मुला-मुलीचं लग्नही पाहता आलं नाही; पोट भरण्यासाठी जंगलात गेला अन् घरच्यांनी फोडला एकच हंबरडा बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : सरपणासाठी जंगलात गेलेल्या एका शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृत शेतमजुराचे नाव दत्तू रामचंद्र मडावी (वय ५५) आहे.  हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप बल्लारपूर तालुक्‍यातील मानोरा वनपरिक्षेत्रातील मानोरा येथील दत्तु मडावी बुधवारी शेताजवळील जंगलात सरपणासाठी गेले होते. सरपण गोळा करताना वाघांनी अचानक हल्ला करून त्यांना ठार केले. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर त्यांना फरफटत नेले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे रात्री गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, काहीच पत्ता लागला नाही. गुरुवारी वनविभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. वनविभाग व पोलिसांनी शोधमोहीम राबविली. तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत व एका मुलाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली. मृताच्या मुलामुलीचे लग्न ठरले होते. लग्नाची तयारीही सुरू होती. याच परिसरात काल, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीस्वारांना मार्गात दोन वाघ दिसले होते.  हेही वाचा - हृदयद्रावक! एकलुता एक मुलगा ऑटोने प्रवाशांना घेऊन गेला, एक फोन वाजला अन् सर्वच संपलं बिबट्याचा बालकावर हल्ला - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्‍यातील मथुरानगर येथे घरी झोपलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता.४) रात्री घडली. विकास विजय ब्राह्मण असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.  ढाणकी शहर व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकरी व शेतमजूर भयभीत झालेले आहेत. बिबट्याने गाय, वासरू, कालवड, मेंढी आदींचा यापूर्वी फडशा पाडला आहे. कृष्णापूर परिसरात गायीची शिकार केली होती. दोन दिवसांपूर्वी करंजी शिवारातील छबूराव यांच्या शेतातील वासराचा फडशा पाडला. यापूर्वी मथुरानगर येथे एका व्यक्तीवर हल्ला केला. त्यात तो व्यक्ती बचावला. शेळ्यांच्या गोठ्याजवळ जागल करीत असलेल्या विकास विजय ब्राह्मण याच्या डोक्‍याला पकडून बिबट्याने ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मुलगा जोरात ओरडल्याने आईवडील व शेजारी मदतीसाठी धावून आले. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत सानप व वनमजूर राजू देवकते, दाभाडे, राहुल देवकते घटनास्थळी हजर झाले. सदर मुलाला ढाणकी येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.  संपादन - भाग्यश्री राऊत Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, February 4, 2021

मुला-मुलीचं लग्नही पाहता आलं नाही; पोट भरण्यासाठी जंगलात गेला अन् घरच्यांनी फोडला एकच हंबरडा बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : सरपणासाठी जंगलात गेलेल्या एका शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृत शेतमजुराचे नाव दत्तू रामचंद्र मडावी (वय ५५) आहे.  हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप बल्लारपूर तालुक्‍यातील मानोरा वनपरिक्षेत्रातील मानोरा येथील दत्तु मडावी बुधवारी शेताजवळील जंगलात सरपणासाठी गेले होते. सरपण गोळा करताना वाघांनी अचानक हल्ला करून त्यांना ठार केले. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर त्यांना फरफटत नेले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे रात्री गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, काहीच पत्ता लागला नाही. गुरुवारी वनविभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. वनविभाग व पोलिसांनी शोधमोहीम राबविली. तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथे पाठविण्यात आला. घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत व एका मुलाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली. मृताच्या मुलामुलीचे लग्न ठरले होते. लग्नाची तयारीही सुरू होती. याच परिसरात काल, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीस्वारांना मार्गात दोन वाघ दिसले होते.  हेही वाचा - हृदयद्रावक! एकलुता एक मुलगा ऑटोने प्रवाशांना घेऊन गेला, एक फोन वाजला अन् सर्वच संपलं बिबट्याचा बालकावर हल्ला - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्‍यातील मथुरानगर येथे घरी झोपलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता.४) रात्री घडली. विकास विजय ब्राह्मण असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.  ढाणकी शहर व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकरी व शेतमजूर भयभीत झालेले आहेत. बिबट्याने गाय, वासरू, कालवड, मेंढी आदींचा यापूर्वी फडशा पाडला आहे. कृष्णापूर परिसरात गायीची शिकार केली होती. दोन दिवसांपूर्वी करंजी शिवारातील छबूराव यांच्या शेतातील वासराचा फडशा पाडला. यापूर्वी मथुरानगर येथे एका व्यक्तीवर हल्ला केला. त्यात तो व्यक्ती बचावला. शेळ्यांच्या गोठ्याजवळ जागल करीत असलेल्या विकास विजय ब्राह्मण याच्या डोक्‍याला पकडून बिबट्याने ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मुलगा जोरात ओरडल्याने आईवडील व शेजारी मदतीसाठी धावून आले. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत सानप व वनमजूर राजू देवकते, दाभाडे, राहुल देवकते घटनास्थळी हजर झाले. सदर मुलाला ढाणकी येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.  संपादन - भाग्यश्री राऊत Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cIQwGw

No comments:

Post a Comment