30 वर्षांनी स्वप्न साकारणार, फुकेरी धरणासाठी 34 कोटी सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेली 30 वर्षे मागणी होत असलेल्या फुकेरी (ता. दोडामार्ग) धरणाचे स्वप्न आता साकारणार आहे. राज्याने यासाठी 34 कोटीची आर्थीक तरतूद केली आहे. याची निविदाही निघाली आहे. ही माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दिली.  तळकट-कोलझर पंचक्रोशी पाणी व्यवस्थेसाठी स्थानिक पातळीवरून गेली 30 वर्षे मागणी होत होती; मात्र धरणासाठी योग्य जागेचा शोध सुरू होता. सुरूवातीला काही जागा बघीतल्या गेल्या; मात्र शासकीय निकषात त्या बसत नव्हत्या. अखेर फुकेरी येथील दोनेखोल येथे दोन डोंगरांच्या खोपणीत असलेली जागा निश्‍चित झाली; मात्र तीव्र मागणी होवूनही हे स्वप्न 30 ते 32 वर्षे रखडले होते.  आधीच्या आघाडी सरकारच्या काळात या धरणाला मान्यता मिळाली. निविदाही निघाली; मात्र नंतर उघड झालेल्या सिंचन घोटाळ्यात अनेक प्रकल्प रद्द करण्यात आले. त्यात फुकेरी धरणाचाही समावेश होता. स्थानिक पातळीवरून या धरणासाठी गेल्या तीन-चार वर्षाप पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. याला यश येवून राज्याच्या जलसंधारण विभागातर्फे धरणासाठी पुन्हा सर्व्हे करण्यात आला. जागा निश्‍चित करून याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. ही प्रक्रिया युती सरकारच्या काळात झाली; मात्र प्रकल्पाला मंजुरी व आर्थिक तरतुद झाली नव्हती. प्राथमिक सर्व्हेत या प्रकल्पासाठी अवघ्या 70 कोटींची गरज होती. या धरणाचा सांडवा साधारण 25 मीटरचा आणि एकूण बांधकाम अवघे 250 मीटरची असणार आहे. अडीचशे हक्‍टर क्षेत्र ओलीताखाली आणण्याची याची क्षमता असणार आहे. असे असले तरी यामुळे नदी बारमाही प्रवाहीत राहणार आहेत. साहजीकच सिंचनाखालील क्षेत्र आणखी वाढणार आहे. तसा प्रस्ताव जलसंधारणने याआधीच राज्याकडे पाठवला होता. कोरोनाच्या कालावधीत बरेचसे प्रकल्प मागे पडले. यात फुकेरीचाही समावेश होतो. आता मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. यासाठी राज्याने 35 कोटींची आर्थिक तरतुद केली आहे. याची निविदाही निघाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे. आमदार केसरकर यांनी याला दुजोरा दिला.  दृष्टीक्षेपात * फुकेरी-दोनेखोल येथे दोन डोंगरांच्या खोबनीत जागा निश्‍चित  * नदीला चौकुळकडून येणाऱ्या बारमाही पाण्याची जोड  * फुकेरी-झोळंबे-तळकट-कोलझर-उगाडे या मार्गाने जाणाऱ्या नदीवर प्रकल्प  * साडेतीनशे मीटर बांधकामाची गरज  * प्रत्यक्ष ओलीताखालील क्षेत्र अडीचशे हेक्‍टर  * पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा  * गरजेनुसार नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था  * भूसंपादन क्षेत्रात केवळ खासगी, सार्वजनिक जागा  * वनक्षेत्राचा अडसर नाही  * पूर्नवसनाचीही गरज नाही.  `सकाळ`चे पाठबळ  फुकेरी येथे धरण व्हावे यासाठी सकाळने गेली चार वर्षे सतत पाठपुरावा केला. याबाबत प्रत्यक्ष फुकेरी दोनेखोल येथे जावून ग्राऊंड रिपोर्टींग केले. वेळोवेळी याबाबत ग्रामस्थांच्या मागण्या लावून धरल्या. स्थानिकांच्या मागणीला माध्यम म्हणून पाठबळ दिले. `सकाळ`च्या या पाठपुराव्यामुळे हा टप्पा गाठता आल्याची भावना स्थानिकांनी व्यक्‍त केली.  फुकेरी येथील धरणाला मान्यता मिळाली आहे. याचे काम लवकरच सुरू होईल. याचा तेथील बागायतीला फायदा होणार आहे. माजगाव येथे लघुपाटबंधारे प्रकल्पही मंजूर असून आठ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांना कृषी उत्पादने घेण्यासाठी देखील या पाण्याचा लाभ होणार आहे. - दीपक केसकर, आमदार तथा माजी पालकमंत्री.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

