एकदम भारीच! आता महिलांच्या सुरक्षित पर्यटनासाठी 'टाइग्रेस ऑन द ट्रेल'  राज्यातील खासकरुन महिलांसाठी साहसी व सुरक्षित पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री निवासामध्ये महिलांच्या दुचाकी मोहिमेंतर्गत 'टाइग्रेस ऑन द ट्रेल' या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी पर्यटनचे शिव शेखर शुक्ला म्हणाले की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, 'एकल महिला प्रवाशांसाठी' मध्य प्रदेश पूर्णपणे सुरक्षित असून पर्यटनासाठीही राज्य तितकेच लोकप्रिय असल्याचे पर्यटकांना भासवून देण्याचा उद्देश आहे.  दरम्यान, या मोहिमेत देशभरातील 15 महिलांनी दुचाकी चालवत सहभाग नोंदवला होता. भोपाळमधून या मोहिमेस प्रारंभ होऊन मढई, पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना आणि खजुरा मार्गे या मोहिमेची समाप्ती झाली. "टाइग्रेस ऑन द ट्रेल" ही मोहीम 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. श्री. शुक्ला म्हणाले, या यात्रा मार्गाची रचना खूपच सुंदर करण्यात आली होती. या मोहिमेतील सहभागी महिलांना पर्यटनाचा देखील आनंद लुटता यावा, यासाठी मार्गात बदल करण्यात आले होते. राज्यातील विहंगम दृश्यांचा आस्वाद घेत या वाहनचालकांना प्रवासाचा थरार अनुभवता येईल आणि मध्य प्रदेशातील आकर्षक ठिकाणी पर्यटकांची ओळख करुन, ते पर्यटकांना या पर्यटन स्थळांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेविषयी माहिती देऊ शकतील, हा यामागचा उद्देश होता. शुक्ला पुढे म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नवकल्पना राबविण्यात मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड नेहमीच अग्रणी असते. या कालावधीत पर्यटकांना जागृतीसह पर्यटन आणि राज्यातील प्रमुख वन्यजीव पर्यटन स्थळे, मढई, पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना या राष्ट्रीय उद्यानांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 28, 2021

एकदम भारीच! आता महिलांच्या सुरक्षित पर्यटनासाठी 'टाइग्रेस ऑन द ट्रेल'  राज्यातील खासकरुन महिलांसाठी साहसी व सुरक्षित पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री निवासामध्ये महिलांच्या दुचाकी मोहिमेंतर्गत 'टाइग्रेस ऑन द ट्रेल' या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी पर्यटनचे शिव शेखर शुक्ला म्हणाले की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, 'एकल महिला प्रवाशांसाठी' मध्य प्रदेश पूर्णपणे सुरक्षित असून पर्यटनासाठीही राज्य तितकेच लोकप्रिय असल्याचे पर्यटकांना भासवून देण्याचा उद्देश आहे.  दरम्यान, या मोहिमेत देशभरातील 15 महिलांनी दुचाकी चालवत सहभाग नोंदवला होता. भोपाळमधून या मोहिमेस प्रारंभ होऊन मढई, पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना आणि खजुरा मार्गे या मोहिमेची समाप्ती झाली. "टाइग्रेस ऑन द ट्रेल" ही मोहीम 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. श्री. शुक्ला म्हणाले, या यात्रा मार्गाची रचना खूपच सुंदर करण्यात आली होती. या मोहिमेतील सहभागी महिलांना पर्यटनाचा देखील आनंद लुटता यावा, यासाठी मार्गात बदल करण्यात आले होते. राज्यातील विहंगम दृश्यांचा आस्वाद घेत या वाहनचालकांना प्रवासाचा थरार अनुभवता येईल आणि मध्य प्रदेशातील आकर्षक ठिकाणी पर्यटकांची ओळख करुन, ते पर्यटकांना या पर्यटन स्थळांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेविषयी माहिती देऊ शकतील, हा यामागचा उद्देश होता. शुक्ला पुढे म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नवकल्पना राबविण्यात मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड नेहमीच अग्रणी असते. या कालावधीत पर्यटकांना जागृतीसह पर्यटन आणि राज्यातील प्रमुख वन्यजीव पर्यटन स्थळे, मढई, पेंच, कान्हा, बांधवगड, पन्ना या राष्ट्रीय उद्यानांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PiU098

No comments:

Post a Comment