खाद्यभ्रमंती : पुण्यातील ‘पीटरचे मोमो’ पुण्यात (तसं पाहिलं तर कोणत्याही शहरात) अनेकदा एखाद्या वस्तूची किंवा पदार्थांची टूम येते. जसं की बिर्याणी, मिसळ, चहा, सेंद्रिय, चुलीवरचं, स्मोकी फ्लेव्हर, कोळसा, दम, ए २ दूध, गुळाचा चहा, इराणी चहा, गाजर किंवा दुधीचा ज्यूस, कांस्यथाळी वगैरे वगैरे... एखादी टूम निघाली, की लोक त्याच्या मागे धावत सुटतात. काही दिवस किंवा महिने ही टूम टिकते. त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ किंवा एखादी नवीन टूम लोकांना पागल बनविते. काही वर्षांपूर्वी पुण्यात ‘मोमो’ची अशीच टूम आली होती. चौकाचौकांत भांड्यामध्ये नेपाळी, तिबेटियन किंवा ईशान्य भारतातील लोक ‘मोमो’ उकडत बसलेले दिसायचे, पण अल्पावधीतच ती टूम मोडीत निघाली. अनेक ‘मोमो’वाल्यांनी गाशा गुंडाळला. असे अनेक ‘मोमो’वाले बंद पडले असले, तरीही मूळ दार्जिलिंगचा रहिवासी असलेल्या एका विक्रेत्याने जबरदस्त ‘मोमो’ खिलवून पुणेकरांना वेड लावलंय. आज नाही, गेली दहा वर्षे त्याची गाडी तुफान गर्दी खेचते आहे. नाव आहे ''पीटर मोमो''ज सेंटर''. स्थळ श्रीकृष्ण नगर, बावधन. महाराष्ट्र बँकेसमोर किंवा युनियन बँकेच्या बाहेर. पीटर झेवियर लेपचा हे १९९९-२००० मध्ये दार्जिलिंगमधून महाराष्ट्रात आले. आधी मुंबईत आणि मग पुण्यात वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलं आणि २०११ मध्ये बावधनमध्ये स्वतःची ‘मोमो’ची गाडी सुरू केली. रोज संध्याकाळी ५.३० ते ‘मोमो’ संपेपर्यंत गाडी सुरू असते. खाद्यभ्रमंती : चला, ‘कॉकटेल’ घेऊ... व्हेज, व्हेज फ्राइड, चिकन आणि चिकन फ्राइड अशा चार प्रकारचेच ‘मोमो’ मिळतात. कोणताही प्रकार घ्या तोंड खवळणारच. ‘हेल्थ कॉन्शस’ लोकांमुळे स्टीम्ड अर्थात, उकडलेल्या ‘मोमो’ना ‘फ्राइड मोमो’पेक्षा थोडी अधिक पसंती मिळते, इतकंच. चिकन ‘मोमो’त सारा खेळ बारीक केलेलं चिकन, आलं, लसूण, मीठ आणि मिरे यांच्यावर अवलंबून असतो. तर ‘व्हेज मोमो’त गाजर, थोड्या प्रमाणात फ्लॉवर, भरपूर कोबी नि बारीक कांदा आणि ‘बिन्स’... मीठ आणि मिरे चवीनुसार. दोन्ही ‘मोमो’ नुसते खाल्ले तर एकदम साधे लागतील. फारसे तिखट किंवा झणझणीत लागणार नाही. हीच ‘मोमो’ची खासियत, असे पीटर सांगतात. सोबत येणाऱ्या ‘साल्सा सॉस’मुळे ‘मोमो’ना झणझणीत चव मिळते. ‘मेओनिज’ आणि ‘साल्सा सॉस’च्या सोबत ‘मोमो’चा एकेक घास खास वाटत जातो. मैफल उत्तरोत्तर अशी रंगते, की विचारू नका.  हेही वाचा : उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम  ‘‘दार्जिलिंगला वाफाळते ‘मोमो’ आणि गरमागरम सूप हे ‘हॉट कॉम्बिनेशन’ लोकांमध्ये जाम लोकप्रिय आहे. सुरुवातीला आम्ही पुण्यामध्ये तसं सर्व्ह करत होतो. पण आपल्याकडं उभं राहून खावं लागत असल्यानं अनेकांना ते फार रुचलं नाही, किंवा जमलं नाही नि त्यामुळं आम्ही आता फक्त ‘मोमो’ सर्व्ह करतो,’’ असं पीटर सांगतात. गाडी बावधनमध्ये असली, तरीही पिंपरी, चिंचवड, खडकी आणि पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोक मोठ्या संख्येनं गाडीसमोर गर्दी करतात. दुचाकी प्रमाणेच चारचाकी गाड्यांचीही गर्दी असते. तुलनेनं कमी किंमतीत भरपूर ऐवज असलेले हे ‘मोमो’ज पोटाला चांगला आधार देणारे ठरतात. त्यामुळंच अगदी सुटाबुटातील लोकही इथं ‘मोमो’वर ताव मारताना दिसतात.  खाद्यभ्रमंती : अमरावतीचा ‘गिला वडा’ पुण्यात असाल, तर नक्की जा आणि बाहेर असाल, तर पुण्यात आल्यावर नक्की ट्राय करा. पहिल्यांदा ट्राय करणार असाल, तरी नक्की प्रेमात पडाल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

