आंगणेवाडी यात्रा; कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे  मालवण (सिंधुदुर्ग) - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने झाली. पहाटे चार वाजल्यापासून देवीच्या दर्शनाचा, ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली. यावर्षीची यात्रा ही केवळ आंगणेवाडी कुटुंबीयांसाठीच मर्यादित असल्याने पहिल्या दिवशी सुमारे एक हजारहून अधिक आंगणे कुटुंबीयांनी देवीचे दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातील भाविकांना या यात्रेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे भक्तांनी जेथून हाक दिली त्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर... कोरोनाचे संकट कायमस्वरूपी दूर कर, असे साकडे आंगणे कुटुंबीयांनी भराडी देवीस यावेळी घातले.  राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओढवल्याने आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने तसेच आंगणे कुटुंबीयांनी जाहीर केला होता. दोन दिवसांपूर्वी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला होता. यात आंगणेवाडी यात्रेस कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, पत्रकार तसेच अन्य भाविकांना प्रवेश नसेल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने चोख नियोजन केले होते.  पहाटे चार वाजल्यापासून भराडी देवीच्या यात्रेस सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परीसरात पोलिस व आरोग्य विभाग यांचे दोन कक्ष उभारण्यात आले होते. भाविकांना दर्शनासाठी दोन रांगा करण्यात आल्या होत्या. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या भाविकांची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर थर्मल गन, ऑक्‍सीमीटरच्या सहाय्याने तपासणी करण्यात येत होती. 50 जणांच्या समुहाला सामाजिक अंतर ठेवून देवीचे दर्शन दिले जात होते. आंगणे कुटुंबीयांनी देवीच्या दर्शनासह, ओट्या भरल्या. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला तुलाभाराची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळपर्यत सुमारे एक हजारहून अधिक आंगणे कुटुंबीयांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती.  आंगणेवाडीत जाणाऱ्या तिन्ही प्रमुख मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंगणे कुटुंबीयां व्यतिरिक्त कोणालाही मंदिराच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही. मंदिर तसेच परिसरात सुमारे 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यावर्षीची यात्री केवळ आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित असल्याने मंदिर परिसरात कोणतीही दुकाने थाटण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर जी स्थानिकांची दुकाने होती तीही बंद ठेवण्यात आली होती. आतापर्यतच्या यात्रेच्या इतिहासात प्रथमच भराडीची यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी होत असल्याचे दिसून आले.  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेस दरवर्षी लाखो भाविक भेट देत दर्शनाचा लाभ घेतात; मात्र यावर्षी राज्यभरातील भाविकांना देवीच्या दर्शनाबरोबरच, नवस फेडता आले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर आंगणे कुटुंबीयांनी ज्या भाविकांनी तुला हाक दिली त्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण कर.. राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ देत असे साकडे घातले. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक भाविक आज आंगणेवाडी परिसरात दाखल झाले होते; मात्र यावर्षीची यात्रा आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित असल्याने या भाविकांनी आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत तेथूनच भराडी मातेस नमस्कार केला. गेली अनेक वर्षे आपण यात्रेच्या निमित्ताने येथे येत आहोत. यात कधीही खंड पडला नाही. मंदिरात जात देवीचे दर्शन घेता आले नसले तरी या आंगणेवाडीत भूमीत आल्याचे समाधान असल्याचे मुंबईतून आलेल्या भाविकांनी सांगितले. दरवर्षी आंगणेवाडीची यात्रेत राजकीय पक्षांचे मंत्री, नेतेमंडळी, पदाधिकारी, नगरसेवक, सेलेब्रिटी उपस्थित लावत असत. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंगणेवाडी यात्रेच्या ठिकाणी न जाता चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 6, 2021

आंगणेवाडी यात्रा; कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे  मालवण (सिंधुदुर्ग) - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने झाली. पहाटे चार वाजल्यापासून देवीच्या दर्शनाचा, ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली. यावर्षीची यात्रा ही केवळ आंगणेवाडी कुटुंबीयांसाठीच मर्यादित असल्याने पहिल्या दिवशी सुमारे एक हजारहून अधिक आंगणे कुटुंबीयांनी देवीचे दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातील भाविकांना या यात्रेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे भक्तांनी जेथून हाक दिली त्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर... कोरोनाचे संकट कायमस्वरूपी दूर कर, असे साकडे आंगणे कुटुंबीयांनी भराडी देवीस यावेळी घातले.  राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओढवल्याने आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने तसेच आंगणे कुटुंबीयांनी जाहीर केला होता. दोन दिवसांपूर्वी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला होता. यात आंगणेवाडी यात्रेस कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, पत्रकार तसेच अन्य भाविकांना प्रवेश नसेल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने चोख नियोजन केले होते.  पहाटे चार वाजल्यापासून भराडी देवीच्या यात्रेस सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परीसरात पोलिस व आरोग्य विभाग यांचे दोन कक्ष उभारण्यात आले होते. भाविकांना दर्शनासाठी दोन रांगा करण्यात आल्या होत्या. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या भाविकांची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर थर्मल गन, ऑक्‍सीमीटरच्या सहाय्याने तपासणी करण्यात येत होती. 50 जणांच्या समुहाला सामाजिक अंतर ठेवून देवीचे दर्शन दिले जात होते. आंगणे कुटुंबीयांनी देवीच्या दर्शनासह, ओट्या भरल्या. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला तुलाभाराची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळपर्यत सुमारे एक हजारहून अधिक आंगणे कुटुंबीयांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती.  आंगणेवाडीत जाणाऱ्या तिन्ही प्रमुख मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंगणे कुटुंबीयां व्यतिरिक्त कोणालाही मंदिराच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही. मंदिर तसेच परिसरात सुमारे 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यावर्षीची यात्री केवळ आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित असल्याने मंदिर परिसरात कोणतीही दुकाने थाटण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर जी स्थानिकांची दुकाने होती तीही बंद ठेवण्यात आली होती. आतापर्यतच्या यात्रेच्या इतिहासात प्रथमच भराडीची यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी होत असल्याचे दिसून आले.  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेस दरवर्षी लाखो भाविक भेट देत दर्शनाचा लाभ घेतात; मात्र यावर्षी राज्यभरातील भाविकांना देवीच्या दर्शनाबरोबरच, नवस फेडता आले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर आंगणे कुटुंबीयांनी ज्या भाविकांनी तुला हाक दिली त्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण कर.. राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ देत असे साकडे घातले. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक भाविक आज आंगणेवाडी परिसरात दाखल झाले होते; मात्र यावर्षीची यात्रा आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित असल्याने या भाविकांनी आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत तेथूनच भराडी मातेस नमस्कार केला. गेली अनेक वर्षे आपण यात्रेच्या निमित्ताने येथे येत आहोत. यात कधीही खंड पडला नाही. मंदिरात जात देवीचे दर्शन घेता आले नसले तरी या आंगणेवाडीत भूमीत आल्याचे समाधान असल्याचे मुंबईतून आलेल्या भाविकांनी सांगितले. दरवर्षी आंगणेवाडीची यात्रेत राजकीय पक्षांचे मंत्री, नेतेमंडळी, पदाधिकारी, नगरसेवक, सेलेब्रिटी उपस्थित लावत असत. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंगणेवाडी यात्रेच्या ठिकाणी न जाता चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OcqxgB

No comments:

Post a Comment