खून, मारामारी, घरफोडीतील 18 गुंड तडीपार; साताऱ्यात पोलिस अधीक्षकांची 4 टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई सातारा : मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न व घरफोडी अशा विविध गुन्ह्यांत सहभागी होऊन जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार टोळ्यांतील 18 गुंडांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.  शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, गर्दी मारामारी तसेच शरीर व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे असलेल्या टोळीतील आमीर इम्तियाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी, ता. सातारा), आमीर सलीम शेख (वय 19, रा. वनवासवाडी), अभिजित ऊर्फ आबू राजू भिसे (वय 18, रा. सैदापूर, ता. सातारा), सौरभ ऊर्फ गोट्या संजय जाधव (वय 20, रा. सैदापूर), जगदीश रामेश्‍वर मते (वय 20, रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी) व आकाश हणमंत पवार (वय 20, रा. सैदापूर) या सहा जणांच्या टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना तडीपार करण्याबाबत शहर पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.  सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राचा निधी द्या; खासदार उदयनराजेंची मंत्री गडकरींकडे मागणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी व मारामारीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी (वय 23), विपुल तानाजी नलवडे (वय 20), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 20), अर्जुन नागराज गोसावी (वय 35) व रवी नीलकंठ घाडगे (वय 25, सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) या पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना तडीपार करण्याबाबत शाहूपुरी पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता. वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गर्दी मारामारी, दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा व सरकारी नोकरास दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील रॉकी निवास घाडगे (वय 29), कृष्णा निवास घाडगे (वय 23) व सनी निवास घाडगे (वय 30, सर्व रा. लाखानगर, सोनगिरवाडी, वाई) या टोळीला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत वाई पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.  फलटणच्या भुयारी गटार योजनेत मोठा भ्रष्टाचार; खासदार निंबाळकरांचे चौकशीचे आदेश कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील आशिष अशोक पाडळकर (वय 32), इंद्रजित हणमंत पवार (वय 24), अनिकेत रमेश शेलार (वय 21, सर्व रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) व सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत, कऱ्हाड) या चार जणांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्हा तसेच कडेगाव, वाळवा, शिराळा या तीन तालुक्‍यांतून तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. या कारवाईमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक व्ही. के. वायकर, वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक मधुकर गुरव यांनी या सर्व प्रस्तावांच्या सुनावणीदरम्यान पुरावा सादर करण्याचे काम केले.  साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 5, 2021

खून, मारामारी, घरफोडीतील 18 गुंड तडीपार; साताऱ्यात पोलिस अधीक्षकांची 4 टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई सातारा : मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न व घरफोडी अशा विविध गुन्ह्यांत सहभागी होऊन जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार टोळ्यांतील 18 गुंडांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.  शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, गर्दी मारामारी तसेच शरीर व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे असलेल्या टोळीतील आमीर इम्तियाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी, ता. सातारा), आमीर सलीम शेख (वय 19, रा. वनवासवाडी), अभिजित ऊर्फ आबू राजू भिसे (वय 18, रा. सैदापूर, ता. सातारा), सौरभ ऊर्फ गोट्या संजय जाधव (वय 20, रा. सैदापूर), जगदीश रामेश्‍वर मते (वय 20, रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी) व आकाश हणमंत पवार (वय 20, रा. सैदापूर) या सहा जणांच्या टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना तडीपार करण्याबाबत शहर पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.  सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राचा निधी द्या; खासदार उदयनराजेंची मंत्री गडकरींकडे मागणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी व मारामारीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील सागर नागराज गोसावी (वय 23), विपुल तानाजी नलवडे (वय 20), अक्षय रंगनाथ लोखंडे (वय 20), अर्जुन नागराज गोसावी (वय 35) व रवी नीलकंठ घाडगे (वय 25, सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) या पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना तडीपार करण्याबाबत शाहूपुरी पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता. वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गर्दी मारामारी, दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा व सरकारी नोकरास दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील रॉकी निवास घाडगे (वय 29), कृष्णा निवास घाडगे (वय 23) व सनी निवास घाडगे (वय 30, सर्व रा. लाखानगर, सोनगिरवाडी, वाई) या टोळीला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत वाई पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.  फलटणच्या भुयारी गटार योजनेत मोठा भ्रष्टाचार; खासदार निंबाळकरांचे चौकशीचे आदेश कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत करणे असे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील आशिष अशोक पाडळकर (वय 32), इंद्रजित हणमंत पवार (वय 24), अनिकेत रमेश शेलार (वय 21, सर्व रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) व सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत, कऱ्हाड) या चार जणांना दोन वर्षांसाठी सातारा जिल्हा तसेच कडेगाव, वाळवा, शिराळा या तीन तालुक्‍यांतून तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. या कारवाईमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक व्ही. के. वायकर, वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक मधुकर गुरव यांनी या सर्व प्रस्तावांच्या सुनावणीदरम्यान पुरावा सादर करण्याचे काम केले.  साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संपादन : बाळकृष्ण मधाळे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uYdi3D

No comments:

Post a Comment