30 वर्षांनी स्वप्न साकारणार, फुकेरी धरणासाठी 34 कोटी सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेली 30 वर्षे मागणी होत असलेल्या फुकेरी (ता. दोडामार्ग) धरणाचे स्वप्न आता साकारणार आहे. राज्याने यासाठी 34 कोटीची आर्थीक तरतूद केली आहे. याची निविदाही निघाली आहे. ही माहिती माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दिली.  तळकट-कोलझर पंचक्रोशी पाणी व्यवस्थेसाठी स्थानिक पातळीवरून गेली 30 वर्षे मागणी होत होती; मात्र धरणासाठी योग्य जागेचा शोध सुरू होता. सुरूवातीला काही जागा बघीतल्या गेल्या; मात्र शासकीय निकषात त्या बसत नव्हत्या. अखेर फुकेरी येथील दोनेखोल येथे दोन डोंगरांच्या खोपणीत असलेली जागा निश्‍चित झाली; मात्र तीव्र मागणी होवूनही हे स्वप्न 30 ते 32 वर्षे रखडले होते.  आधीच्या आघाडी सरकारच्या काळात या धरणाला मान्यता मिळाली. निविदाही निघाली; मात्र नंतर उघड झालेल्या सिंचन घोटाळ्यात अनेक प्रकल्प रद्द करण्यात आले. त्यात फुकेरी धरणाचाही समावेश होता. स्थानिक पातळीवरून या धरणासाठी गेल्या तीन-चार वर्षाप पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. याला यश येवून राज्याच्या जलसंधारण विभागातर्फे धरणासाठी पुन्हा सर्व्हे करण्यात आला. जागा निश्‍चित करून याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. ही प्रक्रिया युती सरकारच्या काळात झाली; मात्र प्रकल्पाला मंजुरी व आर्थिक तरतुद झाली नव्हती. प्राथमिक सर्व्हेत या प्रकल्पासाठी अवघ्या 70 कोटींची गरज होती. या धरणाचा सांडवा साधारण 25 मीटरचा आणि एकूण बांधकाम अवघे 250 मीटरची असणार आहे. अडीचशे हक्‍टर क्षेत्र ओलीताखाली आणण्याची याची क्षमता असणार आहे. असे असले तरी यामुळे नदी बारमाही प्रवाहीत राहणार आहेत. साहजीकच सिंचनाखालील क्षेत्र आणखी वाढणार आहे. तसा प्रस्ताव जलसंधारणने याआधीच राज्याकडे पाठवला होता. कोरोनाच्या कालावधीत बरेचसे प्रकल्प मागे पडले. यात फुकेरीचाही समावेश होतो. आता मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. यासाठी राज्याने 35 कोटींची आर्थिक तरतुद केली आहे. याची निविदाही निघाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे. आमदार केसरकर यांनी याला दुजोरा दिला.  दृष्टीक्षेपात * फुकेरी-दोनेखोल येथे दोन डोंगरांच्या खोबनीत जागा निश्‍चित  * नदीला चौकुळकडून येणाऱ्या बारमाही पाण्याची जोड  * फुकेरी-झोळंबे-तळकट-कोलझर-उगाडे या मार्गाने जाणाऱ्या नदीवर प्रकल्प  * साडेतीनशे मीटर बांधकामाची गरज  * प्रत्यक्ष ओलीताखालील क्षेत्र अडीचशे हेक्‍टर  * पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा  * गरजेनुसार नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था  * भूसंपादन क्षेत्रात केवळ खासगी, सार्वजनिक जागा  * वनक्षेत्राचा अडसर नाही  * पूर्नवसनाचीही गरज नाही.  `सकाळ`चे पाठबळ  फुकेरी येथे धरण व्हावे यासाठी सकाळने गेली चार वर्षे सतत पाठपुरावा केला. याबाबत प्रत्यक्ष फुकेरी दोनेखोल येथे जावून ग्राऊंड रिपोर्टींग केले. वेळोवेळी याबाबत ग्रामस्थांच्या मागण्या लावून धरल्या. स्थानिकांच्या मागणीला माध्यम म्हणून पाठबळ दिले. `सकाळ`च्या या पाठपुराव्यामुळे हा टप्पा गाठता आल्याची भावना स्थानिकांनी व्यक्‍त केली.  फुकेरी येथील धरणाला मान्यता मिळाली आहे. याचे काम लवकरच सुरू होईल. याचा तेथील बागायतीला फायदा होणार आहे. माजगाव येथे लघुपाटबंधारे प्रकल्पही मंजूर असून आठ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांना कृषी उत्पादने घेण्यासाठी देखील या पाण्याचा लाभ होणार आहे. - दीपक केसकर, आमदार तथा माजी पालकमंत्री.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sdHOoA

No comments:

Post a Comment