रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन जाधवांसह कदम, बने शर्यतीत  रत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापतिपदासाठी 22 मार्चला निवडणूक होणार आहे. पदासाठी दावेदार असलेल्या इच्छुकांनी आपले पत्ते सरकवण्यास आरंभ केला आहे. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव, चिपळूणचे बाळशेठ जाधव तर ज्येष्ठ सदस्य उदय बने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.  चारच दिवसांपूर्वी अध्यक्षांसह सभापतींनी राजीनामे सादर करण्यात होते. त्यानुसार प्रशासनाकडून निवडणुक प्रक्रिया जाहीर केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरुन चढाओढ सुरू झाली आहे. ज्येष्ठ सदस्य उदय बने हे पूर्वीपासूनच संधीच्या प्रतिक्षेत होते. सव्वा वर्षांपूर्वी नवीन चेहरा देण्यासाठी रोहन बने यांना संधी दिली. खुल्या गटासाठी आरक्षण असल्यामुळे यावेळी तरी उदय बनेंच्या ज्येष्ठत्वाचा आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विचार होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे; परंतु त्यांच्या मागे कोणीच गॉडफादर नाही.  मागील चार वर्षात जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्‍यांमध्ये अध्यक्षपद राहीले आहे. त्यामुळे पुन्हा रत्नागिरीला संधी मिळेल का याबाबत साशंकताच व्यक्‍त केली जात आहे. खासदार विनायक राऊत यांच्या गोटातून बाळशेठ जाधव यांच्या नावासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे; मात्र बाळशेठ यांना अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्या नावाचीही चर्चा आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे मुलासाठी आमदार जाधव प्रतिष्ठा पणाला लावू शकतात. माजी मंत्री शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम हे पूर्वीपासून अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागात पद गेले तर अण्णांनाच पद मिळणार अशीच अटकळ आहे. रामदास कदमही त्यांच्यासाठी मातोश्रीपर्यंत धाव घेऊ शकतात. यामध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत कुणाची शिफारस करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विविध समिती सभापतिपदांमध्ये चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, स्वप्नाली पाटणे, पूजा नामे, रेश्‍मा झगडे यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उपाध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांना संधी मिळू शकते. विक्रांत जाधव यांचे नाव अध्यक्षपदातून मागे राहीले तर नेत्रा ठाकूर यांची निश्‍चितच वर्णी लागू शकते.  असा राहील कार्यक्रम  अध्यक्ष व सभापतींच्या निवडीसाठी 22 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दुपारी 3 ते 3.15 या काळात छाननी, 3.30 वाजेपर्यंत माघारीसाठीचा कालावधी आहे. त्यानंतर आवश्‍यकता भासल्यास मतदान घेण्यात येईल. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल.        Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दोन जाधवांसह कदम, बने शर्यतीत  रत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापतिपदासाठी 22 मार्चला निवडणूक होणार आहे. पदासाठी दावेदार असलेल्या इच्छुकांनी आपले पत्ते सरकवण्यास आरंभ केला आहे. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव, चिपळूणचे बाळशेठ जाधव तर ज्येष्ठ सदस्य उदय बने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.  चारच दिवसांपूर्वी अध्यक्षांसह सभापतींनी राजीनामे सादर करण्यात होते. त्यानुसार प्रशासनाकडून निवडणुक प्रक्रिया जाहीर केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरुन चढाओढ सुरू झाली आहे. ज्येष्ठ सदस्य उदय बने हे पूर्वीपासूनच संधीच्या प्रतिक्षेत होते. सव्वा वर्षांपूर्वी नवीन चेहरा देण्यासाठी रोहन बने यांना संधी दिली. खुल्या गटासाठी आरक्षण असल्यामुळे यावेळी तरी उदय बनेंच्या ज्येष्ठत्वाचा आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विचार होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे; परंतु त्यांच्या मागे कोणीच गॉडफादर नाही.  मागील चार वर्षात जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्‍यांमध्ये अध्यक्षपद राहीले आहे. त्यामुळे पुन्हा रत्नागिरीला संधी मिळेल का याबाबत साशंकताच व्यक्‍त केली जात आहे. खासदार विनायक राऊत यांच्या गोटातून बाळशेठ जाधव यांच्या नावासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे; मात्र बाळशेठ यांना अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्या नावाचीही चर्चा आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे मुलासाठी आमदार जाधव प्रतिष्ठा पणाला लावू शकतात. माजी मंत्री शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम हे पूर्वीपासून अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागात पद गेले तर अण्णांनाच पद मिळणार अशीच अटकळ आहे. रामदास कदमही त्यांच्यासाठी मातोश्रीपर्यंत धाव घेऊ शकतात. यामध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत कुणाची शिफारस करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विविध समिती सभापतिपदांमध्ये चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, स्वप्नाली पाटणे, पूजा नामे, रेश्‍मा झगडे यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उपाध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांना संधी मिळू शकते. विक्रांत जाधव यांचे नाव अध्यक्षपदातून मागे राहीले तर नेत्रा ठाकूर यांची निश्‍चितच वर्णी लागू शकते.  असा राहील कार्यक्रम  अध्यक्ष व सभापतींच्या निवडीसाठी 22 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दुपारी 3 ते 3.15 या काळात छाननी, 3.30 वाजेपर्यंत माघारीसाठीचा कालावधी आहे. त्यानंतर आवश्‍यकता भासल्यास मतदान घेण्यात येईल. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल.        Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3kPCVyZ

No comments:

Post a Comment