पिंपरी-चिंचवडच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ नाही पिंपरी - कोरोना व लॉकडाउनमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करवाढ सुचवली जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, कोणतीही करवाढ न करता तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे बुधवारी सादर केले. कठीण समयी गावचा पाटील जनतेला मदत करतो. त्याप्रमाणे, आयुक्त पाटील यांनी अंदाजपत्रकात आपली पाटिलकी दाखवली.  महापालिकेचे २०२०-२१ चे सुधारित व २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त पाटील यांनी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे सादर केले. त्यात अपेक्षित उत्पन्न पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख धरले असून, अपेक्षित खर्च पाच कोटी ५८६ कोटी ३५ लाख रुपये आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह सुमारे सात हजार ११२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यावर स्थायी समिती सदस्य अभ्यास करून काही बदल सुचवू शकतात. त्यासाठी बुधवार (ता. २४) दुपारी दोन वाजेपर्यंत सभा तहकूब केली. अंदाजपत्रकावर बुधवारी चर्चा होणार आहे. भविष्यातील सर्वाधिक पसंतीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहण्यायोग्य शहर बनविण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी, विविध विकासकामांसाठी एक हजार ६३० कोटी भरीव रकमेची तरतूद केली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’, ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयांसाठी ३२ कोटी ३२ लाख, ६८ कोटी दोन लाख, ७० कोटी ५५ लाख, २५ कोटी २७ लाख, ४२ कोटी ९४ लाख, २९ कोटी ४७ लाख, २४ कोटी सात लाख, ३८ कोटी ८९ लाख इतकी तरतूद केली आहे. शहरी गरीब, महिला, दिव्यांग, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महत्त्वाचे उपक्रम पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा १४० फूट उंचीचा पुतळा उभारणे चिखली जाधववाडी गट नंबर ६०६ आरक्षण १/४४६  येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणे बोऱ्हाडेवाडी येथील गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधणे थेरगाव सर्व्हे क्रमांक नऊ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे थेरगाव बापूजीबुआनगर येथील सर्व्हे क्रमांक नऊमध्ये दवाखाना बांधणे महापालिका दिलीप वेंगसकर अकादमीच्या पॅव्हेलियनचे उर्वरित काम करणे थेरगाव येथे डीपी आरक्षण ६२८ येथील खेळाचे मैदान विकसित करणे लोहगाव विमानतळाला जोडणारा चऱ्होलीतील ३० मीटर रस्त्याचे भूसंपादन पूर्ण करणे पुणे-नाशिक महामार्गासाठी भूसंपादन करणे मोशी येथील सर्व्हे क्रमांक १४४ आरक्षण १/२०४ येथे बहुउद्देशीय स्टेडियम बांधणे चिखली येथील गट क्रमांक १६५३ व १६५४ मध्ये रुग्णालय बांधणे सांगवी-किवळे रस्त्यावरील पवना नदीवर बास्केट पुलाशेजारी समांतर पूल बांधणे सांगवी-बोपोडी जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधणे बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण करणे नाशिक फाटा ते वाकड फ्री-वे करणे नाशिक महामार्गावरील पांजरपोळ ते आळंदी रस्त्यापर्यंत रस्ता विकसित करणे नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावर सुदर्शननगर येथे ग्रेडसेपरेटर बांधणे विशालनगर-पिंपळेनिलख व आकुर्डी रेल्वस्थानक परिसरातील चार रस्ते अर्बन स्ट्रीट संकल्पनेनुसार १८ ते २४ मीटर रुंद विकसित करणे भोसरीतीत राजमाता जिजाऊ पुलाखाली आणि एम्पायर इस्टेट पुलाखाली अर्बन स्ट्रीटनुसार विकास करणे तळवडे व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाल्हेकरवाडी ते ताथवडेपर्यंतचा स्पाईन रस्ता विकसित करणे व पवना नदीवर पूल बांधणे पिंपरी-चिंचवड विजांच्या कडकडाटासह पाऊस; शहरवासियांची धांदल शहर विकासासाठी... पाणीपुरवठा पिंपरी-चिंचवड शहराचा सध्याचा विकास वेग व भविष्यातील लोकसंख्या विचारात घेता नवीन जलस्रोतांमधील पाणी आरक्षित करणे आवश्यक आहे. महापालिकेने आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन व