं दुसऱ्यांच्या विनोदावर हसून मिळवले असं या वर्तुळात गंमतीनं म्हटलं जातं. मात्र, परीक्षक अतिशयोक्तीपूर्ण हसतात, की ‘हसं’ करून घेतात असाही प्रश्न सुजाण प्रेक्षकांना पडलाय हेही तितकंच खरं.  परीक्षक स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी असतात हे आपण समजू शकतो; पण त्यांचं लोण आता इतकं वाढलंय, की कपिल शर्मानं ‘कॉमेडी सर्कस’नंतर त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ नावाचा स्वतंत्र शो सुरू केला, तेव्हाही त्यात समोर नवज्योतसिंग सिद्दू यांना ठेवलं. गंमत बघा, या शोमध्ये स्पर्धाच नाही. कपिलचाच शो आहे. इतर वेळी वेगवेगळ्या स्किटनंतर परीक्षक मांडतात तशी मतंही व्यक्त करायची नाहीत. फक्त कपिलच्या विनोदांवर हसत बसायचंय. म्हणजे हे किती ‘इनोदी’ प्रकरण आहे तुम्हीच बघा. सिद्दू यांची जागा सध्या अर्चना पुरणसिंग यांनी घेतली असली, तरी फक्त हसण्यासाठी एखाद्याला असं कार्यक्रमात घेणं ही गोष्ट ‘हसण्यावारीच’ न्यावी लागेल..  मात्र, एकूणच कॉमेडी शोंमध्ये परीक्षकांचा समावेश हे लाफ्टर ट्रॅक्सचंच नवं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र, ‘परीक्षकां’च्या हसण्यापेक्षा ‘प्रेक्षकां’च्या हसण्याचा विचार संबंधितांनी करायला काय हरकत आहे, असा प्रश्न विचारला तर केवळ ‘ठोको ताली’ एवढंच उत्तर येईल, हे मात्र खरं. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

