टपाल खात्याला ‘एइपीएस’चा ‘आधार’ पिंपरी - टपाल खात्याच्या आधार अनेबल पेमेंट सिस्टिम (एइपीएस) या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये गर्दी व रांगेत ताटकळत उभे न राहता घरबसल्या ग्राहकांना रक्कम मिळत आहे. अत्याधुनिक सुविधा वेळेत पुरविल्याबद्दल पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहराने प्रथम क्रमांक मिळविला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात ३२ टपाल कार्यालये असून, १५० पोस्टमन आहेत. टपाल खात्याचे रूपांतर आता इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकेमध्ये झाले आहे. त्यामुळे पेमेंट देण्याच्या अनेक सुविधाही ऑनलाइन सुरू केल्या आहेत. त्यासाठी खात्याने अत्याधुनिक सुविधा सुरू केल्याने कामदेखील वाढले आहे. एइपीएस योजनेच्या माध्यमातून ‘डोअर टू डोअर’ पोचण्याचे काम पोस्टमनने केले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, निवृत्तीधारकांची संख्या सर्वाधिक आहे. ग्राहकांकडून पाच हजार किंवा दहा हजार रुपये विड्रॉल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता वेळेची बचत होत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशी केली कामगिरी  मुख्य टपाल कार्यालयाकडून पोस्टमनला नीट मार्गदर्शक सूचना दिल्या. टपाल खात्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी टिप्स दिल्या. पत्र वाटप करतानाच ज्येष्ठ आणि निवृत्तिवेतनधारकांचा डाटा मिळविला. ज्या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडता येत नाही, अशांना पोस्टाशी जोडले. त्यानंतर संदेश किंवा फोन आल्यावर तत्काळ खातेदारांना रक्कम देण्यात आली. सरकारी व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना बसल्या जागेवर पोस्ट बँकेतून पैसे मिळवून दिल्याने ग्राहकांचा विश्‍वास वाढला. पत्रव्यवहार करताना मोठ्या बँकांबाहेर गर्दी वाढली. रांगेतील लोकांच्या अडचणीत त्यांना मदतीचा हात दिला. त्यांचा आधार क्रमांक पोस्टाच्या आयपीपीबी खात्याला जोडला. एका पोस्टमनने ग्राहकांना कमीतकमी एक लाख रुपयाचे पेमेंट केले पाहिजे आणि ५० वेळा ट्रान्झॅक्शन केले पाहिजेत. तेव्हा त्या कर्मचाऱ्याला ‘गोल्डन अचिव्हर्स’ असे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते.  मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला प्रत्येक कार्यालयात ‘एइपीएस’ काऊंटर  गेल्या वर्षापासून ही योजना लागू केल्याने ‘लॉकडाउन’च्या काळात खात्याने पाच हजार ग्राहकांना चार लाखांची रोख रकमांची सेवा घरपोच पुरवली आहे. खात्यामध्ये आता कोणत्याही नागरिकांना आधार कार्डाच्या आधारे इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्यांमधून रक्कम काढणे किंवा जमा करण्याचे काम सुलभ झाले आहे. प्रत्येक कार्यालयात ‘एइपीएस’ काउंटर सुरू केले आहे. लॉकडाउनच्या काळात एक लाख ग्राहकांनी स्कीममध्ये सहभाग घेतला आहे. अगदी पोस्टमननेदेखील घरपोच बॅक खात्यातील रकमा काढून दिल्या. त्यामुळे नागरिकांवर बॅंकेत किंवा एटीएम केंद्राबाहेर रांगेत उभे राहण्याची वेळ येत नाही. पुण्यात ८० ते ९० टपाल कार्यालये आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधून ७० टक्के नागरिकांनी लाभ घेतल्याने पुणे जिल्ह्यात प्रथम; तर पंढरपूर, सोलापूर, श्रीरामपूर, सातारा, नगर या विभागात पिंपरी-चिंचवड शहराचा तिसरा क्रमांक आला आहे. Video : मोठी कारवाई : सांगवी पोलिस स्टेशन झालं गॅस सिलिंडर गोडाऊन; 22 जण ताब्यात    अशा आहेत सुविधा घरबसल्या विड्रॉल-कॅश काढू शकता  एक लाख रक्कम मिळण्याची सुविधा ज्येष्ठ नागरिक व निवृत्तीधारकांची वेळेची बचत  बँकेत जाण्याची गरज नाही सर्व कार्यालयांत आधारकार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी बायोमेट्रिक उपकरण व कॉम्प्युटर कनेक्‍टिव्हिटी यासारख्या सुविधा दिल्या आहेत. दिवसाला पन्नास जणांचे आधार अपडेट करण्यात येत आहेत. तसेच, येथे नवीन कार्ड तर मिळतीलच, पण जुन्या आधार कार्डांतील माहितीत बदलही करता येणार आहे. - के. एल. पारखी, माहिती जनसंपर्क अधिकारी पोस्टमनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात मला घर बसल्या पैसे मिळाले. त्यामुळे माझे बँकेत जाणे व रांगेत थांबायचे टळले आहे. - रजनी जाधव, खातेदार, अजमेरा कॉलनी  मला जेव्हा पैशाची गरज असते. तेव्हा मी पोस्टमनला फोन करतो. तत्काळ माझ्या पैशाची सोय होते. - एस. ठक्कर, खातेदार, पिंपरी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, February 20, 2021