भामा-आसखेड प्रकल्पातून १६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी कोटा आरक्षित केला आहे. या धरणांतून पाणी आणणे, चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी व मोशी परिसरात पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. कामाची मुदत २४ महिने आहे. ७९ कोटी खर्च अपेक्षित आहे. निघोजे-तळवडे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ४३ कोटी २७ लाख खर्च अपेक्षित आहे. सद्यःस्थितीत भामा-आसखेड जॅकवेल ते मुख्य जलवाहिनी टाकण्याचा आदेश दिला आहे. निघोजे-तळवडे येथे १०० दशलक्ष लिटर व भामा-आसखेडमधून २०० दशलश्क्ष लिटर पाणी उचलण्यासाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे आहे. भामा आसखेड येथे जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे, नवलाख उंबरे येथे बीपीटी काम प्रगतिपथावर आहे. शहरास या स्रोतातून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी १८३ कोटी तरतूद आहे. तसेच, रावेत येथील पवना नदीवरील जुन्या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी २५ लाख तरतूद ठेवली आहे.  नाशिक फाटा ते वाकड आता सुसाट; पिंपरी-चिंचवड महापालिकेचं बजेट सादर सारथी हेल्पलाइन शहरातील नागरिकांना त्यांचे दैनंदिन महापालिकेच्या कामांसंबंधी अडचणींचे त्वरित निवारण होण्यासाठी महापालिकेने ‘चोवीस बाय सात’ सारथी हेल्पलाइन सुविधा निर्माण करून दिली आहे. त्यावर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे त्वरित संबंधित विभागाकडून निवारण केले जाते. यासाठी सारथी हेल्पलाइन सुविधा पुरविणे, चालन करणे व देखभाल व लेखाशिर्षावर ६५ लाख रुपये तरतूद सुचविली आहे. सिटी ट्रान्सफॉर्मेशन कार्यालय पिंपरी-चिंचवड शहराच्या लाभार्थीत सुधारणा व दीर्घकालीन धोरण विकसित करण्यासाठी शहर परिवर्तनाचे उद्दिष्ट साधण्याकरिता जानेवारी २०१८ पासून शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना महापालिकेच्या इमारतीत केली आहे. शहराची तुलना भारतीय आणि निवडक जागतिक शहरांशी करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपूरक शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करणे व शहरविकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करण्यासाठी २०३० पर्यंतचे नियोजन करून पिंपरी-चिवड शहर परिवर्तन आराखडा हे विकास धोरण तयार करण्यात आले आहे. या आराखड्यातील समाविष्ट प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच कोटी तरतूद आहे. Video : कोरोनातून सावरुन मदतीला धावणारा अवलिया महिला स्वावलंबन कार्यक्रम महिला बचतगटासाठी मिशन स्वावलंबन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळ संस्थेची मदत घेतली आहे. त्याअंतर्गत शहरातील महिला बचतगटांचे सर्व्हेक्षण करणे, बचतगटांची क्षमता विकसित करणे, कौशल्य वाढविणे, कौशल्य सुधारणे, बचतगटांना विविध बँक व वित्तीय संस्थांमार्फत कर्ज प्रक्रियेत आणणे, मायक्रो फायनान्स, विमा, आरोग्य विमा आदी सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यमान सदस्यांचे जीवनमान सुधारणे. त्यांच्या व्यवसायाला मार्केटसाठी साहाय्य उपलब्ध करून देणे. बॅंक लिंकेज करणे, पॅकेजिंग, ब्रॅंडिंग, लेबलिंग कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण करण्याचे नियोजन आहे. स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा केंद्र) राज्य सरकारच्या आदेशानुसार महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा कक्ष) उभारण्यात येत आहे. महिलांच्या अडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणे, कौटुंबिक हिंसाचार पीडित, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जाणाऱ्या महिलांना कायदेशीर आणि सायबर गुन्ह्यांबाबत सल्ला देणे व समुपदेशन करणे, केंद्र- राज्य व महापालिकेमार्फत  महिलांसाठी आखलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे.  