कणकवली बालोद्यानसाठी 75 लाखाचा निधी कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील श्रीधर नाईक बालोद्यानाच्या सुशोभिकरणासाठी 75 लाखांचा निधी तसेच भालचंद्र महाराज आश्रमासाठी 50 लाखाचा निधी, असा सुमारे एक कोटी पेक्षा अधिक निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरासाठी दिला आहे. अद्ययावत अशा अग्निशमन विभागाची ही मागणी आम्ही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परुळेकर, सुजित जाधव, महिला अध्यक्ष नीलम पालव आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, जिल्हा नियोजनाचा 170 कोटीचा आराखडा नुकताच मंजूर झाला. यावेळी आम्ही बालोद्यानासाठी निधीची मागणी केली होती. याचबरोबर भालचंद्र महाराज आश्रम लगतच्या भूमिगत वीज महिन्यांसाठी साडेसात लाख रुपये वेगळा निधी दिला आहे. तसेच मंडपाचे आता काम सुरू झाले आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना आणि महाविकासआघाडी कटिबद्ध आहे. आम्ही जो जनतेला शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार आहोत. क्रीडांगणाच्या आरक्षणासाठी ही पालकमंत्र्यांनी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. शहराच्या विकासाची कामे ही शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत. शहरासाठी सहा कोटीचा निधी हा भूमिगत वीज महिन्यांसाठी मंजूर झाला होता. मात्र, हा निधी आता मागे गेला आहे. याचे कारण सत्ताधारी मंडळींना कोणतेही व्हीजन नाही केवळ भ्रष्टाचार डोक्‍यात असल्यामुळे विकास निधी मागे जात आहे. शहरासाठी हा भूमिगत विज वाहिन्यांचा प्रकल्प पुन्हा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून हा निधी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भूमिगत वीजवाहिन्या साठी मिळावा अशी मागणी आम्ही वीज मंत्र्यांकडे केली आहे. कणकवली शहराच्या विकासासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. पारकर यांनी यावेळी दिली. भालचंद्र महाराज प्राथमिक शाळेची जागा आश्रम संस्थेला देवून दुसऱ्या जागेत शाळा इमारत बांधकामासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असून त्याचा पाठपुरावा करीत आहोत.  भाजी मार्केटची इमारत  नगरपंचायतीने विकसीत करावी  भाजी मार्केटची इमारत नगरपंचायतीने विकसित करावी ही भूमिका कायम आहे. खासगी विकासकाला भाजी मार्केट इमारत बांधकामाला 3 वर्षाची दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने आरक्षित जमीन ताब्यात घेऊन स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी ही भूमिका आहे. नगरपंचायत आणि विकासकातील करार वगळून इमारत बांधकाम होत नाही आहे. चुकीचे अनधिकृत बांधकाम तोडून सदर जागेत नगरपंचायतीने भाजी मार्केट इमारत बांधावी असा पुनरुच्चार पारकर यांनी केला. 3 डिसेंबर 2020 रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती. त्यानुसार नगरसंचालक याना मंत्री शिंदे यांनी निर्देश दिल्यानुसार या चौकशीकामी नगगरचना विभागाचे असिस्टंट डायरेक्‍टर मिलिंद आव्हाडे यांची स्वतंत्र कमिटी नेमली असून येत्या काही दिवसांत याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करणार आहोत, अशी माहिती पारकर यांनी दिली.   संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 7, 2021

कणकवली बालोद्यानसाठी 75 लाखाचा निधी कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरातील श्रीधर नाईक बालोद्यानाच्या सुशोभिकरणासाठी 75 लाखांचा निधी तसेच भालचंद्र महाराज आश्रमासाठी 50 लाखाचा निधी, असा सुमारे एक कोटी पेक्षा अधिक निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरासाठी दिला आहे. अद्ययावत अशा अग्निशमन विभागाची ही मागणी आम्ही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परुळेकर, सुजित जाधव, महिला अध्यक्ष नीलम पालव आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, जिल्हा नियोजनाचा 170 कोटीचा आराखडा नुकताच मंजूर झाला. यावेळी आम्ही बालोद्यानासाठी निधीची मागणी केली होती. याचबरोबर भालचंद्र महाराज आश्रम लगतच्या भूमिगत वीज महिन्यांसाठी साडेसात लाख रुपये वेगळा निधी दिला आहे. तसेच मंडपाचे आता काम सुरू झाले आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना आणि महाविकासआघाडी कटिबद्ध आहे. आम्ही जो जनतेला शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार आहोत. क्रीडांगणाच्या आरक्षणासाठी ही पालकमंत्र्यांनी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. शहराच्या विकासाची कामे ही शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत. शहरासाठी सहा कोटीचा निधी हा भूमिगत वीज महिन्यांसाठी मंजूर झाला होता. मात्र, हा निधी आता मागे गेला आहे. याचे कारण सत्ताधारी मंडळींना कोणतेही व्हीजन नाही केवळ भ्रष्टाचार डोक्‍यात असल्यामुळे विकास निधी मागे जात आहे. शहरासाठी हा भूमिगत विज वाहिन्यांचा प्रकल्प पुन्हा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून हा निधी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भूमिगत वीजवाहिन्या साठी मिळावा अशी मागणी आम्ही वीज मंत्र्यांकडे केली आहे. कणकवली शहराच्या विकासासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. पारकर यांनी यावेळी दिली. भालचंद्र महाराज प्राथमिक शाळेची जागा आश्रम संस्थेला देवून दुसऱ्या जागेत शाळा इमारत बांधकामासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असून त्याचा पाठपुरावा करीत आहोत.  भाजी मार्केटची इमारत  नगरपंचायतीने विकसीत करावी  भाजी मार्केटची इमारत नगरपंचायतीने विकसित करावी ही भूमिका कायम आहे. खासगी विकासकाला भाजी मार्केट इमारत बांधकामाला 3 वर्षाची दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने आरक्षित जमीन ताब्यात घेऊन स्वमालकीची भाजी मार्केट इमारत बांधावी ही भूमिका आहे. नगरपंचायत आणि विकासकातील करार वगळून इमारत बांधकाम होत नाही आहे. चुकीचे अनधिकृत बांधकाम तोडून सदर जागेत नगरपंचायतीने भाजी मार्केट इमारत बांधावी असा पुनरुच्चार पारकर यांनी केला. 3 डिसेंबर 2020 रोजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत कैफियत मांडली होती. त्यानुसार नगरसंचालक याना मंत्री शिंदे यांनी निर्देश दिल्यानुसार या चौकशीकामी नगगरचना विभागाचे असिस्टंट डायरेक्‍टर मिलिंद आव्हाडे यांची स्वतंत्र कमिटी नेमली असून येत्या काही दिवसांत याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करणार आहोत, अशी माहिती पारकर यांनी दिली.   संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sXxWz9

No comments:

Post a Comment