कोरोनाला रोखण्यासाठी जाणून घ्या प्रशासनाचे नवे निर्णय शाळा-महाविद्यालये, क्लासेस  एकाच वेळी गर्दी होत असल्याने पहिल्या टप्प्यात महिनाअखेरपर्यंत म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद असतील. या विद्यार्थ्यांसाठीच्या खासगी शिकवण्याही बंद राहतील. मात्र, परीक्षा जवळ आल्याने क्लासेस सुरू ठेवण्यास परवानगी आहे; परंतु, तेही ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. अभ्यासिका सुरू ठेवता येणार असल्या तरी त्यात सोशल डिस्टन्स महत्त्वाचे राहणार आहे. येत्या शुक्रवारी आढावा घेऊन त्यानंतर शाळांबाबत नवा निर्णय होऊ शकतो.  भाजी, दूध, किराणे दुकाने नव्या उपायांत भाजी, दूध खरेदी-विक्रीबाबत कोणतेही बंधन नाही. त्यामुळे लोकांना रोज भाजी-दूध आणि किराणा साहित्य उपलब्ध असेल. मात्र, भाजी खरेदी करताना मंडईत गर्दी होणार नाही, याची काळजी नागरिकांसह व्यापाऱ्यांनीही घ्यावयाची आहे. त्या ठिकाणी सर्वजण मास्क वापरतील आणि सोशल डिस्टन्सला प्राधान्य देतील, यासाठी व्यापाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे.  हॉटेल, बार, रेस्टॉरंट  सध्या हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट हे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी असली तरी, ती दोन वाजेपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे आता केवळ ११ वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून ती बंद केली जाणार आहेत. ती बंद झाली आहेत का, याची खातरजमाही केली जाणार आहे. हा नियम सोमवारपासून (ता. २२) लागू होईल.  पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय संचारबंदी  शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत लोक विशेषत: तरुणवर्ग रस्त्यांवर फिरत असल्याने त्यातून संसर्गवाढीचा धोका आहे. रात्री लोक रस्त्यांवर येणार नाहीत, यासाठी रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर राहणार असून, या काळात अत्यावश्‍यक सेवांना परवानगी राहणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी जाहीर होणार आहे.  सूक्ष्मबाधित क्षेत्र  शहरात जिथे कुठे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ते परिसर सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. पुण्यात आधी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या भागांत आता पुन्हा सर्वाधिक रुग्ण संसर्ग असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे काही व्यवहार आणि नागरिकांसाठी मर्यादा राहणार आहे. परंतु, आधीच्या आदेशासारखे सूक्ष्मबाधित भागांत पत्रे उभारून रस्ते बंद केले जाणार नाहीत.  कोविड केअर, जम्बो सेंटर  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद केलेले कोविड केअर सेंटर आणि जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले जाऊ शकतात. मात्र, सध्याची रुग्णसंख्या लक्षा घेता, महापालिकेच्या रुग्णालयांसह ससून, स्वतंत्र कोविड हॉस्पिटलमधील यंत्रणा पुरेशी आहे. यापुढच्या काळात रुग्ण वाढल्यास कोविड सेंटर नव्याने सुरू होतील. याआधीच्या ठिकाणी हे सेंटर राहणार आहेत.  कोरोना चाचण्या कोरोना संसर्गवाढीचा वेग पाहता नागरिकांच्या चाचण्या वाढविण्यात येणार आहे. तसेच, रुग्णांच्या सपंर्कातील व्यक्तींची (क्लोज कॉन्टॅक्ट) चाचणी करून त्यांना विलग केले जाणार आहे. त्यासाठी संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठीची पथके वाढविण्यात येतील. एका रुग्णामागे साधारपणे १५ जणांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नव्याने चाचणी केंद्र सुरू करण्यात येतील. तर नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्याच्या तपासणीची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ससूनमध्ये १००० नमुन्यांची तपासणी होईल, अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल वेळेत येतील.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा वाहतूक व्यवस्था शहरांमधील सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी घातलेल्या बंधनांचे पालन करण्याची जबाबदारी प्रवासी आणि वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या यंत्रणांची आहे. दुसरीकडे, विदर्भातील काही जिल्ह्यांतून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी तूर्तास बंदी नाही. त्यामुळे राज्यभरातून पुण्यात ये-जा करण्यास परवानगी आहे.     महापालिका-पोलिस कोरोनाच्या साथीत लोकांची गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका हद्दींसाठी महापालिका आयुक्त हेच निर्णयांचे आदेश काढणार आहेत. त्यानुसार अंमलबजावणी होईल. याआधी पोलिस आणि महापालिकांच्या आदेशामुळे गोंधळ निर्माण झाला होता. यापुढे या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय राहणार आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 21, 2021

