UPSC Success Story: चारवेळा अपयश आलं तरी मानली नाही हार; IAS रुचीचा थक्क करणारा प्रवास UPSC Success Story : पुणे : यूपीएससीचा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असतो. आपल्या स्वप्नापर्यंत कोण लवकर पोहोचतं, तर कुणाला इथपर्यंत पोहचायला बरीच वाट पाहावी लागते. आणि त्यातही जर महिला कँडिडेट असेल आणि बरेच अडथळे अपयश वाट्याला येत असेल, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण ज्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवासही असाच काहीसा आहे.  रुची बिंदालने 2019 च्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि हा तिचा पाचवा प्रयत्न होता. पहिल्या चार प्रयत्नांमध्ये कधी पूर्वपरीक्षेत, कधी मुख्य परीक्षेत तर कधी मुलाखतीमधून बाहेर पडावे लागले. यूपीएससीचे पाच अटेम्प्ट म्हणजे जवळपास सात वर्षाचा संघर्ष. या सात वर्षाच्या काळात संयम राखणे आणि धीर न सोडणे हे कौतुकास्पद आहे. रुचीचा यूपीएससीचा प्रवास कसा राहीला, याबाबत आपण जाणून घेऊया.  - तुम्हाला बँकेत नोकरी हवीय? मग परीक्षेची तयारी करा 'या' पध्दतीने​ वारंवार अपयश वाट्याला आलं रुचीच्या यूपीएससी प्रवासावर नजर टाकल्यावर पहिलं निदर्शनास येत ते म्हणजे पाच प्रयत्नांपैकी तीन वेळा रुचीची गाडी पूर्व परीक्षेतच अडकली होती. पूर्व परीक्षाच पास होऊ शकत नाही, मग आपण चुकीच्या क्षेत्रात तर नाही आलो ना? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात गोंधळ उडाला होता. पण आत्मविश्वासाने रुचीने चौथा अटेम्प्ट दिला आणि तिने पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे पार केले, पण संघर्ष अजून काही संपला नव्हता. रुचीचं सिलेक्शन होऊ शकलं नाही. चौथ्यांदा अपयश पदरी पडल्याने रुची निराश झाली, आजूबाजूचे लोकही तिला 'आता बास झालं' असा सल्ला देत होते, पण तिने पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेत पाचवा अटेम्प्ट दिला. आणि अखेर 2019च्या यूपीएससी परीक्षेत 39 व्या रँक मिळवत रूची आयएएस बनली. - UPSC Success Story: 'थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय'; IAS विशाखाचा मंत्र​  रुची म्हणते - - तुमचे अभ्यासाचे स्त्रोत मर्यादीत ठेवा. आणि तीच पुस्तके वारंवार वाचावी लागणार आहेत, हे लक्षात ठेवा.  - यूपीएससीच्या अभ्यासाला सुरवात करण्याअगोदर या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम नीट बघा आणि प्रत्येक गोष्टीची तयारी करावी लागणार आहे, हे लक्षात राहू द्या.  - एकदा पूर्ण अभ्यासक्रम लिहून अशा जागी ठेवा, जेणेकरून आपल्याला हा टॉपिक वाचणे आवश्यक आहे का हे लगेच पाहता येईल.  - दिलेल्या अभ्यासक्रमानुसार तयारी केल्यास तुम्ही भटकणार नाही आणि तुमच्याकडून काही अभ्यासाचं वाचायचं राहून गेलं असंही होणार नाही.  - जेव्हा तुमची तयारी एका स्टेजपर्यंत पोहोचेल, तेव्हा मॉक टेस्ट देण्यास सुरवात करा. आणि मॉक टेस्टही यूपीएससीची परीक्षा देत आहोत, इतक्याच गांभीर्याने द्या, त्याचा बराच फायदा होतो.  - योग शिक्षणात उत्तम करिअर करण्याची संधी, जाणून घ्या उपलब्ध पर्याय​ - मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे उत्तर लेखन. जितकं लिहाल त्याच्या आधारावरच तुम्हाला मार्क मिळतील. तुम्हाला किती माहिती आहे, याचा परीक्षकावर काही फरक पडत नाही. तुमच्या उत्तरपत्रिकेत जे दिसेल त्याच्या आधारवर परीक्षक तुम्हाला मार्क देतात.  - शेवटची गोष्ट म्हणजे खूप अभ्यास करा. प्रत्येक विषयाला समान महत्त्व द्या आणि यशस्वी होण्यासाठी वेळ लागत असेल, तर निराश होऊ नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एकच रणनीती प्रत्येकाला लागू पडेल असंही नसतं. प्रत्येकजण आपल्या स्ट्राँग आणि वीक पॉईंटनुसार प्लॅन करत असतो. त्यामुळे प्रत्येकाची यशस्वी होण्याची वेळ ही वेगवेगळी असते.  - स्वत:ची तुलना कोणाशाही करू नका, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) भारत, महाराष्ट्र, यूपीएससी लोकसेवा, स्पर्धा परीक्षा, पुणे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 25, 2021