टपाल खात्याला ‘एइपीएस’चा ‘आधार’ पिंपरी - टपाल खात्याच्या आधार अनेबल पेमेंट सिस्टिम (एइपीएस) या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये गर्दी व रांगेत ताटकळत उभे न राहता घरबसल्या ग्राहकांना रक्कम मिळत आहे. अत्याधुनिक सुविधा वेळेत पुरविल्याबद्दल पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहराने प्रथम क्रमांक मिळविला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात ३२ टपाल कार्यालये असून, १५० पोस्टमन आहेत. टपाल खात्याचे रूपांतर आता इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकेमध्ये झाले आहे. त्यामुळे पेमेंट देण्याच्या अनेक सुविधाही ऑनलाइन सुरू केल्या आहेत. त्यासाठी खात्याने अत्याधुनिक सुविधा सुरू केल्याने कामदेखील वाढले आहे. एइपीएस योजनेच्या माध्यमातून ‘डोअर टू डोअर’ पोचण्याचे काम पोस्टमनने केले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, निवृत्तीधारकांची संख्या सर्वाधिक आहे. ग्राहकांकडून पाच हजार किंवा दहा हजार रुपये विड्रॉल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता वेळेची बचत होत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अशी केली कामगिरी  मुख्य टपाल कार्यालयाकडून पोस्टमनला नीट मार्गदर्शक सूचना दिल्या. टपाल खात्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी टिप्स दिल्या. पत्र वाटप करतानाच ज्येष्ठ आणि निवृत्तिवेतनधारकांचा डाटा मिळविला. ज्या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडता येत नाही, अशांना पोस्टाशी जोडले. त्यानंतर संदेश किंवा फोन आल्यावर तत्काळ खातेदारांना रक्कम देण्यात आली. सरकारी व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना बसल्या जागेवर पोस्ट बँकेतून पैसे मिळवून दिल्याने ग्राहकांचा विश्‍वास वाढला. पत्रव्यवहार करताना मोठ्या बँकांबाहेर गर्दी वाढली. रांगेतील लोकांच्या अडचणीत त्यांना मदतीचा हात दिला. त्यांचा आधार क्रमांक पोस्टाच्या आयपीपीबी खात्याला जोडला. एका पोस्टमनने ग्राहकांना कमीतकमी एक लाख रुपयाचे पेमेंट केले पाहिजे आणि ५० वेळा ट्रान्झॅक्शन केले पाहिजेत. तेव्हा त्या कर्मचाऱ्याला ‘गोल्डन अचिव्हर्स’ असे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते.  मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला प्रत्येक कार्यालयात ‘एइपीएस’ काऊंटर  गेल्या वर्षापासून ही योजना लागू केल्याने ‘लॉकडाउन’च्या काळात खात्याने पाच हजार ग्राहकांना चार लाखांची रोख रकमांची सेवा घरपोच पुरवली आहे. खात्यामध्ये आता कोणत्याही नागरिकांना आधार कार्डाच्या आधारे इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्यांमधून रक्कम काढणे किंवा जमा करण्याचे काम सुलभ झाले आहे. प्रत्येक कार्यालयात ‘एइपीएस’ काउंटर सुरू केले आहे. लॉकडाउनच्या काळात एक लाख ग्राहकांनी स्कीममध्ये सहभाग घेतला आहे. अगदी पोस्टमननेदेखील घरपोच बॅक खात्यातील रकमा काढून दिल्या. त्यामुळे नागरिकांवर बॅंकेत किंवा एटीएम केंद्राबाहेर रांगेत उभे राहण्याची वेळ येत नाही. पुण्यात ८० ते ९० टपाल कार्यालये आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधून ७० टक्के नागरिकांनी लाभ घेतल्याने पुणे जिल्ह्यात प्रथम; तर पंढरपूर, सोलापूर, श्रीरामपूर, सातारा, नगर या विभागात पिंपरी-चिंचवड शहराचा तिसरा क्रमांक आला आहे. Video : मोठी कारवाई : सांगवी पोलिस स्टेशन झालं गॅस सिलिंडर गोडाऊन; 22 जण ताब्यात    अशा आहेत सुविधा घरबसल्या विड्रॉल-कॅश काढू शकता  एक लाख रक्कम मिळण्याची सुविधा ज्येष्ठ नागरिक व निवृत्तीधारकांची वेळेची बचत  बँकेत जाण्याची गरज नाही सर्व कार्यालयांत आधारकार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी बायोमेट्रिक उपकरण व कॉम्प्युटर कनेक्‍टिव्हिटी यासारख्या सुविधा दिल्या आहेत. दिवसाला पन्नास जणांचे आधार अपडेट करण्यात येत आहेत. तसेच, येथे नवीन कार्ड तर मिळतीलच, पण जुन्या आधार कार्डांतील माहितीत बदलही करता येणार आहे. - के. एल. पारखी, माहिती जनसंपर्क अधिकारी पोस्टमनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात मला घर बसल्या पैसे मिळाले. त्यामुळे माझे बँकेत जाणे व रांगेत थांबायचे टळले आहे. - रजनी जाधव, खातेदार, अजमेरा कॉलनी  मला जेव्हा पैशाची गरज असते. तेव्हा मी पोस्टमनला फोन करतो. तत्काळ माझ्या पैशाची सोय होते. - एस. ठक्कर, खातेदार, पिंपरी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aBBq3V

No comments:

Post a Comment