10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती नागपूर : परीक्षांच्या काळात अभ्यास करताना सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे तुमचा आहार. अभ्यासादरम्यान टाइम टेबल, वेळेचं नियोजन या गोष्ट जश्या महत्वाच्या आहेत तसाच तुमच्या आहाराकडे लक्ष असणंही आवश्यक आहे. अनेकदा भरपूर अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडते ज्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. याचप्रमुख कारण म्हणजे असंतुलित आहार. विद्यार्थी अभ्यास तर करतात मात्र खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. मात्र आता चिंता करू नका. परीक्षांच्या काळात तुमचा आहार कसा असायला हवा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.   दिवसभरातील आहार टप्यांमध्ये वाटून घ्या  परीक्षांचे आणि अभ्यासाचे दिवस म्हंटलं की तुमचा आहार सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण पोटभर करण्याऐवजी तुमचं जेवण किंवा नाश्ता काही टप्प्यांमध्ये वाटून घ्या. एकाच वेळी पोटभर जेवल्यामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते. त्याचप्रमाणे अभ्यासादरम्यान झोपही येऊ शकते. म्हणूनच दिवसभरात थोडं फार काही वेळानं खात राहा.  जंक फूडपासून दूर राहा  अभ्यासादरम्यान आणि परीक्षा चालू असताना चुकूनही जंक फूड खाऊ नका. बाहेरचं रस्त्यावरचं खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीचा त्रास होऊ शकतो. तसंच अपचन झाल्यामुळे अभ्यासात लक्ष लागू शकत नाही. कोरोनाकाळात बाहेरचे पदार्थ तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच जण फूड खाणं टाळा.  भरपूर पाणी प्या  बोर्डाच्या परीक्षा उन्हाळ्यातच असतात आणि उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची आवश्य्कता असते. त्यामुळे भरपूर पाणी पिणं हे तुमच्या आरोगासाठी उत्तम राहील. अभ्यासाच्या दरम्यान सतत पाणी पित राहा किंवा काही वेळानं फळांचा ज्यूस घेत राहा. यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल तसंच तुम्हाला कधीच उन्हाचा त्रास होणार नाही. म्हणूनच दिवसभरातून कमान २ ते २.५ लिटर पाणी नक्की प्या.  पौष्टिक अन्नपदार्थांचं सेवन करा  परीक्षांच्या काळात तुम्ही खात असलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट पदार्थांचा परिणाम तुमच्या बुद्धीवर होत असतो. त्यामुळे पौष्टिक अन्नपदार्थ खाणं उत्तम राहील. तुमच्या दररोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं, मांसाहारी पदार्थांमध्ये मासोळी यांचं समावेश नक्की करा. त्याचबरोबर शक्य असल्यास दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुका मेवा घालून दूध प्या. यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.  तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा  उन्हाळाच्या दिवसांमध्ये तेलकट किंवा अति तिखट खाल्ल्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. तसंच तुमच्या शरीरातील उष्णता वाढून तुमची प्रकृती बिघडू शकते. म्हणूनच परीक्षेच्या काळात तिखट आणि तेलकट पदार्थ खाणं टाळा.  चॉकलेट खा हे वाचून तुमचा आनंद द्विगुणित झाला असेलच. हो हे खरंय. चॉकलेट हे एका प्रकारे ताण कमी करण्याचं काम करतं.म्हणून दिसभरातुन एक चॉकलेट नक्की खा. मात्र चॉकलेटचं अति सेवन तुमच्या प्रकृतीसाठी हानिकारक असू शकतं. त्यामुळे एका लहान  चॉकलेटपेक्षा अधिक चॉकलेट खाऊ नका. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 6, 2021

10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती नागपूर : परीक्षांच्या काळात अभ्यास करताना सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे तुमचा आहार. अभ्यासादरम्यान टाइम टेबल, वेळेचं नियोजन या गोष्ट जश्या महत्वाच्या आहेत तसाच तुमच्या आहाराकडे लक्ष असणंही आवश्यक आहे. अनेकदा भरपूर अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडते ज्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. याचप्रमुख कारण म्हणजे असंतुलित आहार. विद्यार्थी अभ्यास तर करतात मात्र खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. मात्र आता चिंता करू नका. परीक्षांच्या काळात तुमचा आहार कसा असायला हवा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.   दिवसभरातील आहार टप्यांमध्ये वाटून घ्या  परीक्षांचे आणि अभ्यासाचे दिवस म्हंटलं की तुमचा आहार सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण पोटभर करण्याऐवजी तुमचं जेवण किंवा नाश्ता काही टप्प्यांमध्ये वाटून घ्या. एकाच वेळी पोटभर जेवल्यामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते. त्याचप्रमाणे अभ्यासादरम्यान झोपही येऊ शकते. म्हणूनच दिवसभरात थोडं फार काही वेळानं खात राहा.  जंक फूडपासून दूर राहा  अभ्यासादरम्यान आणि परीक्षा चालू असताना चुकूनही जंक फूड खाऊ नका. बाहेरचं रस्त्यावरचं खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटासंबंधीचा त्रास होऊ शकतो. तसंच अपचन झाल्यामुळे अभ्यासात लक्ष लागू शकत नाही. कोरोनाकाळात बाहेरचे पदार्थ तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच जण फूड खाणं टाळा.  भरपूर पाणी प्या  बोर्डाच्या परीक्षा उन्हाळ्यातच असतात आणि उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची आवश्य्कता असते. त्यामुळे भरपूर पाणी पिणं हे तुमच्या आरोगासाठी उत्तम राहील. अभ्यासाच्या दरम्यान सतत पाणी पित राहा किंवा काही वेळानं फळांचा ज्यूस घेत राहा. यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल तसंच तुम्हाला कधीच उन्हाचा त्रास होणार नाही. म्हणूनच दिवसभरातून कमान २ ते २.५ लिटर पाणी नक्की प्या.  पौष्टिक अन्नपदार्थांचं सेवन करा  परीक्षांच्या काळात तुम्ही खात असलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट पदार्थांचा परिणाम तुमच्या बुद्धीवर होत असतो. त्यामुळे पौष्टिक अन्नपदार्थ खाणं उत्तम राहील. तुमच्या दररोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळं, मांसाहारी पदार्थांमध्ये मासोळी यांचं समावेश नक्की करा. त्याचबरोबर शक्य असल्यास दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुका मेवा घालून दूध प्या. यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होईल.  तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा  उन्हाळाच्या दिवसांमध्ये तेलकट किंवा अति तिखट खाल्ल्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. तसंच तुमच्या शरीरातील उष्णता वाढून तुमची प्रकृती बिघडू शकते. म्हणूनच परीक्षेच्या काळात तिखट आणि तेलकट पदार्थ खाणं टाळा.  चॉकलेट खा हे वाचून तुमचा आनंद द्विगुणित झाला असेलच. हो हे खरंय. चॉकलेट हे एका प्रकारे ताण कमी करण्याचं काम करतं.म्हणून दिसभरातुन एक चॉकलेट नक्की खा. मात्र चॉकलेटचं अति सेवन तुमच्या प्रकृतीसाठी हानिकारक असू शकतं. त्यामुळे एका लहान  चॉकलेटपेक्षा अधिक चॉकलेट खाऊ नका. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3v1ByCg

No comments:

Post a Comment