कोरोनाला रोखण्यासाठी जाणून घ्या प्रशासनाचे नवे निर्णय शाळा-महाविद्यालये, क्लासेस  एकाच वेळी गर्दी होत असल्याने पहिल्या टप्प्यात महिनाअखेरपर्यंत म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद असतील. या विद्यार्थ्यांसाठीच्या खासगी शिकवण्याही बंद राहतील. मात्र, परीक्षा जवळ आल्याने क्लासेस सुरू ठेवण्यास परवानगी आहे; परंतु, तेही ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. अभ्यासिका सुरू ठेवता येणार असल्या तरी त्यात सोशल डिस्टन्स महत्त्वाचे राहणार आहे. येत्या शुक्रवारी आढावा घेऊन त्यानंतर शाळांबाबत नवा निर्णय होऊ शकतो.  भाजी, दूध, किराणे दुकाने नव्या उपायांत भाजी, दूध खरेदी-विक्रीबाबत कोणतेही बंधन नाही. त्यामुळे लोकांना रोज भाजी-दूध आणि किराणा साहित्य उपलब्ध असेल. मात्र, भाजी खरेदी करताना मंडईत गर्दी होणार नाही, याची काळजी नागरिकांसह व्यापाऱ्यांनीही घ्यावयाची आहे. त्या ठिकाणी सर्वजण मास्क वापरतील आणि सोशल डिस्टन्सला प्राधान्य देतील, यासाठी व्यापाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे.  हॉटेल, बार, रेस्टॉरंट  सध्या हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट हे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी असली तरी, ती दोन वाजेपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे आता केवळ ११ वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून ती बंद केली जाणार आहेत. ती बंद झाली आहेत का, याची खातरजमाही केली जाणार आहे. हा नियम सोमवारपासून (ता. २२) लागू होईल.  पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय संचारबंदी  शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत लोक विशेषत: तरुणवर्ग रस्त्यांवर फिरत असल्याने त्यातून संसर्गवाढीचा धोका आहे. रात्री लोक रस्त्यांवर येणार नाहीत, यासाठी रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर राहणार असून, या काळात अत्यावश्‍यक सेवांना परवानगी राहणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी जाहीर होणार आहे.  सूक्ष्मबाधित क्षेत्र  शहरात जिथे कुठे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत, ते परिसर सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. पुण्यात आधी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या भागांत आता पुन्हा सर्वाधिक रुग्ण संसर्ग असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे काही व्यवहार आणि नागरिकांसाठी मर्यादा राहणार आहे. परंतु, आधीच्या आदेशासारखे सूक्ष्मबाधित भागांत पत्रे उभारून रस्ते बंद केले जाणार नाहीत.  कोविड केअर, जम्बो सेंटर  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद केलेले कोविड केअर सेंटर आणि जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले जाऊ शकतात. मात्र, सध्याची रुग्णसंख्या लक्षा घेता, महापालिकेच्या रुग्णालयांसह ससून, स्वतंत्र कोविड हॉस्पिटलमधील यंत्रणा पुरेशी आहे. यापुढच्या काळात रुग्ण वाढल्यास कोविड सेंटर नव्याने सुरू होतील. याआधीच्या ठिकाणी हे सेंटर राहणार आहेत.  कोरोना चाचण्या कोरोना संसर्गवाढीचा वेग पाहता नागरिकांच्या चाचण्या वाढविण्यात येणार आहे. तसेच, रुग्णांच्या सपंर्कातील व्यक्तींची (क्लोज कॉन्टॅक्ट) चाचणी करून त्यांना विलग केले जाणार आहे. त्यासाठी संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठीची पथके वाढविण्यात येतील. एका रुग्णामागे साधारपणे १५ जणांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नव्याने चाचणी केंद्र सुरू करण्यात येतील. तर नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्याच्या तपासणीची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ससूनमध्ये १००० नमुन्यांची तपासणी होईल, अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल वेळेत येतील.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा वाहतूक व्यवस्था शहरांमधील सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी घातलेल्या बंधनांचे पालन करण्याची जबाबदारी प्रवासी आणि वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या यंत्रणांची आहे. दुसरीकडे, विदर्भातील काही जिल्ह्यांतून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी तूर्तास बंदी नाही. त्यामुळे राज्यभरातून पुण्यात ये-जा करण्यास परवानगी आहे.     महापालिका-पोलिस कोरोनाच्या साथीत लोकांची गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका हद्दींसाठी महापालिका आयुक्त हेच निर्णयांचे आदेश काढणार आहेत. त्यानुसार अंमलबजावणी होईल. याआधी पोलिस आणि महापालिकांच्या आदेशामुळे गोंधळ निर्माण झाला होता. यापुढे या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय राहणार आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/37zxor9

No comments:

Post a Comment