तरुणाई नैराश्य, चिंतेच्या विळख्यात; अमेरिकेतील ३३ हजार महाविद्यालयांतील सर्वेक्षण बोस्टन (अमेरिका) - जगभरात विविध कारणांमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेतील तरुणाईवरही नैराश्याच्या विळख्यात सापडली आहे. अमेरिकेतील नैराश्याचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर पोचत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील ३३ हजार महाविद्यालयांत केलेल्या संशोधनातून विद्यार्थ्यांमधील नैराश्य, चिंता सातत्याने वाढत असल्याचे समोर आले. कोरोना साथीसह, राजकीय अस्थिरता, असमानता, वंशद्वेषासारख्या कारणांमुळे तणाव वाढून नैराश्य वाढत आहे.     अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. ‘हेल्दी माईंडस नेटवर्क’च्या माध्यमातून २०२० मध्ये हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत बिघडलेल्या मनस्थितीने शैक्षणिक कामगिरीवर विपरित परिणाम झाल्याचे ८३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यासंदर्भात कोणतीही सेवा मिळत नव्हती. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्यविषयक साक्षरता वाढविण्याची, अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याची गरजही संशोधकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये  यासंदर्भात बोलताना विद्यापीठाच्या संशोधिका प्रा. साराह लिप्सन म्हणाल्या, की सर्वेक्षणातील एकूण विद्यार्थ्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य किंवा चितेंच्या विकाराची लक्षणे आढळली. या संशोधनाने विद्यापीठांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न ध्यानात घेणारी यंत्रणा आखण्याची गरज अधोरेखित केली आहे. शिक्षकांनी डेडलाइनबाबत लवचिक असण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, केवळ परीक्षेतील गुण हेच क्षमता दर्शविण्याचे एकमेव साधन नसल्याचेही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ध्यानात आणून द्यायला हवे. शिक्षकांनी सकाळी नऊ वाजता किंवा मध्यरात्री गृहपाठ देण्याऐवजी दुपारी पाचपर्यंत तो दिल्यास विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यात मदत होईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे रात्रीचे जागरण टळून ते व्यवस्थित झोपू शकतील. छोट्या वर्गामध्ये शिक्षक थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोचून विचारपूस करू शकतात. मोठ्या वर्गांत ई-मेल सारख्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकतात, याकडेही प्रा. लिप्सन यांनी लक्ष वेधले.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनामुळे आपल्या नजीकच्या व्यक्तीला गमावलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आर्थिक ताणाचा अधिक सामना करावा लागू शकतो. यातून विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊन शैक्षणिक कामगिरी खालावू शकते.  - प्रा. साराह लिप्सन, संशोधिका, बोस्टन विद्यापीठ जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ६६ टक्के - एकटेपणा जाणवणारे विद्यार्थी ८३ टक्के - शैक्षणिक कामगिरी खालावलेले विद्यार्थी नैराश्याची कारणे कोरोनाची साथ सोशल मीडियाचा वाढता प्रभाव राजकीय अस्थिरता यशस्वी करिअरच्या चुकीच्या संकल्पना Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, February 21, 2021

तरुणाई नैराश्य, चिंतेच्या विळख्यात; अमेरिकेतील ३३ हजार महाविद्यालयांतील सर्वेक्षण बोस्टन (अमेरिका) - जगभरात विविध कारणांमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेतील तरुणाईवरही नैराश्याच्या विळख्यात सापडली आहे. अमेरिकेतील नैराश्याचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर पोचत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील ३३ हजार महाविद्यालयांत केलेल्या संशोधनातून विद्यार्थ्यांमधील नैराश्य, चिंता सातत्याने वाढत असल्याचे समोर आले. कोरोना साथीसह, राजकीय अस्थिरता, असमानता, वंशद्वेषासारख्या कारणांमुळे तणाव वाढून नैराश्य वाढत आहे.     अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. ‘हेल्दी माईंडस नेटवर्क’च्या माध्यमातून २०२० मध्ये हे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत बिघडलेल्या मनस्थितीने शैक्षणिक कामगिरीवर विपरित परिणाम झाल्याचे ८३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यासंदर्भात कोणतीही सेवा मिळत नव्हती. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्यविषयक साक्षरता वाढविण्याची, अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्याची गरजही संशोधकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये  यासंदर्भात बोलताना विद्यापीठाच्या संशोधिका प्रा. साराह लिप्सन म्हणाल्या, की सर्वेक्षणातील एकूण विद्यार्थ्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य किंवा चितेंच्या विकाराची लक्षणे आढळली. या संशोधनाने विद्यापीठांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न ध्यानात घेणारी यंत्रणा आखण्याची गरज अधोरेखित केली आहे. शिक्षकांनी डेडलाइनबाबत लवचिक असण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, केवळ परीक्षेतील गुण हेच क्षमता दर्शविण्याचे एकमेव साधन नसल्याचेही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ध्यानात आणून द्यायला हवे. शिक्षकांनी सकाळी नऊ वाजता किंवा मध्यरात्री गृहपाठ देण्याऐवजी दुपारी पाचपर्यंत तो दिल्यास विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यात मदत होईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे रात्रीचे जागरण टळून ते व्यवस्थित झोपू शकतील. छोट्या वर्गामध्ये शिक्षक थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोचून विचारपूस करू शकतात. मोठ्या वर्गांत ई-मेल सारख्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकतात, याकडेही प्रा. लिप्सन यांनी लक्ष वेधले.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा कोरोनामुळे आपल्या नजीकच्या व्यक्तीला गमावलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आर्थिक ताणाचा अधिक सामना करावा लागू शकतो. यातून विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊन शैक्षणिक कामगिरी खालावू शकते.  - प्रा. साराह लिप्सन, संशोधिका, बोस्टन विद्यापीठ जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ६६ टक्के - एकटेपणा जाणवणारे विद्यार्थी ८३ टक्के - शैक्षणिक कामगिरी खालावलेले विद्यार्थी नैराश्याची कारणे कोरोनाची साथ सोशल मीडियाचा वाढता प्रभाव राजकीय अस्थिरता यशस्वी करिअरच्या चुकीच्या संकल्पना Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aG99cM

No comments:

Post a Comment