कोरोना लस घेण्यात ग्रामिण पोलिस अव्वल; शहर पोलिसांमध्ये मात्र भीती; अल्पप्रतिसादामुळे `टेंशन’ नागपूर :  कोरोना लसीकरणाला शहर पोलिस दलात धडाक्यात प्रारंभ झाला. मात्र, लस घेतल्यानंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सची भीती मनात असल्यामुळे अनेक पोलिसांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे ग्रामीण पोलिस दलात लसीकरणाला चांगला प्रतिसाद असून जवळपास प्रत्येक कर्मचारी लस टोचून घेत असल्याची माहिती आहे. 'राज्यपाल भाजप कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचे... गेल्या आठवड्यापासून शहर आणि जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनावर लस उपलब्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या ६ फेब्रुवारीला पोलिस मुख्यालयात असलेल्या रुग्णालयात कोरोना लसीकरणास धूमधडाक्यात प्रारंभ झाला. अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप झळके आणि नवीनचंद्र रेडी यांच्यासह मुख्यालयाचे उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी लस घेऊन अभियानाला सुरवात केली. मात्र, नागपूर शहर पोलिस दलात लसीचे भीतीचे वातावरण असल्यामुळे अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली.  पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी लागणार आहे. परंतु पहिलीच लस घेण्यासाठी शहरातील पोलिस कर्मचारी मागे-पुढे पाहत आहेत. लसीकरण ऐच्छिक असले तरी लसीकरणाबाबत मनात भीती निर्माण झाल्यामुळे लसीकरणाला अनुपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोलिस रुग्णालयात ११२३ कर्मचाऱ्यांनी तर शहरातील अन्य ९ केंद्रावर ९३० जणांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. या उलट ग्रामिण पोलिस दलात अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना लस घेण्याबाबत आवाहन केले होते.  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लसीकरणासाठी एसएमएस आलेल्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता लसीकरण करून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि डॉ. संदीप शिंदे यांनी केले आहे. 'अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमारचे शूटींग बंद पाडू, मोदी सरकारच्या विरोधात त्यांची टीवटीव का... कोरोना बाधित पोलिसांचे अर्धशतक शहर पोलिस दलात जवळपास ५१ पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे लक्षण असलेल्या पोलिसांसाठी आयुक्तालयाकडून सर्व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु जर प्रत्येक कर्मचाऱ्याने लस टोचून घेतल्यास कोरोनापासून दूर राहता येईल. आतापर्यंत नागपूर शहर पोलिस दलातील २२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 18, 2021

कोरोना लस घेण्यात ग्रामिण पोलिस अव्वल; शहर पोलिसांमध्ये मात्र भीती; अल्पप्रतिसादामुळे `टेंशन’ नागपूर :  कोरोना लसीकरणाला शहर पोलिस दलात धडाक्यात प्रारंभ झाला. मात्र, लस घेतल्यानंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सची भीती मनात असल्यामुळे अनेक पोलिसांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे ग्रामीण पोलिस दलात लसीकरणाला चांगला प्रतिसाद असून जवळपास प्रत्येक कर्मचारी लस टोचून घेत असल्याची माहिती आहे. 'राज्यपाल भाजप कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचे... गेल्या आठवड्यापासून शहर आणि जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनावर लस उपलब्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या ६ फेब्रुवारीला पोलिस मुख्यालयात असलेल्या रुग्णालयात कोरोना लसीकरणास धूमधडाक्यात प्रारंभ झाला. अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप झळके आणि नवीनचंद्र रेडी यांच्यासह मुख्यालयाचे उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी लस घेऊन अभियानाला सुरवात केली. मात्र, नागपूर शहर पोलिस दलात लसीचे भीतीचे वातावरण असल्यामुळे अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली.  पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी लागणार आहे. परंतु पहिलीच लस घेण्यासाठी शहरातील पोलिस कर्मचारी मागे-पुढे पाहत आहेत. लसीकरण ऐच्छिक असले तरी लसीकरणाबाबत मनात भीती निर्माण झाल्यामुळे लसीकरणाला अनुपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. पोलिस रुग्णालयात ११२३ कर्मचाऱ्यांनी तर शहरातील अन्य ९ केंद्रावर ९३० जणांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. या उलट ग्रामिण पोलिस दलात अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना लस घेण्याबाबत आवाहन केले होते.  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लसीकरणासाठी एसएमएस आलेल्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता लसीकरण करून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि डॉ. संदीप शिंदे यांनी केले आहे. 'अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमारचे शूटींग बंद पाडू, मोदी सरकारच्या विरोधात त्यांची टीवटीव का... कोरोना बाधित पोलिसांचे अर्धशतक शहर पोलिस दलात जवळपास ५१ पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे लक्षण असलेल्या पोलिसांसाठी आयुक्तालयाकडून सर्व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु जर प्रत्येक कर्मचाऱ्याने लस टोचून घेतल्यास कोरोनापासून दूर राहता येईल. आतापर्यंत नागपूर शहर पोलिस दलातील २२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  संपादन - अथर्व महांकाळ  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3qFxc16

No comments:

Post a Comment