ज्येष्ठ नागरिकाचा आगळावेगळा छंद; लिहून काढल्या दुर्मिळ कविता, धार्मिक ग्रंथ नागपूर : माणूस रिटायर्ड झाला की नंतर दिवस कसा घालवायचा हेच कळत नाही. अशावेळी चिडचिडेपणा वाढून तब्येतीवर विपरित परिणाम होतो. ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सुरेश पंडित यांनी मात्र आगळावेगळा छंद जोपासताना दुर्मिळ कवितांपासून अनेक धार्मिक ग्रंथ लिहून काढले. या छंदाच्या माध्यमातून त्यांच्याकडे आज जुन्या-नव्या आठवणींचा अनमोल खजिना तयार झाला आहे. त्यांचा हा संग्रह सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. गोकुळपेठ येथील सुरेश पंडित हे २००१ मध्ये स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. आयुष्यातील जवळपास ४० वर्षे कुटुंब व बँकेच्या कामात गेल्यानंतर आता फावला वेळ कसा घालवायचा, असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, घरातील धार्मिक व पौराणिक ग्रंथ व पोथ्या वाचून काढण्यास सुरवात केली. नुसते वाचून ते थांबले नाहीत. प्रत्यक्षात डायरीत उतरवू लागले. अधिक माहितीसाठी - पत्नी सतत प्रियकराशी बोलते या संशयातून पतीने केला खून; लग्नाना झाले होते फक्त तीन महिने रोज पाच ते सहा तास काहीतरी नवीन लिखाण करायचे, हा एकच निर्धार करीत चांगले साहित्य लिहायला लागले. सुरवात जुन्या काळातील दुर्मिळ कवितांपासून केली. त्यानंतर गीता, रामचरितमानस, दासबोध, गजानन विजयग्रंथ, श्रीसाईचरित्र, मिराबाईचे दोहे, म्हणी, सुविचार, वचनामृत, स्तवन, भूपाळी, गोंधळ, लोकप्रिय गाणी, ड्रॉइंग, संस्कृत सुभाषिते, आजीबाईचा बटवा, उतारे आपल्या हाताने लिहून काढली. पाहतापाहता मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लिखाण केलेल्या पेटीभर साहित्य जमा झाले. परिवाराने दिले प्रोत्साहन पंडित यांनी हा आगळावेगळा छंद २० वर्षांपासून जोपासला आहे. यामुळे ‘आपण रिटायर्ड झालो’ ही भावनादेखील मनात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, या कामात त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही मदत केली; वेळोवेळी प्रोत्साहन दिले. विशेषतः पत्नी शोभना यांना पतीच्या आगळ्यावेगळ्या छंदाचा अभिमान व कौतुक आहे. मित्र व नातेवाईकही संकलित केलेल्या या खजिन्याची स्तुती करीत असतात. माझ्याकडील हा अमूल्य ठेवा भविष्यात कुणाच्या तरी कामी पडावा, अशी त्यांची इच्छा आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 17, 2021

ज्येष्ठ नागरिकाचा आगळावेगळा छंद; लिहून काढल्या दुर्मिळ कविता, धार्मिक ग्रंथ नागपूर : माणूस रिटायर्ड झाला की नंतर दिवस कसा घालवायचा हेच कळत नाही. अशावेळी चिडचिडेपणा वाढून तब्येतीवर विपरित परिणाम होतो. ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सुरेश पंडित यांनी मात्र आगळावेगळा छंद जोपासताना दुर्मिळ कवितांपासून अनेक धार्मिक ग्रंथ लिहून काढले. या छंदाच्या माध्यमातून त्यांच्याकडे आज जुन्या-नव्या आठवणींचा अनमोल खजिना तयार झाला आहे. त्यांचा हा संग्रह सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. गोकुळपेठ येथील सुरेश पंडित हे २००१ मध्ये स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. आयुष्यातील जवळपास ४० वर्षे कुटुंब व बँकेच्या कामात गेल्यानंतर आता फावला वेळ कसा घालवायचा, असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, घरातील धार्मिक व पौराणिक ग्रंथ व पोथ्या वाचून काढण्यास सुरवात केली. नुसते वाचून ते थांबले नाहीत. प्रत्यक्षात डायरीत उतरवू लागले. अधिक माहितीसाठी - पत्नी सतत प्रियकराशी बोलते या संशयातून पतीने केला खून; लग्नाना झाले होते फक्त तीन महिने रोज पाच ते सहा तास काहीतरी नवीन लिखाण करायचे, हा एकच निर्धार करीत चांगले साहित्य लिहायला लागले. सुरवात जुन्या काळातील दुर्मिळ कवितांपासून केली. त्यानंतर गीता, रामचरितमानस, दासबोध, गजानन विजयग्रंथ, श्रीसाईचरित्र, मिराबाईचे दोहे, म्हणी, सुविचार, वचनामृत, स्तवन, भूपाळी, गोंधळ, लोकप्रिय गाणी, ड्रॉइंग, संस्कृत सुभाषिते, आजीबाईचा बटवा, उतारे आपल्या हाताने लिहून काढली. पाहतापाहता मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लिखाण केलेल्या पेटीभर साहित्य जमा झाले. परिवाराने दिले प्रोत्साहन पंडित यांनी हा आगळावेगळा छंद २० वर्षांपासून जोपासला आहे. यामुळे ‘आपण रिटायर्ड झालो’ ही भावनादेखील मनात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, या कामात त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही मदत केली; वेळोवेळी प्रोत्साहन दिले. विशेषतः पत्नी शोभना यांना पतीच्या आगळ्यावेगळ्या छंदाचा अभिमान व कौतुक आहे. मित्र व नातेवाईकही संकलित केलेल्या या खजिन्याची स्तुती करीत असतात. माझ्याकडील हा अमूल्य ठेवा भविष्यात कुणाच्या तरी कामी पडावा, अशी त्यांची इच्छा आहे. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3bf5TnI

No comments:

Post a Comment