भंगाराच्या आडून दारू वाहतूक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - भंगाराच्या आडून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अजय महेश शर्मा आणि गिरिधारी परसंधारी गुंनेर (दोघेही रा. इंदौर मध्यप्रदेश), अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 12 लाखाच्या दारूसह एकूण 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बावळट येथे काल (ता.26) रात्री उशिरा करण्यात आली.  जिल्हा वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी बावळट तिठा येथे सापळा रचला होता. गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने टेम्पोतून दारू वाहतूक होत असलेली माहिती त्यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वटकर, पोलिस अंमलदार अजित घाडी, वाहतूक पोलीस विलास नर, प्रशांत धुमाळे, मयुर सावंत, श्री. संकपाळ, श्री. नर यांनी येणाऱ्या आयशर टेम्पोला थांबविले. यावेळी पोलिसांनी टेम्पोमध्ये पाहिले असता भंगाराचे बॅरल दिसून आले. यापूर्वीही दोन दिवसापूर्वी पोलिसांनी असेच ट्रकमध्ये बॅरल टाकून त्याखाली दारू वाहतूक करताना 40 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. या दाट संशयावरून पोलिसांनी टेम्पोमध्ये पाहणी केली असता त्यांना दारूचे बॉक्‍स दिसून आले. सर्व भंगाराचे बॅरल बाजूला हटवून यात सुमारे पाचशेहुन जास्त दारूचे बॉक्‍स पोलिसांकडून जप्त करण्यात आले. त्यामध्ये सुमारे 12 लाख 4 हजार 800 रुपयांची दारू आणि 10 लाख रुपयाचा टेम्पो असा मिळून तब्बल 22 लाख 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. बावळाट तिठा येथे दोन दिवसातील पुन्हा मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.  चार दिवसांची पोलिस कोठडी  याप्रकरणी मध्यप्रदेश इंदोर येथील दोघांना ताब्यात घेत येथील पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील ऍड. स्वप्निल कोलगावकर म्हणाले, की ही दारू वाहतूक गोवा ते नांदेड, अशी होत होती. यामागे गोव्यातून राज्यभरात दारू वाहतूक करण्यामध्ये एखादे रॅकेट असू शकते. त्यामुळे या मागचा सूत्रधार शोधणे आवश्‍यक असून या तपाससाठी पोलिस कोठडी सुनावण्यात यावी. ही मागणी मान्य करून या दोन्ही संशयितांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 27, 2021

भंगाराच्या आडून दारू वाहतूक  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - भंगाराच्या आडून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अजय महेश शर्मा आणि गिरिधारी परसंधारी गुंनेर (दोघेही रा. इंदौर मध्यप्रदेश), अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 12 लाखाच्या दारूसह एकूण 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बावळट येथे काल (ता.26) रात्री उशिरा करण्यात आली.  जिल्हा वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी बावळट तिठा येथे सापळा रचला होता. गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने टेम्पोतून दारू वाहतूक होत असलेली माहिती त्यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वटकर, पोलिस अंमलदार अजित घाडी, वाहतूक पोलीस विलास नर, प्रशांत धुमाळे, मयुर सावंत, श्री. संकपाळ, श्री. नर यांनी येणाऱ्या आयशर टेम्पोला थांबविले. यावेळी पोलिसांनी टेम्पोमध्ये पाहिले असता भंगाराचे बॅरल दिसून आले. यापूर्वीही दोन दिवसापूर्वी पोलिसांनी असेच ट्रकमध्ये बॅरल टाकून त्याखाली दारू वाहतूक करताना 40 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. या दाट संशयावरून पोलिसांनी टेम्पोमध्ये पाहणी केली असता त्यांना दारूचे बॉक्‍स दिसून आले. सर्व भंगाराचे बॅरल बाजूला हटवून यात सुमारे पाचशेहुन जास्त दारूचे बॉक्‍स पोलिसांकडून जप्त करण्यात आले. त्यामध्ये सुमारे 12 लाख 4 हजार 800 रुपयांची दारू आणि 10 लाख रुपयाचा टेम्पो असा मिळून तब्बल 22 लाख 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. बावळाट तिठा येथे दोन दिवसातील पुन्हा मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.  चार दिवसांची पोलिस कोठडी  याप्रकरणी मध्यप्रदेश इंदोर येथील दोघांना ताब्यात घेत येथील पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील ऍड. स्वप्निल कोलगावकर म्हणाले, की ही दारू वाहतूक गोवा ते नांदेड, अशी होत होती. यामागे गोव्यातून राज्यभरात दारू वाहतूक करण्यामध्ये एखादे रॅकेट असू शकते. त्यामुळे या मागचा सूत्रधार शोधणे आवश्‍यक असून या तपाससाठी पोलिस कोठडी सुनावण्यात यावी. ही मागणी मान्य करून या दोन्ही संशयितांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3w4d1Ne

No comments:

Post a Comment