घनकचरा व्यवस्थापन शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यावर आधारित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात रोज ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून १४ मेगावॉट विजनिर्मिती होईल. पाच रुपये प्रतियुनिट दराने ती महापालिकेस २० वर्षांसाठी प्राप्त होईल. तसेच, कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने अधिकची जागा उपलब्ध होईल. शहरातील विविध हॉटेल व इतर ठिकाणांहून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून अत्याधुनिक बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. त्याची निविदा कार्यवाही चालू आहे. पाण्याचा पुनर्वापर सद्यःस्थितीत नऊ ठिकाणी १४ मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये सुमारे २६५ ते २७० दशलक्ष लिटर घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण झाले आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी संपूर्ण शहराचा अभ्यास करून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत चिखली मैलाशुध्दीकरण केंद्र येथे प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू असून त्यामधून शुद्ध केलेले पाणी मोशी येथील प्रकल्पासाठी पुरविण्यात येत आहे. नदी पुनरुज्जीवन शहरातील पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करून नदीकाठ सुशोभीकरण करण्यासाठी पूर्ण नद्यांचा सर्व्हे करून विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्ती केली आहे. सद्यःस्थितीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूचा प्रकल्प अहवाल तयार आहे. नदीकाठ सुधारण्याचे काम केले जाणार आहे. वैद्यकीय व आरोग्य महापालिकेच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात वैद्यकीयसाठी २२२ आणि आरोग्यासाठी ३४९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात या विभागांसाठी अनुक्रमे १०१ व १०७ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. गरज भासल्यास या विभागांसाठी नंतरही तरतूद करता येते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3s85YAg - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 18, 2021

पिंपरी-चिंचवडच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ नाही पिंपरी - कोरोना व लॉकडाउनमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करवाढ सुचवली जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, कोणतीही करवाढ न करता तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे बुधवारी सादर केले. कठीण समयी गावचा पाटील जनतेला मदत करतो. त्याप्रमाणे, आयुक्त पाटील यांनी अंदाजपत्रकात आपली पाटिलकी दाखवली.  महापालिकेचे २०२०-२१ चे सुधारित व २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त पाटील यांनी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे सादर केले. त्यात अपेक्षित उत्पन्न पाच हजार ५८८ कोटी ७८ लाख धरले असून, अपेक्षित खर्च पाच कोटी ५८६ कोटी ३५ लाख रुपये आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह सुमारे सात हजार ११२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यावर स्थायी समिती सदस्य अभ्यास करून काही बदल सुचवू शकतात. त्यासाठी बुधवार (ता. २४) दुपारी दोन वाजेपर्यंत सभा तहकूब केली. अंदाजपत्रकावर बुधवारी चर्चा होणार आहे. भविष्यातील सर्वाधिक पसंतीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहण्यायोग्य शहर बनविण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी, विविध विकासकामांसाठी एक हजार ६३० कोटी भरीव रकमेची तरतूद केली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’, ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयांसाठी ३२ कोटी ३२ लाख, ६८ कोटी दोन लाख, ७० कोटी ५५ लाख, २५ कोटी २७ लाख, ४२ कोटी ९४ लाख, २९ कोटी ४७ लाख, २४ कोटी सात लाख, ३८ कोटी ८९ लाख इतकी तरतूद केली आहे. शहरी गरीब, महिला, दिव्यांग, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महत्त्वाचे उपक्रम पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा १४० फूट उंचीचा पुतळा उभारणे चिखली जाधववाडी गट नंबर ६०६ आरक्षण १/४४६  येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणे बोऱ्हाडेवाडी येथील गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधणे थेरगाव सर्व्हे क्रमांक नऊ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे थेरगाव बापूजीबुआनगर येथील सर्व्हे क्रमांक नऊमध्ये दवाखाना बांधणे महापालिका दिलीप वेंगसकर अकादमीच्या पॅव्हेलियनचे उर्वरित काम करणे थेरगाव येथे डीपी आरक्षण ६२८ येथील खेळाचे मैदान विकसित करणे लोहगाव विमानतळाला जोडणारा चऱ्होलीतील ३० मीटर रस्त्याचे भूसंपादन पूर्ण करणे पुणे-नाशिक महामार्गासाठी भूसंपादन करणे मोशी येथील सर्व्हे क्रमांक १४४ आरक्षण १/२०४ येथे बहुउद्देशीय स्टेडियम बांधणे चिखली येथील गट क्रमांक १६५३ व १६५४ मध्ये रुग्णालय बांधणे सांगवी-किवळे रस्त्यावरील पवना नदीवर बास्केट पुलाशेजारी समांतर पूल बांधणे सांगवी-बोपोडी जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधणे बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण करणे नाशिक फाटा ते वाकड फ्री-वे करणे नाशिक महामार्गावरील पांजरपोळ ते आळंदी रस्त्यापर्यंत रस्ता विकसित करणे नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावर सुदर्शननगर येथे ग्रेडसेपरेटर बांधणे विशालनगर-पिंपळेनिलख व आकुर्डी रेल्वस्थानक परिसरातील चार रस्ते अर्बन स्ट्रीट संकल्पनेनुसार १८ ते २४ मीटर रुंद विकसित करणे भोसरीतीत राजमाता जिजाऊ पुलाखाली आणि एम्पायर इस्टेट पुलाखाली अर्बन स्ट्रीटनुसार विकास करणे तळवडे व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाल्हेकरवाडी ते ताथवडेपर्यंतचा स्पाईन रस्ता विकसित करणे व पवना नदीवर पूल बांधणे पिंपरी-चिंचवड विजांच्या कडकडाटासह पाऊस; शहरवासियांची धांदल शहर विकासासाठी... पाणीपुरवठा पिंपरी-चिंचवड शहराचा सध्याचा विकास वेग व भविष्यातील लोकसंख्या विचारात घेता नवीन जलस्रोतांमधील पाणी आरक्षित करणे आवश्यक आहे. महापालिकेने आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन व भामा-आसखेड प्रकल्पातून १६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी कोटा आरक्षित केला आहे. या धरणांतून पाणी आणणे, चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी व मोशी परिसरात पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. कामाची मुदत २४ महिने आहे. ७९ कोटी खर्च अपेक्षित आहे. निघोजे-तळवडे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ४३ कोटी २७ लाख खर्च अपेक्षित आहे. सद्यःस्थितीत भामा-आसखेड जॅकवेल ते मुख्य जलवाहिनी टाकण्याचा आदेश दिला आहे. निघोजे-तळवडे येथे १०० दशलक्ष लिटर व भामा-आसखेडमधून २०० दशलश्क्ष लिटर पाणी उचलण्यासाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे आहे. भामा आसखेड येथे जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे, नवलाख उंबरे येथे बीपीटी काम प्रगतिपथावर आहे. शहरास या स्रोतातून पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी १८३ कोटी तरतूद आहे. तसेच, रावेत येथील पवना नदीवरील जुन्या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी २५ लाख तरतूद ठेवली आहे.  नाशिक फाटा ते वाकड आता सुसाट; पिंपरी-चिंचवड महापालिकेचं बजेट सादर सारथी हेल्पलाइन शहरातील नागरिकांना त्यांचे दैनंदिन महापालिकेच्या कामांसंबंधी अडचणींचे त्वरित निवारण होण्यासाठी महापालिकेने ‘चोवीस बाय सात’ सारथी हेल्पलाइन सुविधा निर्माण करून दिली आहे. त्यावर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे त्वरित संबंधित विभागाकडून निवारण केले जाते. यासाठी सारथी हेल्पलाइन सुविधा पुरविणे, चालन करणे व देखभाल व लेखाशिर्षावर ६५ लाख रुपये तरतूद सुचविली आहे. सिटी ट्रान्सफॉर्मेशन कार्यालय पिंपरी-चिंचवड शहराच्या लाभार्थीत सुधारणा व दीर्घकालीन धोरण विकसित करण्यासाठी शहर परिवर्तनाचे उद्दिष्ट साधण्याकरिता जानेवारी २०१८ पासून शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना महापालिकेच्या इमारतीत केली आहे. शहराची तुलना भारतीय आणि निवडक जागतिक शहरांशी करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपूरक शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करणे व शहरविकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करण्यासाठी २०३० पर्यंतचे नियोजन करून पिंपरी-चिवड शहर परिवर्तन आराखडा हे विकास धोरण तयार करण्यात आले आहे. या आराखड्यातील समाविष्ट प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच कोटी तरतूद आहे. Video : कोरोनातून सावरुन मदतीला धावणारा अवलिया महिला स्वावलंबन कार्यक्रम महिला बचतगटासाठी मिशन स्वावलंबन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळ संस्थेची मदत घेतली आहे. त्याअंतर्गत शहरातील महिला बचतगटांचे सर्व्हेक्षण करणे, बचतगटांची क्षमता विकसित करणे, कौशल्य वाढविणे, कौशल्य सुधारणे, बचतगटांना विविध बँक व वित्तीय संस्थांमार्फत कर्ज प्रक्रियेत आणणे, मायक्रो फायनान्स, विमा, आरोग्य विमा आदी सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यमान सदस्यांचे जीवनमान सुधारणे. त्यांच्या व्यवसायाला मार्केटसाठी साहाय्य उपलब्ध करून देणे. बॅंक लिंकेज करणे, पॅकेजिंग, ब्रॅंडिंग, लेबलिंग कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण करण्याचे नियोजन आहे. स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा केंद्र) राज्य सरकारच्या आदेशानुसार महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा कक्ष) उभारण्यात येत आहे. महिलांच्या अडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणे, कौटुंबिक हिंसाचार पीडित, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जाणाऱ्या महिलांना कायदेशीर आणि सायबर गुन्ह्यांबाबत सल्ला देणे व समुपदेशन करणे, केंद्र- राज्य व महापालिकेमार्फत  महिलांसाठी आखलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे.  घनकचरा व्यवस्थापन शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यावर आधारित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात रोज ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून १४ मेगावॉट विजनिर्मिती होईल. पाच रुपये प्रतियुनिट दराने ती महापालिकेस २० वर्षांसाठी प्राप्त होईल. तसेच, कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने अधिकची जागा उपलब्ध होईल. शहरातील विविध हॉटेल व इतर ठिकाणांहून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून अत्याधुनिक बायोगॅस प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. त्याची निविदा कार्यवाही चालू आहे. पाण्याचा पुनर्वापर सद्यःस्थितीत नऊ ठिकाणी १४ मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये सुमारे २६५ ते २७० दशलक्ष लिटर घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण झाले आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी संपूर्ण शहराचा अभ्यास करून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत चिखली मैलाशुध्दीकरण केंद्र येथे प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू असून त्यामधून शुद्ध केलेले पाणी मोशी येथील प्रकल्पासाठी पुरविण्यात येत आहे. नदी पुनरुज्जीवन शहरातील पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करून नदीकाठ सुशोभीकरण करण्यासाठी पूर्ण नद्यांचा सर्व्हे करून विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्ती केली आहे. सद्यःस्थितीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूचा प्रकल्प अहवाल तयार आहे. नदीकाठ सुधारण्याचे काम केले जाणार आहे. वैद्यकीय व आरोग्य महापालिकेच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात वैद्यकीयसाठी २२२ आणि आरोग्यासाठी ३४९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात या विभागांसाठी अनुक्रमे १०१ व १०७ कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे. गरज भासल्यास या विभागांसाठी नंतरही तरतूद करता येते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/3s85YAg


via Tajya news Feeds https://ift.tt/3rZ4Lvc

No comments:

Post a Comment