परीक्षकांचं हसू की ‘हसं?’ विनोदी मालिकांमध्ये ‘लाफ्टर ट्रॅक्स’ असतात. म्हणजे विनोदी दृश्यं सुरू असताना हसण्याचेही आवाज येत असतात. या ट्रॅक्सची एक गंमत आहे. खूप वर्षांपूर्वी एका स्टुडिओमध्ये चित्रीत झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षक योग्य जागी हसत नसल्यामुळे वैतागलेल्या चार्ली डग्लस नावाच्या साऊंड इंजिनिअरनं ‘लाफ्टर ट्रॅक्स’ पहिल्यांदा आणले. प्रेक्षकांना योग्य जागी हसण्यासाठी दिशादर्शन म्हणा, किंवा समूहात बसून विनोदाचा आस्वाद घेतोय असा फील देणं हे त्यांचं काम. पूर्वीच्या बहुतांश विनोदी मालिकांमध्ये हे ट्रॅक्स असायचेच. हे ट्रॅक्स आता बंद होत असले, तरी विशेषतः कॉमेडी शोंसाठी मात्र एक अफलातून ट्रॅक शोधून काढण्यात आला आहे. हा ट्रॅक आहे परीक्षकांचा. शो स्पर्धात्मक असो किंवा नसो, स्पर्धकांना गुण देणं असो किंवा नसो- परीक्षक मात्र लागतातच! कॉमेडी शोंमधली स्पर्धात्मकता लुटुपुटूची असली, तरी परीक्षकांचा हा खास ट्रॅक आता अनिवार्य होऊन बसला आहे.  भारतात कॉमेडी शोंमधल्या परीक्षकांचं स्थान जास्त अधोरेखित केलं ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ नावाच्या ‘स्टँडअप कॉमेडी शो’नं. या शोमध्ये सुरुवातीला शेखर सुमन आणि नवज्योतसिंग सिद्दू हे परीक्षक होते. खरं तर सुरवातीला हे दोघंही योग्य पद्धतीनं हसायचे, प्रतिक्रिया व्यक्त करायचे. मग सिद्दू यांनी हसण्यात जोरकसपणा दाखवायला सुरवात केली आणि एवढंच नव्हे तर त्यांचं ‘ठोको ताली’ हे वाक्य आणि ‘समंदर झुक नही सकता लहरोंसे’ वगैरे प्रकारच्या खास प्रतिक्रिया स्पर्धकांपेक्षाही लोकप्रिय व्हायला लागल्या. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मग हळूहळू शेखर सुमन यांचं हसणं त्यांच्यापुढे फिकं पडायला लागलं आणि सुमन या शोमधून बाहेरही पडले. एकीकडे हे सगळं चालू असताना त्याच वेळी ‘इंडियन आयडॉल’सारखा म्युझिक रिअॅलिटी शोही मूळ धरत होता आणि तिथंही फराह खान, अन्नू मलिक, सोनू निगम यांच्या कॉमेंट्स महत्त्वाच्या ठरत होत्या. यातूनच भारतात छोट्या पडद्यावर ‘परीक्षक पर्व’ सुरू झालंय ते आजतागायत. ‘मी छोट्या पडद्यावर येणार नाही’ असं म्हणणारे भलेभले कलाकार मग परीक्षक येण्यासाठी धडपडायला लागले. समोर बेंचवर बसून कॉमेंट्स करणं हे फार काही अवघड नव्हतं आणि त्याच वेळी ‘परीक्षक पर्वा’मुळे काही कलाकारांना मिळणारं मानधन कोटींची उड्डाणंही गाठणारं होतं हेही खरंच. कॉमेडी शोंमध्ये तर फार काहीच करायचं नाहीये. ‘हास्य क्लब’मधल्या हसण्याच्या प्रकारांमध्येही असणार नाही इतकं वैविध्य आणत हसत बसायचंय इतकंच.  कॉमेडी शोंमध्ये ‘लाफ्टर चॅलेंज’नं परीक्षकांचं महत्त्व वाढवलं आणि त्याला जास्त बळ दिलं ते ‘कॉमेडी सर्कस’नं. तिथं विशेषतः अर्चना पुरणसिंग यांनी सिद्दू यांच्या पुढची पायरी गाठली. त्यांचं मोठ्यांदा ‘हाहा’ करून हसणं इतकं लोकप्रिय झालं, की समोर कलाकार कोणीही असोत, अर्चना पुरणसिंग यांच्याशिवाय कार्यक्रम पुढे जाऊ शकत नव्हता. नंतर तर अर्चना पुरणसिंग यांच्या हसण्यावरच स्किट सादर व्हायला लागली, इतकं ते हसणं लोकप्रिय झालं. नंतर पुढे प्रादेशिक वाहिन्यांवरसुद्धा विनोदांवर आधारित शो सुरू झाले, तेव्हा सेलिब्रिटी परीक्षक हे ‘मस्ट’ असायचे हे जितकं खरं, तितकंच त्यांनी खूप मोठमोठ्यानं हसणं आणि प्रत्येक पंचच्या वेळी एखाद्या परीक्षकावर कॅमेरा असणंही ‘मस्ट’ झालं. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. मात्र, इतर रिअॅलिटी शोंमध्ये परीक्षक रडतात, स्टेजवर जाऊन स्पर्धकांना मिठ्या मारतात, काही तरी बक्षीस देतात, चिडतात, वस्तू फेकतात हे हल्ली जितकं प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही, तितकंच कॉमेडी शोंमधलं परीक्षकांचं अवाजवी आणि अतिशयोक्तीपूर्ण हसणंही पचनी पडत नाही. कुठल्याही सुजाण माणसाला ज्या विनोदावर हसू येत नाही त्यावर इतकं लोटपोट होऊन हसण्यासारखं काय असतं? स्पर्धकाच्या नुसत्या एंट्रीवरच इतकं खदाखदा हसण्यासारखं काय असतं? खरं तर खुद्द अर्चना पुरणसिंग यांनीच या प्रश्नाचं उत्तरही दिलंय. ‘‘मला पैसे मिळतात म्हणून मी हसते,’’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यांच्या या विधानात इतकं तथ्य आहे, की अर्चना पुरणसिंग यांनी अभिनयावर जितके पैसे मिळवले नसतील, त्याच्यापेक्षा कैक पटीनं दुसऱ्यांच्या विनोदावर हसून मिळवले असं या वर्तुळात गंमतीनं म्हटलं जातं. मात्र, परीक्षक अतिशयोक्तीपूर्ण हसतात, की ‘हसं’ करून घेतात असाही प्रश्न सुजाण प्रेक्षकांना पडलाय हेही तितकंच खरं.  परीक्षक स्पर्धात्मक कार्यक्रमासाठी असतात हे आपण समजू शकतो; पण त्यांचं लोण आता इतकं वाढलंय, की कपिल शर्मानं ‘कॉमेडी सर्कस’नंतर त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ नावाचा स्वतंत्र शो सुरू केला, तेव्हाही त्यात समोर नवज्योतसिंग सिद्दू यांना ठेवलं. गंमत बघा, या शोमध्ये स्पर्धाच नाही. कपिलचाच शो आहे. इतर वेळी वेगवेगळ्या स्किटनंतर परीक्षक मांडतात तशी मतंही व्यक्त करायची नाहीत. फक्त कपिलच्या विनोदांवर हसत बसायचंय. म्हणजे हे किती ‘इनोदी’ प्रकरण आहे तुम्हीच बघा. सिद्दू यांची जागा सध्या अर्चना पुरणसिंग यांनी घेतली असली, तरी फक्त हसण्यासाठी एखाद्याला असं कार्यक्रमात घेणं ही गोष्ट ‘हसण्यावारीच’ न्यावी लागेल..  मात्र, एकूणच कॉमेडी शोंमध्ये परीक्षकांचा समावेश हे लाफ्टर ट्रॅक्सचंच नवं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र, ‘परीक्षकां’च्या हसण्यापेक्षा ‘प्रेक्षकां’च्या हसण्याचा विचार संबंधितांनी करायला काय हरकत आहे, असा प्रश्न विचारला तर केवळ ‘ठोको ताली’ एवढंच उत्तर येईल, हे मात्र खरं. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/391lfvI

No comments:

Post a Comment