UPSC Success Story: चारवेळा अपयश आलं तरी मानली नाही हार; IAS रुचीचा थक्क करणारा प्रवास UPSC Success Story : पुणे : यूपीएससीचा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असतो. आपल्या स्वप्नापर्यंत कोण लवकर पोहोचतं, तर कुणाला इथपर्यंत पोहचायला बरीच वाट पाहावी लागते. आणि त्यातही जर महिला कँडिडेट असेल आणि बरेच अडथळे अपयश वाट्याला येत असेल, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण ज्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवासही असाच काहीसा आहे.  रुची बिंदालने 2019 च्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि हा तिचा पाचवा प्रयत्न होता. पहिल्या चार प्रयत्नांमध्ये कधी पूर्वपरीक्षेत, कधी मुख्य परीक्षेत तर कधी मुलाखतीमधून बाहेर पडावे लागले. यूपीएससीचे पाच अटेम्प्ट म्हणजे जवळपास सात वर्षाचा संघर्ष. या सात वर्षाच्या काळात संयम राखणे आणि धीर न सोडणे हे कौतुकास्पद आहे. रुचीचा यूपीएससीचा प्रवास कसा राहीला, याबाबत आपण जाणून घेऊया.  - तुम्हाला बँकेत नोकरी हवीय? मग परीक्षेची तयारी करा 'या' पध्दतीने​ वारंवार अपयश वाट्याला आलं रुचीच्या यूपीएससी प्रवासावर नजर टाकल्यावर पहिलं निदर्शनास येत ते म्हणजे पाच प्रयत्नांपैकी तीन वेळा रुचीची गाडी पूर्व परीक्षेतच अडकली होती. पूर्व परीक्षाच पास होऊ शकत नाही, मग आपण चुकीच्या क्षेत्रात तर नाही आलो ना? अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात गोंधळ उडाला होता. पण आत्मविश्वासाने रुचीने चौथा अटेम्प्ट दिला आणि तिने पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे पार केले, पण संघर्ष अजून काही संपला नव्हता. रुचीचं सिलेक्शन होऊ शकलं नाही. चौथ्यांदा अपयश पदरी पडल्याने रुची निराश झाली, आजूबाजूचे लोकही तिला 'आता बास झालं' असा सल्ला देत होते, पण तिने पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेत पाचवा अटेम्प्ट दिला. आणि अखेर 2019च्या यूपीएससी परीक्षेत 39 व्या रँक मिळवत रूची आयएएस बनली. - UPSC Success Story: 'थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय'; IAS विशाखाचा मंत्र​  रुची म्हणते - - तुमचे अभ्यासाचे स्त्रोत मर्यादीत ठेवा. आणि तीच पुस्तके वारंवार वाचावी लागणार आहेत, हे लक्षात ठेवा.  - यूपीएससीच्या अभ्यासाला सुरवात करण्याअगोदर या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम नीट बघा आणि प्रत्येक गोष्टीची तयारी करावी लागणार आहे, हे लक्षात राहू द्या.  - एकदा पूर्ण अभ्यासक्रम लिहून अशा जागी ठेवा, जेणेकरून आपल्याला हा टॉपिक वाचणे आवश्यक आहे का हे लगेच पाहता येईल.  - दिलेल्या अभ्यासक्रमानुसार तयारी केल्यास तुम्ही भटकणार नाही आणि तुमच्याकडून काही अभ्यासाचं वाचायचं राहून गेलं असंही होणार नाही.  - जेव्हा तुमची तयारी एका स्टेजपर्यंत पोहोचेल, तेव्हा मॉक टेस्ट देण्यास सुरवात करा. आणि मॉक टेस्टही यूपीएससीची परीक्षा देत आहोत, इतक्याच गांभीर्याने द्या, त्याचा बराच फायदा होतो.  - योग शिक्षणात उत्तम करिअर करण्याची संधी, जाणून घ्या उपलब्ध पर्याय​ - मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे उत्तर लेखन. जितकं लिहाल त्याच्या आधारावरच तुम्हाला मार्क मिळतील. तुम्हाला किती माहिती आहे, याचा परीक्षकावर काही फरक पडत नाही. तुमच्या उत्तरपत्रिकेत जे दिसेल त्याच्या आधारवर परीक्षक तुम्हाला मार्क देतात.  - शेवटची गोष्ट म्हणजे खूप अभ्यास करा. प्रत्येक विषयाला समान महत्त्व द्या आणि यशस्वी होण्यासाठी वेळ लागत असेल, तर निराश होऊ नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एकच रणनीती प्रत्येकाला लागू पडेल असंही नसतं. प्रत्येकजण आपल्या स्ट्राँग आणि वीक पॉईंटनुसार प्लॅन करत असतो. त्यामुळे प्रत्येकाची यशस्वी होण्याची वेळ ही वेगवेगळी असते.  - स्वत:ची तुलना कोणाशाही करू नका, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) भारत, महाराष्ट्र, यूपीएससी लोकसेवा, स्पर्धा परीक्षा, पुणे Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ux9tSU

No comments:

Post a Comment