दैव बलवत्तर! मगरीच्या जबड्यातून सोडविला हात बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा-रेडकरवाडी येथील तेरेखोल नदीपात्रात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या मगरीने शेतकरी राजन यशवंत पंडित (वय 45) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मगरीने डावा हात जबड्यात पकडला असताना प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. रक्ताला आसुसलेल्या मगरींचे प्रमाण दिवसेंदिवस मडुरा परिसरात वाढत असून सुमारे 20 ते 25 घटना मगरींनी हल्ला केलेल्या घडल्या आहेत. वनविभाग गंभीरपणे दखल घेत नसल्याचे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.  मडुरा येथे नदीच्या पाण्याचा उपयोग करून रब्बी पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेकडो एकर जमीन लागवडीखाली आली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी आठ वाजताच्या सुमारास राजन पंडित आपल्या शेतीत गेले होते. इंजिनचा पाईप नदीपात्रात ठेवत असताना दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून मगरीचे पाच दात लागले आहेत. त्यांचा डावा हात मगरीच्या जबड्यात अडकल्यानंतरही त्यांनी धीर न सोडता प्रसंगावधान राखत हात झिडकारून आपला जीव वाचविण्यासाठी नदीपात्राबाहेर धाव घेतली. या झटापटीत त्यांच्या हाताला मात्र गंभीर दुखापत झाली आहे.  या घटनेची खबर मिळताच मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी ग्रामस्थांसह धाव घेत रक्तबंबाळ झालेल्या राजन पंडित यांना तत्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केलेत. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने सावंतवाडीवरून त्यांना गोवा बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला झालेल्या जखमेस अकरा टाके पडल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.  मडुरा परिसरात मगरींनी गुरांवर हल्ले करण्याचे बरेच प्रकार आतापर्यंत घडले आहेत; मात्र मनुष्यांवर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. काढणीयोग्य झालेल्या पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळण्यासाठी रक्ताला आसुसलेल्या मगरींचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी केली आहे. दरम्यान, वनअधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस करून घटनास्थळी भेट दिली. तसेच राजन पंडित यांच्या डाव्या हाताला मगरीचे पाच दात लागल्याचा अंदाज वनरक्षक आप्पासो राठोड यांनी वर्तविला. तालुका वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे म्हणाले की, मडुरा नदीपात्रात मगरींचे वास्तव्य असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

दैव बलवत्तर! मगरीच्या जबड्यातून सोडविला हात बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा-रेडकरवाडी येथील तेरेखोल नदीपात्रात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या मगरीने शेतकरी राजन यशवंत पंडित (वय 45) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मगरीने डावा हात जबड्यात पकडला असताना प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. रक्ताला आसुसलेल्या मगरींचे प्रमाण दिवसेंदिवस मडुरा परिसरात वाढत असून सुमारे 20 ते 25 घटना मगरींनी हल्ला केलेल्या घडल्या आहेत. वनविभाग गंभीरपणे दखल घेत नसल्याचे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.  मडुरा येथे नदीच्या पाण्याचा उपयोग करून रब्बी पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेकडो एकर जमीन लागवडीखाली आली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी आठ वाजताच्या सुमारास राजन पंडित आपल्या शेतीत गेले होते. इंजिनचा पाईप नदीपात्रात ठेवत असताना दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून मगरीचे पाच दात लागले आहेत. त्यांचा डावा हात मगरीच्या जबड्यात अडकल्यानंतरही त्यांनी धीर न सोडता प्रसंगावधान राखत हात झिडकारून आपला जीव वाचविण्यासाठी नदीपात्राबाहेर धाव घेतली. या झटापटीत त्यांच्या हाताला मात्र गंभीर दुखापत झाली आहे.  या घटनेची खबर मिळताच मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी ग्रामस्थांसह धाव घेत रक्तबंबाळ झालेल्या राजन पंडित यांना तत्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केलेत. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने सावंतवाडीवरून त्यांना गोवा बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला झालेल्या जखमेस अकरा टाके पडल्याची माहिती बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.  मडुरा परिसरात मगरींनी गुरांवर हल्ले करण्याचे बरेच प्रकार आतापर्यंत घडले आहेत; मात्र मनुष्यांवर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. काढणीयोग्य झालेल्या पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळण्यासाठी रक्ताला आसुसलेल्या मगरींचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी केली आहे. दरम्यान, वनअधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस करून घटनास्थळी भेट दिली. तसेच राजन पंडित यांच्या डाव्या हाताला मगरीचे पाच दात लागल्याचा अंदाज वनरक्षक आप्पासो राठोड यांनी वर्तविला. तालुका वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे म्हणाले की, मडुरा नदीपात्रात मगरींचे वास्तव्य असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NWQn8t

No comments:

Post a Comment