पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस होताहेत ‘फिट अँड ॲक्टिव्ह’ पिंपरी - ‘अपुरी झोप, वाढलेले वजन, आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या. मात्र, आता हेल्थ स्मार्ट वॉच घातल्यानंतर ऑनलाइनद्वारे तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन करून वजन कमी करण्यासह आहारावर लक्ष केंद्रित केले. आरोग्यावर वैयक्तिक लक्ष ठेवल्याने माझे वजन महिनाभरात ७८ वरून ७५ वर आले. वेळेत जेवण होते, पुरेशी झोप मिळते. व्यायामही वाढला आहे,’ असे पोलिस कर्मचारी विजयकुमार वेलपुरे सांगत होते. त्यांच्याप्रमाणेच इतरही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. त्यांचा व्यायाम, आहार याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी आरोग्याबाबतीत ‘फिट अँड ॲक्टिव्ह’ होत असल्याचे दिसून येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सूत्रे हाती घेताच सर्वच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली. बारा तासांची ड्यूटी, जागरण, अवेळी जेवण यामुळे वजन वाढणे, उच्च रक्तदाब, दम लागणे, मधुमेह आदी आरोग्याच्या समस्या पोलिसांना उद्भवतात. कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. हे जाणून आता आयुक्तालयातील तीन हजार पोलिसांना ‘हेल्थ स्मार्ट वॉच’ दिले आहे.  या वॉचद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांची दैनंदिन आरोग्य स्थिती समजत आहे. कर्मचारी दिवसात किती चालला, व्यायाम किती केला, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब यासह इतरही माहिती नियंत्रण कक्षाला समजत आहे. याद्वारे माहिती मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला फोनवरून संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. यासह हेल्थ स्मार्ट वॉचच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनेही मार्गदर्शन केले जात आहे.  इंद्रायणी नदीतून वाळूउपसा; १३ वाळूमाफियांना ठोकल्या बेड्या, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त  १ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आजअखेर तीन हजार कर्मचाऱ्यांचे आरोग्य व जीवनशैली बदलली आहे. हा उपक्रम सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची सरासरी पाऊल संख्या पाच हजार ९७ होती, आता ती नऊ हजार ७२३ वर आली आहे. उपक्रम सुरू झाल्यापासून यामध्ये ९० टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा सरासरी व्यायामाचा कालावधी ३८ मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढला आहे. यासह झोप व पौष्टिक आहाराच्या सवयींतही सुधारणा केल्या आहेत. सध्या ५५ टक्के पोलिस कर्मचारी फिट व ॲक्टिव्ह श्रेणीत मोडतात; तर जवळपास साडेसहा टक्के कर्मचारी सुपर अ‍ॅक्टिव्ह श्रेणीत आहेत. उपक्रम सुरू होण्यापूर्वी फिट व ॲक्टिव्हचे प्रमाण पूर्वी ३२ टक्केच होते, असे दिसून आले आहे. खिडकीचे गज कापून शिरायचे घरात, घरफोडी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश वॉचमध्ये काय? या वॉचमध्ये फिटनेस ट्रॅकर व वैयक्तिक प्रशिक्षक, आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर समाविष्ट असून, ते कर्मचाऱ्याला जीवनशैली व सवयीनुसार वैयक्तिक आरोग्याचा सल्ला देतात. यामधून शरीराचे तापमान, रक्त ऑक्सिजनचे प्रमाण, हृदय गती, रक्तदाब यासह एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच्या महत्त्वपूर्ण बाबींवर नजर ठेवणे शक्य होत आहे. सर्व पोलिसांचा आरोग्य डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.  कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वर्ग हेल्थ वॉचवरून ऑनलाइन सूचना देण्याबरोबरच आता प्रत्यक्षातही बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्ग सुरू केला आहे. याअंतर्गत प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या २२ कर्मचाऱ्यांसाठी सध्या मुख्यालयात स्वतंत्र वर्ग सुरू केला आहे. त्यांच्याकडून प्रत्यक्षात व्यायाम करून घेण्यासह आहारावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  असा होतोय फायदा... पोलिस कर्मचारी दत्तात्रेय शिंदे यांच्या रक्तातील साखर २८० वरून १६० वर कमी झाली. तथापि, आरोग्यविषयक लक्ष्य साध्य करण्यासाठी सतत प्रेरणा देऊन प्रशिक्षकाने प्रशिक्षण दिले आहे. आता झोपेची आणि तणावाची पातळी सुधारण्याचेही काम करत आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य व जीवनशैली बदलण्यास मदत  होत आहे. आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होत असून, आजारी कर्मचाऱ्याला तातडीने उपचार व मदत देता येते. वजन वाढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू करत आहोत. - सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड अशी आहे स्थिती  १ फेब्रुवारी २०२१ रोजी उपक्रमाला सुरुवात ३००० पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य व जीवनशैलीत बदल उपक्रमापूर्वी सरासरी ५ हजार ९७ इतकी असलेली पाऊल संख्या आता ९ हजार ७२३ वर व्यायामाचा सरासरी कालावधी ३८ मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढला  सध्या ५५ टक्के पोलिस कर्मचारी आता फिट व ॲक्टिव्ह श्रेणीत मोडतात साडेसहा टक्के कर्मचारी सुपर अ‍ॅक्टिव्ह श्रेणीत  उपक्रम सुरू होण्यापूर्वी फिट व ॲक्टिव्हचे प्रमाण ३२ टक्केच होते Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस