स्थायी समितीत उपनगरांमधील नगरसेवकांना स्थान; रासनेंना पुन्हा संधी पुणे - महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नवी राजकीय समीकरणे जुळवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीत सहा सदस्यांची निवड केली. स्थायीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची मुदत संपूनही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सत्तेत आतापर्यंत पद न मिळालेल्या विशेषत: उपनगरांमधील नगरसेवकांना समितीत स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही दोन नव्या नगरसेवकांना मान दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्थायी समितीच्या सदस्यांची मंगळवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. भाजपकडून रासने यांच्यासह राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, महेश वाबळे, मनीषा कदम आणि अर्चना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी उपमहापौर सुनील ऊर्फ बंडू गायकवाड, प्रदीप गायकवाड यांना संधी दिली आहे. काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त समितीत १६ पैकी १० भाजप, राष्ट्रवादीचे चार आणि कॉंग्रेस-शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यातील भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोघांची मुदत संपली होती. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड करण्यात आली.  महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने स्थायीचे सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रयत्न चालविले होते. विशेषत: सत्ताधारी भाजपमध्ये चुरस होती. निवडणुकीच्या आधीचे हे वर्ष महत्त्वाचे असल्याने भाजपनेही समितीची जबाबदारी अनुभवी सदस्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यातून रासने यांची मुदत संपूनही त्यांची निवड करण्यात आली. दुसरीकडे, नव्या चेहऱ्यांनाही प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे.  Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' नाराजी दूर होण्याची आशा समितीसाठी भाजपमधून अडीच डझन, तर राष्ट्रवादीकडून दहा नगरसेवक इच्छुक होते. परंतु गेल्या चार वर्षांत ज्यांना सत्तेत महत्त्वाचे पद मिळाले नाही, अशांना संधी देण्याची भूमिका पक्षनेतृत्वाने घेतली होती. भाजपमध्ये उपनगरांमधील काही नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कात्रज, धायरी, नगर रस्ता, सहकारनगरमधील नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नाराजी दूर होण्याची आशा भाजप नेतृत्वाला आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

स्थायी समितीत उपनगरांमधील नगरसेवकांना स्थान; रासनेंना पुन्हा संधी पुणे - महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नवी राजकीय समीकरणे जुळवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीत सहा सदस्यांची निवड केली. स्थायीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची मुदत संपूनही त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सत्तेत आतापर्यंत पद न मिळालेल्या विशेषत: उपनगरांमधील नगरसेवकांना समितीत स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही दोन नव्या नगरसेवकांना मान दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा स्थायी समितीच्या सदस्यांची मंगळवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. भाजपकडून रासने यांच्यासह राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, महेश वाबळे, मनीषा कदम आणि अर्चना पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी उपमहापौर सुनील ऊर्फ बंडू गायकवाड, प्रदीप गायकवाड यांना संधी दिली आहे. काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त समितीत १६ पैकी १० भाजप, राष्ट्रवादीचे चार आणि कॉंग्रेस-शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यातील भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोघांची मुदत संपली होती. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड करण्यात आली.  महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने स्थायीचे सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रयत्न चालविले होते. विशेषत: सत्ताधारी भाजपमध्ये चुरस होती. निवडणुकीच्या आधीचे हे वर्ष महत्त्वाचे असल्याने भाजपनेही समितीची जबाबदारी अनुभवी सदस्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यातून रासने यांची मुदत संपूनही त्यांची निवड करण्यात आली. दुसरीकडे, नव्या चेहऱ्यांनाही प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे.  Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' नाराजी दूर होण्याची आशा समितीसाठी भाजपमधून अडीच डझन, तर राष्ट्रवादीकडून दहा नगरसेवक इच्छुक होते. परंतु गेल्या चार वर्षांत ज्यांना सत्तेत महत्त्वाचे पद मिळाले नाही, अशांना संधी देण्याची भूमिका पक्षनेतृत्वाने घेतली होती. भाजपमध्ये उपनगरांमधील काही नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कात्रज, धायरी, नगर रस्ता, सहकारनगरमधील नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नाराजी दूर होण्याची आशा भाजप नेतृत्वाला आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3s4ftAn

No comments:

Post a Comment