जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागाला बसला धक्का दहिवडी (जि. सातारा) : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही माण तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. यासोबतच अजून दोन वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यःस्थिती पाहता कंटेनमेंट झोन कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील व्यवहार कधी सुरू करायचे याचा निर्णय अजून अधांतरी आहे.   शहर हॉटस्पॉट झाल्यानंतर शासनाने संपूर्ण शहरच कंटेनमेंट झोन घोषित करून उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, विविध उपाययोजना राबवूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात आणण्यात प्रशासन यशस्वी होताना दिसत नाही. बाधितांची साखळी तुटत नाही. उलट दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शहरात सोमवारी 40 बाधित सापडले होते. दिलासादायक बाब म्हणजे त्यानंतर मंगळवारी 15, बुधवारी 9, तर गुरुवारी 2 अशी बाधितांची संख्या घटत गेली आहे.  मात्र, या पार्श्‍वभूमीवर सर्व जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागालाच कोरोनाने हादरा दिला. एका वेळी तीन वैद्यकीय अधिकारी बाधित आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस दीड महिन्यांपूर्वी, तर दुसरा डोस घेऊन साधारण दहा ते 11 दिवस झाले आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर घातली असली, तरी पुन्हा एकदा कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.   या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बैठक घेतली. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार व वैद्यकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. आज (शुक्रवार) संपूर्ण शहरातील नागरिकांचा वन डे सर्व्हे करण्यात येणार आहे. यात 13 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.  "नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासन तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. नगरपंचायतीकडून सर्व्हे करण्यासोबतच प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे नागरिकांना पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. परिस्थिती पाहून कंटेनमेंट झोन उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी धीर धरावा.'  शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी.  जाणून घ्या : 5 औषधी वनस्पती आपल्या पचनक्रिया ठेवतात तंदुरुस्त टोमॅटोचे सेवन गर्भवती महिला आणि बाळांना ठरते फायदेशीर American Starlink भारतात घडविणार इतिहास; देणार High Speed इंटरनेट सेवा, यासाठी आजच रजिस्टर करा.. Cloud वरुन Google Photos वर असे करा Photo आणि Video सहजपणे ट्रान्सफर, कसे ते जाणून घ्या.. लग्नाला नियमापेक्षा अधिक गर्दी झाल्याने हॉटेल मालकाला 25 हजारांचा दंड Edited By : Siddharth Latkar   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 4, 2021

जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागाला बसला धक्का दहिवडी (जि. सातारा) : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही माण तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. यासोबतच अजून दोन वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यःस्थिती पाहता कंटेनमेंट झोन कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील व्यवहार कधी सुरू करायचे याचा निर्णय अजून अधांतरी आहे.   शहर हॉटस्पॉट झाल्यानंतर शासनाने संपूर्ण शहरच कंटेनमेंट झोन घोषित करून उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, विविध उपाययोजना राबवूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात आणण्यात प्रशासन यशस्वी होताना दिसत नाही. बाधितांची साखळी तुटत नाही. उलट दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. शहरात सोमवारी 40 बाधित सापडले होते. दिलासादायक बाब म्हणजे त्यानंतर मंगळवारी 15, बुधवारी 9, तर गुरुवारी 2 अशी बाधितांची संख्या घटत गेली आहे.  मात्र, या पार्श्‍वभूमीवर सर्व जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागालाच कोरोनाने हादरा दिला. एका वेळी तीन वैद्यकीय अधिकारी बाधित आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस दीड महिन्यांपूर्वी, तर दुसरा डोस घेऊन साधारण दहा ते 11 दिवस झाले आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर घातली असली, तरी पुन्हा एकदा कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.   या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बैठक घेतली. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार व वैद्यकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. आज (शुक्रवार) संपूर्ण शहरातील नागरिकांचा वन डे सर्व्हे करण्यात येणार आहे. यात 13 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.  "नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासन तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. नगरपंचायतीकडून सर्व्हे करण्यासोबतच प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे नागरिकांना पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. परिस्थिती पाहून कंटेनमेंट झोन उठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी धीर धरावा.'  शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी.  जाणून घ्या : 5 औषधी वनस्पती आपल्या पचनक्रिया ठेवतात तंदुरुस्त टोमॅटोचे सेवन गर्भवती महिला आणि बाळांना ठरते फायदेशीर American Starlink भारतात घडविणार इतिहास; देणार High Speed इंटरनेट सेवा, यासाठी आजच रजिस्टर करा.. Cloud वरुन Google Photos वर असे करा Photo आणि Video सहजपणे ट्रान्सफर, कसे ते जाणून घ्या.. लग्नाला नियमापेक्षा अधिक गर्दी झाल्याने हॉटेल मालकाला 25 हजारांचा दंड Edited By : Siddharth Latkar   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PAMeaF

No comments:

Post a Comment