होताहेत ‘फिट अँड ॲक्टिव्ह’ पिंपरी - ‘अपुरी झोप, वाढलेले वजन, आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या. मात्र, आता हेल्थ स्मार्ट वॉच घातल्यानंतर ऑनलाइनद्वारे तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन करून वजन कमी करण्यासह आहारावर लक्ष केंद्रित केले. आरोग्यावर वैयक्तिक लक्ष ठेवल्याने माझे वजन महिनाभरात ७८ वरून ७५ वर आले. वेळेत जेवण होते, पुरेशी झोप मिळते. व्यायामही वाढला आहे,’ असे पोलिस कर्मचारी विजयकुमार वेलपुरे सांगत होते. त्यांच्याप्रमाणेच इतरही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. त्यांचा व्यायाम, आहार याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी आरोग्याबाबतीत ‘फिट अँड ॲक्टिव्ह’ होत असल्याचे दिसून येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सूत्रे हाती घेताच सर्वच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली. बारा तासांची ड्यूटी, जागरण, अवेळी जेवण यामुळे वजन वाढणे, उच्च रक्तदाब, दम लागणे, मधुमेह आदी आरोग्याच्या समस्या पोलिसांना उद्भवतात. कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. हे जाणून आता आयुक्तालयातील तीन हजार पोलिसांना ‘हेल्थ स्मार्ट वॉच’ दिले आहे.  या वॉचद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांची दैनंदिन आरोग्य स्थिती समजत आहे. कर्मचारी दिवसात किती चालला, व्यायाम किती केला, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब यासह इतरही माहिती नियंत्रण कक्षाला समजत आहे. याद्वारे माहिती मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला फोनवरून संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. यासह हेल्थ स्मार्ट वॉचच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनेही मार्गदर्शन केले जात आहे.  इंद्रायणी नदीतून वाळूउपसा; १३ वाळूमाफियांना ठोकल्या बेड्या, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त  १ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आजअखेर तीन हजार कर्मचाऱ्यांचे आरोग्य व जीवनशैली बदलली आहे. हा उपक्रम सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची सरासरी पाऊल संख्या पाच हजार ९७ होती, आता ती नऊ हजार ७२३ वर आली आहे. उपक्रम सुरू झाल्यापासून यामध्ये ९० टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा सरासरी व्यायामाचा कालावधी ३८ मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढला आहे. यासह झोप व पौष्टिक आहाराच्या सवयींतही सुधारणा केल्या आहेत. सध्या ५५ टक्के पोलिस कर्मचारी फिट व ॲक्टिव्ह श्रेणीत मोडतात; तर जवळपास साडेसहा टक्के कर्मचारी सुपर अ‍ॅक्टिव्ह श्रेणीत आहेत. उपक्रम सुरू होण्यापूर्वी फिट व ॲक्टिव्हचे प्रमाण पूर्वी ३२ टक्केच होते, असे दिसून आले आहे. खिडकीचे गज कापून शिरायचे घरात, घरफोडी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश वॉचमध्ये काय? या वॉचमध्ये फिटनेस ट्रॅकर व वैयक्तिक प्रशिक्षक, आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर समाविष्ट असून, ते कर्मचाऱ्याला जीवनशैली व सवयीनुसार वैयक्तिक आरोग्याचा सल्ला देतात. यामधून शरीराचे तापमान, रक्त ऑक्सिजनचे प्रमाण, हृदय गती, रक्तदाब यासह एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याच्या महत्त्वपूर्ण बाबींवर नजर ठेवणे शक्य होत आहे. सर्व पोलिसांचा आरोग्य डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.  कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वर्ग हेल्थ वॉचवरून ऑनलाइन सूचना देण्याबरोबरच आता प्रत्यक्षातही बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्ग सुरू केला आहे. याअंतर्गत प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या २२ कर्मचाऱ्यांसाठी सध्या मुख्यालयात स्वतंत्र वर्ग सुरू केला आहे. त्यांच्याकडून प्रत्यक्षात व्यायाम करून घेण्यासह आहारावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.  असा होतोय फायदा... पोलिस कर्मचारी दत्तात्रेय शिंदे यांच्या रक्तातील साखर २८० वरून १६० वर कमी झाली. तथापि, आरोग्यविषयक लक्ष्य साध्य करण्यासाठी सतत प्रेरणा देऊन प्रशिक्षकाने प्रशिक्षण दिले आहे. आता झोपेची आणि तणावाची पातळी सुधारण्याचेही काम करत आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य व जीवनशैली बदलण्यास मदत  होत आहे. आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होत असून, आजारी कर्मचाऱ्याला तातडीने उपचार व मदत देता येते. वजन वाढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कार्यक्रम सुरू करत आहोत. - सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड अशी आहे स्थिती  १ फेब्रुवारी २०२१ रोजी उपक्रमाला सुरुवात ३००० पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य व जीवनशैलीत बदल उपक्रमापूर्वी सरासरी ५ हजार ९७ इतकी असलेली पाऊल संख्या आता ९ हजार ७२३ वर व्यायामाचा सरासरी कालावधी ३८ मिनिटांवरून ७५ मिनिटांपर्यंत वाढला  सध्या ५५ टक्के पोलिस कर्मचारी आता फिट व ॲक्टिव्ह श्रेणीत मोडतात साडेसहा टक्के कर्मचारी सुपर अ‍ॅक्टिव्ह श्रेणीत  उपक्रम सुरू होण्यापूर्वी फिट व ॲक्टिव्हचे प्रमाण ३२ टक्केच होते Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NHrr4I

No comments:

Post a Comment