खाद्यभ्रमंती : पुण्यातील ‘पीटरचे मोमो’ पुण्यात (तसं पाहिलं तर कोणत्याही शहरात) अनेकदा एखाद्या वस्तूची किंवा पदार्थांची टूम येते. जसं की बिर्याणी, मिसळ, चहा, सेंद्रिय, चुलीवरचं, स्मोकी फ्लेव्हर, कोळसा, दम, ए २ दूध, गुळाचा चहा, इराणी चहा, गाजर किंवा दुधीचा ज्यूस, कांस्यथाळी वगैरे वगैरे... एखादी टूम निघाली, की लोक त्याच्या मागे धावत सुटतात. काही दिवस किंवा महिने ही टूम टिकते. त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ किंवा एखादी नवीन टूम लोकांना पागल बनविते. काही वर्षांपूर्वी पुण्यात ‘मोमो’ची अशीच टूम आली होती. चौकाचौकांत भांड्यामध्ये नेपाळी, तिबेटियन किंवा ईशान्य भारतातील लोक ‘मोमो’ उकडत बसलेले दिसायचे, पण अल्पावधीतच ती टूम मोडीत निघाली. अनेक ‘मोमो’वाल्यांनी गाशा गुंडाळला. असे अनेक ‘मोमो’वाले बंद पडले असले, तरीही मूळ दार्जिलिंगचा रहिवासी असलेल्या एका विक्रेत्याने जबरदस्त ‘मोमो’ खिलवून पुणेकरांना वेड लावलंय. आज नाही, गेली दहा वर्षे त्याची गाडी तुफान गर्दी खेचते आहे. नाव आहे ''पीटर मोमो''ज सेंटर''. स्थळ श्रीकृष्ण नगर, बावधन. महाराष्ट्र बँकेसमोर किंवा युनियन बँकेच्या बाहेर. पीटर झेवियर लेपचा हे १९९९-२००० मध्ये दार्जिलिंगमधून महाराष्ट्रात आले. आधी मुंबईत आणि मग पुण्यात वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलं आणि २०११ मध्ये बावधनमध्ये स्वतःची ‘मोमो’ची गाडी सुरू केली. रोज संध्याकाळी ५.३० ते ‘मोमो’ संपेपर्यंत गाडी सुरू असते. खाद्यभ्रमंती : चला, ‘कॉकटेल’ घेऊ... व्हेज, व्हेज फ्राइड, चिकन आणि चिकन फ्राइड अशा चार प्रकारचेच ‘मोमो’ मिळतात. कोणताही प्रकार घ्या तोंड खवळणारच. ‘हेल्थ कॉन्शस’ लोकांमुळे स्टीम्ड अर्थात, उकडलेल्या ‘मोमो’ना ‘फ्राइड मोमो’पेक्षा थोडी अधिक पसंती मिळते, इतकंच. चिकन ‘मोमो’त सारा खेळ बारीक केलेलं चिकन, आलं, लसूण, मीठ आणि मिरे यांच्यावर अवलंबून असतो. तर ‘व्हेज मोमो’त गाजर, थोड्या प्रमाणात फ्लॉवर, भरपूर कोबी नि बारीक कांदा आणि ‘बिन्स’... मीठ आणि मिरे चवीनुसार. दोन्ही ‘मोमो’ नुसते खाल्ले तर एकदम साधे लागतील. फारसे तिखट किंवा झणझणीत लागणार नाही. हीच ‘मोमो’ची खासियत, असे पीटर सांगतात. सोबत येणाऱ्या ‘साल्सा सॉस’मुळे ‘मोमो’ना झणझणीत चव मिळते. ‘मेओनिज’ आणि ‘साल्सा सॉस’च्या सोबत ‘मोमो’चा एकेक घास खास वाटत जातो. मैफल उत्तरोत्तर अशी रंगते, की विचारू नका.  हेही वाचा : उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम  ‘‘दार्जिलिंगला वाफाळते ‘मोमो’ आणि गरमागरम सूप हे ‘हॉट कॉम्बिनेशन’ लोकांमध्ये जाम लोकप्रिय आहे. सुरुवातीला आम्ही पुण्यामध्ये तसं सर्व्ह करत होतो. पण आपल्याकडं उभं राहून खावं लागत असल्यानं अनेकांना ते फार रुचलं नाही, किंवा जमलं नाही नि त्यामुळं आम्ही आता फक्त ‘मोमो’ सर्व्ह करतो,’’ असं पीटर सांगतात. गाडी बावधनमध्ये असली, तरीही पिंपरी, चिंचवड, खडकी आणि पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोक मोठ्या संख्येनं गाडीसमोर गर्दी करतात. दुचाकी प्रमाणेच चारचाकी गाड्यांचीही गर्दी असते. तुलनेनं कमी किंमतीत भरपूर ऐवज असलेले हे ‘मोमो’ज पोटाला चांगला आधार देणारे ठरतात. त्यामुळंच अगदी सुटाबुटातील लोकही इथं ‘मोमो’वर ताव मारताना दिसतात.  खाद्यभ्रमंती : अमरावतीचा ‘गिला वडा’ पुण्यात असाल, तर नक्की जा आणि बाहेर असाल, तर पुण्यात आल्यावर नक्की ट्राय करा. पहिल्यांदा ट्राय करणार असाल, तरी नक्की प्रेमात पडाल. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aa4NKy

No comments:

Post a Comment