सभेच्या स्वरूपावरून गोंधळ;महापालिकेत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचा ठिय्या  पुणे - महापालिकेची सर्वसाधारण सभा (जीबी) ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात (ऑफलाइन) भरवून, तिचे कामकाज करण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांत सोमवारी वाद घडला. सभा घेण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी महापौरांच्या दालनात ठिय्या मांडला आणि त्याचवेळी गोंधळही उडाला.  सभा घेण्यास परवानगी देण्याबाबत राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करूनही मागणीकडे काणाडोळा झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. पुणे महापालिकेत सोमवारी (ता. ८) केवळ एकच सभा ऑफलाइन घेण्याच्या आदेशाचा उद्देश काय, अशी विचारणा करीत मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकांसाठी आदेश नसल्याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले.  Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​ कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दहा महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन होत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सभा ‘ऑफलाइन’ घेण्याचा विरोधकांचा आग्रह आहे. कोरोना काळातील खर्चाचा तपशील लपविण्यासाठी सत्ताधारी पक्ष सभा ऑनलाइन घेऊन त्या तहकूब करीत असल्यासंबंधीच्या तक्रारी विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्या होत्या. तिची दखल घेत, सभा ऑफलाइन घेण्याच्या सूचना पवार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी (ता. ८) सभा ही ऑफलाइन घेण्याचा आदेशही राज्य सरकारने काढला. त्यानुसार विरोधकांनी एकत्र येऊन सभेला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही सभा ऑनलाइन होत असल्याचे कळताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनाकडे धाव घेऊन, ऑफलाइन सभा घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा तिथे ठिय्या मांडून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. तेव्हा महापौर बसलेल्या दालनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांच्यासह या तिन्ही पक्षांचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सरकारच्या आदेशाबाबत शंका  कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा आदेश राज्याच्या नगरविकास खात्याचा आहे. मात्र, सभा ऑफलाइन घेण्याबाबतचा आदेश राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढल्याचा मुद्दा भाजप नेत्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे सभा घेण्याचा आदेश हा राज्यातील सर्व महापालिकांसाठी का नाही. पुणे महापालिकेला एकच सभा ऑफलाइन घेण्याचा आदेश का, असा प्रश्‍न विचारत महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सरकारच्या आदेशाबाबत शंका उपस्थित केली. सभेचे स्वरुप ठरले असताना ती ऑफलाइन घेण्याचा आदेश रविवारी मिळाला. त्यामुळे नियोजनात बदल शक्य नव्हता, असे बिडकर यांनी स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सर्वसाधारण सभेचे कामकाज होईल, याबाबतची कल्पना विरोधकांना देण्यात आली होती. तशी यंत्रणा नेमून कामही सुरू झाले. तरीही महापौर दालनात गोंधळ घातला गेला. हा राजकीय स्टंट आहे. मात्र, यापुढच्या सभा ऑफलाइन घेण्याबाबतचा नगरविकास खात्याचा लेखी आदेश येईपर्यंत ऑनलाइनच सभा होतील.  - मुरलीधर मोहोळ, महापौर  कोरोना काळातील अपयश आणि विशेषतः गैरव्यवहार लपविण्यासाठीच भाजप नेते सभेत चर्चा करीत नाहीत. सभा ऑफलाइन घेण्याचा आदेश न पाळून भाजपने लोकशाही पायदळी तुडवली आहे.  - चेतन तुपे, नगरसेवक, आमदार  पुणे : दोन तालुके वगळता सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी ठरल्यानुसारच!​ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

सभेच्या स्वरूपावरून गोंधळ;महापालिकेत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचा ठिय्या  पुणे - महापालिकेची सर्वसाधारण सभा (जीबी) ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात (ऑफलाइन) भरवून, तिचे कामकाज करण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांत सोमवारी वाद घडला. सभा घेण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी महापौरांच्या दालनात ठिय्या मांडला आणि त्याचवेळी गोंधळही उडाला.  सभा घेण्यास परवानगी देण्याबाबत राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करूनही मागणीकडे काणाडोळा झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. पुणे महापालिकेत सोमवारी (ता. ८) केवळ एकच सभा ऑफलाइन घेण्याच्या आदेशाचा उद्देश काय, अशी विचारणा करीत मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकांसाठी आदेश नसल्याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले.  Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​ कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दहा महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन होत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सभा ‘ऑफलाइन’ घेण्याचा विरोधकांचा आग्रह आहे. कोरोना काळातील खर्चाचा तपशील लपविण्यासाठी सत्ताधारी पक्ष सभा ऑनलाइन घेऊन त्या तहकूब करीत असल्यासंबंधीच्या तक्रारी विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्या होत्या. तिची दखल घेत, सभा ऑफलाइन घेण्याच्या सूचना पवार यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी (ता. ८) सभा ही ऑफलाइन घेण्याचा आदेशही राज्य सरकारने काढला. त्यानुसार विरोधकांनी एकत्र येऊन सभेला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही सभा ऑनलाइन होत असल्याचे कळताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनाकडे धाव घेऊन, ऑफलाइन सभा घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा तिथे ठिय्या मांडून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. तेव्हा महापौर बसलेल्या दालनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांच्यासह या तिन्ही पक्षांचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा सरकारच्या आदेशाबाबत शंका  कोरोनाच्या ‍पार्श्‍वभूमीवर सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा आदेश राज्याच्या नगरविकास खात्याचा आहे. मात्र, सभा ऑफलाइन घेण्याबाबतचा आदेश राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढल्याचा मुद्दा भाजप नेत्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे सभा घेण्याचा आदेश हा राज्यातील सर्व महापालिकांसाठी का नाही. पुणे महापालिकेला एकच सभा ऑफलाइन घेण्याचा आदेश का, असा प्रश्‍न विचारत महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सरकारच्या आदेशाबाबत शंका उपस्थित केली. सभेचे स्वरुप ठरले असताना ती ऑफलाइन घेण्याचा आदेश रविवारी मिळाला. त्यामुळे नियोजनात बदल शक्य नव्हता, असे बिडकर यांनी स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सर्वसाधारण सभेचे कामकाज होईल, याबाबतची कल्पना विरोधकांना देण्यात आली होती. तशी यंत्रणा नेमून कामही सुरू झाले. तरीही महापौर दालनात गोंधळ घातला गेला. हा राजकीय स्टंट आहे. मात्र, यापुढच्या सभा ऑफलाइन घेण्याबाबतचा नगरविकास खात्याचा लेखी आदेश येईपर्यंत ऑनलाइनच सभा होतील.  - मुरलीधर मोहोळ, महापौर  कोरोना काळातील अपयश आणि विशेषतः गैरव्यवहार लपविण्यासाठीच भाजप नेते सभेत चर्चा करीत नाहीत. सभा ऑफलाइन घेण्याचा आदेश न पाळून भाजपने लोकशाही पायदळी तुडवली आहे.  - चेतन तुपे, नगरसेवक, आमदार  पुणे : दोन तालुके वगळता सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी ठरल्यानुसारच!​ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cTtCfz

No comments:

Post a Comment